' चायनीज “नसलेला” फोन हवाय? ही आहे बेस्ट नॉन-चायनीज स्मार्टफोन्सची यादी… – InMarathi

चायनीज “नसलेला” फोन हवाय? ही आहे बेस्ट नॉन-चायनीज स्मार्टफोन्सची यादी…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मध्यंतरी बऱ्याच चायनीज ऍप्सवर भारतीय सरकारने बंदी घातली. यावेळी ट्विटरवरील मंडळींनी खास त्यांच्या शैलीत या निर्णयाचे स्वागत केले.

#BanChineseProduct किंवा #CKMKB (चायना के माल का बहिष्कार) सारखे हॅशटॅग या काळात बऱ्या पैकी ट्रेंडमध्ये आले होते.

कोरोना सारख्या महामारीने भारतासह आज संपूर्ण जग त्रासले गेले असताना आपला साम्राज्यवादी अजेंडा पुढे रेटत चीनने भारताच्या लडाख भागात घुसखोरी करून नव्या वादाला तोंड फोडले होते.

आणि क्षणार्धात भारतीयांचा रोष हा शिगेला पोहोचला. दोन देशांमध्ये युद्ध होणे ही कोणालाच परवडणारी बाब नव्हती.

त्यामुळे एकमेकांना जास्त नुकसान कसे पोहोचवता येईल या विचाराने देश आजकल चालत असतात. आणि त्यातील सगळ्यात महत्वाचे हत्यार म्हणजे व्यापार.!

भारताने चीनमधून भारतात इन्व्हेस्ट होणारी प्रत्येक गुंतवणूक आपल्या रडार खाली आणली. एनजीओ ना मिळणारी मदत सुद्धा त्यामुळे सरकारी देखरेखेखाली आली.

चीन मधून आयात होणाऱ्या मालावर इम्पोर्ट ड्युटी सुद्धा वाढवली गेली आहे. मोबाईल फोन्स वर जीएसटी वाढवला गेला.

 

chinese app banned inmarathi

 

व्यापारी मार्गाने एकमेकांना शह देण्याचे काम आज आपणास बघायला मिळेल. देशाचे नागरिक म्हणून पण अनेकांचा उद्रेक यावर दिसून यायला लागला.

कोणी आपले चायनीज टीव्ही बदलले तर कोणी मोबाईल.(हे यावर सोल्युशन कधीच नव्हतं.)

कोणी सरसकट बंदी घालावी अस सुचवत होते. थेट व्यापार थांबवणे ही अशक्य अशी बाब आहे. पण चायनीज वस्तूला पर्यायी वस्तू शोधणे हा पर्याय मात्र आज उपलब्ध आहे.

इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट मध्ये सर्वाधिक विकले जाणारी वस्तू म्हणजे मोबाईल फोन. भारतात स्मार्ट फोन मार्केट ची वार्षिक ग्रोथ ही ८% एवढी आहे.

जवळपास १६ करोड स्मार्टफोन हे मागच्या वर्षी भारतात विकले गेले.

एमआय रेडमी, रियलमी, विवो, ओप्पो, लिनोवो-मोटोरोला,आयकु, वनप्लस हे चायनीज ब्रँड!

तर अँपल हे अमेरिकन, सॅमसंग-एलजी हे कोरियन, असुस-एचटीसी हे तैवानी आणि फिनलँडचा नोकिया हे ब्रँड भारतीय मार्केटमध्ये वावरताना दिसतात.

नाही म्हटले तरी सर्वाधिक हिस्सा चायनीज ब्रँडने भारतात व्यापलेला दिसतो.

आता चायनीज मालावर बहिष्कार पण टाकायचा आहे आणि मोबाईल फोन नॉन चायनीज हवा अशा द्विधा मनस्थितीमध्ये आज बरेच जण अडकलेले दिसतात.

 

samsung smartphone inmarathi

 

तर पाहूया चायनीज स्मार्टफोन ला टक्कर देणारे काही नॉन चायनीज मोबाईल ब्रँड, जे मोबाईल विकत घेताना आपली मदत करू शकतील.

