' पैसा टिकवणं अवघड असतं; या टिप्स वाचल्यात तर पैसा फक्त टिकणारच नाही, वाढतही राहील – InMarathi

पैसा टिकवणं अवघड असतं; या टिप्स वाचल्यात तर पैसा फक्त टिकणारच नाही, वाढतही राहील

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

प्रत्येकाला आपण श्रीमंत असावे असे वाटते. नोकरीतून रजा घ्यावी, देशोदेशी खूप फिरावे, मनसोक्त खरेदी करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते.

पण श्रीमंत लोक असे न करता पैसा खर्च काळजीपूर्वक जमा करतात. आपल्या संपत्तीत भर घालतात.

पैसा जमवून श्रीमंत होणं ही गोष्ट आता गुपित, दडवून ठेवायची नाही राहिली. या पृथ्वीतलावर कोट्यधीश होण्यासाठी हुशार, चुणचुणीत व्यक्ती असण्याची, रात्रीचा दिवस करण्याची ही आवश्यकता नाही.

यासाठी श्रीमंत लोक काय जीवनशैली, युक्ती योजत असावेत, ज्यामुळे ते प्रगती करु शकतात? कोणत्या गोष्टींमुळे ते त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळते?

 

१) समान शिलेषु व्यसनं तु सख्यं

 

office inmarathi
Indiabusinessdirectory.com

 

यशस्वी लोकांत रहावे म्हणजे आपणही यशस्वी होतो. प्रेरणा, संभाव्य यश, प्रतिभा यामुळे लोक यशस्वी होत असतात. तुम्हाला नक्की हेच करायचे आहे.

अशा माणसांमध्ये मिसळा, तुमच्या कल्पना त्यांना सांगा, तुमचे संबंध वाढवा. त्यांच्या बरोबर जेवा, कॉफी प्या. त्यांचे विचार आत्मसात करा.

तुमच्या मोबाईल मध्ये अशा प्रभावी लोकांचे नंबर असावेत, जे तुमचे आयुष्य मालामाल करतील, तुम्हाला मार्गदर्शन करतील.

 

२) श्रीमंती वाढवण्याची मानसिकता

 

bill gates inmarathi
distractify.com

 

यशस्वी व श्रीमंत माणसे पैसे मिळविण्याचे विविध मार्ग शोधण्यासाठी कल्पकता दाखवितात. आपण विचारही करू शकत नाहीत, असे गुंतवणुकीचे विविध पर्याय त्यांनी शोध लेले असतात.

पैसे कमावण्याचे त्यांचे विचारही अगदी भिन्न असतात. पैसा हे त्यांच्यासाठी साधन असते. जबाबदारी घेण्याची त्यांची तयारी असते.

आपण केलेली गुंतवणूक आपल्याला फायदेशीर होईल असा विश्वास त्यांना असतो.

 

३) आरामशीर वातावरणाचा त्याग अन् जबाबदारीचा स्वीकार

 

business woman working late in the office InMarathi

 

जो संकटे हसत स्विकारतो, तोच आयुष्यात यशस्वी होतो. आहे त्या परिस्थितीत माणूस समाधानी व खुश रहात असतो.

आर्थिक स्वातंत्र्य हवे असेल तर आराम टाळला पाहिजे. कामाच्या मर्यादा वाढवायला नकोत का? ९ ते ५ ची नोकरी तुमची मोठी स्वप्ने पूर्ण करू शकणार नाही.

जबाबदारी स्वीकारून, कल्पकतेचा वापर हीच तुमची ताकद बनू शकेल. तुम्हाला निडर व शूर बनून या गोष्टी साठी तयार व्हावे लागेल.

 

४)हिशोबी जोखीम

 

atm money inmarathi
hindustantimes.com

 

श्रीमंत माणसे आर्थिक निर्णय घेताना जुगार खेळत नाहीत. ही जबाबदारी ते व्यवहारीपणाने घेतात. त्यामुळे त्यांचे नुकसान होत नाही किंवा कमी होते. गुंतवणुक करताना ते साधकबाधक विचार करतात.

एक लक्षात घ्या, श्रीमंत माणसे ही चतुर असतातच अशी गरज नाही. पण निर्णयात वास्तविकता असणे गरजेचे असते.

 

५) एकाधिक उत्पन्न स्त्रोत 

 

investment-inmarathi
dailymail.co.uk

 

दोन पध्दतीचे उत्पन्न स्त्रोत आहेत. सक्रिय ( avtive ) निष्क्रीय (passive).

