Site icon InMarathi

‘कोलेस्ट्रॉलला’ दूर ठेवण्यासाठी महागड्या तेलाऐवजी “ह्या” गोष्टी आजमावून बघाच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपली जर सध्याची जीवनशैली पाहिली तर ती अतिशय धकाधकीची आहे. मुंबईचा जरी विचार केला तरी ९०% लोक ही ट्रेनचा वापर करतात. कॉस्मो पोलिटन भागात राहत असल्यामुळे बाहेरच्या गोष्टी जास्त खाल्ल्या जातात.

कामाचं टेंशन आपण बर्‍याच प्रमाणात घेतो. या सगळ्याचा परिणाम म्हणजे आपल्याला बीपी, शुगर, कॉलेस्ट्रॉल असे वेगवेगळे आजार होतात.

आणि यावर उपाय करण्यासाठी आपण अनेक वेगवेगळ्या गोळ्या घेतो. कॉलेस्ट्रॉल  हा रक्तामध्ये असलेल्या चरबीचा एक प्रकार आहे.

food.ndtv.com

 

पेशी लवचिक ठेवण, हार्मोन्सच संश्लेषण, पित्त, अॅसिड आणि व्हिटॅमिन डी सारख्या विविध क्रिया करण्यासाठी शरीरात कोलेस्ट्रॉलचा वापर होतो.

कोलेस्ट्रॉल हे मुख्यतः दोन प्रकारच आहे. त्यातल एक असतं लो डेन्सिटि जे तुमचा हृदयरोगाचा धोका वाढवत. आणि दुसरा प्रकार आहे हाय डेन्सिटि, ज्यामुळे आपल्या हृदयरोगाचा धोका कमी होतो.

जास्त वजन, वय, कौटुंबिक इतिहास आणि फॅट प्रचंड प्रमाणात असलेले पदार्थ हे आपल्या कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर परिणाम करणारे घटक आहेत.

यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येऊ शकतो. पण हेल्दी आहाराच घेणे आणि नियमित व्यायाम करणे यासारखे काही बदल केल्यास कॉलेस्ट्रॉल कमी केल जाऊ शकत.

हृदयरोगाच्या नैसर्गिक किंवा पूरक उपचारांमध्ये बहुतेकदा कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करणं, रक्तदाब कमी करणं आणि हृदयाचे आरोग्य सुधारणं हे महत्वाचं उद्दीष्ट असतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही वाचा –

===

 

medisensehealth.com

 

पारंपारिक वैद्यकीय उपचारांच्या तुलनेत सामान्यत: अशा उपचारांवर संशोधन मर्यादित असत. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काही नैसर्गिक उत्पादन वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झाली आहेत.

हार्ट फेल्युअर सोसायटी ऑफ अमेरिका (HFSA) च्या मते, पर्यायी किंवा हर्बल थेरपीमुळे हार्ट फेल्युअर होण्याचा धोका कमी असल्याचा कोणताही पुरावा नाही.

पण, पर्यायी उपचारांसह बर्‍याच लोकांना काही यश मिळाल आहे. तर या अशा कोलेस्ट्रॉलमुळे तुम्हाला सारखं डॉक्टरच्या खेपा घालायला नकोत आणि काही उपाय घरीच केलेत तर फायदा होऊ शकतो.

१. हळद :

 

food.ndtv.com

 

हळद ही आर्टरींच्या भिंतींवर जमा झालेलं कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. कोलेस्ट्रॉल कमी व्हावं म्हणून तुम्ही हळदीची मदत घेऊ शकता.

झोपण्यापूर्वी छान गरम दुधात हळद घाला आणि प्या. किंवा एखाद्याला जर दूध आवडत नसेल तर ती लोक अर्धा चमचा हळद सकाळी उबदार पाण्यान घालून पिऊ शकतात.

तुमचं कोलेस्ट्रॉल घरच्या घरी कमी करण्याचा हा उत्तम मार्ग आहे.

२. लसूण :

 

indianexpress.com

 

लसूणमध्ये अ‍ॅलिसिनच प्रमाण खूप जास्त असत. हे एक सल्फरयुक्त कंपाऊंड जे एकूण LDL कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करत. सकाळी आणि झोपेच्या वेळेस लसणाच्या काही पाकळ्या चावाव्यात.

कच्चा लसूण शिजवलेल्या लसणापेक्षा जास्त चांगले कार्य करतो. असही लसूण हा मागच्या हजारो वर्षांपासून भारतीय स्वयंपाकाचा घटक आहे.

आणि त्याचा औषध म्हणून देखील वापर केला जातो. हे कॅप्सूल किंवा टॅब्लेट च्या स्वरूपात सुद्धा बाहेर उपलब्ध आहेत. काही संशोधक त्यांच्या अभ्यासातून नमूद करतात की लसूण तुम्ही तीन ते चार महीने सलग खायला हवा.

यामुळे  तर तुमचा रक्तदाब कमी करण्यास, रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत होते.

३. हॉथॉर्न :

 

healthline.com

 

हॉथॉर्न हे एक काटेरी झुडुप आहे. साधारण गुलाबाच्या वर्गात याचा समावेश होतो. याला पिवळी, गुलाबी आणि पांढरी अशी फुल येतात.

