Site icon InMarathi

गुगल डुडल्स कोण तयार करतं? ह्याची सुरवात कशी झाली?? जाणून घ्या रंजक माहिती!

google doodle inmarathi1

theindianexpress.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सध्याचे जग हे डिजिटल युग आहे. सकाळी उठल्या उठल्या मोबाईल हातात घेतला जातो. आणि लगेचच जगाची सफर करण्यासाठी आपण गुगल ओपन करतो.

कधीकधी त्या गुगलच्या लोगो वर वेगवेगळी गुगल डूडल्स दिसतात.

गुगल डूडल्स म्हणजे काय तर, गुगल हाच शब्द वेगवेगळ्या पद्धतीत लिहिलेला असतो. वेगवेगळ्या दिवसाचं औचित्य साधून डूडल्स तयार केले जातात.

कधीकधी शोध, शास्त्रज्ञ, प्रसिद्ध व्यक्ती, कलाकार, खेळ, खेळाचे इव्हेंट, विशेष दिवस इत्यादी अनेक विविध विषय या डूडल्स मध्ये समाविष्ट असतात.

 

dqindia.com

 

आता गुगलचा लोगो वेगळा दिसला, की प्रत्येक जण उत्सुकतेने आज काय आहे, हे पाहण्यासाठी त्या लोगोवर क्लिक करतो, त्याची माहिती करून घेतो.

हे डूडल्स जेव्हा सुरू झाले त्यामागची कथा मात्र खूप गमतीशीर आहे. १९९८ मध्ये गुगलचे संस्थापक लॅरी आणि सर्जी हे दोघे नेवाडातील ‘बर्निंग मेन’ हा फेस्टिवल पाहण्यासाठी जाणार होते.

त्यासाठी त्यांनी त्या वेळेस GOOGLE मधले जे दोन O आहेत त्यांना बाहेर काढून संस्थापक “आऊट ऑफ द ऑफिस” असं एक डुडल तयार केलं.

ते खरंतर खूप काही चांगलं बनवलं नव्हतं. परंतु अशा प्रकारचे डूडल तयार करता येतील ही आयडीया मात्र कॅच झाली.

त्यानंतर लॅरी आणि सर्जी या दोघांनी गुगल मधल्या डेनिस हौंग याला २००० मध्ये ‘बेस्टील डे’ साठी डूडल बनवायला सांगितलं. विशेष म्हणजे ते डूडल लोकांना खूप आवडलं.

त्यानंतर गुगलमध्ये डेनिसला चीफ डूडलर करण्यात आलं. आता डेनिस कडे डूडलर्सची एक टीमच आहे. आता हे डूडलर्स खूपच बिझी असतात.

सुरुवातीला केवळ विशिष्ट दिवसांकरिता डूडल्स बनवले जायचे, परंतु आता मात्र महिलांचं फुटबॉल फायनल असेल किंवा क्रिकेट फायनल असेल त्यावर देखील डुडल बनत आहेत.

आत्तापर्यंत जवळजवळ काही हजारांमध्ये गूगल डूडल्स बनवले गेले आहेत. आणि त्यांची लोकप्रियता पाहता गुगलचा ते बंद करण्याचा सध्यातरी कोणताच विचार नाही.

आता हे डूडलर्स दररोज एक छानसं डूडल बनवण्यासाठी खूपच उत्सुक असतात. आता गुगलच्या टीम कडे डूडल्स बनवण्यासाठी निरनिराळे विषय आणि आयडिया यांची मोठी यादी असते.

 

dqindia.com

 

त्यांना आता अगदी निवडून डूडल्स बनवावे लागतात. आता काही नवीन प्रकारचे ऍनिमेटेड डूडल्स देखील बनत आहेत.

हल्ली तर वेगवेगळ्या देशांमधल्या महत्त्वाच्या गोष्टी देखील डूडल मध्ये येत आहेत. त्याच बरोबर “गुगलच्या युजर्सना काही आयडिया सुचतात का” याविषयी देखील विचारण्यात येतं.

proposals@google.com या ईमेलवर डूडल विषयीच्या आयडिया पाठवता येतात.

गुगलने अनेक वेगवेगळे डूडल्स बनवले आहेत.

अगदी आपल्या अंतराळातील घटनादेखील डूडल्स मध्ये डोकावल्या आहेत. जेव्हा नासाने मंगळावर पाण्याचा अंश सापडला असं जाहीर केलं, त्याच वेळेस गुगलने Google मधील एक O हा हसरा मंगळ दाखवला. जो स्ट्रॉ घेऊन पाणी पीत आहे.

 

youtube.com

 

ज्यावेळेस प्लूटो हा ग्रह नाही असे जाहीर झालं, त्यावेळेस त्याला अलविदा करण्यासाठी देखील एक डूडल बनलं होतं.

अगदी शनि जवळ गेलेलं कॅसिनी यान असेल किंवा गुरु जवळ गेलेलं जुनो यान. गुगलने या सगळ्यांचे डूडल्स बनवले आहेत.

नासाने पहिल्यांदाच ब्लॅकहोलचा फोटो घेतला. ही खरोखरच एक ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल, कारण कृष्णविवर किंवा ब्लॅक होल हे सहजासहजी डोळ्यांना तर सोडाच पण दुर्बिणीला देखील दिसत नाही.

