Site icon InMarathi

चक्क “प्रायव्हेट पार्टचं” म्युझियम?! हे असं संग्रहालय असू शकतं असं स्वप्नातही वाटलं नसेल!

island museum inmarathi featured

thedailybeast.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

 

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

संग्रहालय किंवा म्युझियमची बऱ्याच लोकांना आवड असते. वेगवेगळ्या वस्तूंच्या संग्रहालयात जुन्या पुराण्या वस्तूंच्या घोळक्यात काही लोकांना वेळ घालवायला खूप आवडते.

हे म्युझियम बऱ्याच गोष्टींचे असते, पुरातत्व विभागाने गोळा केलेल्या वस्तूंचे असते ज्यांची किंमत अमूल्य असते, तर ऐतिहासिक अवजारे तसेच अश्मयुगीन हत्यारांचे सुद्धा असते!

आपल्यापैकी सगळेच आयुष्यात कधी ना कधी केव्हा ना केव्हा संग्रहालयात गेलेलंच असेल. म्युझियम बनवण्याच्या परंपरा या पूर्वी पासून जगभरात चालत आहेत.

मुंबईत राहत असाल तर छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय किंवा रिझर्व्ह बँकेच्या मॉनेटरी म्युझियम मध्ये आवर्जून गेला असाल.

 

transindiatravels.com

 

शौक म्हणून जुन्या किंवा नाविन्यपूर्ण गोष्टी जमा करण्याच्या सवयीला कालांतराने संग्रहालयाचं स्वरूप प्राप्त होत.त्यातच बऱ्याच जणांना चित्र विचित्र गोष्टींचा संग्रह करायचा छंद असतो.

अशाच विचित्र छंदाचा नंतर संग्रहालय मध्ये परिवर्तन झालेल्या वस्तू संग्रहालय बद्दल आज आपण जाणून घेऊयात.

आईसलँडची राजधानी रेकजावीक येथे स्थित असलेल्या ‘आईसलँडीक फेलोलॉजिकल म्युझियम’ (The Icelandic Phallological Museum) स्वतः मध्येच विशेष आहे.

हे जगातील एकमेव म्युझियम आहे जिथे मासे,जनावरापासून माणसापर्यंत जीवांचे लिंग अर्थात जनेंद्रियांचा संग्रह केला गेला आहे.

 

contiki.com

 

या लिंग म्युझियम ची स्थापना आईसलँडचेचं नागरिक असलेल्या सिगरदर जारटार्सन यांनी १९९७ साली केली.

या म्युझियम मध्ये आइसलँडच्या पाणी आणि जमीन दोहोंवर सापडणाऱ्या सस्तन प्राण्यांच्या लिंगाचा संग्रह केला गेला आहे. ज्याची संख्या ही जवळपास तीनशेच्या घरात आहे.

व्हेल माशाच्या १७ प्रजातींचे सुमारे ५६ लिंग, ७ प्रकारच्या सील चे ३६ लिंग आणि माणसासहित इतर २६ प्रकारच्या सस्तन प्राण्यांचे लिंग असे एकूण ३०० पेक्षा जास्त लिंगांचा संग्रह या म्युझियम मध्ये आहे.

या म्युझियमला आतापर्यंत ४ जणांनी मृत्यूपश्चात आपलं लिंग दान करण्याचे आश्वासन दिले आहे.त्यापैकी एकाने आपलं वचन पूर्ण केलं सुद्धा.

आईसलँडचेच टुरिस्ट गाईड पॉल एरासन यांनी त्यांचं लिंग हे अंडकोष सहित म्युझियम मध्ये ठेवलं गेलेलं आहे.

अमेरिकन नागरिक जॉन फॉल्कन यांनी सुद्धा आपलं लिंग दान करण्याचं आश्वासन दिलं आहे. याची विशेषता अशी आहे की यांचं लिंग हे जगातील सगळ्यात मोठं लिंग आहे.

येथे संग्रहित केलेल्या लिंगांमध्ये व्हेल माशाचं लिंग सगळ्यात लांब ६७ इंच तर हेमस्टरचं पेनिस बोन सगळ्यात लहान ०.८ इंच एवढं आहे.

 

atlasobscura.com

 

ज्याला पाहण्यासाठी बहिर्वक्र भिंगाचा वापर करावा लागतो.

पेनिस बोन हे लिंगामध्ये सापडले जाते. जे मनुष्य व्यतिरिक्त गोरिला, चिम्पाझी आदि प्राण्यांमध्ये सापडले जाते.

