Site icon InMarathi

कॅमेऱ्यात उत्तमरीत्या फोटो टिपण्यासाठी पूर्वापार वापरल्या जाणाऱ्या “फ्लॅशलाईटचा” रंजक इतिहास!

flashlight fatured inmarathi

freepik,com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

घरात कधी अगदी जुने‌ अल्बम पाहीले आहेत का? अगदी एका ठराविक पोजमध्ये बसलेले आजी आजोबा, दोन वेण्या घातलेल्या आत्या.. अगदी चौकटी चौकटीचे पत्त्यांसारखे छोटे छोटे फोटो!

अगदी ३०- ४० वर्षांनीही ते अजून टवटवीत वाटतात ना? मग आलेले रंगीत फोटो.. ते आपलं लहानपण दाखवतात. थोडीशी सुधारणा!

लग्नासाठी ताईचा स्टुडीओत नेऊन काढलेला फोटो..किंवा वहिनीचा दाखवायला आणलेला टिपीकल फोटो…पुढं स्टुडीओत आपलेच फोटो काढायला गेल्यावर तिथं मांडलेल्या छत्र्या, मोठे मोठे फोकस असलेले लाईट, मग रोलवाला कॅमेरा.

 

olx.in

 

मग डिजीटल कॅमेरा,डी एस एल आर कॅमेरा असा प्रवास करत फोटो आता मोबाईल कॅमेऱ्यापाशी येऊन थांबले आहेत.

ना रोलची कटकट ना फोटो बिघडले म्हणायची तक्रार. पण तुम्हाला माहिती आहे का हा रंजक प्रवास कसा झाला?

सर्वसाधारणपणे मानलं जातं की, १८२६ साली जगातला पहिला फोटो घेतला गेला. त्यावेळी प्रकाश परावर्तित करण्यासाठी एका विशिष्ट प्रकारचं डांबर वापरलं गेलं होतं.

त्याला बिटमॅन ऑफ जूडी म्हणून ओळखलं जात होतं. तो काढलेला फोटो सर्वात पहिला नॅचरल म्हणजे आजकाल आपण ज्याला कँडीड म्हणतो तसा स्वाभाविक प्रकाशात काढलेला फोटो होता.

नंतर फोटोग्राफरनी वेगवेगळ्या प्रकारच्या कृत्रिम प्रकाशाचा वापर करून खूप वेगवेगळे फोटो काढले. तो सारा प्रवास एका साध्या लाईटपासून, LED पर्यंत कसा झाला…

जुन्या सिनेमात आठवतो का.. तो फोटोग्राफर फोटो काढताना गळ्यात कॅमेरा अडकवायचा. त्याला एक ट्रे असायचा. तो फोटो काढायचा जोरदार फ्लॅश उडायचा.. फोटो काढला की लगेचच फोटोंची प्रिंटपण यायची!

त्यासाठी फ्लॅश पावडर वापरली जायची. ही पावडर म्हणजे metallic fuel व oxdizer यांचं मिश्रण होतं. हे शोभिवंत दारुकाम आणि थिएटरमध्ये वापरलं जात होतं.

 

petapixel.com

 

ही फ्लॅश पावडर वापरणं धोकादायक होतं. चुकून जरी काही इकडं तिकडं झालं तर फोटोग्राफरचा चेहरा भाजण्याची शक्यता होतीच.

हातात दिवाळीतल्या फटाक्यांमधील पाऊस उडवायचं धाडस अंगाशी आलेले कुणी आठवत असतीलच… तो पाऊस वर उडण्याऐवजी हातातच फुटला आणि ती जळती दारु हात भाजून गेली…अगदी तसाच धोका इथंही होता.

असंच असतं, गरज ही शोधाची जननी आहे. सुरक्षेच्या कारणास्तव नवा शोध आवश्यक होताच. मग आले फ्लॅश लाईट!

पाॅल बायरनी २० व्या शतकाच्या सुरुवातीला फ्लॅश लाईटची कल्पना सत्यात उतरवली. ते डिझाईन त्यांनी बनवलं त्यात कोरडे सेल वापरुन ऊर्जा साठवली होती आणि फ्लॅश पावडर उत्प्रेरक म्हणून वापरतच होते.

हे फ्लॅश लाईट कॅमेऱ्याच्या झडपेला जोडलेले असत. जेंव्हा फोटोग्राफर फोटो घ्यायचा तेंव्हा हे लाईट लागत. एकाच वेळी अनेक कॅमेरे हा फ्लॅश लाईट वापरू शकत. पण यातही धोका होताच.

 

faculty.trinity.edu

 

पावडरच्या तुलनेत फक्त थोडासा कमी झाला होता इतकच. काहीजण जखमी झाले..कुणी मृत्युमुखी पडले.