परंतु ही किमया नासाच्या दुर्बिणीने केली. त्यासाठी देखील केवळ अर्ध्या तासाच्या कालावधीत गुगलने त्यावर डुडल बनवले.

 

interestingengineering.com

 

आपणही नेहमीच पाहतो, की आपल्या भारतीय सणांचे प्रतिबिंब देखील गूगल डूडल्स मध्ये दिसतं.

एखाद्या महत्वाच्या व्यक्तींविषयी देखील गूगल डूडल्स बनवलेले दिसतात. बाबा आमटे आणि त्यांच्या आनंदवनवर देखील गूगल डूडल्स बनले आहेत.

गणित तज्ञ किंवा चालता बोलता कॉम्प्युटर म्हणून ज्यांना ओळखलं जायचं त्या शकुंतलादेवी यांच्या ८४ व्या वाढदिवशी एक गुगल डुडल बनवण्यात आलं.

भारतीयांमध्ये गणिताची गोडी निर्माण व्हावी, यासाठी शकुंतलादेवी यांनी अनेक गणिताची पुस्तकं लिहीली आणि गणिताच्या सोप्या पद्धती सांगितल्या आहेत.

त्या दिवशी त्यांच्या कामाचा सन्मान म्हणून गुगल डुडल बनवण्यात आलं. त्यादिवशी गुगलची अक्षरे ही कॅल्क्युलेटर मधील अंकासारखी होती.

 

abcnews.com

 

गुगलने कधीकधी आपल्या डुडलमुळे वादही ओढवून घेतला आहे.

स्टीव्ह आयर्विन हा प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन क्रोकोडाइल हंटर आणि टीव्ही पर्सनॅलिटी सगळ्यांनाच माहित आहे. त्याचे अनेक प्राण्यांबरोबरचे धाडसी प्रोग्रॅम बऱ्याच जणांनी डिस्कव्हरी चॅनेलवर पाहिले असतील.

त्याच्यामुळेच वाइल्डलाइफ अवेअरनेस लोकांना माहीत झाला. त्याचाच सन्मान करण्यासाठी गुगलने त्याच्या ५७ व्या वाढदिवसाच्या दिवशी एक डूडल बनवले ज्यात त्याने एका मगरीला हातात घेतल आहे.

 

google.com

 

या डूडल वर ‘पेटा’ या प्राणिमित्र संघटनेने अक्षेप घेतला. प्राण्यांबाबत गुगल धोकादायक संदेश देत आहे असं त्याचं म्हणणं होतं.

परंतु अनेक जणांनी स्टीव्ह आयर्विनने प्राणी संवर्धनासाठी केलेल्या कामाच्या योगदानाचे कौतुक केले.

यावर्षीचे जे काही गूगल डूडल्स बनवण्यात आले. त्यामध्ये विशेष उल्लेखनीय डूडल होते:

१९ जानेवारी डूडलने मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर डे साजरा केला.

२९  फेब्रुवारी डूडलने लीप डे साजरा केला.

७ मार्च हा दिवस डूडलने ३ डी तंत्रज्ञान वापरून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला.

 

google.com

 

मार्च १९ चे डूडल वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी देणारे होते.

३१ मार्चचे डूडल पोलियो डॉक्टर डेम जीन मॅकनामाराचा सन्मान करण्यासाठी होते.

२ एप्रिलचे डूडल हे कोरोनाव्हायरस संदर्भात जनजागृती करण्यासाठी ‘स्टे होम सेव्ह लाईव्हज’ असा संदेश देणारे होते.

तसेच एप्रिल २०२० मध्ये, कोरोनाव्हायरसचा संपूर्ण जगावर परिणाम होत असल्याने, Google ने दोन आठवड्यांचे डूडल हे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समर्पित केले.

 

economictimes.indiatimes.com

 

ज्यामध्ये डॉक्टर, नर्सेस, पोलीस, स्वच्छता कर्मचारी, अन्नपुरवठा करणारे लोक यासारखे अनेक कामगार समाविष्ट होते.

गुगलचे हे डुडल आता इतके प्रसिद्ध झाले आहेत की आता गुगल दरवर्षी “डूडल फॉर गूगल” नावाची एक स्पर्धा घेते.

ज्यामध्ये भाग येणाऱ्या स्पर्धकांना त्या वर्षाची थीम सांगण्यात येते. ज्यामध्ये शिशू वर्गातील मुले ते बारावीपर्यंतची मुले यात भाग घेऊ शकतात. संपूर्ण जगभरातून मुले या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवतात.

त्याच्यामधून गुगल एक विजेता जाहीर करते आणि त्या विद्यार्थ्याचे डूडल हे गुगल वर येते. यावर्षीच्या म्हणजेच २०२० ची थीम आहे,’ I SHOW KINDNESS BY….’

जर गुगलचे डुडल पाहणं चुकलं असेल तर निराश होण्याचे काहीच कारण नाही. कारण गुगलने आपले सगळे डूडल्स संग्रहित करून ठेवले आहेत.

Google.com/doodle या वेबसाईटवर प्रत्येक डूडलचे संपूर्ण ऐतिहासिक संग्रहण आहे. यावर आपल्याला प्रत्येक देशात जे वेगवेगळे डूडल्स केले असतील तेही पाहता येतील.

असे हे गुगल डूडल्स आता गूगल बरोबरच आपल्या आयुष्याचा ही भाग झाले आहेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version