Site icon InMarathi

विमानात बसल्यावर मोबाईल ‘फ्लाईट मोड’ वर सेट करतात – कारण जाणून घ्या!

flight inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

तुकाराम महाराज पुष्पक विमानावर बसून वैकुंठी गेले होते अशा गोष्टी आपल्या पुराणात ऐकल्या आहेत, आणि विमान या गोष्टीचं कुतूहल अगदी त्या प्रसंगापासून लोकांच्या मनात आहे!

आकाशात उडणारं विमान म्हटलं की आपल्या प्रत्येकाच्या मनात कुतुहूल जागं होतं. विमानाचा प्रवास असं नुसतं म्हंटल तरी सामान्य माणसाच्या डोळ्यासमोर उभा राहतो तो भला मोठा खर्च!

तर ह्या अशा विमानातून आज सगळं जग सर्रास प्रवास करतं! अगदी आपल्याइथे देशातल्या देशात सुद्धा लाखो लोकं विमानाने प्रवास करतात!

अगदी लहान मुलांसपासून वृद्ध माणसांपर्यंत प्रत्येकाला विमानात एकदातरी बसायची इच्छा असतेच, त्यात मिळणाऱ्या विविध सोयी सुविधा, तो आरामदायी प्रवास प्रत्येकाला एकदातरी अनुभवायचा असतो!

 

 

आजकाल कुठेही गेलात की तुम्हाला Data किंवा Wifi ची नितांत आवश्यकता असते, जेणेकरून तुम्ही फेसबुकवर काही वेळ घालवू शकता.

काही लेटेस्ट न्यूज पाहू शकता, जगभरातील अपडेट मिळवू शकता आणी खूपच कंटाळा आला तर ऑनलाईन मुव्हीज पाहू शकता किंवा म्युजिक ऐकू शकता. पण विमानात बसल्यावर मात्र या सर्व गोष्टींना मुकावं लागतं.

आजही विमानामध्ये बसल्यावर तुमच्याजवळ असलेले सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस तुम्हाला एकतर बंद करावे लागतात किंवा Flight Mode वर सेट करावे लागतात.

तसा नियमच आहे आणि त्या नियमाचे प्रत्येक प्रवाश्याला पालन करावेच लागते. त्यामुळे Data काय किंवा Wifi काय कशाचाच वापर करता येत नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही वाचा –

===

 

 

अश्या वेळी मनात प्रश्न येतो की तंत्रज्ञान एवढ सुधारलंय, फ्लाईट टेक्नोलॉजी अतिशय प्रगत झाली आहे, मग तरीही अजून या Flight Mode वर उपाय का निघत नाही?

मोबाईल जर Airplane Mode वर नाही ठेवला तर कुठे बिघडतं? चला तर आज या प्रश्नामागचं उत्तर आज जाणून घेऊया.

खरतरं ही गोष्ट प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी अतिशय महत्त्वाची आहे.

एक असा समज होता की मोबाईल सुरु ठेवल्यास त्यातून निघणाऱ्या frequencies (लहरी) विमानाच्या यंत्रणेमध्ये अडथळा निर्माण करतात, ज्यामुळे विमान कोसळून त्याला अपघात होतो.

 

 

पूर्वी अश्या काही विमान दुर्घटना घडल्यामुळे असा अंदाज बांधण्यात आला होता. परंतु हा अंदाज चुकीचा ठरला.

अधिकच्या निरीक्षणातून असे लक्षात आले की फोन/मोबाईल सिग्नल हे radio frequency मध्ये अडथळा आणू शकतात/आणतात.

ही गोष्ट वारंवार घडत नाही पण जेव्हा घडते तेव्हा भयंकर परिणाम सोबत आणू शकते.

 

 

जेव्हा मोबाईल सिग्नल मुळे radio frequency मध्ये अडथळा येतो तेव्हा CD कशी अडकत अडकत चालते तसा आवाज येतो. या आवाजामुळे कानाला हेडफोन लावून बसलेल्या पायलटला अतिशय त्रास होतो.

Radio Frequency च्या माध्यामातूनच पायलट आणि एयर ट्राफिक कंट्रोल एकमेकांशी संवाद साधत असतात. तसेच अतिशय महत्वपूर्ण माहितीची देवाण घेवाण करत असतात.

पण फोन सिग्नलमुळे निर्माण होणाऱ्या, डोकं दुखावणाऱ्या आवाजामुळे त्यांना एकमेकांशी संवाद साधणे कठीण होऊन बसते.

अश्यावेळेस केवळ काही सेकंदासाठी जरी त्यांचे बोलणे तुटले तरी ते धोकादायक ठरू शकते.

हे ही वाचा –

===

 

अजूनही तुम्ही असे म्हणत असालं की त्या आवाजाने एवढं काय त्रास होतोय? तर एकदा तुम्ही देखील त्या आवाजाचा सामना करून बघाच.

तुमच्या ऑडियो सिस्टमच्या जवळ तुमचा फोन ठेवा आणि कानाला हेडफोन लावून बसा. त्यावेळेस तुमच्या गाण्यात अडथळा आणणारा एक आवाज तुम्हाला सारखा ऐकू येईल!

जो तुमचं डोकं उठवल्याशिवाय राहणार नाही. जोवर तुम्ही मोबाईल ऑडियो सिस्टम पासून लांब ठेवत नाही तोवर तो आवाज येणे सुरूच राहील.

 

 

तसेच विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी जर त्यांच्या मोबाईल Airplane Mode सेट केला नाही तर मोठ्या प्रमाणात Radio Pollution देखील होते.

तर मग आता तुम्हाला या मागचं कारण कळलं आहेच, त्यामुळे पायलटला त्रास न होता त्याने विमान सुरक्षितपणे चालवावे असे वाटत असेल तर पुढच्या वेळेस तुमचा मोबाईल Airplane Mode वर सेट करायला विसरू नका.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा – प्रत्येक विमानात राखीव असणाऱ्या या ‘खास’ सिक्रेट जागांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version