Site icon InMarathi

मधमाश्या जपण्यासाठी ‘मॅकडॉनल्ड’ ने उचललेले हे पाऊल खूप कौतुकास्पद आहे!

honey bees Mcdonalds Inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मधमाशी किंवा कोणत्याही किड्याकडे बघताना आपल्याकडे एक तर भीतीची किंवा वैतागाची भावनाच नेहमी बघायला मिळते.

आपण प्राणीमात्रांबद्दल संवेदनशील आहोत याबद्दल शंका नाही. म्हणून तर आपल्याकडे कुत्रा, मांजर पाळणे हे सर्रास पहायला मिळतं.

काही घरांमध्ये आपल्याला पाळलेल्या प्राण्यांसाठी ‘आऊट हाऊस’ सुद्धा तयार केलेले दिसतात ज्यामध्ये हे प्राणी आपलं एक छोटं विश्व तयार करून रहात असतात.

 

news.faltupana.in

 

हे तर झालं आपल्या घरात पाळल्या जाणाऱ्या प्राण्यांबद्दल. यासोबतच, काही ऑफिसेस, शो रूम मध्ये आपल्याला एक फिश टँक सुद्धा बघायला मिळतो. ज्याची की वेळच्यावेळी आवश्यक ती काळजी घेतली जाते.

प्राणी प्रेमासोबतच शो रूम मध्ये फॅमिली सोबत आलेल्या लहान मुलांना ‘एंगेज’ ठेवणं हा एक अश्या गोष्टींचा व्यवसायिक हेतू असतो.

मधमाश्यांचं जगणं हे सध्या बाजारात आलेल्या नवीन किटकनाशकांमुळे अवघड होऊन बसलं आहे. प्रत्येक शहरात वाढणारी लोकसंख्या आणि शहराच्या सतत रुंदावल्या जाणाऱ्या सीमा यामुळे मधमाश्यांचा त्यांच्या अस्तित्वासाठीचा संघर्ष दिवसेंदिवस वाढतच आहे.

पेस्टीसाईड्स, डिझेल चा वाढता वापर यामुळे मधमाश्या ह्या दिवसागणिक कमी होत आहेत.

परिस्थिती अशीच राहिली तर, लवकरच आपण या जमातीला आणि पर्यायाने बऱ्याच वनस्पतींना ज्यांना या मधमाश्यांमुळे परागकण मिळत असतात त्यांना मुकणार असं चित्र दिसत आहे.

याशिवाय आइनस्टाईन ने सुद्धा त्याच्या एका थियरीमध्ये म्हंटलं आहे की जगातल्या सगळ्या मधमाशा मेल्या तर त्याच्या ४ वर्षानंतर सगळी माणसं मरतील, अर्थात ही एक थिअरी आहे तिला कोणत्याही पुराव्याची जोड अद्याप नाही!

 

twitter.com

 

तुम्ही कधी कोणत्या व्यवसायिकाने मधमाश्यांच्या एका ठिकाणी रहाण्याची सोय करण्यासाठी आपले पैसे खर्च करून कोणतं घर बांधल्याची बातमी ऐकली आहे का ? शक्यता कमीच असेल.

ही कमाल McDonald’s च्या स्वीडन मधील शो रूम ने करून दाखवली आहे.

McDonald’s च्या आउटलेट ची एक लाकडी छोटी प्रतिकृती त्यांनी तयार करून घेतली आहे. या जगातील सर्वात छोट्या McDonald’s आउटलेट चं नाव त्यांनी McHive असं ठेवलं आहे जे की फक्त मधमाश्यांसाठी तयार करण्यात आलं आहे.

McHive ही संकल्पना NordDDB या मार्केटिंग कंपनी ने प्रत्यक्षात आणली आहे. नावाप्रमाणेच, McHive ची साईज ही एखाद्या बॉक्स प्रमाणे आहे ज्यामध्ये मधमाश्या व्यवस्थित राहू शकतील.

