Site icon InMarathi

इन्व्हेस्टर्स शिवाय ‘करोडोंचा’ बिझनेस उभा करणाऱ्या “दृढनिश्चयी” उद्योजकाचा प्रेरणादायी प्रवास!

narayan poojari featured inmarathi

bwhotelier.businessworld.in

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बिजनेस करण्याचं स्किल तुमच्यात असेल तर, गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत जातात. तुम्हाला यश मिळतंच.

गरज आहे ती तुम्हाला बिजनेस का करायचा आहे? हे तुम्हाला क्लिअर असण्याची आणि सतत वेगवेगळे प्रयोग करून ‘लोकांना काय आवडेल? यावर अभ्यास करण्याची.

आज आम्ही एका ग्रेट व्यक्ती बद्दल सांगणार आहोत जे की वयाच्या १३ व्या वर्षी घरातून बाहेर पडले होते!

ज्यांनी मुंबई मधील हॉटेल मध्ये भांडी घासण्या पासून सुरुवात केली आणि आज हीच व्यक्ती अश्याच एका हॉटेल चेन चे मालक आहे. नारायण पुजारी या अवलिया व्यक्तीची ही स्टोरी आहे.

 

homegrown.co.in

 

जे की आज ‘शिव सागर’ या हॉटेल चेन चे मालक आहेत आणि त्यांच्यमुळे १३०० लोकांना आज नोकरी मिळाली आहे. शेवटपर्यंत नक्की वाचा. तुम्हाला खूप इन्सपायर करेल आणि खूप काही गोष्टी शिकवेल.

नारायण पुजारी यांचा जन्म १९६७ मध्ये कर्नाटक च्या उडपी जिल्ह्यातील गुज्जडी या छोट्या गावात झाला. घरची परिस्थिती जेमतेम होती. वयाच्या १३ व्या वर्षी नारायण पुजारी हे काही तर चांगलं काम करायचं या हेतूने मुंबईत आले.

दिवसा हॉटेल मध्ये काम करायचे आणि रात्री शाळा अटेंड करायचे. ८० च्या दशकात मुंबई मध्ये खूप नवीन उद्योग आणि ऑफिसेस सुरू झाले होते. देशभरातून खूप तरुण मुलं मुंबईत कामासाठी रोज दाखल होत होते.

मुंबई शहर हे कसं घड्याळाच्या सेकंद काट्यांवर चालतं हे आपण सगळे जाणतोच.

त्या काळी ‘फास्ट फूड’ जसे की, पाव भाजी, दोसा हे पदार्थ काम करणाऱ्या तरुणांमध्ये खूप लोकप्रिय होत होते.

नारायण पुजारी यांनी एक मार्केट रिसर्च केला आणि त्यांच्या लक्षात आलं की, आपण या फास्ट फूड चं हॉटेल सुरू केलं तर ते नक्की चालू शकतं.

१९९० मध्ये वयाच्या २३ व्या वर्षी नारायण पुजारी यांनी मुंबईच्या चर्चगेट एरिया मध्ये ‘शिव सागर’ या नावाने एक हॉटेल सुरू केली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही वाचा – 

===

 

tripadvisor.in

 

हे हॉटेल सुरू करण्यासाठी नारायण पुजारी यांना ४० लाखांची इन्व्हेस्टमेंट केली एका पार्टनर ला सोबत घेऊन.

एका वर्षातच पार्टनर ने काही कारणांमुळे काढता पाय घेतला आणि मग नारायण पुजारी हे ‘शिव सागर’ हॉटेलचे मालक झाले.

आज या चेन चा टर्नओवर हा ७५ करोड वर पोहोचला आहे आणि ३ शहरात मिळून १५ शाखा स्थापन झाल्या आहेत.

एका इंटरव्यूह मध्ये बोलताना नारायण पुजारी यांनी सांगितलं होतं की,

“तो काळ वेगळा होता. तेव्हा आजच्या इतकी स्पर्धा नव्हती. पण, ग्राहकांना आपल्या पर्यंत आणणं हे एक आव्हान होतं.

आम्ही सतत नवीन प्रयोग करत राहिलो आणि जे पदार्थ बाकी कोणी ठेवत नाहीत ते आम्ही ठेवू लागलो जसं की, डोसा चे विविध प्रकार आणि ‘इंडियन पिझ्झा’ जे की आमच्या ग्राहकांच्या पसंतीस पडले.”

वेगळं काय केलं?

हा प्रश्न आपल्याला पडूच शकतो. इतर उडपी हॉटेल हे संध्याकाळी ७ किंवा ८ वाजता बंद व्हायचे. त्याच वेळी ‘शिव सागर’ हे रात्री २ वाजेपर्यंत चालू असायचे.

त्यांच्या या स्पेशलिटी मुळे फार कमी काळात ‘शिव सागर’ हे तरुणांमध्ये खूप लोकप्रिय झालं.

हे ही वाचा – 

===

 

homegrown.co.in

 

आज सोशल मीडिया आणि स्वस्त इंटरनेट मुळे लोकांपर्यंत पोहोचणं हे अगदी सोपं झालं आहे. ९० च्या दशकात हे इतकं सोपं नव्हतं. तेव्हा लोक सिनेमा थिएटर मध्ये बघण्यासाठी कायम उत्सुक असत.

लोकांची ही आवड नारायण पुजारी यांनी हेरली आणि त्यांनी दक्षिण मुंबईतील काही टॉकीज मध्ये जाहिराती द्यायला सुरुवात केली.

