Site icon InMarathi

दारूचा अवैध धंदा आणि गाय – दारूबंदीच्या काळातील एक विचित्र कहाणी

cow shoes featured inmarathi

historybyzim.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

कोणत्याही गोष्टीची किंवा वस्तूची आवड ही कधी व्यसन बनते हे बऱ्याच लोकांना कळत नाही. व्यसन दूर करणे हे फार कठीण काम आहे. जसं की, आपल्या सर्वांना आजकाल मोबाईलच एका प्रकारचं व्यसनच लागलं आहे.

जर का थोडा वेळ कोणताही मेसेज आला नाही किंवा कोणतंही नोटिफिकेशन आलं नाही की अस्वस्थ होणारे लोक सुद्धा आहेत. पण हे निदान आपण मान्य करतोय.

आधीच्या काळात तर व्यसनासाठी काही पण करायला लोक तयार व्हायचे पण व्यसन सोडायचे नाहीत. व्यसन असल्याचं समर्थन करणारं एक वाक्य प्रचलित झालं होतं ते म्हणजे, “शौक बडी चीज है”.

तुम्ही जर का आशिकी २ हा सिनेमा बघितला असेल तर त्यामध्ये हिरो त्याच्या व्यसनामुळे त्याचं करिअर संपवतो. पूर्ण सिनेमात आपल्याला फक्त वेगवेगळ्या आकाराच्या बाटल्याच दिसत असतात.

अमिताभ बच्चन यांचा तर एक सिनेमा आहे एका व्यसनाधीन मुलाच्या आयुष्यावर ‘शराबी’.

 

thelallantop.com

 

मध्यंतरी लॉकडाऊन सुरू असताना आपण सर्वांनी बघितलं की, महसूल येत रहावा म्हणून सरकारने सर्वात आधी दारू ची दुकानं सुरू करण्याचे निर्देश दिले आणि मग तयार झल्या जवळपास १ किलोमीटर लांबीच्या रांगा या दुकानांसमोर.

आपल्याला असं वाटू शकतं की, ‘व्यसनासाठी काय पण’ ही वृत्ती फक्त भारतातच दिसते.

तर तसं नाहीये, आज आम्ही १९२० च्या दशकात अमेरिकेत दारू च्या व्यसनासाठी घडलेली एक सत्य घटनेची तुम्हाला माहिती देणार आहोत.

१९२० च दशक हे अमेरिकेसाठी बदल घडवणारं दशक म्हणून ओळखलं जातं. त्याला “Roaring 20’s” असं ही संबोधलं जातं.

त्याच दशकात अमेरिकेत जंगी पार्टी, दारू च्या विविध प्रकारांची वाढती विक्री ही बघायला मिळाली. याच दशकात अमेरिकन सरकारने त्यांच्या संसदेत दारूबंदीचा ठराव पास केला.

ज्यामुळे दारू तयार करणे, त्याची अवैध वाहतूक करणे, विक्री करणे या प्रत्येक गोष्टीवर सरकार कडून निर्बंध लावण्यात आले. याचा अपेक्षित तोच परिणाम झाला तो म्हणजे, या गोष्टीला कडाडून विरोध.

 

amzon.ca

 

एक वाट बंद केली की त्यातून पळवाट काढण्यात लोक हुशार असतात हे आपण जाणतोच.

तिथेही तेच झालं. काही लोकांनी स्वतःच्या घरातच दारू तयार करायला सुरुवात केली आणि त्याची अवैध विक्री सुद्धा सुरू केली. ह्या बनावटी दारू ला ‘bootlegging’ या नावाने ओळखलं जातं.

‘बूटलेगर्स’ हे वेगवेगळ्या क्लुप्त्या काढून पोलिसांपासून स्वतःला वाचवत असत. ते दारू लपवून ठेवायचे आणि ती दारू विकायचे.

बूटलेगर्स ला शोधून काढणे ही पोलिसांना पहिली प्रायोरिटी म्हणून सांगण्यात आली होती. दारू तयार करणे आणि त्याची अवैध वाहतूक करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आमलात आणल्या गेल्या.

ते म्हणतात ना, ‘माणूस हा आपल्या सर्वात आवडीची गोष्ट मिळवण्यासाठी सर्वात जास्त हुशार असतो’ याचाच प्रत्यय लोकांनी दिला.

