Site icon InMarathi

एकटा ‘कृपाणधारी’ वि. १२ चीनी सैनिक! गलवान खोऱ्यातले थरारक युद्धनाट्य

gurtej singh 3 inmarathi

thevoiceofchattisgarh.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपण कधीच कोणत्या देशावर पहिला वार केला नाही, तरी आपला देश नेहमीच सीमेवर होणाऱ्या कारवायांमुळे त्रस्त असतो! पाकिस्तान च्या छुप्या कारवाया चालूच असतात आणि आता त्यात भर म्हणून चीन ने उघडपणेच भारताला चॅलेंज केले आहे!

संपूर्ण जग आणि भारत सुद्धा कोरोनाशी झुंज देण्यात व्यस्त आहे तर चीनने बॉर्डर वर त्यांचे रंग दाखवायला सुरुवात केली आहे!

 

financialexpress.com

 

ह्या सगळ्या परिस्थितीतून नेमकं काय होणार आहे हे आपल्याला माहीत नाही, पण एवढं मात्र नक्की की जर आता चीनने काही कुरापत्या केल्या तर भारत सुद्धा शांत बसणार नाही!

भारतीय जवानांच्या शौऱ्या बद्दल अनेक गाथा आपण याआधी देखील नक्कीच ऐकल्या असतील, भारत आणि चीन यांच्यादरम्यान गेल्या काही दिवसांपासून सीमेवर तणाव अनुभवायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी चिनी सैनिकांनी भारताच्या वीस सैनिकांची निर्घुणपणे हत्या केल्याचे देखील समोर आलेले आहे.

परंतु त्याच ठिकाणी भारताच्या देखील एका २३ वर्षाच्या तरुण सैनिकाने अनेक चिनी सैनिकांना केवळ पारंपरिक कृपण च्या सहाय्याने यमसदनी धाडले पण दुर्दैवाने या सर्व झटापटीमध्ये त्याला देखील वीर मरण आले.

जाणून घेऊयात या पराक्रमी सैनिकाबद्दल…..

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन यांच्यातील LAC वर गलवान खोऱ्यात तणाव निर्माण झालेला आहे.

 

tribuneindia.com

 

१५ जून रोजी रात्री काही चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर धारदार शस्त्राने हल्ला केला.

काही भागात पेट्रोलिंग करत असताना बंदूक आणि इतर शस्त्र घेऊन जायची परवानगी नसते कारण भारत आणि चीन यांच्या दरम्यान याआधी शांतता करार झालेला आहे!

आणि त्या शांतता करारानुसार भारत किंवा चीन यांचे सैन्य पेट्रोलिंग करताना बंदुक सोबत घेऊन जात नाहीत किंवा आवश्यकता वाटल्यास ते बंदुक फक्त खांद्याला लटकवून पेट्रोलिंग करत असतात.

अशा भागात पेट्रोलिंग करत असताना चिनी सैन्याने अचानक धारदार शस्त्राच्या आधारे हल्ला केल्यामुळे भारतीय सैन्यातल्या अनेक सैनिकांना जीव गमवावा लागला.

 

indianexpress.com

 

परंतु परिस्थिती लक्षात आल्यावर लगेच पंजाब रेजिमेंट “घातक प्लाटून’ या तुकडीला पाचारण करण्यात आली.

या ठिकाणी भारतीय सैन्य आणि चिनी सैन्यामध्ये झडप झाली आणि या दरम्यान तेवीस वर्षाच्या गुरतेज सिंगने मोठा पराक्रम गाजवला. तेवीस वर्षाच्या या तरुणाकडून, आजच्या तरुणांनी नक्कीच आदर्श घ्यायला हवा.

जेव्हा याठिकाणी घातक प्लाटून ला पाचारण करण्यात आले तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली होती.

गुरुतेजचे इतर सहकारी सांगतात की आमच्याकडील पारंपारिक कृपण घेऊन आम्ही घटनास्थळी पोहोचलो.

गुरु तेजने,” वाहेगुरू जी का खलसा, वाहेगुरू जी की फतेह” अशी सिंहगर्जना करत चिनी सैनिकांवर हल्ला चढवला.

 

deccanherald.com

 

गुरुतेज वर एकाच वेळी चार चिनी सैनिकांनी हल्ला केला परंतु जराही न डगमगता गुरु चारही सैनिकांना यमसदनी धाडलं. परंतु या झटापटीत गुरुतेजचा तोल गेला आणि तो खोऱ्यात खाली दगडांवरति पडला.

त्याच्या मानेवरती आणि डोक्यावरती जखमा झाल्या, तो गंभीर जखमी झाला होता. त्याही परिस्थितीत तो परत मैदानात आला.

जखमी अवस्थेतही त्याने एका चिनी सैनिकाला गंभीर जखमी केले.

त्याच्या समोर उभे असलेले सातही चिनी सैनिक त्याच्या रक्ताळलेल्या हाताकडे भितीदायक नजरेने बघत होते तेवढ्यात गुरुतेजवर एकाने पाठीमागून हल्ला केला त्याला खाली पाडण्यात तो यशस्वी झाला.

ज्या चिनी सैनिकांनी त्याला खाली पडलं त्यानेच धारदार शस्त्राद्वारे त्याच्यावरती जीवघेणा हल्ला देखील केला, परंतु गुरु तेजने सुद्धा हार न करता त्याच्या मारेकऱ्याला संपवले.

जेव्हा ही मारामारी थांबली त्यावेळी लक्षात आलं की तेवीस वर्षाच्या या तरुण मुलाने थोडेथोडके नव्हे तर तब्बल १२ चिनी सैनिकांना मारले होते.

ते पंजाबी मध्ये म्हणतात ना की,” ईक ईक अकाली सवाल लाख दे बराबर.” त्याने ‘घातक प्लाटून’ चे नाव राखले होते.

याआधी देखील पंजाब रेजिमेंटने अनेक लढायांमध्ये आपलं शौर्य आणि कर्तुत्व दाखवलेलं आहे. या झटापटीत गुरुतेजन पंजाब रेजिमेंटची ही परंपरा कायम ठेवली.

 

punjabtribune.com

 

आपण जेव्हा सायंकाळी घरी निवांत टीव्ही बघत असतो आणि आराम करत असतो त्यावेळेला आपण विचारही करू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये आपले भारतीय सैनिक दिवस-रात्र डोळ्यात तेल घालून देशाची सेवा करत असतात.

जिथे हा संघर्ष सुरू आहे तिथली भौगोलिक परिस्थिती म्हणजे गलवान घाटी एक प्रकारे मोठी दरी आहे, खाली नदी असून वर LAC आहे या LAC वर भारतीय सैनिक चिनी सैन्यासोबत संघर्ष करत आहेत.

येथील तापमान शून्याच्या सुद्धा खाली आहे. हाडं गोठवणाऱ्या या थंडीत आपले जवान पहारा देत आहेत आणि या घाटी ची उंची एवढी आहे की जर चुकून जरी पाय घसरला तर मृत्यू निश्चित आहे.

अशा भौगोलिक परिस्थितीमध्ये आपले भारतीय जवान कर्तव्य बजावत आहेत अशा परिस्थितीत आपण जाण्याचा देखील विचार कराल का?

अशा कठीण परिस्थितीत देखील जिवाची पर्वा न करता आपलं कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांना आणि वीरमरण आलेल्या गुरुतेजला आमचा सलाम.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version