आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
नेपाळ आणि भारताचे संबंध हे पूर्वीपासून जवळचे राहिले आहेत. आणि मैत्रीपूर्ण राहिले आहेत. परंतु सध्या या संबंधात थोडीशी कटुता आलेली आहे.
कथित बॉर्डर एरियात भारत बांधत असलेल्या रोड्सना नेपाळचा विरोध आहे. म्हणून नेपाळने भारताच्या विरोधात भुमिका घेतली आहे.
तिबेट, चीन आणि भारत यांच्यादरम्यान असलेल्या वादग्रस्त भागात जोडणारे रस्ते बांधून त्यांचं उद्घाटन करण्याप्रसंगी नेपाळने भारताच्या विरोधी भुमिका घेतलेली आहे.
या सगळ्या गोष्टी राजकीय आहेत. आपण त्या निमित्ताने नेपाळची वैशिष्ट्ये असलेल्या काही गोष्टी पाहू या –
गौतम बुद्धाचं मूळ स्थान असलेला हा देश. निसर्गसंपन्न, युनेस्कोने जाहीर केलेली अनेक ऐतिहासिक स्थळं असलेला, हिमालयाच्या सान्निध्यातला हा देश.
इथं हिंदू लोकवस्ती अधिक आहे. तसेच बौद्ध व इतर धर्मांचे देखील वास्तव्य आहे.
१. सिलिंग ऑफ द वर्ल्ड –
या नावाने नेपाळ जगभरात ओळखला जातो. याचे कारण हिमालयाची उंच शिखरं याच्या सान्निध्यात आहेत.
माऊन्ट एव्हरेस्ट, कांचनजंघा, लाहोत्से, मकालु, चो-यो, धौलागिरी इत्यादी जगातील सर्वात उंच पर्वतशिखरांच्या मध्ये वसलेला हा देश आहे.
२. कधीच कुणाच्या वर्चस्वाखाली नसणे –
नेपाळमध्ये कोणताही स्वातंत्र्यदिन साजरा होत नाही. कारण हा देश कधीच परकीयांच्या वर्चस्वाखाली राहीलेला नाही. साऊथ आशिया खंडातील हा सर्वात प्राचीन देश.
२००८ पर्यंत इथे राजेशाही अस्तित्वात होती. मात्र २००८ पासून येथे रिपब्लिक सरकार अस्तित्वात आले आहे. आजुबाजूला मोठमोठी राष्ट्रे असताना हे होणं आवश्यकही होतं.
अन्यथा मोठी राष्ट्रे अशा छोट्या राष्ट्रांना गिळून टाकू शकतात.
३. खोल, उंच आणि रुंद –
नेपाळमध्ये जगातील सर्वात खोल असलेला तलाव आहे – शेय फोकसुंडो. उंच गवतांचा माळ आहे – चितवन. काली गंडकी घाट, लेक तिलिचो नावाचा सर्वात उंच जागी असलेला तलाव.
नेपाळने निसर्ग सौंदर्याच्या बाबतीत जागतिक विक्रम मोडलेले आहेत. अरुण व्हॅली- सर्वात उंचावरची व्हॅली.
४. जागतिक वारसा घोषित ठिकाणे –
नेपाळ हा काही फक्त नैसर्गिक सृष्टीने नटलेला देश आहे असं नाही. नेपाळमध्ये बरीच ऐतिहासिक, युनेस्कोने संरक्षित म्हणून घोषित केलेली प्राचीन, ऐतिहासिक वारसा सांगणारी ठिकाणेही आहेत.
नेपाळच्या राजधानी काठमांडूमध्येच अशी सात ठिकाणे आहेत. याचाच अर्थ नेपाळ हा प्राचीन संस्कृतीचा वारसा सांगणारा एक महत्त्वाचा देश आहे.
५. नेपाळमध्ये असलेलं व्हेनिस –
भुगर्भशास्त्राच्या सांगण्यानुसार नेपाळमधील काठमांडू येथील आज जी व्हॅली आहे ती एकेकाळी तिथे तलाव असलेली जागा आहे.
