' सावधान: तुम्ही वापरत असलेलं ‘सॅनिटायझर’ डुप्लीकेट तर नाहीये ना? अशी घ्या टेस्ट – InMarathi

सावधान: तुम्ही वापरत असलेलं ‘सॅनिटायझर’ डुप्लीकेट तर नाहीये ना? अशी घ्या टेस्ट

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

काही आवश्यक गोष्टीची मार्केट मधली मागणी पूर्ण करताना काही कंपन्या कायम शॉर्टकट वापरतात. या उत्पादकांचा एकच हेतू असतो, तो म्हणजे सद्य परिस्थितीचा फायदा घ्यायचा आणि आपल्या कंपनीचा नफा वाढवायचा.

जसं की, काही कंपन्या या साबुदाणाच्या आकाराचे खडे सुद्धा तयार करतात अशी काही वर्षांपूर्वी बातमी होती. त्यासोबतच शेंगदाणा मध्ये सुद्धा त्याच रंगाचे आणि वजनाचे खडे तयार करून टाकले जातात हे सुद्धा आपण ऐकून आहोत.

हे प्रकार करत असताना या उत्पादकांना ज्या ग्राहकांमुळे, ते त्या बिजनेस मध्ये किती तरी वर्षांपासून आहेत यांचा विचार का येत नसेल हा एक संशोधनाचा विषय आहे.

“बेहेती गंगा मे हात धो लो” या हिंदी म्हणीप्रमाणे या लोकांची क्षणिक फायदा बघण्याची मानसिकता असते.

आता या वस्तूंमध्ये अजून एका गोष्टीची भर पडली आहे ती म्हणजे सध्याच्या अत्यावश्यक म्हणून घोषित करण्यात आलेल्या ‘सॅनिटायझर’ ची.

कोरोना पासून स्वतःला आणि फॅमिली ला वाचवण्यासाठी सामान्य माणूस जे काही शक्य आहे ते प्रयत्न करत आहे. सरकार शक्य तितक्या योजना राबवून कोरोना ला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

 

corona inmarathi 2
deccanherald.com

 

अटीतटीच्या या वेळी काही कंपन्या मात्र जास्त अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझर तयार करण्यात व्यस्त आहेत. या भेसळयुक्त सॅनिटायझरने तुमच्या हाताच्या त्वचेला इजा देखील पोहोचू शकते.

कोणतं सॅनिटायझर हे ओरिजनल आणि कोणतं भेसळयुक्त ओळखण्यासाठी काही सोप्या पद्धती मध्यंतरी इंडियन मेडिकल असोसिएशनने सांगितल्या आहेत.

‘न्यू नॉर्मल’ या जीवनपद्धती मध्ये सॅनिटायझर ही अत्यावश्यक वस्तू म्हणून सर्वमान्य झाली आहे.

 

sanitizer inmarathi
kipsinendeinstitute.ac.ke

 

ज्या हँड सॅनिटायझर मध्ये अल्कोहोल चं प्रमाण कमीत कमी ६०% आहे तेच फक्त वापरले गेले पाहिजेत, असे निर्देश वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने फार पूर्वीच दिले आहेत.

असं असताना ही काही कंपन्यांनी मागणी वाढल्यानंतर सॅनिटायझर चं उत्पादन सुरू केलं आणि स्पर्धेत गुणवत्तेकडे त्यांनी दुर्लक्ष केलं, हे सध्या बघायला मिळत आहे.

तुम्ही विकत आणलेलं सॅनिटायझर हे योग्य आहे की नाही हे चेक करण्यासाठी या तीन पद्धती आहेत :

 

१. टिश्यू पेपर टेस्ट :

 

tissue paper inmarathi
usatoday.com

 

ही टेस्ट करण्यासाठी एक टिश्यू पेपर घ्या आणि त्यावर मध्यभागी पेनाने एक सर्कल तयार करा. या सर्कल मध्ये सॅनिटायझर चे दोन थेंब ओता.

जर का तुम्ही तयार केलेलं हे सर्कल तसंच राहिलं आणि टिश्यू पेपर सुद्धा लगेच कोरडा झाला तर तुम्ही आणलेलं सॅनिटायझर हे उत्तम दर्जाचं आहे हे समजायला हरकत नाही.

पण, तेच जर का पेनाची शाई पसरली, सॅनिटायझर जर का टिश्यू पेपर वर पसरत असेल तर समजून घ्या, की त्या सॅनिटायझर मध्ये अल्कोहोल चं प्रमाण गरजेपेक्षा जास्त आहे आणि म्हणून ते सॅनिटायझर हे ‘fake’ आहे.

अशा सॅनिटायझर चा जास्त वापर केल्यास हाताच्या त्वचेला इजा होऊ शकते.

 

२. हेअर ड्रायर टेस्ट :

 

hair dryer test inmarathi
techradar.com

 

ही टेस्ट करण्यासाठी तुम्हाला एक हेअर ड्रायर आणि एका छोट्या बाउल ची गरज असेल. हँड सॅनिटायझर चे काही थेंब बाउल मध्ये ओता. त्या बाउल वरून हेअर ड्रायर सुरू करून काही सेकंदांसाठी फिरवा.

सॅनिटायझर हे पाच सेकंदाच्या आत वाळलं पाहिजे. जर का पाच सेकंदाच्या पेक्षा जास्त वेळ लागला आणि तरीही सॅनिटायझर हे वाळलं नाही, तर लक्षात घ्यावं की सॅनिटायझर हे ‘fake’ आहे.

 

३. कणिक टेस्ट :

 

Refined or White Flour-inmarathi
idealraw.com

 

हँड सॅनिटायझर हे चांगल्या दर्जाचं आहे की नाही हे तुम्ही कणिक टेस्ट ने सुद्धा चेक करू शकता. या साठी तुम्ही एका बाउल मध्ये थोडं गव्हाचं पीठ घ्या. त्यात हँड सॅनिटायझर चे काही थेंब टाका. कणिक मळण्याचा प्रयत्न करा.

जर का, तुम्हाला थोडा जास्त वेळ लागत असेल पीठ एकरूप करण्यासाठी, तर लक्षात घ्यावं की सॅनिटायझर हे चांगल्या दर्जाचं आहे.

जसं पिठामध्ये पाणी टाकल्यावर कणिक लगेच मळता येते, तसं जर का झालं तर लक्षात घ्यावं की, ते सॅनिटायझर हे ‘fake’ आहे.

हे उपाय करून तुम्ही आपण वापरत असलेला हँड सॅनिटायझर हा आरोग्यास हितावह आहे की नाही याची खात्री करून घेऊ शकता.

जर तुम्ही जिथे राहता, त्या भागात हँड सॅनिटायझर चा जर तुटवडा असेल तर  कोणत्याही साबणाने किंवा हँडवॉश ने २० सेकंद हात नक्की धुवा आणि कोरोनाला आपल्या घरात शिरण्यापासून रोखा.

आता आपण या लढाईच्या निर्णायक टप्प्यावर आहोत. आता कोणतीही हलगर्जी ही आपल्या सर्वांना महागात पडू शकते तेव्हा social distancing आणि कायम हात स्वच्छ ठेवा आणि त्यांना चेहऱ्या जवळ नेण्याचं टाळा ही नम्र विनंती आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?