जवळपास १ लाख रुपयांचा बिजनेस नारायण पुजारी यांना या माध्यमातून मिळाला ज्याला की ‘बार्टर’ म्हणजेच देवाणघेवाण पद्धत असं म्हणतात.

ज्यामध्ये तुम्ही थिएटर ला तितक्या किमतीचा तुमच्या हॉटेल च्या जेवणाचा सप्लाय करायचा सहा महिन्यांच्या कालावधीत.

नारायण पुजारी यांनी स्टील प्लेट्स चा वापर बंद केला आणि अमेरिकेहून काही Corelle प्रकारातील प्लेट्स मागवल्या आणि त्या काळात लोक त्या गोष्टीचं सुद्धा कौतुक करणारे होते.

कालांतराने नारायण पुजारी यांनी रीतसर परवानगी काढून दारू विक्री सुद्धा सुरू केली.

‘शिव सागर’ हे नाव हिट झाल्यावर बऱ्याच लोकांनी त्याच्याशी मिळतं जुळतं ‘शिव होम सागर’ किंवा ‘श्री शिव सागर’ या नावाने हॉटेल सुरू केले होते.

ब्रँड नेम चा होणारा वापर रोखण्यासाठी नारायण पुजारी यांनी हायकोर्टात याचिका दाखल करून त्यावर बंदी आणली.

दुसरी पिढी :

२०१७ मध्ये नारायण पुजारी यांची मुलगी निकिता पुजारी हिने BTech चं शिक्षण पूर्ण करून या बिजनेस मध्ये वडिलांची साथ द्यायला सुरुवात केली.

तिच्या बिजनेस मध्ये येण्याने ‘शिव सागर’ च्या प्रगतीला एक दिशा मिळाली. त्यांनी BKC मध्ये Fish N Bait नावाचं एक seafood रेस्टॉरेंट सुरू केलं.

त्यामध्ये अपेक्षित यश न मिळल्याने ते २०१८ मध्ये बंद करावं लागलं.

 

magzter.com

 

तेव्हा नारायण पुजारी यांच्या लक्षात आलं की, फक्त जेवणाची सोय असलेलं हॉटेल आणि जेवण, बार ची सोय असलेल्या हॉटेल पैकी लोक दुसऱ्या प्रकाराला जास्त पसंती देतात.

त्यांनी याच फॉर्म्युला ला घेऊन Butterfly High या नावाने नवीन हॉटेल्स सुरू केल्या. या प्रकाराला लोकांनी भरभरून दाद दिली.

निकिता पुजारी यांनी The Bigg Small Cafe Bar ची सुद्धा सुरुवात केली. हॉटेल च्या या प्रकाराची सुरुवात त्यांनी पुणे, मँगलोर सारख्या शहरांच्या ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून केली आहे.

या सोबतच ‘order big and pay small ‘ ही एक कन्सेप्ट सुरू केली ‘कॉर्पोरेट लंच’ या सेगमेंट ला डोळ्यासमोर ठेवून. या उपक्रमाला मुंबईत सध्या खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 

yourstory.com

 

आपल्या हॉटेल ची प्रत्येक शाखा ही स्वच्छ असावी हा नारायण पुजारी यांचा आग्रह असतो. ते अचानक त्यांच्या कोणत्याही हॉटेल ला भेट देतात आणि ते आधी टॉयलेट स्वच्छ आहे की नाही ते बघतात आणि मग किचन.

कारण, कस्टमर हे तुम्हाला या छोट्या गोष्टींवरून जज करत असतात आणि रेटिंग देत असतात याची पूर्ण कल्पना नारायण पुजारी यांना आहे.

अन्न आणि स्वच्छतेचा दर्जा टिकवण्यासाठी नारायण पुजारी यांनी कॉर्पोरेट मध्ये काम केलेले ‘शेफ’ सुद्धा ठेवले आहेत.

कोणतीही नवीन व्यक्ती ग्रुप मध्ये जॉईन झाल्यावर त्याला आधी प्रॉपर ट्रेनिंग देऊन मगच काम देण्यात येतं. अगदी प्रायव्हेट जॉब सारखं.

ऑनलाईन मार्केटिंग चं महत्व नारायण पुजारी यांना निकिता पुजारीने समजावून सांगितलं आहे. अंदाजे वार्षिक २ लाख रुपये इतकी रक्कम ही नारायण पुजारी यांनी राखीव ठेवलेली असते फक्त ऑनलाईन जाहिरातींसाठी.

 

marketingmind.in

 

कारण, त्यांना हे माहीत आहे की लोक आता रेटिंग पाहिल्या शिवाय कोणत्या हॉटेल मध्ये जात नाहीत. मुंबई, पुणे आणि मँगलोर या तीन शहरांपुढे अजून ‘शिव सागर’ च्या शाखा अजून वाढू शकल्या नाहीत.

पण, अस्तित्वात असलेल्या सर्व शाखा या कोणत्याही इन्व्हेस्टर च्या मदती शिवाय कार्यरत आहेत या गोष्टीचं त्यांना समाधान आहे. जी की आजकालच्या काळात खूप मोठी गोष्ट आहे.

कधी कधी आपल्याला आपले प्रॉब्लेम्स फार मोठे वाटत असतात. पण, असं म्हणतात की, तुमच्या समोरील प्रॉब्लेम्स हे तुमच्या problem solving ability सोबत तुलना केल्यावर फारच छोटे असतात.

नारायण पुजारी यांच्या या प्रवासातून आपण दृढनिश्चय असेल आणि मेहनत करायची तयारी असल्यावर काहीच अशक्य नाहीये हा बोध नक्कीच घेऊ शकतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version