पोलीस हे नेहमीच थोडी जरी हिंट मिळाली की धाड टाकून दारुसाठा जप्त करायची आणि त्या सापडलेला दारूसाठा नेहमीच लोकांसमोर आणून फेकून द्यायचे जेणेकरून त्यांचा मेसेज लोकांपर्यंत पोहोचेल.

 

history.howstuffworks.com

हे ही वाचा –

===

 

बूटलेगर्स हे पोलिसांच्या रडार वर होते. स्वतःला लपवण्यासाठी ते दारू तयार करायचं काम हे जंगलामध्ये करत असत जिथे की पोलीस येणं हे तितकं सहज नव्हतं.

काही ‘बूटलेगर्स’ हे सगळे बंधन झुगारून त्यांनी तयार केलेली दारू त्यांच्या शहर हद्दीच्या बाहेर जाऊन सुद्धा विकू लागले. पोलीस सुद्धा तितकेच हुशार आणि सतर्क होते.

ते या लोकांना त्यांच्या शुज चे ठसे follow करत ‘बूटलेगर्स’ पर्यंत पोहोचायचे. या गोष्टीवर काही तोडगा निघत नव्हता.

पण, ‘इच्छा तिथे मार्ग’ या म्हणी प्रमाणे बूटलेगर्स ला सुद्धा ‘cow shoes ‘ हा एक पर्याय सापडलाच.

Cow shoes हे नाव वाचून धार्मिक भावना दुखवण्याची गरज नाहीये.

हे नाव त्यांनी वापरलं कारण त्यांनी त्यांच्या नेहमीच्या शुज च्या खाली दोन लाकडी तुकडे जोडले होते ज्यामुळे त्यांची पायवाट ही कोणालाच ओळखू येणार नाही.

त्या शुज ला जर का मागच्या बाजूने बघितलं तर ते गायीच्या पायासारखेच दिसायचे. ज्याला आपण ‘खुर’ म्हणतो.

 

thevintagenews.com

 

त्यामुळे जेव्हा बूटलेगर्स आणि पोलीस यांच्यात चकमक व्हायची तेव्हा पोलिसांना बूटलेगर्स कुठे लपून बसले ह्या गोष्टीचा काहीच अंदाज यायचा नाही.

या युक्तीने बूटलेगर्स हे खूप वेळ पोलिसांपासून पळू शकले. पण प्रत्येक गोष्टीचा शेवट हा होतच असतो.

पोलिसांना या प्रकारचा एक बुट सापडला आणि बूटलेगर्सचं बिंग उघडं पडलं. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

कालांतराने असं लक्षात आलं की cow shoes ही मुख्य संकल्पना ही बूटलेगर्स यांची नव्हती. ही संकल्पना शेरलॉक होम्स या रहस्यमय कथाकाराच्या “The Adventure of the Priory School ” या कथेतून घेण्यात आला आहे.

मूळ कथेमध्ये गुन्हेगार हा गायीचं खुर हे घोड्यावर ठेवून द्यायचा जेणेकरून पोलिसांना घोडा कोण चालवत होतं याचा काही अंदाज येत नसे.

दारूबंदीच्या त्या काळात बूटलेगर्स आणि त्यांचे हे cow shoes हे फारच प्रसिद्ध झाले होते त्यांच्या हुशारी किंवा चलाखीमुळे. १९३३ मध्ये ही दारूबंदी अमेरिकेने उठवली.

पण, ‘मुनशाईन’ म्हणजेच घरी कोणत्याही परवानगी शिवाय दारू तयार करणं हे आजही अवैध आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे त्यावर सरकारला कोणताही कर लावता येत नाही.

 

pinterest.com

 

घरी तयार करण्यात येणाऱ्या दारू मध्ये अजून एक चूक असते ती म्हणजे त्यामध्ये अल्कोहोल चं प्रमाण खूप जास्त असतं जे की शरीराला अपायकारक असते.

त्यामुळे अंधत्व सुद्धा येऊ शकतं आणि प्राणघातक सुद्धा ठरू शकतं.

या घटनांतून एक लक्षात येऊ शकतं की, तुम्ही कितीही ‘स्मार्ट’ असलात तरीही पोलीस हे तुमच्या पेक्षा जास्त हुशार असतात आणि ते तुम्हाला पकडतातच. तेव्हा, ‘कायदे मे रहोगे, तो फायदे मे रहोगे’ हे कायम लक्षात ठेवावं.

 

हे ही वाचा –

===

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version