' गुन्हेगारी विश्व ढवळून काढणाऱ्या विकास दुबेची खरी काळीकुट्ट बाजू! – InMarathi

गुन्हेगारी विश्व ढवळून काढणाऱ्या विकास दुबेची खरी काळीकुट्ट बाजू!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कानपूर चकमकी प्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबे याला ९ जुलैला मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये अटक करण्यात आली.

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये त्याच्या बंदूकधारकांनी आठ पोलिसांवर हल्ला केल्यानंतर एका आठवड्यात गँगस्टर विकास दुबे याला अटक करण्यात आली.

विकास दुबे याला पकडण्यासाठी पोलिसांच्या पाठलागात उत्तर प्रदेश, हरियाणा आणि मध्य प्रदेश अशी तीन राज्ये सामील होती. जिथे त्याला उज्जैनमधील प्रसिद्ध महाकाळ मंदिरात जाताना अटक करण्यात आली.

विकास दुबे याच्यावर बीजे यांच्या हत्येसह इंडिया टुडेच्या अहवालानुसार २००१ मध्ये दुबे याने शिवली पोलिस स्टेशनमध्ये भारतीय जनता पक्षाच्या संतोष शुक्लाचा खून केला होता.

 

vikas dubey inmarathi
amarujala.com

 

अशा अनेक फौजदारी आरोपांची लांबलचक यादी त्याच्या नावावर आहे.

त्या महाकाळ मंदिराच्या आसपास असलेल्या एका दुकानदाराने त्याला ओळखल्यानंतर त्या परिसरातील उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांना त्याने सतर्क केल्यावर विकास दुबे याला अटक करण्यात आली.

विकास दुबे याने मंदिरासाठी नैवेद्य विकत घेतला आणि मंदिरातून बाहेर आल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडलं, पण त्याने बनावट आयडी पोलिसांना दाखवला आणि पोलिसांना ठोसा मारताना एका पोलिसाने त्याला धडक दिली.

आणि मग तिथेच त्याने आपली ओळख ओरडून सांगितली.

या विकास दुबेबद्दल काही महत्वाची माहिती :

विकास दुबेवर गुन्हे दाखल केलेत कानपूरचे चौबेपूर पोलीस ठाणे येथे! त्यांच गाव बिक्रू जिल्ह्यातील शिवली पोलिस ठाण्याचे अंतर्गत.

विकास दुबे याच्याविरूद्ध चौबेपूर पोलिस ठाण्यात साधारण ६० फौजदारी गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांमध्ये खून आणि खुनाचा प्रयत्न यांचा समावेश आहे.

 

vikas dubey 2 inmarathi
thequint.com

 

त्याचे जवळजवळ तीन दशकांतील कानपूरमधील गुन्हे आणि दहशतवादाचे रेकॉर्ड्स या पोलिस ठाण्याने दाखवले.

२ ते ३ जुलैच्या रात्री कानपूर जिल्हा मुख्यालयापासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या बिक्रू गावात पोलिस पथक विकास दुबेला अटक करण्यासाठी गेलं.

छापा मारणारा गट एका खून प्रकरणाचा तपास करत होते. या प्रकरणात विकास दुबे याच नावाचा आरोपी आहे.

विकास दुबे याला यापूर्वी बर्‍याचदा अटक करण्यात आली होती पण केलेल्या कोणत्याही ६० गुन्ह्यांमध्ये तो दोषी ठरलेला नाही.

या शतकाच्या शेवटी, विकास दुबे याला कानपूरमध्ये कायदा व सुव्यवस्थे बाबतीत केलेल्या एका गंभीर गुन्हयाकरता अटक करण्यात आली. पण त्याची राजकीय वर्तुळात ओळख असल्यामुळे तो त्यातून बाहेर पडला.

२००० मध्ये तो तुरूंगात होता आणि तरीही त्याने हत्येचा कट रचला आणि सगळ्यांना तो यशस्वीपणे आमलात आणून दाखवला. ज्याची हत्या केली त्यांचं नाव रामबाबू यादव होतं.