तिथला धर्म असं सांगतो की लोकांना राहायला, त्यांचा विकास व्हायला जागा मिळावी म्हणून त्या तलावातील पाणी आटून, वाहून गेले.
परंतु विज्ञानदेखील हेच सांगतंय की या व्हॅलीतील जागा सुपीक आणि धान्य लागवडीसाठी उत्कृष्ट अशी आहे.
६. ही भूमी अजूनही फिरती आहे –
नेपाळचा भूभाग अजूनही सरकतोय. नेपाळ अंतर्गत असलेला इंडो-ऑस्ट्रेलियन प्लॅटो पुढी दहा दशलक्ष वर्षांत आशियात १५०० किमीचा प्रवास करणार आहे असे म्हटले जाते.
७. नेपाळ आणि पोर्तुगाल –
कधी लक्ष देऊन बघा. नेपाळचा नकाशा नव्वद अंशात फिरवला तर तो पोर्तुगालच्या नकाशासारखा दिसतो.
८. यती किंवा स्नोमॅन –
यती किंवा स्नोमॅन ही एक दंतकथा आहे.
सामान्य माणसापेक्षा मोठा आणि केसाळ दिसणारा असा हा माणूस जो बर्फाळ मनुष्य किंवा यती नावाने ओळखला जातो त्याचे वास्तव्य नेपाळच्या हिमालयन पर्वतात आहे आणि तो लोकांना आजही कधी कधी दिसतो असे म्हटले जाते.
नेपाळी भाषेत त्यांना मेह-तेह म्हटले जाते.
९. आशियातील ऍमेझोन –
नेपाळला आशिया खंडातील ऍमेझोन म्हटले जाते. कारण इथं ५९८० प्रकारच्या वेगवेगळ्या फुलांच्या जाती आणि वनस्पती आहेत. वेगवेगळ्या कलरफुल ऑर्कीडच्या जाती आहेत.
८७० प्रकारच्या पक्ष्यांच्या जाती आहेत. ६५० जातीची फुलपाखरे इथे आहेत. मधमाश्या आहेत. इथलं चितवन नॅशनल पार्क हे दुर्मिळ एकशिंगी ऱ्हायनोसोर्स साठी राखीव अभयारण्य आहे.
१०. थरारक, साहसी खेळांसाठी योग्य ठिकाण –
पॅराग्लायडींग, व्हाईट वॉटर राफ्टींग, कायाकिंग, हाय अल्टीट्युड मॅरॅथॉन्स, बन्जी जन्पिंग, माउन्टेन बायकींग, पर्वतारोहण इत्यादीसारख्या आयुष्यभर आठवणी राहतील अशा साहसी खेळ आणि प्रकारांसाठी नेपाळमध्ये सुयोग्य अशी ठिकाणे आहेत.
११. बर्फाळ प्रदेश –
नेपाळमधील बर्फाळ हिमालयन पर्वतातूनच आशियातील सर्वात मोठ्या तीन नद्या – गंगा, यमुना आणि ब्रम्हपुत्रा – उगम पावतात.
जगातील एकूण बर्फाळ प्रदेशांत नेपाळचा तिसरा क्रमांक लागतो.
१२. अनोखा ध्वज –
नेपाळचा राष्ट्रीय ध्वज हा हटके आहे एकदम. इतर देशांच्या ध्वजांसारखा तो कॉमन नाही. त्याचा आकार वेगळा आहे. तो दुहेरी त्रिकोण असलेल्या आकारात आहे.
याच्या वरच्या त्रिकोणात चंद्र तर खालच्या त्रिकोणात सूर्याची प्रतिकृती आहे. या दोन प्रतिकृती म्हणजे नेपाळमधील दोन महत्त्वाच्या धर्माचे प्रतिनिधीत्व करतात.
हिंदु आणि बौद्ध.
