नृत्यासाठी १९ किलोमीटर चालत येणाऱ्या अभिनेत्याला विनामूल्य शिकवणाऱ्या गुरु “सरोज खान”
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
माधुरी दीक्षित-ऐश्वर्या राय यांचा डोला रे डोला, ऐश्वर्या रायचं बरसो रे मेघा मेघा, श्रीदेवीचा हवा हवाई, करीना कपूरचा ये इश्क हाये ही गाणी आणि त्यातला डान्स पाहिल्यावर एक नाव नक्की तोंडावर येतं,
सरोज खान!
बॉलिवूड, टॉलीवुड मधल्या अनेक प्रसिद्ध गाण्यांवर अभिनेता-अभिनेत्रींना थिरकायला लावणाऱ्या जगप्रसिद्ध अशा कोरियोग्राफर सरोज खान यांचं काल दु:खद निधन झालं. त्या ७१ वर्षाच्या होत्या.
तीन राष्ट्रीय पुरस्कार आणि डझनभर फिल्मफेअर अवॉर्ड त्यांच्या नावावर आहेत. यावरूनच त्यांच्या एकूण नृत्याविष्काराचा अंदाज येईल.
आपल्या चार दशकापेक्षा जास्त मोठ्या करियर मध्ये त्यांनी २००० पेक्षा जास्त गीतांमध्ये कोरियोग्राफी केली आहे.
८०-९० च्या दशकातले श्रीदेवी, माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय, जुही चावला या त्या काळी यशाच्या शिखरावर असणाऱ्या अभिनेत्रींसोबत त्यांनी काम केलं आहे.
अभिनेत्रीचं काय अनेक अभिनेते सुद्धा त्यांच्या या यादी मध्ये आहेत. त्यातलं एक महत्त्वाचे नाव म्हणजे गोविंदा!
गोविंदाच्या डान्सचा चाहता कोण नाही? गोविंदाला डान्स शिकवणाऱ्या गुरु म्हणजे याच सरोज खान!
गोविंदा अगदी कमी वयातच चित्रपट सृष्टी मध्ये दाखल झाला.अभिनयापेक्षा डान्स मध्ये त्याला जास्त रुची होती. त्याच आवडीच्या कारणाने त्याला सरोज खानकडे यावं लागलं.
वय कमी असल्यामुळे त्याच्याजवळ पैसे नसायचे. म्हणून १९ किलोमीटर तो चालत सरोज खान यांच्याकडे डान्स शिकायला यायचा. त्यावेळेस डान्स शिकण्याच्या आवडीपुढे त्याला या सगळ्याचा त्रास होत नसे.
डान्स प्रति गोविंदाचे असलेले प्रेम आणि समर्पण पाहून सरोज खान यांनी त्याच्याकडून एक ही रुपया फी म्हणून घेतला नाही.
गोविंदा आपल्या डान्स प्रति असलेल्या प्रेम आणि पॅशन बद्दल सांगतो की,
डान्स त्याचं नेहमीच पहिलं प्राधान्य आहे. डान्स त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचे चैतन्य निर्माण करतं. डान्स शिकण्यात जेवढी ऊर्जा गोविंदा द्यायचा, तेवढ्याच जोशात सरोज खान त्यांना डान्सचं ट्रेनिंग देत असे.
याच कारणामुळे सरोज खान गोविंदाला जास्त भावतात.आणि गोविंदाच्या याच समर्पण भावनेमुळे सरोज खान यांनी गोविंदाला एकही पैसा न घेता नृत्याचे धडे दिले.
डान्सचं नव्हे तर गोविंदाला ऑन स्क्रीन रोमान्स करायला शिकवला तो सरोज खान यांनीच! गोविंदाची पहिली फिल्म म्हणजे इल्जाम.
या फिल्म मध्ये गोविंदाला अभिनेत्री नीलम सोबत एक रोमान्स सीन द्यायचा होता, पण गोविंदाला काही केल्या ते जमेना.