आणि इतकच नाही तर त्याच वर्षी विकास दुबे याला महाविद्यालयीन कर्मचार्‍यांच्या हत्येप्रकरणी आरोपी ठरविण्यात आलं होतं.

पण विकास दुबे याने अनेक जणांची हत्या केली आणि त्याला आरोपी म्हणून अनेकदा बोलवण्यात आल होत.

 

vikas dubey 3 inmarathi
indiatoday.in

 

या सर्व गुन्ह्यांपैकी सगळ्यात प्रसिद्ध असलेल्या भाजपचे संतोष शुक्ला यांची हत्या करण्यात आली. ते उत्तर प्रदेश सरकारचे राज्यमंत्री होते.

कॅम्पसमध्ये सुमारे २५ साक्षीदार उपस्थित असलेल्या पोलिस स्टेशनमध्ये त्यांची हत्या करण्यात आली.

संतोष शुक्ला खून खटल्याच्या वेळी यातले बहुतेक सर्व साक्षीदार पोलिस कर्मचारी विरोधी ठरले. विकास दुबे याला चार वर्षांनंतर २००५ मध्ये पुराव्यांच्या अभावामुळे आणि बाहेरील सहकार्यामुळे निर्दोष मुक्त केल.

निर्दोष सुटका होण्यापूर्वीच विकास दुबे कानपूरमधील आणखी एका खळबळजनक खून प्रकरणात सापडला होता. यावेळी जो माणूस मेला ते केबल्समध्ये काम करणारे सुप्रसिद्ध स्थानिक व्यापारी दिनेश दुबे होते.

स्थानिक लोकांच म्हणणे आहे की विकास दुबे यांनी १९९०च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात स्नैचिंग आणि दरोडेखोरीच्या गुन्ह्यात आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.

त्याने स्वतःची एक टोळी तयार केली आणि कानपूरची डॉन होण्याची त्याची इच्छा होती. जेव्हा त्याची पुरेशी बदनामी झाली, तेव्हा त्याला सरकारच्या प्रश्नांना आमंत्रण द्यायचं नव्हतं आणि स्वतःच रक्षण करण्यासाठी तो १९९५-९६ मध्ये बसपामध्ये रुजू झाले.

 

vikas dubey basapa inmarathi
newbust.in

 

अलीकडच्या काळात विकास दुबे याने राजकीय महत्त्वाकांक्षा विकसित केल्या होत्या. त्याला आमदार व्हायच होतं. त्याने जिल्हा पंचायत स्तरावरही पद भूषवलं. त्याची पत्नी जिल्हा पंचायत समितीत सदस्य झाली.

त्याच्या गावात मागचे १५ वर्ष मतदान झालं नाही. विकास दुबे जे नाव सांगतील ते सगळे सदस्य आणि लोक मान्य करायचे.

पोलिस कारवाई टाळण्यासाठी विकास दुबे याने आपल्या राजकीय संबंधांचा गैरफायदा घेतला आणि अतिरिक्त सुरक्षा ठेवण्यासाठी पोलिस विभागात “मित्र” बनवले.

हेच “मित्र” होते ज्यांनी त्याला एका खून प्रकरणात अटक करण्यासाठी पोलिस पथकाच्या हालचालीविषयी उलटसुलट टिप दिली.

विकास दुबेने पोलिस पथकावर हल्ला केला आणि एका डीएसपी रँक अधिकार्‍यांसाह आठ जणांचा जीव घेतला.

 

vikas dubey encounter inmarathi
inventiva.co.in

 

विकास दुबे याच्याशी संबंध असलेल्या आता साधारण २०० पोलिसांचा शोध सुरू आहे.

तर अशाप्रकारे हा कानपूरचा डॉनचं अखेर एन्काऊंटर १० जुलै रोजी उत्तर प्रदेश पोलिसांनी केलं, त्यात त्याला यमसदनी पाठवून त्याच्या कुकर्माच्या अध्यायाला पोलिसांनी पूर्णविराम लावला!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?