Site icon InMarathi

मोफत ऑनलाईन सिनेमे आणि वेबसिरीज बघताय?! थांबा! हे वाचा, सावध रहा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारत आणि चीन मधील वाद सध्या तरी संपण्यापेक्षा वाढतच चालला आहे. आपले शहीद झालेले सैनिक, चीन ने सीमेवर वाढवलेले त्यांचं सैन्य, भारताने नुकतेच बंद केलेले चीन चे ५९ apps या पार्श्वभूमीवर हा तिढा लवकर सुटू शकेल असं वाटत नाहीये.

चीन हा देश प्रसिद्ध आहे त्याच्या कुरापती करण्याच्या स्वभावामुळे.

प्रत्यक्ष युद्ध झालं नाही तरी एखादा ऑनलाईन व्हायरस तयार करून आपल्या बँकिंग क्षेत्राचं मोठं नुकसान करू शकतो अशी माहिती गुप्तचर खात्याने नुकतीच जाहीर केली आहे.

 

bgr.in

 

आजच्या डिजिटल जगात युद्ध झालं किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यावर सामान्य नागरिकांकडून सीमेवर जाऊन लढणं अपेक्षित नाहीये.

गरज आहे ती तुमच्या सरकार ने दिलेल्या निर्देशांचं काटेकोरपणे पालन करण्याची आणि देशसेवेला हातभार लावण्याची.

इंटरनेट चा वाढलेला प्रचंड वापर, ऑनलाईन सिनेमा बघणे, OTT प्लॅटफॉर्म यामुळे तुमच्या डेटा पर्यंत पोहोचणं हे तसं पाहिलं तर सहज शक्य आहे.

आपल्या सायबर सेक्युरिटी विभागाने मध्यंतरी एक सर्व्हे केला आणि एक परिपत्रक जाहीर केलं की, असे काही सिनेमे, वेब सिरीज आहेत ज्या की लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत आणि त्या वारंवार बघितल्या जातात.

ह्या सिनेमाच्या दरम्यान एखादी आकर्षक जाहिरात किंवा कोरोना बद्दल उपयुक्त माहिती हे शीर्षक असलेली लिंक तुमच्या मोबाईल च्या स्क्रीनवर येऊ शकते.

आणि तुमच्या मोबाईल वरून तुमच्या नेटवर्क पर्यंत हा व्हायरस पोहोचेल अशी एक योजना चीन करत आहे अशी अधिकृत माहिती सायबर सेक्युरिटी ने जाहीर केली आहे.

“आम्ही तर असं कुठेच क्लीक करत नाही ” असा खूप जणांचा युक्तिवाद असू शकतो.

पण, आजकाल असे व्हायरस तुम्ही सिनेमा डाउनलोड जरी केला तरीही येऊ शकतात आणि सध्या बऱ्याच जणांचं work from home सुरू आहे.

 

news.fresherslive.com

 

तुमच्या घरातील लहान मुलांनी जरी असं काही चुकून केलं तर सतर्क रहावं म्हणून हे कोणते सिनेमे आहेत हे माहीत करून घेणं अत्यंत आवश्यक आहे.

कारण, हे हॅकर ही तुमची व्यक्तिगत माहिती विकू शकतात किंवा तुमच्या कडून ती माहिती कोणाला न सांगण्यासाठी पैसे मागू शकतात. लॉकडाऊन च्या काळात फक्त महाराष्ट्रात ५७२ अश्या केसेस ची नोंद झाली आहे.

त्यापैकी २७३ लोकांना आतापर्यंत अटक झाली आहे.

त्या सिनेमा, वेबसिरीज ची यादी आम्ही जाणीवपूर्वक इंग्रजीत देत आहोत कारण आपण सर्च करताना स्पेलिंग ची सुद्धा काळजी घ्यावी यासाठी :

1. Mardani 2
2. Zootopia
3. Jawani Diwani
4. Chhapaak
5. Love Aaj Kal
6. Inception
7. Baahubali
8. Rajnigandha
9. Gully Boy
10. Bala

 

bebaknews.in

 

वेब सिरीज :

1. Delhi Crime
2. Brooklyn Nine-Nine
3. Panchayat
4. Akoori
5. Fauda
6. Ghoul
7. Mindhunter
8. Narcos
9. Devlok
10. Lost

महाराष्ट्र सायबर क्राईम डिपार्टमेंट ने हे सांगितलं आहे की,

 

latestly.com

 

यापैकी कोणता सिनेमा किंवा वेबसिरीज तुम्ही डाउनलोड केली असेल तर तुम्ही तू सुरू करताना एखादी permission विचारली जाईल, त्यावेळी “allow” वर क्लिक करू नका. ती फाईल लगेच डिलीट करा.

सिनेमात दाखवतात तशी ती एखाद्या लावलेल्या बॉम्ब ची “लाल वायर” असू शकते.

या व्यतिरिक्त आपण काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल महाराष्ट्राचे सायबर एक्सपर्ट अंकुर पुराणिक यांनी एका पत्रकात असं म्हंटलं आहे की,

“हे सायबर गुन्हेगार दरवेळेस काही तरी नवीन शक्कल लढवत असतात. ते कोणत्या न कोणत्या मार्गांनी तुमच्या मोबाईल चा पासवर्ड, OTP जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतात.

ते free Netflix subscription, free mobile data, Paytm verification असे प्रलोभन देणारे मेसेजेस पाठवत असतात आणि तुमच्या मोबाईल मध्ये व्हायरस install करायचा प्रयत्न करत असतात. तुमच्या महत्वाच्या डेटा चा सतत बॅकअप घेत रहा.

 

truegossiper.com

 

तुमच्या मोबाईल मध्ये बॅकअप मध्ये कोणतंही app सुरू ठेवू नका. Paytm ला पेमेंट लिमिट सेट करा. मोबाईल, लॅपटॉप मध्ये antivirus install करून घ्या. ”

आतापर्यंत नोंद झालेल्या ५१२ केसेस चं वर्गीकरण करताना असं सांगण्यात आलं की, त्यापैकी २८ केसेस या TikTok आणि Twitter वर अक्षेपार्ह व्हिडीओ share केल्याने समोर आल्या आहेत.

तर, ६० केसेस या YouTube वर share केलेल्या आक्षेपार्ह विडिओ मुळे समोर आल्या आहेत.

१९६ केसेस या whatsapp वर न खात्री करता फॉरवर्ड केलेल्या विडिओ च्या विरुद्धात नोंदवण्यात आल्या आहेत तर २१३ केसेस या फेसबुक वर न खात्री करता लिहिलेल्या पोस्ट मुळे समोर आल्या आहेत.

त्यापैकी १०८ पोस्ट्स या delete करण्यात आल्या आहेत.

हे सगळं सांगायचं कारण इतकंच की, जसे आपण स्मार्ट झालो आहोत. तसंच पोलीस डिपार्टमेंट सुद्धा सायबर क्राईम विभागाच्या सहाय्याने स्मार्ट झालं आहे म्हणूनच ते आपल्याला इतके specific inputs देऊ शकत आहेत.

गरज आहे ती त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची आणि एका गोष्टीची खूणगाठ बांधण्याची की, “फुकट काहीच मिळत नसतं – There is no free lunch.”

प्रत्येक गोष्टीची काहीतरी किंमत ही मोजवी लागत असते. ती किंमत मनस्तापाच्या स्वरूपात देण्यापेक्षा पैश्याच्या स्वरूपात देणं कधीही चांगलं असतं.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version