मग त्यावरही दुसरा पर्याय शोधला गेला. फ्लॅश पावडर ऐवजी कृत्रिम प्रकाशयोजना करण्याचा पर्याय विचाराधीन झाला.

१९२७ साली फ्लॅश बल्ब बनवण्याचा प्रयत्न केला. GE या कंपनीला ते श्रेय जातं. सतत वेगवेगळे प्रयोग करत त्यांनी फ्लॅश बल्ब बनवला. पूर्वीच्या त्रुटी कमी करत करत साधारण धोका कमी होईल असे फ्लॅश बल्ब तयार करण्यात उत्पादक यशस्वी झाले.

१९६० साली कोडॅकनं फ्लॅशक्यूब बनवली. मग या उत्पादकांनी पाच फ्लॅशक्यूब एकत्र बसवून काम करता येईल का याचाही विचार सुरू केला.

कोडॅक कंपनीने हा विचार केला तर दुसऱ्या कंपन्यांनी साधारण आठ ते दहा क्यूब एकत्र करुन फोटो काढताना सोपं करता येईल का याचाही विचार सुरू केला.

ज्यामुळे फोटोग्राफर एका वेळी असं सलग आठ दहा क्यूब्ज बसवून आठ दहा शाॅट्स घेऊ शकेल अशीही एक कल्पना सुचली. कोडॅक व्यतिरिक्त ही कल्पना राबवणाऱ्या कंपन्या होत्या- सिल्वेनिया, फिलीप्स, आणि पोलाराईड!!!

 

petapixel.com

 

यानंतरच सुचली ती फ्लॅशची कल्पना जी अजूनही सारे फोटोग्राफर सर्रास वापरतात. इलेक्ट्रॉनिक फ्लॅश ट्यूबची कल्पना होती १९३१ साली इलेक्ट्रीकल इंजिनिअर हेराॅल्ड इगर्टन यांची.

त्यांनी संशोधनाला सुरुवात केली होती. त्याचा फायदा असा झाला की, कॅमेरे स्वस्त झाले.आणि त्यांची किंमत सर्वसामान्य लोकांनाही परवडू लागली होती.

फोटो काढताना बटन दाबले असता, कॅमेऱ्यात असणारा कपॅसिटर साठवलेली ऊर्जा या फ्लॅशट्यूबमधून प्रसारीत करतो, ज्यात असलेला गॅस काही काळासाठी उजेड निर्माण करतो.

हा इतका उत्तम ताळमेळ असतो की बटण दाबले की पटकन् फ्लॅश झळाळतो. आजकाल वापरले जाणारे सर्व कॅमेरे आणि फ्लॅश याच तंत्रज्ञानाचा उपयोग करून बनवलेले आहेत.

मग ते कुठलेही.. स्टुडिओतील‌ असोत की‌ हौसेने खरेदी केलेले साधे कॅमेरे असोत. या कॅमेऱ्यात झेनाॅन हा वायू भरलेला असतो. तो हे फ्लॅश दीर्घकाळपर्यंत टाकू शकतो.

 

petapixel.com

 

आपल्या मोबाईलला मात्र LED फ्लॅश असतो. हे स्मार्टफोन कमी उजेडातही फ्लॅशच्या मदतीने उत्तम फोटो काढू शकतात ते याच तंत्रज्ञानाचा वापर करून!

हे फ्लॅश झेनाॅन फ्लॅश इतकेच प्रभावी असतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते खिशात मावतात. एरवी आपण कॅमेरा नेला तर फ्लॅश पाडणारं उपकरण वेगळं सोबत न्यावे लागतं.

पण स्मार्टफोनचा हाच फायदा…की जग मुठीत येतं!

पण त्यातली अजून एक वैशिष्ट्य असलेली सुधारणा म्हणजे, अॅपल, नोकीया या फोननी ड्यूएल कलर LED फ्लॅश विकसित करुन नविन स्मार्टफोनमध्ये ठेवला आहे!

ज्यामुळं कोणाताही फोटो काढत असताना एकंदरीत तो जास्तीत जास्त नैसर्गिक वाटावा. कृत्रिम वाटू नये.

 

dignited.com

 

एकंदरीत, कोणताही शोध अचानकपणे लागतो. त्यातील त्रुटींचं निराकरण करत करत आपल्याला उत्तमोत्तम तंत्रज्ञान वापरायला मिळतं.

आज आपण सहजासहजी मोबाईल वापरुन फोटो काढतो पण इथंवर यायचा तंत्रज्ञानाचा रस्ता किती वळणावळणांनी आला आहे बघा! हीच तंत्रज्ञानाची कमाल..सुधारणांची भरारी!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version