बजेट मोबाईल सेगमेंट मध्ये सगळ्यात जास्त फोन्स हे सॅमसंगचे पाहायला मिळतात.

सॅमसंग ची ए आणि एम सिरीज ही खास करून बजेट ओरिएंटेड मोबाईल सेगमेंट आहे.

ए सिरीज मध्ये काही फ्लॅगशिप लेव्हलचे फोन्स देखील पाहायला मिळतील पण त्यानुसार त्यांची किंमत सुद्धा तेवढीच आहे.

 

१. सॅमसंग एम ११ :

 

samsung m 11 inmarathi

 

हा आहे सॅमसंगचा बजेट सेगमेंट फोन.

स्नॅपड्रॅगन ४५० वर चालणारा हा फोन ६.४ इंच एचडी+ रिझोल्युशन डिस्प्लेसह मिळतो. ३ जीबी/३२ जीबी आणि ४ जीबी/६४ जीबी मेमरी याला दिली गेली आहे.

ट्रिपल कॅमेरा मॉड्युल आणि ५००० एमएएच एवढी ह्युज बॅटरी ही या मोबाईलची विशेषता आहे.

११००० किमती मध्ये मिळणारा हा फोन त्याच्या किमती आणि स्पेक्स मुळे बजेट लिस्ट मध्ये पाहिल्या स्थानावर येतो.

२.सॅमसंग एम ४० :

 

samsung m 40 inmarathi

 

स्नॅपड्रॅगन च्या ६७५ चिपसेटवर चालणारा हा स्मार्टफोन १६००० रुपयांमध्ये आपल्याला मिळतो.

६ जीबी/१२८ जीबी मेमरी यामध्ये मिळते. ज्यामुळे गेमिंग साठी कुठलीही तडजोड येथे होत नाही.

३२+८+५ मेगापिक्सेलचे ट्रिपल कॅमेरा मॉड्युल इथे पाहायला मिळते.

६.३ इंच फुल्लएचडी + रिझोल्युशनची डिस्प्ले याला दिली गेली आहे. ३५०० एमएएचची बॅटरी दिली गेली आहे जी फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.

३. नोकिया ७.२ :

 

nokia 7.2 inmarathi

 

नोकियाचा दरारा आधीसारखा जरी राहिला नसला तरी कॅमेरा सेन्ट्रीक क्रिस्पी फोन आजही नोकिया ची ओळख आहे.

स्नॅपड्रॅगन ६६० वर चालणार हा फोन त्याच्या कॅमेरा परफॉर्मन्स साठी प्रसिद्ध आहे. ४८+५+८ मेगापिक्सेलचे ट्रिपल मॉड्युल नोकिया ची असलेली ओळख कायम ठेवते.

फ्रंट मॉड्युल हे २० मेगापिक्सेल एवढे आहे. ६.३ इंचाची फुल्लएचडी + प्लस रिझोल्युशन असणारी डिस्प्ले इथे मिळते.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स सपोर्ट करणारा हा फोन १५००० च्या किमतीत आपल्याला मिळतो.

 

४. असुस झेनफोन ५झी :

 

asus zenfone inmarathi

 

आपल्या ओएस इंटरफेस आणि हार्डवेअरसाठी प्रसिद्ध असलेल्या असुस ने हा फोन सुद्धा आपल्या प्रतिमेला साजेसा तयार केलेला आहे.

स्नॅपड्रॅगन च्या ८४५ चिपसेट वर चालणार हा फोन १९००० रुपयात आपल्याला मिळतो.

सोनीचा आयएमएक्स ३६३ चा १२ मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा मॉड्युल याला दिला गेलेला आहे.

तसेच ६.२ इंच ची फुल्लएचडी + रिझोल्युशन असलेला डिस्प्ले आणि ३३०० एमएएच ची बॅटरी या फोन ला दिली गेली आहे.

दोन्ही बाजूने गोरिला ग्लास ६ चं प्रोटेक्शन या फोन ला दिल गेलं आहे.

