ट्युशन्स घेणारा शिक्षक भारतातील “सर्वात श्रीमंत” लोकांच्या यादीत, “बायजू”ची प्रेरणादायक कथा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
‘एखादा व्यवसाय पैसा कमवण्याच्या तीव्र आवेशाने चालवता येत नाही, त्यासाठी समाज बदलण्याची उत्कटता अधिक महत्त्वाची असते.’
यश हे प्रत्येकासाठीच खूप महत्वाच असतं, पण एखाद्याची यशोगाथा वाचून आपल्याला केवळ प्रेरणाच मिळत नाही, तर आपणही काहीतरी नवीन ध्येय डोळ्यासमोर ठेऊन ते पूर्ण करण्यास मदत करते, बरोबर?
म्हणून अशी एक प्रेरक अशी यशोगाथा इथे मांडलेली आहे. आज आपण त्या मुलाबद्दल बोलणार आहोत, ज्याने भारताला एका वेगळ्या प्रकारे सुशिक्षित करायचं ठरवलं आहे.
बायजू रवींद्रन हे एज्युकेशन टेक्नॉलॉजी फर्म byju’s या क्लासेसचे संस्थापक आहेत. ज्यांची टॅगलाइन आहे “शिक्षणाच्या प्रेमात पडा”.
साधारण २००७ मध्ये त्यांनी साधारण साधा व्यवसाय सुरू केला. CAT ची परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना प्रश्नांमागील संकल्पना समजून घेऊन परीक्षेत अडथळा कमी करण्यास मदत केली. ही भारतीय शिक्षण तंत्रज्ञानात मोठी कामगिरी आहे.
इथे ६-१२ वी पर्यंतच्या वर्गातील मुलांना मुख्यत्वे गणित आणि विज्ञान यातील संकल्पना शिकविल्या जातात. कारण त्यांना पुढील काळात अनेक प्रवेश परीक्षांची तयारी करावी लागते.
भारतात अंदाजे २२७ दशलक्ष विद्यार्थी आहेत आणि शिक्षण हे भारतीयांसाठी कायमच प्राधान्य राहिलं आहे, म्हणूनच बायजू यांनी अलीकडेच उद्योजक sequoia यांच्याकडून ७५ दशलक्ष डॉलर्सचा निधी उभ केला.
सोफिना ही भारतातील एड्युकेशन टेक्नॉलजीच्या इतिहासामधील सर्वात मोठी फंडिंग करणारी कंपनी आहे. आणि ही कामगिरी करणारा बायजू रवींद्रन एक प्रेरक शक्ती आहे.
बायजू रवींद्रनचा जन्म केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील अझीकोड नावाच्या छोट्याशा गावात झाला. त्याचं शिक्षण हे माल्याळम भाषेतून झालं. त्याचे आईवडील दोघेही जण शिक्षक होते. त्याने शाळेत चांगले काम करावे अशी त्यांची इच्छा होती.
त्याच्या पालकांनी त्यांना अभ्यासाबरोबरच क्रीडाक्षेत्राकडे लक्ष देण्यासाठी प्रोत्साहन दिलं.
ते त्यांच्या मुलाखतीत कायम अभिमानाने सांगतात, की “मी विद्यापीठाच्या स्तरावर फुटबॉल, क्रिकेट आणि बॅडमिंटनसह सहा वेगवेगळे खेळ खेळलो आहे.”
हा सगळा वेळ लेक्चर्स पासून दूर राहिल्याने रवींद्रनला त्यांचा राहिलेला अभ्यास कुठून तरी पुस्तक आणि नोट्स गोळा करून करावा लागला.
ते म्हणतात, जेव्हा मी पहिल्यांदा शैक्षणिक क्षेत्रात अशीकाहीतरी नवीन संकल्पना आणण्याचा विचार केला, तेव्हा माझ्या डोक्यात अशाच मुलांचा विचार आला ज्यांचा काही न काहीतरी कारणांनी अभ्यास बुडतो.
आता Byju’s नेटवर्कवर १.६ लाख विद्यार्थ्यांनी विनामूल्य अॅप डाउनलोड केलं आहे. ते कायम त्यांच्या आईवडिलांना याचं श्रेय देतात.
आईवडिलांनी त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. खेळाने आत्मविश्वास आणि समाजाची जाणीव दिली. या गोष्टींमुळे आज ते त्यांच्या व्यवसायात खूप दूरवर पोहोचले आहेत.
शालेय शिक्षणानंतर रवींद्रन इंजिनियर झाले. मग त्यांना आयटी क्षेत्रात नोकरी मिळाली. ज्यामुळे त्यांनी अनेक महिने परदेशात घालवले. २००३ मध्ये ते बेंगळुरूमध्ये सुट्टीसाठी आले असतांना, त्यांनी काही मित्रांना CAT परीक्षेचा अभ्यास करण्यास मदत केली.
