आपली “आवड” एका जागतिक महा-उद्योगाची नांदी ठरू शकते – हे शिकवणाऱ्या बास्कीन-रॉबिन्सच्या जन्माची कथा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आज आईस्क्रीम आणूया का? असा प्रश्न घरातल्या एखाद्या व्यक्तीने विचारावा आणि त्याला अगदी एका स्वरात होकार यावा यात काहीच नवल नाही.
अगदी घरात असणार्या दोन वर्षाच्या लहान मुलापासून ते ८० वर्षाच्या आजी पर्यंत सगळेच मनापासून आईस्क्रीमवर ताव मारतात.
तर आज जगात अनेक आईस्क्रीम पार्लर्स आहेत. त्याच्या अनेक ब्रांचेस आपल्या भारतात देखील आहेत.
मागचे अनेक वर्ष बास्किन रॉबिन्स हे आपल्याला त्यांचे वेगवेगळे आईस्क्रीम फ्लेवर्स खायला घालून मन अगदी तृप्त करतायेत. त्यांची ही छोटीशी गोष्ट.
इर्व्हिन रॉबिन यांचा जन्म कॅनडामध्ये झाला. त्यांच्या आई बाबांनी पोलंड आणि रशिया इथून स्थलांतरण केल होत.
नंतर ते वॉशिंग्टनमधील टॅकोमा येथे गेले, जिथे रॉबिन्सचे वडील एका लोकल डेअरीचे भागीदार होते. त्या डेअरीवरुनच रॉबिन्सना आईस्क्रीमची कल्पना सुचली.
कोल्ड ट्रीटस् याची विक्री त्यांच्या डेअरी साइटवर सुरू केली. नंतर अजून विक्री वाढावी म्हणून त्यांनी याला मजेदार नाव दिली.
दुसर्या महायुद्धानंतर रॉबिन्स हे दक्षिण कॅलिफोर्निया इथे स्थायिक झाले. जिथे त्यांनी ग्लेंडेलमध्ये ‘स्नोबर्ड’ नावाच स्वत:च पहिल आईस्क्रीम शॉप उघडल.
जॉन रॉबिन्स हा इर्व्हिन रॉबबिन्सचा एकुलता एक मुलगा. बास्किन रॉबिन्सचा सह – संस्थापक आहे. जॉन याने कौटुंबिक वारसा समजून घेण्यासाठी पुढाकार घेतला.
आईस्क्रीम कोनच्या आकाराचा स्विमिंग पूल असलेल्या घरात रॉबिन्स आनंदाने वाढले.
त्यांना लहानपणापासूनच घरात “अति प्रमाणात आइस्क्रीम” उपलब्ध होत आणि याचा फायदा करून आपला कौटुंबिक व्यवसाय वाढवण्याचा त्यांचा उद्देश होता.
रॉबिन्स एका मुलखातीत म्हणाले होते. “बहुतेक लोक असा विचार करतात की यांचा हा अनेक वर्ष कौटुंबिक व्यवसाय असल्यामुळे यांना अनेक प्रकारचे फ्लेवर्स सहज बनवता येत असतील. हे ऐकून मला खूप आनंद झाला खरा.
पण आईस्क्रीमचे आरोग्यावर होणारे परिणाम याबद्दल मी अभ्यास केला. तसच गायींशी कस वागाव याबद्दल मी जास्त अधिक शिकलो. माझा घरचा व्यवसाय आहे या उद्देशाने उलट मी कमी उपभोग घेतला कारण माला हा व्यवसाय जगभर वाढवायचा होता.”
सुरुवातीला रॉबिन्सने आपल्या बहिणीचा नवरा बर्टन बास्किन यांनाही आईस्क्रीम विकायला लावलं होत.
बास्किन हा इलिनॉयचा होता आणि त्याची पार्श्वभूमी एक छोटसं दुकान चालवणे एवढीच होती, पण आईस्क्रीम गेममध्ये त्यांनी स्वतःला चांगल्या प्रकारे सिद्ध केल.
बास्किनने पसडेना इथे स्वतःच दुकान सुरू केल. लवकरच, त्यांच्या भावंडांकडे अनेक आइस्क्रीम स्टोअर्स होती.
१९४० मध्ये त्यांचं निधन झाल्यावर त्यांनी व्यवस्थापकांना दुकान विकलं आणि बास्किन-रॉबिन या नावाने व्यवसाय सुरू केला.
या फ्रेंचायझी मॉडेलचे दोन मोठे फायदे होते. सर्वात महत्वाचा म्हणजे त्याने बास्किन-रॉबिन ब्रँडला दूरवर पसरण्यास परवानगी मिळाली.
१९५९ मध्ये कॅलिफोर्नियाच्या बाहेर असलेल्या अॅरिझोना इथे बास्किन-रॉबिन्स यांचं पहिलं दुकानं सुरू झाल. १९६० च्या उत्तरार्धात देशभरात ६०० हून अधिक दुकान होती.
