आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
Zombies सर्वांनाच माहित असतील याबद्दल शंका नाही. त्यांच्यावर अनेक हॉलीवूड चित्रपट, तसेच गेम्स उपलब्ध आहेत. हे Zombies तसे भीतीदायक. मेलेला माणूस पुन्हा जिवंत होऊन त्याला मिळालेले नरभक्षकाचे रूप म्हणजे Zombies होय.
अश्या या Zombies बद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जातात. कोणाचा त्यांच्या अस्तित्वावर विश्वास आहे तर कोणी म्हणतं की ही केवळ एक काल्पनिक गोष्ट आहे. आज आपण याच Zombies नामक कल्पनेचा इतिहासात काही संबंध सापडतो का ते पाहणार आहोत.
Zombies चा उगम
मेलेला माणूस पुन्हा जिवंत होणे ही कल्पना तशी हजारो वर्षे जुनी आहे. अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये या कल्पनेशी निगडीत विधी, परंपरा अस्तित्वात होत्या हे आढळून आले आहे.
बहुधा ही देखील एक प्रकारची अंधश्रद्धा असावी आणि आजच्या प्रमाणे त्या काळी देखील काही बुवा वगैरे असावेत जे लोकांना अंधश्रद्धेच्या नावाखाली स्वत:च्या नियंत्रणात ठेवत असावेत. यातूनच त्यांनी Zombies ही संकल्पना स्वत:हून निर्माण केल्याचे नाकारता येणार नाही.
Zombies हा शब्द पश्चिमी आफ्रिकी किंबबुंडू भाषेतील ‘nzambi’ या शब्दापासून उत्त्पन्न झाल्याचे अनेक जाणकारांचे मत आहे. ‘nzambi’ चा अर्थ आहे सर्पदेव किंवा आत्मा! काही प्राचीन ग्रंथांमध्ये असे उल्लेख आहेत की, Zombie हे एक मृत शरीर असते जे काळ्या जादूच्या सहाय्याने पुन्हा जिवंत केले जाते.
अश्मयुगातले Zombies
Zombies चा मागोवा आपल्याला अश्युगामध्ये देखील घेऊन जातो. त्याकाळी एखाद्या मृत शरीराला जमिनीत पुरल्यावर तो पुन्हा जिवंत होऊन बाहेर येऊ नये म्हणून त्याच्या थडग्यावर दगड ठेवले जायचे, जेणेकरून समजा एखाद शरीर Zombie मध्ये परावर्तीत झाले तर त्यांना थडगे खोदून बाहेर येणे कठीण व्हावे!
सिरीयामध्ये उत्खनन करताना १०,००० वर्षे जुने सांगाडे सापडले होते. हे सांगाडे पूर्णपणे ठेचून टाकण्यात आले होते.
युरोप आणि पूर्व भागातील काही संस्कृतींमध्ये एक प्रथा होती की ते मृत शरीराला पूर्णपणे फाडून टाकायचे आणि त्या शरीरातील हाडे, सांगाडे बाहेर काढून, ते पूर्णपणे ठेचून मग पुरून टाकायचे. या प्रथेला दुजोरा देणारे अनेक पुरावे देखील उत्खनन करताना सापडले आहेत, तसेच अनेक ठिकाणी असे ठेचून काढले सांगाडे आढळून आले आहेत.
जाणकारांच्या मते या प्रथेतून अश्मयुगीन काळच्या मानवाला असलेली एक भीती स्पष्ट होते ती म्हणजे- त्यांना वाटत होते की मृत शरीरे पुन्हा जिवंत होऊन मानवजातीला धोका पोहचवू शकतात.
प्राचीन ग्रीक Zombies
१९८० साली ग्रीकमध्ये उत्खनन करताना काही सांगाडे आढळून आले. या सांगाड्यांना दगड आणि इतर वजनदार गोष्टींच्या सहाय्याने पूर्णपणे आच्छादून टाकले होते.
या उत्खननामध्ये एका ८-१३ वर्षांच्या मुलाचा सांगाडा आढळून आला, ज्यावर पाच भलेमोठे दगड लावून ठेवले होते. यावरून हा दावा सिद्ध झाला की प्राचीन काळी ग्रीक संस्कृतीमध्ये मृत शरीराला दगड आणि इतर वजनदार गोष्टींनी आच्छादून मगच पुरण्यात येई. जेणेकरून ते मृत शरीर पुन्हा जिवंत होऊन थडगे फोडून बाहेर येऊ नये.
प्राचीन ग्रीक संस्कृतीमध्ये असा समज होता की ज्यांनी आत्महत्या केल्या आहेत, ज्यांचा खून झाला आहे किंवा ज्यांच्यावर अत्याचार झाला आहे, असे लोक मेल्यानंतरही पुन्हा जिवंत होऊ शकतात आणि आपल्यावरच्या अन्यायाचा बदला घेऊ शकतात.