त्यांच्या मित्रांनी त्यात चांगले गुण मिळवले. यानंतर ते जेव्हा दोन वर्षांनी पुन्हा भारतात परतले, तेव्हा त्यांनी CAT करता आणखी काही लोकांना मदत केली.
जेव्हा त्यांना या शिकवण्याला खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला, तेव्हा त्यांनी ठरवलं आपणही आपल्याला पालकांप्रमाणे शिक्षक व्हायचं.
रवींद्रन यांनी ज्या कोणाला CAT परीक्षेच प्रशिक्षण दिलेल्या सगळ्यांचे निकाल अगदी कौतुकास्पद होते. आणि आता आपण हेच करायच असं मनाशी ठरवून त्यांनी आयटी मधील नोकरी सोडली.
त्यांनी याच प्रशिक्षण देण्याला व्यवसायात बदलण्याचा निर्णय घेतला. सोमवार ते शुक्रवार ते बेंगळुरूमधील तरुणांसाठी कोचिंग घ्यायचे. एकदा हे जमू लागल्यावर त्यांनी मुंबई आणि पुणे इथे शनिवार आणि रविवार कोचिंग घ्यायला सुरूवात केली.
ज्यांनी कॅट क्रॅक करण्याचे स्वप्न पाहिलं होतं, त्या सगळ्यांसाठी तो एक देव होता. नंतर जेव्हा वर्ग कमी पडू लागले, तेव्हा त्यांनी १२०० विद्यार्थ्यांसाठी सभागृह बुक केले.
यात विद्यार्थी मोठ्या संख्येने आणि अत्यंत उत्साहान उपस्थित होते. अगदी पिन ड्रॉप सायलेंस मध्ये त्यांच व्याख्यान सगळ्यांनी ऐकलं जे थक्क करणारं होतं.
अनेक शहरांमध्ये व्यवसाय सुरू झाल्याने रविंद्रन एका आठवड्यात नऊ शहरांचा प्रवास करत होते. वेबवेक्स वापरून पूर्व-रेकॉर्ड केलेले वर्ग स्क्रीनिंग करण्याचा मार्ग त्यांनी शोधून काढला.
कोचिंगची मागणी जसजशी वाढत गेली, तसतसं त्यांनी अधिक ठिकाणांसाठी अधिक क्लासेस ची नोंद करायला सुरुवात केली. अखेरीस, त्यांनी व्हिडिओ बघितल्यावर असणार्या शंकांची उत्तर देण्यासाठी अनेक नवीन विडिओ बनवले.
Byju’s अॅप त्यांनी सुरू केलं. सुरुवातीला ट्रायल म्हणून अॅप डाउनलोड केल्यानंतर गणित, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्रातील काही व्हिडिओ त्यांनी स्वतः पहिले.
दहावीच्या व्हिडिओंना पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, ग्राफिक्स आणि अॅनिमेशनचा वापर यात करायला हवा.
अशाप्रकारे ते दरवर्षाला व्हिडिओ बनवून मुलांना सोप्या भाषेत कठीण संकल्पना कशा सांगता येतील याचा विचार करतात. आणि आता तर हे अॅप संपूर्ण भारतभर प्रसिद्ध ठरलं आहे.
आधी केवळ तीनच विषय शिकवणार्या Byju’s यांनी आता अगदी सगळ्याच विषयांचा समावेश केला आहे.
दिवसभर सहकार्यांसह काम केल्यावर दररोज रात्री फुटबॉल खेळतात. ते स्वत:ला “योगायोगाने उद्योजक” झालोय असं म्हणतात.
बायजू रवींद्रन यांना असं वाटत, की अजूनही शिक्षण मिळवण्यासारखे बरेच विषय आहेत. या क्षेत्रात क्रांती नक्कीच घडवून आणता येईल.
त्यांचं हे अॅप आज अनेक विद्यार्थी वापरतात. तरी…..
“आम्ही अजूनही भारतातल्या १% पेक्षा कमी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलोय. आम्हाला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. हे असं एक साधन आहे जे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रेमात पाडेल.” असं ते म्हणतात.
फोर्ब्स’ने भारतातील सर्वाधिक श्रीमंतांची एक यादी प्रसिद्ध केली. या यादीत बायजू रवींद्रन समावेश आहे. ‘फोर्ब्स’ च्या म्हणण्यानुसार, त्याची सध्याची संपत्ती १.८ अब्ज डॉलर्स इतकी आहे.
या शिक्षणवीरास टीम इनमराठी कडून खूप खूप शुभेच्छा!!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.