 

५. नोकिया ६.१ प्लस :

 

nokia 6.1 inmarathi

 

स्नॅपड्रॅगन च्या ६३६ चिपसेट वर हा फोन चालतो. (प्रोसेसर थोडा जुना आहे पण अजून तेवढ्याच एफिशिययंट ने परफॉर्म करतो.)

६ इंचाची फुल्लएचडी+ प्लस रिझोल्युशनचा डिस्प्ले इथे पाहायला मिळते. ड्युअल रेकॅमेरा हे या फोन चे वैशिष्ट्य आहे.

४जीबी/६४जीबी मेमरी कॉन्फिग्रेशन इथे पाहायला मिळते.

 

६. मायक्रोमॅक्स इन १ बी :

मध्यंतरी दुर्लक्षित राहिलेली ही कंपनी आता ‘चिनी कम’ म्हणत पुनरागमन करत आहे. अवघ्या ७ हजरांमध्ये मिळू शकेल, असा हा फोन म्हणजे लॉटरी आहे, असे म्हणता येईल.

 

micromax-1b-inmarathi

 

२ जीबी रॅम आणि ३२ जीबी मेमरी किंवा ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी मेमरी अशा दोन पर्यायांमध्ये हा उपलब्ध होऊ शकतो.

७. मायक्रोसॉफ्ट इन नोट १ :

हा फोन सुद्धा कमी बजेटमध्ये उत्तम फीचर्स देतो. ४८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा, ६४ जीबी मेमरी, ५००० एमएएचची बॅटरी इत्यादी गोष्टी अवघ्या ११ हजारांमध्ये उपलब्ध आहेत.

 

in-note-inmarathi

 

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, मायक्रोमॅक्सचे फोन हे पूर्णतः भारतीय आहेत.

 

फ्लॅगशिप लेव्हल फोनला अँपल आणि सॅमसंगला टक्कर देणारी वनप्लस ही एकमेव चायनीज कंपनी मार्केटमध्ये उभी आहे म्हणायला हरकत नाही.

सॅमसंग ची एस आणि नोट सिरीज,अँपलचे सगळेच नवीन रिलीज होणारे फोन महागड्या फोन मध्ये आघाडीला आहेत!

तर पाहुयात हाय बजेट नॉन चायनीज ब्रँडचे फोन्स.

१. सॅमसंग गॅलेक्सी एस २०, एस २०+,एस २० अल्ट्रा :

सॅमसंगची एस सिरीज त्याच्या डिस्प्ले,कॅमेरा आणि स्मूथ परफॉर्मन्स साठी प्रसिद्ध आहे.त्याप्रमाणे त्याची प्रायझिंग सुद्धा तेवढीच हाय असते.

एस २० :

 

samsung s 20 inmarathi

 

सॅमसंग चा स्वतःचा एक्झिनॉस ९९० प्रोसेसर,६.२ इंचाची क्वाड एचडी रिझोल्युशनची सुपरएमोलेड डिस्प्ले,६४+१२+१२ मेगापिक्सेलचं ट्रिपल कॅमेरा मॉड्युल,फ्रंट १० मेगापिक्सेल.

४००० एमएएच ची बॅटरी विथ वायरलेस आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट. ७०,००० रुपये पासून सुरवात.

 

एस २०+ :

 

samsung galaxy s20plus inmarathi

 

स्वतःचा एक्झिनॉस ९९० प्रोसेसर, ६.७ इंचाची क्वाड एचडी रिझोल्युशनची सुपरएमोलेड डिस्प्ले, ६४+१२+१२+०.३ मेगापिक्सेलचं क्वाड कॅमेरा मॉड्युल, फ्रंट १० मेगापिक्सेल.

४५०० एमएएच ची बॅटरी विथ वायरलेस आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट. ७७,००० रुपयांपासून सुरवात.

 

एस २० अल्ट्रा :

 

s20 ultra inmarathi

 

सॅमसंग चा स्वतःचा एक्झिनॉस ९९० प्रोसेसर, ६.९ इंचाची क्वाड एचडी रिझोल्युशनची सुपरएमोलेड डिस्प्ले, १०८+४८+१२+०.३ मेगापिक्सेलचं क्वाड कॅमेरा मॉड्युल, फ्रंट १० मेगापिक्सेल.

