Site icon InMarathi

कचऱ्यात जाणाऱ्या बटाट्याच्या सालीचे देखील आहेत महत्त्वाचे आरोयदायी फायदे

potato peels inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बटाटा हा जगभरात सर्वत्र उपलब्ध असतो. आणि ते लोकांचं सर्वात लोकप्रिय कंदमूळ आहे. बटाटा हा तस बघायला गेलं तर शेती करण्यासाठी खूपच स्वस्त आहे आणि त्यात पौष्टिक घटक सुद्धा बरेच आहेत.

भारतात कुठल्याही भागात फिरायला जा, तिथल्या खाद्यसंस्कृती मध्ये बटाट्याचा वापर तुम्हाला सर्रास केलेला दिसेल. त्यामुळे आपण दैनंदिन जेवणात बटाटा हा बर्‍याच प्रमाणात वापरतो.

 

 

पण बर्‍याच जणांप्रमाणे तुम्हीही बटाट्याची साले कचर्‍याच्या डब्यात टाकता का? जर हो, तर आपण खरोखर मोठ्या संख्येने त्यात असणार्‍या निरोगी घटकांकडे दुर्लक्ष करतोय हे लक्षात घायला हवं.

तुम्हाला माहिती आहे का,की बटाट्यांची सालं खाण्याने शरीराला खूप फायदे होऊ शकतात.

केवळ बटाट्याच्या सालांमधून आपल्याला फायबर, विटमिन्स, प्रोटींस, मिनरल्स आणि फायटोकेमिकल्स मिळतात.

रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून बटाट्यांची सालं फायदेशीर आहेत. तसंच यामुळे आरोग्य आणि सौंदर्य दोन्ही टिकून राहतं. याचे फायदे पुढीलप्रमाणे :-

१. वजन कमी करण्यासाठी :

 

 

आपल्या सर्वांना हे माहित आहे, की बटाट्यांमध्ये कार्बोहायड्रेट्स याच प्रमाण खूप असतं. जे आपल वजन सुधारण्याससाठी महत्वाची भूमिका बजावतात.

तरीपण, बटाट्याच्या सालामध्ये कमीतकमी fat, कोलेस्ट्रॉल आणि सोडियम असतं. त्यामुळे बटाट्याची पौष्टिक सालं आपल्याला वजन कमी करायला मदत करतात. त्यामुळे तुमच्या आहारात आठवड्यातले दोन ते तीन दिवस तरी याचा समावेश करा.

 

२. न्युट्रीशिनल फायदे :

 

 

बटाटाच्या सालांमध्ये व्हिटॅमिन बी 3 याच प्रमाण खूप असतं. जे शरीरातील सेल्स यांना वापरण्यायोग्य न्युट्रीशिनल पोषक घटकांमध्ये बदलतं. शारीरिक तणाव कमी करण्यास करण्यास मदत करतं.

याशिवाय, ही सालं आपल्याला भरपूर प्रमाणात फायबर देतात. कर्करोग, हृदयविकाराचा धोका कमी करायचा असेल आणि पचन नियंत्रणात ठेवायचं असेल तर हे फायबर उपयुक्त आहे.

ही सालं पोटॅशियमचा एक चांगला स्रोत आहेत. जर तुम्ही ऑरगेनिक सालं खाल्लीत तर तुमच्या शरीरातील मेटाबॉलिजम याला मदत होते. यात खनिज मोठ्या प्रमाणात असतात जे रक्त पेशींना काम करायला मदत करतात.

 

३. कॅन्सरचा धोका कमी होतो :

 

 

या सालांमध्ये फायटोकेमिकल्स असतात ज्यामुळे शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट क्रिया होते. या व्यतिरिक्त, त्यात क्लोरोजेनिक acid याच प्रमाणही जास्त असतं, जे कर्करोगापासून शरीराच रक्षण करतं.

 

४. हृदयविकार आणि ब्लड प्रेशर यावर उपाय :

 

 

बटाट्याच्या सालांमध्ये पोटॅशियम असतं, जे तुमच्या हृदयविकार आणि स्ट्रोक सारख्या आजरांसाठी अतिशय गरजेचं आहे. कारण पोटॅशियम हे तुमचं ब्लड प्रेशर कमी करायला मदत करतं आणि तुमचं हार्ट रेट सुद्धा एका विशिष्ट प्रमाणात ठेवतं.