सक्रिय स्त्रोतामध्ये तुमची नोकरी व इतर पैसे मिळवण्याचे मार्ग आहेत. ज्यात तुम्ही काम करत असता.

निष्क्रीय स्त्रोतामध्ये तुम्हाला अमुक तास काम करावे, असा नियम नसून भाड्यावर जागा देऊन किवा व्याजावर पैसे मिळवू शकता.

म्हणूनच तुम्हाला श्रीमंत होऊन टिकायचे असेल तर प्रगतीचे नवे मार्ग चोखाळावे लागतील.

सुरुवातीला हे मार्ग सक्रिय स्त्रोत असतील, पण नंतर तुम्हाला हा पैसा निष्क्रीय स्त्रोतांमध्ये गुंतवणूक म्हणून जमा करावा लागेल.

 

६) गुंतवणूक करा

 

investment-inmarathi
businessfundingshow.com

 

श्रीमंत लोक पैसा हेच पैसा बनवण्याचे साधन मानतात. पैसा वाढवण्याच्या अनेक सक्रीय पध्दती ते शोधून त्यात गुंतवणूक करीत रहातात. त्यामुळे त्यांचा आर्थिक स्तर उंचावतो.

मागे सांगितल्याप्रमाणे सक्रिय स्त्रोतांवर काम करु लागल्याने माणूस जास्त पैसे कमावू लागतो. जास्त बचत कमी परतावा. मग जादा बचत जादा व्याज. असा मार्ग शोधतो

यातही संभाव्य धोके असतात.

 

७)अति खर्च टाळा

 

lending money 1 inmarathi
economictimes.com

 

सामान्य व्यक्ती पैसे खर्च करण्याचे स्वप्न बाळगते. वस्तू खरेदी करताना किमतीचा विचार महत्वाचा असतो. श्रीमंत माणूस वस्तूची खरी किंमत ओळखून असल्याने व्यर्थ पैसा खर्च करणार नाही.

उदाहरणार्थ, गाडीची किंमत ३० लाख रुपये आहे. श्रीमंताला कळेल यावरील इतर खर्च १० हजार रुपये आहे, त्यामुळे गाडीची खरी किंमत थोडी जास्त आहे.

श्रीमंत माणूस सामान्य व्यक्तीपेक्षा हजारो पटीने खर्च करेलही, पण योग्य असेल तर अन् विचारपूर्वक! अति खर्च टाळणे गरजेचे आहे.

 

८) आत्म सुधारणा

 

indian girl reading book inmarathi 1
twitter.com

 

श्रीमंत व्यक्तीला स्वविकास, नव कल्पना, नवीन गोष्टी, बातम्या वाचायला आवडते. त्यामुळे हे उत्साही वाचक असतात.

अभ्यासानुसार ८५% लोक स्वसुधारणे संबंधी पुस्तके वाचतात. तर ९४% लोक नुसती वर्तमानपत्रे वाचतात. त्यातूनही त्यांना नवीन कल्पना सापडतात.

 

९) सेवाव्रती व्हा

 

ratan tata inmarathi

 

सामान्य माणसाला सेवानिवृत्त व्हायला खूप आवडते, श्रीमंत माणूस वयाच्या ७०व्या वर्षी सुध्दा कार्यरत असतो. कारण त्याचे कामावर प्रेम असते, त्याला तसे करणे आवडते.

आपल्या गुंतवणूकीमुळे आपला आर्थिक स्तर उंच राहतो, पैसा खेळता राहतो. शारीरिक कष्ट कमी करावे लागतात.

यशाची गुरुकिल्ली व सर्वांचे लक्ष केंद्रीत रहावे यासाठी श्रीमंत माणसे प्रयत्नशील रहात असतात.

 

१०) प्रक्रियेचे मूल्यांकन करा

 

writing inmarathi
HaresfieldSchool.com

 

आपण काय काम केले यावर ते पुरेसा वेळ खर्च करतात. तुम्ही घेतलेले निर्णय, ध्येय, खाजगी गोष्टी यावर अर्धा तास जरी बोललात, तरी तुमच्या योजना प्रक्रियेत कमालीचा सकारात्मक बदल होतो.

हे लोक लेख लिहीतात, अनुभव सांगतात. नकारात्मक विचार मनात न आणता वेळ सार्थकी लावतात. मेडिटेशन करतात. समस्या मांडून सोडविण्याचा प्रयत्न केला तर आयुष्यभर केंद्रीत रहाल. तुमचे जीवन सार्थकी लागेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?