व्हिटॅमिन सी घेण्याची योग्य वेळ जाणून घ्या, ज्यामुळे शरीरासाठी जास्तीत जास्त फायदे होतील
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
फिटनेस आधीपासूनच मानवी जीवनातील अविभाज्य घटक आहे, परंतु या करोनासारख्या महामारीमुळे आपल्या सर्वांना त्याचं महत्त्व चांगल्या पद्धतीने कळालेलं आहे.
गेल्या काही महिन्यांपासून आपण व्हिटॅमिन ‘सी’ आपल्या आहारात जास्त प्रमाणात कसे घेता येईल याचा प्रयत्न करत आहोत, कारण निरोगी राहण्यासाठी व्हिटॅमिन सी सर्वात महत्त्वाचा घटक आहे.
यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तुम्ही निरोगी राहण्यासाठी व्हिटॅमिन सी नक्कीच घेत असाल, पण विशिष्ट वेळी व्हिटॅमिन सी चे सेवन केल्यामुळे तुम्हाला त्याचा अधिक फायदा होईल.
सध्याच्या परिस्थितीत संपूर्ण जगात करोना विषाणूने थैमान घातलेलं आहे. संपूर्ण जग सध्या दहशतीच्या सावटाखाली आहे. चीनमधून संपूर्ण जगभर हा विषाणू पसरलेला आहे.
–
हे ही वाचा – निरोगी राहण्यासाठी जर रोज व्हिटॅमिनच्या गोळ्या खात असाल तर थांबा, आधी ‘हे’ वाचा
–
या विषाणू पासून वाचण्यासाठी अनेक प्रकारचे सल्ले वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सामान्य नागरिकांना देण्यात येत आहेत.
यापैकीच एक सर्वमान्य सल्ला असा, की व्हिटॅमिन सीचे सेवन केल्यामुळे मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. आणि करोनापासून आपला बचाव करण्यासाठी व्हिटॅमिन सीचं मुबलक प्रमाणात सेवन करावं.
एका सर्वेक्षणानुसार, विचार केला तर लक्षात येईल, की संपूर्ण जगामध्ये ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारकशक्ती कमी आहे अशा व्यक्तींना या विषाणूची बाधा लवकर होते.
सध्या कोरोनाची भीती प्रत्येकाच्याच मनात आहे. त्यापासून वाचण्यासाठी जमतील ते सगळे उपाय सध्या घरबसल्या लोकं करत आहेत.
म्हणून, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सगळीकडे व्हिटॅमिन सी चा मुबलक प्रमाणात वापर केला जात आहे.
व्हिटॅमिन सी मुळे मानवी शरीराला अनेक फायदे होतात, आपली त्वचा देखील तजेलदार राहते आणि त्यासोबतच जर तुम्ही आजारी असाल, तर तुम्हाला लवकर बरं करण्यासाठी व्हिटॅमिन सी उपयोगी आहे.
सर्दी, स्वाइन फ्ल्यु ह्यांसारख्या आजारांना व्हिटॅमिन सी उत्तम पर्याय आहे. सर्दी कमी होणे, थंडी वाजणे कमी होणे ह्यांसारखे बदल व्हिटॅमिन सी मुळे होतात हे आधीच सिद्ध झाले आहे.
संत्री, मोसंबी, स्ट्रॉबेरी, लिंबू अशा पदार्थांमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं. या सोबतच इतरही अनेक पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळतात.
दैनंदिन आहारामध्ये या गोष्टींचा मोठ्या प्रमाणात वापर करावा, त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती बाहेरील विषाणूंचा नायनाट करेल.
फक्त तुमची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी नव्हे, तर काही दुर्धर आजारांवर देखील व्हिटॅमिन सी मुळे चांगल्या पद्धतीने उपचार होण्यास मदत होते, त्यामुळेच आपल्याकडे उपचारांना सोबतच व्हिटॅमिन सी देण्याची सुद्धा पद्धत आहे.
या व्हिटॅमिन सी मुळे तुमचे फक्त आजारच बरे होत नाहीत, तर तुमच्या शरीरात जर इतर काही आवश्यक घटकांची कमतरता असेल, ती पूर्ण करण्यासाठी सुद्धा व्हिटॅमिन सी तुम्हाला मदत करते.
व्हिटॅमिन सी मुळेच आपल्या शरीरातील रक्ताभिसरण योग्य पद्धतीने चालू राहतं, आपल्या मेंदूकडे जाणाऱ्या प्रवाहाला गती देण्याचे काम देखील व्हिटॅमिन सी करतं.
फक्त व्हिटॅमिन सी च नव्हे तर इतरही सर्व घटक मानवी शरीरासाठी अत्यंत गरजेचे आहेत.
व्हिटॅमिन सी सेवन करण्याची सर्वात चांगली वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही हे व्हिटॅमिन घ्यायला हवं.
तुम्ही जेवायच्या किंवा नाश्ता करायचा ३५ ते ४० मिनिटे आधी पाण्यासोबत हे व्हिटॅमिन सेवन करायला हवं. जर तुम्हाला सकाळी तुमच्या बिझी शेड्युलमुळे ते शक्य होणार नसेल, तर तुम्ही दिवसभरात केव्हा ही हे व्हिटॅमिन घेऊ शकता.
काळजी फक्त एवढीच घ्यायची, की तुमच्या जेवणाच्या आणि व्हिटॅमिन घेण्यामध्ये किमान दोन ते तीन तासाचं अंतर असायला हवं.
–
हे ही वाचा – आरोग्याला अत्यावश्यक ‘व्हिटॅमिन डी’ कोवळ्या उन्हाशिवायही मिळू शकतं, हे वाचा
–
जेणेकरून, व्हिटॅमिनचे सेवन केल्यानंतर ते चांगल्या पद्धतीने तुमच्या रक्तामध्ये शोषले जाईल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल.
यासोबतच तुम्ही दैनंदिन आहारामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असणाऱ्या भाजांचा, फळांचा समावेश करणं देखील तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.
व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात शरीरात जाईल तेवढं चांगलं असा देखील काही जणांचा समज असतो, त्यासाठी मग दिवसातून अनेक वेळेस व्हिटॅमिनचं सेवन केलं जातं.
मित्रांनो लक्षात घ्या, अशाप्रकारे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे, तुम्हाला त्याचा तोटा होऊ शकतो. त्यामुळे तुमचा आहार बघून, डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच व्हिटॅमिनच्या गोळ्या घ्या.
पूरक व्हिटॅमिनच्या गोळ्या रोजच्या रोज किंवा अनावश्यक असताना घेणे हे योग्य तर नाहीच, पण कधी कधी हानीकारक देखील ठरते.
जेव्हा तुम्ही आहार देखील पौष्टीक, चौरस घेऊन, वरून व्हिटॅमिनच्या गोळ्या देखील अनावश्यकपणे घेत राहाल, तर तुमच्या शरीरात अतिरिक्त व्हिटॅमिन्सची भरमार होऊन त्याचे वरील सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे दुष्परिणाम होऊ शकतात.
थोडक्यात, अशा रितीने जिथे आवश्यक असतील तिथेच व्हिटॅमिन सप्लिमेंट्सच्या स्वरुपात गोळ्या औषधे घ्यावीत. आपल्याच मनाने कुठल्याही गोळ्या घेऊ नयेत.
डॉक्टरांच्या किंवा डाएटीशियन्सच्या सल्ल्याशिवाय कोणतीच औषधे घेऊ नयेत.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.