१९७४ च्या लॉस एंजेलिस टाईम्सच्या लेखात अस नमूद केलेल आहे की, मागील वर्षी, बास्किन-रॉबिन्सचे एक नवीन दुकान दररोज उघडत होत आणि ६०० हून अधिक शहरांमध्ये ते रोजगार निर्माण करीत होते.
जेव्हा कंपनीने आपला ३१ वा वर्धापन दिन साजरा केला तेव्हा एक महत्त्वाचा कार्यक्रम झाला तो म्हणजे बास्किन-रॉबिन्सचा विस्तार युरोप आणि जपानमध्येही झाला.
शीत युद्धाच्या समाप्ती मॉस्कोमध्ये झाली तेव्हा तिथे उपस्थित हा एकमेव जगप्रसिद्ध असा ब्रँड होता.
१९८८ च्या उन्हाळ्यात, मॉस्कोच्या एका हॉटेलमध्ये बास्किन-रॉबिन्सने दुकान उघडल. इथे लंडनहून आईस्क्रीम आणलं जात असे आणि मोठ्या प्रमाणात त्या काळात स्कूप्सची विक्री यांनी केली.
१९९० सालापर्यंत बास्किन-रॉबिन्स हे सोव्हिएत युनियनमध्ये आपला विस्तार करण्यास तयार होते.
रॉबिन्सच्या न्यूयॉर्क टाईम्सच्या शब्दसंग्रहात, त्यांची मुलगी मार्शा व्हेईट यांनी स्वयंपाकघरात नवीन फ्लेवर्सवर काम करणार्या भाऊ बहिणीची आठवण करून दिली.
कालांतराने, नवीन फ्लेवर्स तयार करणार्या लोकांचा विस्तार झाला. १९७३ च्या न्यूयॉर्क टाईम्सच्या लेखात रॉबिन्सने सांगितलं की, नुकतेच त्यांना भेटलेल्या लोकांना नवीन प्रकारच्या आईस्क्रीमची कल्पना असेल.
कारण त्यावेळेस तिथे ३३० फ्लेवर्स होते आणि कंपनी दरवर्षी सरासरी १५ नवीन प्रकार रिलीझ करत होती.
१९७० च्या उत्तरार्धापर्यंत रॉबिन्स कंपनीचा एक भाग म्हणून राहिले आणि त्यांचा आवडता फ्लेवर जामोका अल्मोंड फज होता. अनेक वर्षांपासून ते आणि त्यांचे कुटुंब आईस्क्रीम कोनच्या आकाराच्या तलावासह राहत होते.
सेवा निवृत्तीनंतर रॉबिन्स रांचो मिराज इथे गेले. जिथे त्यांचं २००८ मध्ये निधन झालं.
पण आजही त्यांच्या निधनानंतर सुद्धा कॅनडा ते कोलंबिया, युनायटेड किंगडम ते कोरिया, भारत ते औस्ट्रेलिया या आणि अशा अनेक ठिकाणी आईस्क्रीमची दुकान असून आज बास्किन-रॉबिन्स जवळजवळ सर्वव्यापी आहेत.
तरीही, जागतिक स्तरावर वर्चस्व असलेल्या या ब्रँडची मुख्य शाखा उपनगरी लॉस एंजलिसमध्ये आहे जिथे अजूनही त्यांचा व्यवसाय उत्तम चालू आहे.
ही स्थापना दुसऱ्या वर्ल्डवॉर नंतर काही वर्षात त्यांच्या दोन मेहुण्यांनी केली होती.
तर अशाप्रकारे बास्किन-रॉबिन्स आता आपल्या घराघरात पोहोचल आहे.
आपल्या वडिलांचा व्यवसाय होता म्हणून केवळ आपण तो चालवावा असा उद्देश या घरातल्यांचा नसल्यामुळे ते आज मोठ्या प्रमाणात जगव्यापी झालेत.
परत त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक दशकांमध्ये, बास्किन-रॉबिन्सच्या फ्लेवर्सचे सतत होणारे वर्गीकरण आहे. साधारण ज्या देशात जाऊ तिथल्या आवडीनुसार हे फ्लेवर्स तयार करतात.
पॉप कल्चर इव्हेंटमध्ये वारंवार हा ब्रॅंड वापरला जातो.
तर असे हे जगप्रसिद्ध आईस्क्रीम आणि त्याची ही कथा. आम्हाला माहितीये तुम्हाला आता हे वाचून आईस्क्रीम खायची इच्छा झाली असेल.
पण थोडे लॉकडाउन चे दिवस जाऊदे. मग तुम्ही आनंदाने आणि पोटभर आईस्क्रीम खाऊ शकता.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.