जगभरातील Zombies उल्लेख
नॉर्ज दंतकथेअध्ये draugr या संकल्पनेचा उल्लेख आढळतो. draugr म्हणजे मेलेला माणूस पुन्हा जिवंत होऊन चालू लागणे. त्यांच्या मते draugr हे थडग्यातच राहतात, पण त्यांच्यासोबत झालेल्या वाईट गोष्टींचा बदला घेण्यासाठी ते थडग्यातून बाहेर पडतात.
जर त्यांनी एखाद्याचा घोट घेतला, तर तो व्यक्ती देखील त्यांच्यासारखाच draugr होतो. draugr त्यांच्या मार्गात येणाऱ्या व्यक्तींना हातोहात मारून टाकतात किंवा त्यांना कच्चं खाऊन टाकतात. या draugr कडे दैवी शक्ती देखील असतात असे यांचे म्हणणे!
चीनमध्ये देखील Jiang Shi नावाची संकल्पना आढळते. हे Jiang Shi म्हणजे Zombie आणि Vampire याचं संयुक्त रूप असतात. ज्यांचा खून झाला आहे किंवा ज्यांनी आत्महत्या केली आहे ते लोक Jiang Shi बनतात.
रोमन इतिहासामध्ये Strigoi ही Zombies शी निगडीत संकल्पना आढळते. हे Strigoi म्हणजे मृत होऊन जिवंत झालेले Vampire असतात. जे रक्त पितात आणि प्राण्याचे रूप घेतात. ज्यांच्या काही इच्छा अतृप्त राहिल्या असतील ते लोक Strigoi होतात.
जे लग्न न होता मृत पाव्याचे ते देखील Strigoi बनू नये म्हणून त्यांच्या मृत शरीराचे त्यांच्याच वयाच्या एखाद्या व्यक्तीशी लग्न लावून दिले जायचे, जेणेकरून तो Strigoi बनू नये.
आफ्रिकेच्या हैती मधील Zombies ची संकल्पना पूर्णत: वेगळी आहे. त्यांचे Zombies हे शरीर नसलेले म्हणजे एक प्रकारे आत्मा असतात. जगभरात Zombie ची संकल्पना पसरली ती आफ्रिकेमधीलच Voodoo धर्मामुळे.
या धर्माचे लोक हे गुलाम होते. त्यामुळे ते जेथे जायचे तेथे आपल्या धार्मिक विधींचा, कल्पनांचा अप्रत्यक्षपणे प्रसार करायचे.
ज्यांचा मृत्यू नैसर्गिक नाही असे सर्व लोक पुन्हा जिवंत होतात असा या धर्माचा समज होता. अश्यावेळी काळ्या जादूची जाण असणारा एखादा मांत्रिक या मृत शरीरांच्या आत्म्यांना बरणीमध्ये कैद करायचा आणि त्या माध्यमातून त्यांच्या मृत शरीरांवर नियंत्रण ठेवायचा.
Voodoo धर्मामध्ये या मांत्रिकांना फारच मानाचे स्थान होते. कारण त्यांना Zombies ची बिलकुल भीती वाटायची नाही, उलट Zombies त्यांची आज्ञा पाळायचे. काही मांत्रिक हे चांगले असयाचे, तर काही आपल्या या विद्येचा उपयोग करून Zombies च्या माध्यमातून वाईट कामे करायचे.
आधुनिक काळात Zombies हा शब्द १८१९ साली पहिल्यांदा इंग्रजी भाषेमध्ये वापरला गेला. Robert Southey या कवीने “History of Brazil” हे पुस्तक लिहिले. त्यानंतर जवळपास एक शतकानंतर W.B. Seabrook यांनी त्यांच्या “The Magic Island” या रहस्यमयी कादंबरीमधून Zombies ही संकल्पना अमेरिकेपुढे आणली. त्यानंतर ३ वर्षांनी “White Zombie” हा Zombies वर आधारित पहिला वाहिला चित्रपट १९३२ साली प्रदर्शित झाला.
तर अश्याप्रकारे Zombies ही संकल्पन पिढ्यान पिढ्या पुढे येत आज २१ व्या शतकामध्ये आली आहे. आजकालच्या Zombies ना चांगले आधुनिक स्वरूप मिळाले आहे. त्यावर आधारित अनेक मनोरंजनात्मक चित्रपट देखील आले आहेत आणि येत आहेत.
आज Zombies या संकल्पनेवर डिजिटल इंडस्ट्रीचा जो काही डोलारा उभा आहे तो तब्बल ६ बिलियन डॉलरचा आहे.
Zombies खरंच आहेत की नाहीत याबद्दल ठोस काही सांगणे कठीण, पण त्यांच्या या संकल्पनेचा मनुष्याने मात्र आपल्या फायद्यासाठी आणि मनोरंजनासाठी जो काही वापर करून घेतला आहे तो वाखाणण्याजोग आहे हे मात्र नक्की!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.