केसांच्या सर्रास होणाऱ्या “ह्या” त्रासावर हे रामबाण घरगुती उपाय करून बघाच!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आपण ऑफिसच्या मुलाखतीला जातो किंवा डिनरसाठी छान कपडे घालून जातो.
आणि अगदी नकळत घडणारी गोष्ट म्हणजे खाज सुटलेल्या डोक्याच्या त्वचेवर आपण खाजवतो आणि मग आपण टापटीप तयार होऊन गेलेल्या ब्लॅक ब्लेझरवर कोंडा पडतो.
जो सगळ्यांना दिसतो आणि त्या वेळेला आपल्याला प्रचंड लज्जास्पद वाटत.
कोंडा ही अशी वैद्यकीय समस्या आहे जी लिंग, वय, जातपात काहीही न बघता होते.
जगातील अर्ध्याहून अधिक प्रौढ लोकांना तर हा त्वचेचा आजार सहज होतो. डोक्यातील कोंडा ही टाळूची अशी स्थिती आहे जी मलासेझिया नावाच्या बुरशीमुळे निर्माण होते.

जी आपल्या टाळूवरील सेबेशियस ग्रंथींमधून तयार झालेले तेलकट पदार्थ आणि नवीन त्वचेच्या तयार झालेली असते ते एकत्र होऊन नैसर्गिकरित्या तयार होतो.
जरी हे पांढरे सूक्ष्म जंतू टाळूचा भाग आहे, तरी जेव्हा ही समस्या येते तेव्हा त्यात असलेल्या फॅटी अॅसिडमुळे अनेकांच्या संवेदनशील टाळूला त्रास होऊ शकतो.
हेच आपल्या कोरडेपणा आणि खाज सुटण्याचे कारण देखील आहे. जेव्हा हवेत जास्त मोईस्त्चर असतं म्हणजे पावसाळा तेव्हा मलासेझिया या एका पदार्थाची भरभराट होतो आणि मन कोंड्याचा आर्द्रता आणि घाम येणे यामुळे त्रास होतो.
त्याचबरोबर, हिवाळ्यातील थंड वारा आर्द्रतेचे कारण बाजूला ठेऊन त्वचा कोरडी होण्यास कारणीभूत ठरतो. ज्यामुळे टाळूला खाज सुटते आणि ती त्वचा फडफडते. त्यामुळे वर्षभर डोक्यात कोंडा कधीही होऊ शकतो.
या कोंड्यामुळे केस गळतात, आपल्या चेहर्र्यावर त्याचे कण पडल्याने आपलायला पिंप्लस सारखा त्रास होतो. या सगळ्यापासून मुक्तता हवी असेल तर काही उपाय तुम्ही घरी करू शकता.

बाजारात जाऊन महागडे शॅम्पू आणण्यापेक्षा किंवा केस पूर्णपणे काढून टाकण्यापेक्षा पुढील उपाय करून बघा.
१. तेल लावू नका किंवा जास्त काळ ठेवू नका :

डोक्यात कोंडा असलेल्या केसांना तेल लावण चांगल आहे हा एक गैरसमज आहे. खरं तर, अनेक डॉक्टर सांगतात तेलाचा उपयोग केल्यामुळे डोक्यात अधिक कोंडा होतो. कारण तेल मलासेझिया या बुरशीला लागण्यार्या अन्नासारख आहे ज्यामुळे डोक्यात कोंडा होऊ शकतो.
कोरड्या, खाज सुटणार्या टाळूला तेल लावल्याने आपल्याला अगदी छान वाटेल पण यामुळे डोक्यातील कोंडाची स्थिती अधिकच वाढू शकते.
विशेषत: जेव्हा आपण आपल्या टाळूवर जास्त काळ तेल ठेवतो तेव्हा परिणाम दिसून येतात. म्हणून तेल कमी लावा. आणि लावलं तरी १५ मिनिटाच्या वर ठेऊ नका.
२. बेकिंग सोडा :

बेकिंग सोडा हे कोंडा असलेल्या टाळूवर एका स्क्रबप्रमाणे काम करत आणि तिथल्या स्कीनला काही होऊ न देता त्वचेवरील मृत पेशी काढून टाकतं.
डोक्यातील कोंडा आणखी वाढणार नाही याची खात्री करण्यासाठी बेकिंग सोडा मध्ये असलेला एक्सफोलिएशन आवश्यक आहे.
बेकिंग सोडामध्ये असलेल्या आणि त्याच्या एक्सफोलिएशन या अँटी फंगल गुणधर्मांमुळे टाळू स्वच्छ होते आणि लालसरपणा आणि खाज सुटण कमी होत. आपण सहजपणे आपल्या वापरातल्या शॅम्पूमध्ये थोडा बेकिंग सोडा टाकू शकता.
३. कडुलिंब :

आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कडूलिंबात त्याच्या अँटीबैक्टीरियल आणि अँटीफंगल गुण आहेत. त्यामुळे त्वचेच्या जवळजवळ सर्व आजारांवर याचा औषध म्हणून केला जातो.
डोक्यातील कोंडा मुख्यतः टाळूवर आलेल्या बुरशी सारख्या पदार्थास जबाबदार असू शकतो. आणि म्हणूनच या त्वचेच्या आजारावर दुर्लक्ष न करणच योग्य आहे.
नैसर्गिक पदार्थ कोंड्यावर वापरण हा उत्तम मार्ग आहे. त्यामुळे तुम्ही कडूलिंबाचा वापर कमी प्रमाणात का होईना पण करू शकता.
४. व्हिनेगर :

व्हिनेगर हे खाज सुटण, कोरडी त्वचा यावर उपचार करण्यात मदत करत आणि कोंडा निर्माण करणारी बुरशी आणि जीवाणू नष्ट करण्यास देखील मदत करत.
व्हिनेगरमधील आम्लीय घटक फ्लेकिंग असल्याने तो कोंडा कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. साधारण व्हिनेगर डोक्यावर वॉश घेण्याच्या अर्धा तास आधी केसांच्या त्वचेवर पांढर व्हिनेगर आणि त्याबरोबर समान प्रमाणात पाणी एकत्र करून लावा.
यामुळे तुमचं कोंडा नक्की कमी कमी होईल.
५. टी ट्री ऑइल :

सगळ्या प्रकारचे मुरुम आणि त्वचेवरील रोबुरशीजन्य बॅक्टेरियाच्या संसर्गापासून बचाव करण्याच काम टी ट्री ऑइल करत.
हे तेल आपल्या शॅम्पूमध्ये एक किंवा दोन थेंब घाला आणि साधारणपणे कोंबट पाण्याने केस धुवा. तुमचं कोंडा कमी झालेला तुम्हाला घर बसल्या बघता येईल.
६. लसूण :

अधूनमधून लसणाच्या पाकळ्यांचा कडक वास सोडला तर काहीतरी कारणांसाठी त्याच्यात औषधी मूल्य नक्कीच आहे ज्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. लसूण हे एक विरोधी बुरशीजन्य नैसर्गिक औषध म्हणून खूप फायदेशीर आहे.
कच्चे लसूणाचे फायदे अनेक वर्ष माणसाला उपयोगी ठरतात. एक लवंग किंवा दोन लसूण बारीक करा आणि पाण्यात मिसळल्यानंतर, लगेच परिणाम पाहण्यासाठी आपल्या टाळूवर लावा.
लसूणाचा वास केसातून घालवायचा उत्तम उपाय म्हणजे त्यात थोड मध एकत्र करा.
७. कोरफड :

कोरफड त्वचेकरता केवळ थंडच नाही तर त्वचेची सौम्यता सुद्धा वाढवत. त्यात मोठ्या प्रमाणात अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात.
कोरफड वनस्पती थेट झाडवरून काढण कधीही चांगले आहे. ते पारदर्शक आहे आणि जेल स्वरुपात असल्यामुळे चांगलं आहे.
हे टाळूवर तसच लावायच आणि नंतर औषधी किंवा अँटीडँड्रफ सौम्य शॅम्पूने धुऊन काढायच.
८. मिश्रण :

डोक्यातीळ कोंडा घालवायचा असेल तर तुम्ही घरच्या घरी एक औषधी आणि उपयुक्त असा हेयर मास्क बनवू शकता. यात मुख्यत्वे लिंबू, दही आणि थोड तेल घाला.
हे मिश्रण दर आठवड्याला एकदा लावल्याने तुमच्या डोक्यातील कोंडयाच प्रमाण कमी होईल.
९. अंड :
अनेक डॉक्टर, स्कीन स्पेशालिस्ट आपल्याला सांगतात की केशांच्या अनेक समस्यांवर तुम्ही अंड औषध म्हणून लावू शकता. त्यामुळे अंड्याच जे बल्क असतं ते तुम्ही केसांना लावून ठेवा. आणि नंतर शॅम्पूने स्वच्छ केस धुवा.
हे वरील नऊ उपाय केसातील कोंडा घालवण्यासाठी अत्यंत उपायकरक ठरू शकतात.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.