त्याची लाल छोटी फळं, पाने आणि फुले ही रोमन साम्राज्याच्या काळापासून हृदयाच्या आजरांसाठी वापरली जातात.

काही अभ्यासकांनुसार हार्ट फेल्युअर जर सौम्य स्वरूपाचं असेल तर ही वनस्पती त्यावरचा एक प्रभावी उपचार असल्याच आढळलं आहे. 

४. अळशीच्या बिया :

 

hindi.webduniya.com

 

अळशीच्या बिया आणि त्यापासून बनवलेल्या तेलामध्ये अल्फा-लिनोलेनिक (ALA) या अॅसिडचं प्रमाण खूप  जास्त असत. हे ओमेगा ३ नावाचं फॅटी अॅसिड आहे ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होण्यास मदत होते.

अनेक पोषणतज्ञांनी केलेल्या या बियांच्या वापरण्याचे पूर्ण समर्थन केलेले नाही. म्हणून महत्व सिद्ध करण्यासाठी संशोधन अद्याप सुरू आहे.

एक ग्लास कोमट पाणी किंवा दुधात एक चमचा अळशीच्या बियांच चूर्ण घाला आणि चांगल मिक्स करून ते लगेच प्या. 

५. रेड यीस्ट राइस :

 

yourmediakart.com

 

रेड यीस्ट राईस हा एक पारंपारिक चीनी औषधाचा परकर आहे. आणि त्यांच्या रोजच्या स्वयंपाकातील एक महत्वाचा घटक आहे. हे  लाल तांदूळ यीस्ट बरोबर संवर्धन करून बनवलेले असतात.

काही लाल यीस्ट तांदळाच्या उत्पादनांमध्ये मोनाकोलीन के याचं प्रमाण असत. हा पदार्थ कोलेस्ट्रॉल कमी करणार्‍या औषधांमध्ये लोवास्टाटिन नावाचा एक सक्रिय घटक असतो त्यासारखे आहे.

त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी करायचे असेल तर आपल्याही घरात या राईसचा वापर तुम्ही करू शकता.

हे ही वाचा –

===

६. स्टेरॉल्स आणि स्टॅनॉल :

 

bistromd.com

 

वनस्पती स्टेरॉल्स आणि स्टॅनॉल या अनेक पदार्थ, भाज्या, शेंगदाणे, बियाणे, धान्य आणि इतर वनस्पतींमध्ये आढळतात. काही प्रक्रिया केलेले पदार्थ वनस्पती स्टिरॉल्स किंवा स्टॅनोल्सने देखील मजबूत केले जातात.

उदाहरणार्थ, आपल्या रोजच्या खायच्या पदार्थांचा विचार केला तर त्यात लोणी, ऑरेंज ज्यूस किंवा दही उत्पादन यात हे मोठ्या प्रमाणात सापडतील.

हे तुमच्या आतड्यांना कोलेस्ट्रॉल शोषून घेण्यापासून थांबवतात.

७. फिश ऑइल :

 

theactivetimes.com

 

फिश ऑइल हे ओमेगा 3 या फॅटी अॅसिडचं उत्कृष्ट स्रोत आहे. मॅकरेल, सॅल्मन, लेक ट्राउट, सार्डिन आणि हलीबूट असे मासे खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल पातळी कमी होण्यास मदत होते.

आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग होण्याचा धोका कमी प्रमाणात जाणवतो. आपण शाकाहारी असल्यास, दररोज १०० मिलीग्राम फिश ऑइलच्या गोळ्या घेणे सुरू करा.

८. कोथिंबीर :

 

indianexpress.com

 

कोथिंबीर यात अँटीऑक्सिडेंट्स खूप प्रमाणात असतात जे कोलेस्ट्रॉलची पातळी खाली आणण्यास मदत करतात.

त्यात फोलिक अॅसिड, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन सारख्या असंख्य जीवनसत्त्व आहेत.

एक चमचा कोथिंबिरीचे दाणे पाण्यात सुमारे दोन मिनिटं उकळायचे आणि नंतर गाळून ते पाणी प्यायच. हा उपाय कोलेस्ट्रॉलची पातळी योग्य ठेवण्यास मदत करतो.

९. आवळा :

 

khaskhabar.com

 

आवळा आवश्यक अमीनो अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट घटक आपल्याला देतो. जो आपल्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी उत्कृष्ट आहे.

ताजा आवळा किंवा दररोज एक चमचे वाळलेल्या आवळासह एक ग्लास कोमट पाणी प्या.

१०. अॅपल साइडर व्हीनेगर :

 

sunpeaksnews.com

 

अॅपल साइडर व्हीनेगर आपल्या शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी प्रभावी उपाय आहे.

एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा व्हिनेगर घाला आणि प्या. जर तुम्हाला सर्वोत्तम इलाज हवा असेल तर हे दररोज प्या.

अशाप्रकारे, वरील उपाय करा आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून तुमच्या डॉक्टरांकडे सारखं जाण थांबवा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version