५००० एमएएच ची बॅटरी विथ वायरलेस आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट. ९८,००० रुपयांपासून सुरवात!

तगडी रॅम आणि रोम मॅनेजमेंट, इनडिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, फेसआयडी सारखे सर्व लेटेस्ट सिक्युरिटी ऑप्शन, सर्व सेन्सर्स सहित परिपूर्ण मोबाईल म्हणून या कडे पाहता येईल.

त्याचसोबत सॅमसंगची एस १० आणि नोट १० सिरीज ही देखील वर्षभर जुनी असून देखील आजही तेवढंच क्रिस्पी परफॉर्मन्स देते.

 

२. आयफोन ११, ११ प्रो, ११ प्रो मॅक्स, १२ मिनी, १२ प्रो :

आयफोन म्हटल्यावर काय आठवतं? काळाच्या एक पाऊल पुढे असणार प्रोसेसर, रेटिना डिस्प्ले आणि सगळेच कंपन्या कॉपी करतात असे सिक्युरिटी फीचर्स.

आयफोन ११ :

 

iphone 11 inmarathi

 

सुपरफास्ट अशा बायोनिक ए१३ चिपसेट वर हा फोन चालतो. विशेषता असलेली ६.१ इंच रेटिन डिस्प्ले, १२+१२ मेगापिक्सेलचा ड्युअल कॅमेरा मॉड्युल आणि १२ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा मॉड्युल.

आणि नेहमीची बोंब असणारी ३१०० एमएएचची बॅटरी. ६८,००० रुपयांपासून सुरवात.

 

आयफोन ११ प्रो :

 

iphone 11 pro inmarathi

 

आयफोन ११ प्रमाणे ए १३ बायोनिक चिप येथे सुद्धा वापरली गेली आहे. ५.८ इंचाची रेटिना डिस्प्ले, १२+१२+१२ मेगापिक्सेलचे ट्रिपल कॅमेरा मॉड्युल आणि १२ मेगापिक्सेलचाचं फ्रंट कॅमेरा मॉड्युल,३०४६ एमएएचची बॅटरी.

एक लाखापासून सुरवात.

 

आयफोन ११ प्रो मॅक्स :

 

11 max pro inmarathi

 

सेम ए १३ बायोनिक चिप, ६.५ इंच रेटिना डिस्प्ले,१२+१२+१२ मेगापिक्सेलचे ट्रिपल कॅमेरा मॉड्युल आणि १२ मेगापिक्सेलचाचं फ्रंट कॅमेरा मॉड्युल, ३९०० एमएएच ची बॅटरी.

१ लाख १७ हजार पासून सुरवात.

 

आयफोन एसई २०२० :

 

iphone se inmarathi

 

आयफोन ७ सारखा दिसणारा हा फोन अँपलच्या लेटेस्ट ए १३ बायोनिक चिप वर चालतो. ३५,००० पासून या फोन ची सुरवात आहे.

आयफोन १२ मिनी :

 

iphone-12-mini-inmarathi

 

यात ए १४ बायोनिक चिपचा वापर करण्यात आला आहे. नेहमीप्रमाणे आधीच्या फोनपेक्षा एक पाऊल पुढे टाकत हा फोन अँपलने लॉन्च केला आहे.

आयफोन १२ प्रो 

 

iphone-12-inmarathi

 

१२ प्रोमध्ये ६.१ इंच तर १२ प्रो मॅक्समध्ये ६.७ इंच अशी भली थोरली स्क्रीन मिळणार आहे. अर्थातच यातही ए १४ बायोनिक चिपचा वापर करण्यात आला आहे. शिवाय हा आयफोन आकाराने सुद्धा मोठा आहे.

तर, बजेट ओरिएंटेड आणि हाय बजेट अशा दोन्ही प्रकारच्या मोबाईल सेटबद्दल आपण पाहिले.

भविष्यात नवीन मोबाईल घेताना या नॉन चायनीज ब्रँड मोबाईल फोनबद्दलची माहिती नक्कीच उपयोगी ठरेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?