१३. बौद्धाचे जन्मस्थान –
नेपाळ हा मूळात शांतीप्रिय लोकांचा देश आहे. कारण हा देश बुद्धाचे जन्मस्थान आहे. सिद्धार्थ गौतम किंवा भगवान बुद्ध ह्यांचा जन्म नेपाळमधील कपिलवस्तू, लुंबिनी येथे इ.स.पूर्व ६२३मध्ये झाला.
आज लुंबिनी हे ठिकाण जागतिक वारसा म्हणून युनेस्कोकडून संरक्षित पर्यटनस्थळ आहे.
१४. धार्मिक किंवा जातीय दंगली नाहीत –
१४७१८१ स्क्वेअर फूटाच्या या छोट्याशा देशात ८० प्रकारच्या प्राचीन जाती आणि १२३ भाषा नांदताहेत. बाजूला अक्राळविक्राळ असे मोठे देश गिळायला टपलेले आहेत.
इथला मुख्य धर्म हिंदू आणि त्याच्या खालोखाल बुद्ध आहे. एवढी विविधता असूनही तिथे आजपर्यंत कधी जातीय किंवा धार्मिक दंगली झालेल्या नाहीत.
आपल्या या शांततापूर्ण जीवनाचा नेपाळी लोकांना अर्थातच अभिमान आहे.
१५. जगापासून अलिप्त देश –
सन १८४६ ते १९५० पर्यंत ब्रिटीश आक्रमणापासून वाचण्यासाठी या देशाने स्वतःला जगापासून अलिप्त आणि एकांतात ठेवले.
१६. जिवंत देवतेचं घर –
इथं कुमारी मुलीची देवता म्हणून प्रतिष्ठापना केली जाते. तिची निवड झाली की तिला पवित्र कुमारी देवता म्हणून ओळखले जाते आणि तिची पुजा केली जाते.
ही कुमारी देवता तलेजु किंवा दुर्गा म्हणून समजली जाते. ती देवळातच राहते आणि वर्षांतून काही प्रसंगी तिची पालखी, मिरवणुक काढली जाते. तेव्हाच तिचे सर्वांना दर्शन होते.
अर्थात तिची पाळी सुरू झाल्यावर ती देवी म्हणून राहत नाही. त्यानंतर नवीन कुमारी देवीचा शोध घेतला जातो.
१७. भ्याडपणापेक्षा मृत्यु बरा –
हा तिथल्या गुरखा सैनिकांचा मोटो आहे. ही गुरखा जमात शूर म्हणून ओळखली जाते. ते आपल्या देशाच्या संरक्षणासाठी मरायला तयार असतात.
त्यांच्यातील ही शूरता पाहूनच ब्रिटीश सरकारने १८१६ मध्ये त्यांची आपल्या सैन्यात नेमणूक करून घेऊन गुरखा रेजिमेंट उभी केली होती.
आणि या पलटणीत अजूनही गुरखा सैनिकांची भरती होत असते.
१८. शेरपा हमाल –
नेपाळमधील शेरपा ही जमात नेपाळी हिमालय पर्वताच्या खोऱ्यांमध्ये ट्रेकर्स लोकांचे सामान उचलणे आणि त्यांना ट्रेकींगमध्ये सहाय्य करणे ही कामे परंपरेने करतात. त्या उंच पर्वतांवर ते आरामात चढू शकतात.
तिथल्या कमी प्राणवायूच्या वातावरणातही ते सहज राहू वावरू शकतात. कारण ते तिथेच जन्मतात, वाढतात त्यामुळे त्यांना तिथल्या हवामानाची सवय झालेली असते.
१९. पर्यटकांचा देश –
नेपाळचा पर्यटन व्यवसाय बराच मोठा आहे. नेपाळच्या एकूण रेव्हेन्यूपैकी जवळपास २५ टक्के रेव्हेन्यू हा पर्यटन व्यवसायातून येत असतो.
यापैकी निम्मा रेव्हेन्यू हा तिथली सरकार मूलनिवासी आणि आदिवासीच्या कल्याणासाठी खर्च करत असते.