मुळात मस्करी मधून या म्युझियम ची सुरवात झाली.

१९७४ साली जारटार्सन जेव्हा एका शाळेत काम करत होते. तेव्हा जवळच्याच एका गावच्या ग्रामस्थाने त्यांना बैलाचे लिंग दिले. त्यांनी ते लिंग शाळेत आपल्या सहकर्मींना दाखवायला आणलं.

त्यांचे सहकारी सुद्धा उन्हाळाच्या सुट्टीत जवळच्याच व्हेल स्टेशन मध्ये काम करायचे. तर त्यांनी जारटार्सन यांची मस्करी करण्यासाठी त्यांच्यासाठी एक विशाल व्हेलच लिंग भेट म्हणून दिल.

आणि या मस्करीचा उलटचं परिणाम झाला. जारटार्सन यांना अशा विविध लिंगांचा संग्रह करण्याची आयडिया आली.

१९८० पर्यंत १३,१९९० पर्यंत ३४ आणि २००० सालापर्यंत ६२ लिंगांचा संग्रह त्यांनी केला. आज त्यांच्याकडे ३०० पेक्षा जास्त लिंगांचा संग्रह आहे.

 

voxradiolambeth.com

 

या म्युझियम संबंधित काही विशेष तथ्य.

•या म्युझियम ला वर्षभरात एव्हरेज ११००० लोक भेट देतात.

•भेट देणाऱ्यांपैकी ६०% या महिला आहेत.

प्रकृतीच्या विरुद्ध लिंगाप्रति असलेल्या आकर्षणाचा नियम इथे अधोरेखित होतो.

•अमेरिकेच्या टॉम मिचेल यांनी मृत्यू पूर्वीच आपलं लिंग दान देण्याचं कबूल केलं आहे. आणि विशेष म्हणजे यामुळे त्यांच्यावर डॉक्युमेंटरी सुद्धा बनली आहे.

•एका जर्मन व्यक्तीने हे म्युझियम विकत घेण्यासाठी जवळपास सव्वादोन लाख डॉलर द्यायची तयारी दाखवली होती. तर एकाने याच्या जास्त प्रसिद्धी साठी ब्रिटन मध्ये हे म्युझियम शिफ्ट करायची ऑफर दिलेली.

दोन्ही ऑफर ना जारटार्सन यांच्या मुलांनी नकार दिला.

•२००८ च्या बीजिंग ऑलम्पिक मध्ये आईसलँडच्या हँडबॉल टीम ने सिल्व्हर मेडल जिंकल. या मेडल विजेत्या संघाच्या १५ सदस्यांच्या लिंगांची हुबेहूब कॉपी या म्युझियम मध्ये ठेवण्यात आली आहे.

 

thetraveltart.com

 

•२००४ पर्यंत या म्युझियम ला आईसलँड सरकार कडून आर्थिक मदत दिली जायची जी २००४ पासून बंद केली गेली. परिणामी हे म्युझियम जारटार्सन यांनी जवळच्या गावात शिफ्ट केले.

२०११ साली त्यांच्या मुलांनी हे म्युझियम पुन्हा रेकजाविक मध्ये पुन्हा रिशिफ्ट केले.

•इथले आर्टवर्क सुद्धा लिंगाशी संबंधितचं आहेत.

•जारटार्सन आणि त्यांचा मुलगा सिगुरोसो यांना या म्युझियम ला फेलोलॉजी च्या वर्ल्ड क्लास स्टडी सेंटर मध्ये करायचं आहे.

(फेलोलॉजी म्हणजे लिंगांचा अभ्यास करणारी मेडिकल सायन्सची एक ब्रांच.)

 या म्युझियम ला व्हर्च्युअली भेट देण्यासाठी त्यांच्या www.phallus.is या वेबसाईटवर आपण भेट देऊ शकतो.

एकंदरीत बुद्धीचा विकास इतर जीवाच्या मानाने जास्त झालेल्या माणसाच्या कल्पकतेने काय काय नाविन्यपूर्ण उपक्रम होऊ शकतात हे जारटार्सन यांनी दाखवून दिले.

समाजात ज्या गोष्टींकडे प्रायव्हसी म्हणून पाहिले जाते त्याचेच यांनी संग्रहालय ओपन करून एक प्रकारचं वेगळंच धाडस केल्याचं आपण म्हणू शकतो.

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version