 

twistedfood.co.uk

 

ह्या संकल्पने कडे McDonald’s च्या मधमाश्यांबद्दल असलेल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून बघितलं जात आहे.

McHive तयार करण्यासाठी काही प्रोफेशनल सुतारांची मदत घेण्यात आली.

एखाद्या खऱ्या आऊटलेट प्रमाणेच McHive ला सुद्धा take away चा काउंटर आहे, समोर बसण्यासाठी जागा आहे आणि खिडकीवर McDonald’s ची जाहिरात सुद्धा आहे.

सोबत दिलेल्या फोटोमधून तुम्हाला हे स्ट्रक्चर तयार करण्यासाठी किती बारकाईने काम करावं लागलं असेल याचा अंदाज येईल.

 

crafty.diply.com

 

McHive या संकल्पने सोबतच स्वीडन येथील बऱ्याच McDonald’s ने मधमाश्यांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. त्यांच्या आऊटलेट च्या छतावरील काही जागा त्यांनी मधमाश्यांसाठी राखीव ठेवली आहे जिथे ते राहू शकतात आणि त्यांची भरभराट होऊ शकते.

चांगल्या हेतूने सुरू केलेल्या कामाला सकारात्मक प्रतिसाद मिळतोच. याबाबतीत सुद्धा तेच झालं. स्वीडन मध्ये सुरू झालेला हा लोकल उपक्रम कधी ग्लोबल झाला हे कोणाच्या लक्षात सुद्धा आलं नाही.

आजकाल उपलब्ध असलेल्या सोशल मीडिया आणि विडिओ च्या माध्यमातून कोणतीही बातमी, संकल्पना ही एका मर्यादित जागेपूरती सीमित राहू शकत नाही.

स्वीडन च्या McDonald’s च्या पावलावर पाय ठेवून अजून किती तरी franchiese ने त्यांच्या आउटलेट समोर असलेल्या Lawn वर फुलांची झाडं लावली आहेत जेणेकरून मधमाश्यांना जगण्यासाठी आवश्यक ती जागा आणि खाद्य त्यांना सहज मिळेल.

दरम्यान, McDonald’s ने World Bee Day च्या निमित्ताने २० मे ला या McHive चा लिलाव करून त्याला १०००० US डॉलर ला विकल्याची बतमी मध्यंतरी प्रकाशीत करण्यात आली होती.

आणि ही रक्कम सेवाभावी संस्थेला देण्यात येईल अशी माहिती कंपनी ने प्रकाशित केली होती. हे छोटंसं घर येणाऱ्या काळात हजारो मधमाश्यांचं घर असेल असा विश्वास कंपनी ने व्यक्त केला आहे.

“आपल्याला मिळालेल्या निसर्गावर प्रत्येकाचा तितकाच अधिकार आहे” ही जर का एखाद्या व्यक्तीची किंवा कंपनीची विचारधारा असेल तर असे कित्येक उपक्रम सहज शक्य आहेत.

 

goodnewsnetwork.org

 

खरंतर आपण सध्या इतकं आपल्या विश्वात गुरफटून गेलो आहोत की ह्या अशा छोट्या छोट्या जीवांचं सुद्धा आपल्या जगण्यात योगदान आहे ते आपण विसरलोच आहोत!

आपल्यापैकी कित्येक लोकं वैयक्तिक पातळीवर अशी कामं करत असतातच पण मोठमोठ्या कंपन्यांनी, उद्योजकांनी ही अशी कामं केली की त्यांची समाजात आणखीन चर्चा होते!

हे साध्य करण्यासाठी प्रत्येकाने फक्त आपल्याला होणाऱ्या फायद्याच्या पलीकडे बघण्याची गरज आहे. McDonald’s सारखे अजून उद्योग समूह या दिशेने पावलं उचलतील अशी आशा करूयात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version