पहिल्याच फिल्म मध्ये असे दृश्य द्यायला लागल्यामुळे थोडेसे घाबरणे साहजिकच होते. सीनच्या शूटिंगच्या वेळेस गोविंदा कापायला लागायचा.
गोविंदाची अडचण पाहून सरोज खान यांनी गोविंदाला विचारले, की तुझी कोणी प्रेयसी आहे का?
गोविंदा कडून नकारात्मक उत्तर मिळाल्यावर सरोज खान यांनी गोविंदाला रोमान्स शिकवण्याची जबाबदारी उचलली.
गोविंदा आजही त्याच्या करियर मध्ये सरोज खान यांच असलेलं योगदान अनेक वेळा मान्य करताना दिसतो.
सरोज खान यांनी १९७४ मध्ये ‘गीता मेरा नाम’ या गाण्यापासून आपल्या करियरची सुरवात केली.
पण त्यांना प्रसिद्ध मिळवून दिली, ती १९८७ च्या मिस्टर इंडिया मधल्या श्रीदेवीच्या ‘हवा हवाई’ या गाण्याने. आणि यानंतर त्यांच्या करियर बहरत गेले. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून नाही पाहिले.
८०-९० च्या दशकात श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित यांच्या गाण्यांनी अनेकांना थिरकायला लावलं. त्या गाण्यांना कोरियोग्राफी असायची ती सरोज खान यांचीच!
श्रीदेवी सोबत त्यांनी नगीना आणि चांदणी च्या गीतांमध्ये काम केले. त्यासाठी सरोज खान यांचं आजही तेवढंच कौतुक होतं.
माधुरी दीक्षित आणि सरोज खान हे तर दृढ नातं आहे. माधुरी ला ‘धक धक गर्ल’चं टायटल मिळवून देणाऱ्या याच सरोज खान!
एक दो तीन, तम्मा तम्मा लोगे, धक धक करने लगा, डोला रे डोला अशा अनेक माधुरी दीक्षितच्या सुपरहिट गाण्यांमध्ये सरोज खान यांनी कोरियोग्राफी केली.
सरोज खान यांनी शेवटचं कोरियोग्राफ केलेलं गाणं सुद्धा माधुरी दीक्षितचंच होतं. फिल्म कलंक मधल्या ‘तबाह हो गए’ गाण्यात त्यांनी कोरियोग्राफी केली होती.
२००३ च्या देवदास मधील डोला रे डोला,
२००६ च्या तामिळ फिल्म श्रीनगरम,
२००८ च्या जब वी मेट मधल्या ए इश्क हाये,
या गाण्याच्या उत्तम कोरियोग्राफी साठी त्यांना बेस्ट कोरियोग्राफीचे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
“लगान” चित्रपटात केलेल्या त्यांच्या कोरियोग्राफीसाठी त्यांना २००२ साली अमेरिकन कोरियोग्राफी पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले आहे.
सरोज यांचं मूळ नाव निर्मला नागपाल. त्यांचं कुटुंब फाळणी नंतर भारतात आलं आणि ते मुंबई मध्ये स्थायिक झाले.
एकुलत्या एक असणाऱ्या सरोज यांनी ५० च्या दशकात बँकग्राउंड डान्स आर्टिस्ट म्हणून कमी वयातच चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.
नृत्य करताना नर्तकांच्या तोंडावर त्यांचे नैसर्गिक हावभाव आणणे हेच सरोज यांच्या कोरिओग्राफीचं रहस्य.
कोरिओग्राफीसोबत ऊर्जा, अथेलॅटिजम हे सरोज यांच्या कामाचं वैशिष्ट्य!
सरोज खान यांच्यामुळे आज बॉलिवूडमध्ये अनेक गाणी प्रसिद्ध झाली. त्या गाण्यांवर नृत्य करणाऱ्या अभिनेत्री प्रसिद्ध झाल्या. त्या गाण्यांमधून सरोज खान यांची आठवण कायमच आपल्यासोबत असेल.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.