२०. राष्ट्रीय खेळ –
नेपाळचा राष्ट्रीय खेळ हा व्होलीबॉल आहे. परंतु तरीही नेपाळ आजपर्यंत या खेळातले ऑलिम्पिक मेडल जिंकलेला नाही.
२१. धुम्रपान –
६० ते ७०च्या दशकात नेपाळ हे हिप्पी लोकांचे तीर्थक्षेत्र समजले जायचे. त्यांच्यामुळेच तिथे मारिजुआना या मादक द्रव्याचा बेकायदेशीर धंदा फोफावला होता.
हिंदूंच्या धार्मिक मान्यतेनुसार नेपाळ हे भगवान शंकराचेही स्थान आहे. मारीजुआना म्हणजेच गांजासाठी शंकर प्रसिद्ध आहे हे आपल्याला माहीतच आहे.
त्यामुळे इथं गांजा ओढणे हे बरेच कॉमन आहे. १९६५ पासून गांजा हे तिथलं सेक्शन ए उत्पादन मानले जाते. देशात सगळीकडे त्याचे उत्पादन आपल्याला दिसते.
तिथल्या कुठल्याही स्थानिक बारमध्ये देखील तुम्हाला उत्कृष्ट प्रतीचा गांजा मिळू शकतो.
२२. लैंगिक बंधने –
आपण आशियातील लोक असल्याने आपल्याला हे माहीत असते. की भिन्नलिंगी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किसींग, हगिंग इत्यादी करत नाहीत सहसा.
परंतु पाश्चात्या देशांतील लोकांना इथले हे नियम पाळावे लागतात. त्यांना त्यासंबंधी सांगितले जाते. अगदी हात धरूनही चालू शकत नाही इथे.
मात्र तुम्ही एकाच लिंगाचे म्हणजे मुली मुलींचा व पुरुष पुरुषांचा हात बिनधास्त धरू शकतात.
२३. पाणी आणि वीजेची कमतरता –
हिमालय, पाणी, तळी यांची मुबलकता असूनही नेपाळमध्ये अजूनही पिण्याचे पाणी, वीज, नेटवर्क यांची उपलब्धता कमी आहे. काही प्रांतात याचे खूप शॉर्टेज आहे.
अनेक ठिकाणी दिवसांतून आठ आठ तास वीज गायब असते.
२४. सर्वात कमी लांबीचा रेल्वेमार्ग –
नेपाळमध्ये फक्त ५९ किमी लांबीची रेल्वे आहे.
२५. माउन्ट एव्हरेस्ट –
जगात हे शिखर या नावाने ओळखले जाते ते त्यावर पहिली चढाई करणारे सर जॉर्ज एव्हरेस्ट यांच्यामुळे.
परंतु या पर्वतशिखराचे स्थानिक नाव आहे ‘सागरमाथा’ किंवा ‘चोमोलुंगमा’.
याशिवाय नेपाळमध्ये देखील जातवर्चस्व असल्याने अजूनही तिथे अरेंज मॅरेजेसना प्राधान्य आहे. तिथले लोक आपल्याप्रमाणेच दोन हात जोडून नमस्ते करून स्वागत करतात.
आपल्याप्रमाणेच डाळ आणि भात हे तेथील प्रमुख अन्न आहे. आणि ते तिथे कोणत्याही वेळी उपलब्ध असते. आपल्याप्रमाणेच नेपाळमध्ये गायीला पवित्र मानले जाते.
तिची पुजा केली जाते. तिथे गोहत्याबंदी असून गायीची हत्या केल्यास १२ वर्षाच्या तुरुंगवासाची सजा होऊ शकते. गाय हा तिथला राष्ट्रिय प्राणी देखील आहे.
आपल्याप्रमाणेच डाव्या हाताने जेवणं तिथं निषिद्ध मानलं जातं.
अशाप्रकारे आपल्यासारखाच असलेल्या या देशाला आपण जीवनात एकदा तरी भेट द्यायला हवी. नाही का?
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.