त्यामुळे या दोन्ही गोष्टी जर योग्य प्रमाणात ठेवायच्या असतील तर ही सालं नक्की खा.

 

५. योग्य साखरेची पातळी : 

 

 

तुम्हाला सारखी भूक लागते का? मग, आपल्या जेवणात बटाट्याची सालं वापरण हे खूप गरजेचं आहे. यामुळे अतिरिक्त खाण कमी होतं.

फायबरच प्रमाण जास्त असण्या व्यतिरिक्त बटाट्याच्या सालांमध्ये आवश्यक पोषक घटक असतात, जे रक्तातील साखरेची पातळी वाढवण्यास प्रतिबंध करतात.

बटाट्याची सालं खाल्यानंतर तुम्हाला बराच काल भूक लागत नाही. आणि दीर्घकालीन आजारांमध्ये असलेला टाइप २ चा मधुमेह थांबवता येतो.

 

६. हाडांसाठी चांगले :

 

 

या सालांमध्ये असे काही मिनरल्स असतात जे तुमच्या हाडांच्या रचनेसाठी आणि बळकटीसाठी चांगली असतात. यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, कॉपर अशा बर्‍याच घटकांचा समावेश असतो.

जवळपास ५० ते ६० टक्के मॅग्नेशियम हे तुमच्या हाडात असतं. त्यामुळे हे एकंदरीतच हाडांसाठी खाण योग्य आहे.

 

७. त्वचेच्या समस्या :

 

 

बटाट्याची सालं ही त्वचेच्या समस्यांसाठी खूपच उपयोगाची आहेत. आपल्या त्वचेवर आलेले डाग घालवून छान नितळ आणि पांढरी त्वचा यामुळे मिळते. त्याचबरोबर पिंप्लस, ब्लॅकहेड्स, व्हाइटहेड्स, हे कमी करतात.

आपल्या चेहर्‍यावर खास करून उन्हाळ्यात जे जास्तीच तेल त्वचेतून बाहेर पडतं, ते कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. या सालांमध्ये अॅंटी बॅक्टीरियल घटक जास्त असल्याने, ही सालं तुमच्या चेहर्‍यावरील डार्क सर्कल, स्कीन बर्न घालवून टाकतात.

यासाठी तुम्हाला फक्त बटाट्याच्या सालांचा रस काढून १५-२० मिनिट त्वचेवर लावून ठेवायचंय आणि मग साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवायचा.

 

८. केसांसाठी फायदा :

 

 

बहुतेक लोकांना पांढरे केस कसे लपवायचे याचा प्रश्न असतो. किवा केसांना लावलेला रंग अधिक काळ कसा राहील? याचा विचार करतात.

या बटाट्याच्या सालांमध्ये असंख्य आवश्यक पौष्टिक घटक असतात. जे आपल्या केसांना नैसर्गिक स्वरूप आणि रंग आणण्यास मदत करतात.

त्याचबरोबर आपल्या केस वाढण्यासाठी याचा फायदा होतो आणि इतकच नाही तर अंघोळीच्या आधी १५ मिनिट रस केसांना लाऊन ठेवला तर हवी असलेली चमक सुद्धा येते.

हे वरील उपयोग सोडले तर अजून दोन उपयोग आहेत, ते म्हणजे ही सालं आपल्या बगीच्यातील झाडांसाठी खत म्हणून काम करतात. यात न्युट्रीशिनल वॅल्यू बरीच असल्याने झाड पटापट आणि उत्तम वाढतात.

अजून एक म्हणजे घरातील चांदीच्या वस्तु घासून चकाचक व्हायला मदत होते.

तर अशा प्रकारे बटाट्याच्या सालांचे वरील फायदे लक्षात घ्या आणि ते कचर्‍याच्या डब्यात टाकून देण्यापेक्षा जेवणात समावेश करा. किंवा इथे दिलेल्या अन्य गोष्टींसाठी वापरा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version