आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
दर महिन्याला आपण सामानाची यादी करतो. जर तुमचे आरोग्य तुम्हाला उत्तम ठेवायचे असेल, तर आपल्या वाणसामानाच्या यादीत काही पदार्थ शक्यतो ठेवू नका.
एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. आहारात पोषक पदार्थांचा वापर, उदा. फळं, हिरव्या भाज्या, सॅलड इत्यादी. जितका महत्त्वाचा आहे, त्याहूनही अधिक अनारोग्य घडवणाऱ्या वस्तू टाळणे महत्त्वाचे आहे.
सध्या कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सोशल डिस्टन्सिंग, सतत हात धुणे, कुणाला स्पर्श न करणे या गोष्टी आपण जितक्या पाळतो आणि जितक्या महत्त्वाच्या आहेत, त्याचप्रमाणे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी वेगवेगळी औषधे, काढे इत्यादी महत्त्वाचे आहे.
जितका पोषक आहार महत्त्वाचा आहे, तितकाच शरीराला घातक असणारे पदार्थ टाळणे हेही महत्त्वाचे आहे. मात्र त्यावर चर्चा होताना फारशा दिसत नाहीत.
चला तर पाहू या असे पदार्थ कोणते आहेत, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी करू शकतात.
व्हाईट ब्रेड-
व्हाईट ब्रेड, कुकीज, केक्स, रोल्स इत्यादी पदार्थ हे मैद्यापासून बनलेले असतात. मैद्याचे पदार्थ हे पचायला कठीण असतात. त्यात कॅलरीज जास्त आणि पोषकमूल्यं कमी असतात.
त्यामुळे वजन वाढू शकतं आणि वजन वाढल्याने ओबेसिटी, इन्शुलिनचा वापर वाढून त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. शिवाय मैद्याच्या पदार्थाने ऍसिडीटी वाढू शकते. ऍसिडीटी वाढल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी होते.
मैद्याच्या पदार्थात ग्लुटेन जास्त असते आणि ते प्रत्येकाला पचेलच असे नाही. हे ग्लुटेन शरीरातील प्रतिकारशक्तीला घातक ठरू शकते.
साखरेच्या मिठाया, चॉकलेट्स इत्यादी –
साखर शरीराला किती घातक आहे हे आता कुणाला नव्याने सांगायला नको. साखर पचायला जड असते. ती पचवण्यासाठी शरीराला अधिक इन्शुलिन निर्माण करावं लागतं. ती पचण्यासाठी शरीराला बराच वेळ लागतो.
अशा परिस्थितीत जर तुम्ही सतत साखरेचे पदार्थ खात राहिलात, तर त्यातील साखर पचवण्यासाठी शरीरातील पचनसंस्थेवर ताण निर्माण होतो. तुमची रोगप्रतिकारशक्ती दुर्बल होते.
अधिक साखर ही तुमच्या आतड्यांवरही परिणाम करते. ज्यामुळे तुमच्या शरीरात बॅक्टेरीया लवकर कॅच होऊ शकतात.
मध –
मध हे जरी आरोग्याला चांगले समजले जात असले, तरी काही डॉक्टरांच्या मते, ते देखील साखरेला पर्यायीच असतं. फक्त ती नैसर्गिक साखर असते एवढंच.
त्यामुळे साखरेचे जे दुष्परिणाम असतात, तेच मधाचा वापर गरजेहून अधिक केल्यास होऊ शकतात.
मनुका, किसमिस आदी सुका मेवा-
डॉक्टरांच्या मते मनुका, किसमिस इत्यादी सारख्या सुक्या मेव्यात देखील तितकीच साखर असते. ही साखर आपल्या शरीरातील रक्तातली साखर वाढवू शकते.
त्यामुळे सुका मेवा इत्यादी देखील प्रमाणाच्या बाहेर खाऊ नये. आणि आपली प्रकृती लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्याचा वापर करावा.
फळांचे ज्युसेस –
फळांचे तयार ज्युसेस, सोडा, गोड चहा, कोल्ड्रिंक्स इत्यादी पेयांमध्ये अतिरिक्त साखर असते आणि सोडाही असतो ज्याचा आपल्या शरीरावर घातक परिणाम होतो.
रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य, मधूमेह, लठ्ठपणा आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या समस्या एवढेच नव्हे, तर कर्करोगाचाही धोका उद्भवू शकतो.
कच्ची केळी, फळं इत्यादी –
फळांमधील नैसर्गिक साखरेचा देखील तुमच्या प्रतिकारशक्तीवर आणि आतड्यांच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो आणि जेव्हा ते कच्चे असतात तेव्हाच तर ते अधिक त्रासदायक ठरते.
केळी, इतर कच्ची फळे आणि भाज्यांत देखील, लेक्टिन नावाचे प्रोटीन असू शकतात. आणि अभ्यासाने असे सिद्ध झाले आहे, की लेक्टिनमुळे शरीरातील पोषक द्रव्यांचे शोषण बिघडू शकते आणि त्याचा परिणाम आतड्यांवर होतो.
आतड्याची भिंत शरीराला विषारी आणि हानीकारक जीवाणूपासून बचाव करत असते. ते आतडेच अती लेक्टिनमुळे कमकुवत होऊ शकते.
सोडा –
तयार सोडा पिण्याची अनेकांना सवय असते. कोल्ड्रिंक्समध्येही तो असतोच. यात साखर खूप असते, जी रोगप्रतिकारक यंत्रणेस अडचणीत आणू शकते, सोडा तर सर्वात वाईट आहे.
यात कृत्रिम साखरेबरोबरच कृत्रिम रंगदेखील असतात हे आपल्या प्रजननक्षमतेवर घातक परिणाम करू शकतात.
या कोल्ड्रिंक्समध्ये फॉस्फरस देखील असतो ज्यामुळे मूत्रपिंडांद्वारे पेशींमधील कॅलशिअम कमी होतो. शरीरातील कॅलशिअम कमी होणे म्हणजे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होणे.
टोफू –
–
हे ही वाचा – सावधान! हे ७ पदार्थ खाल्लेत तर तुमचा शरीरातील ‘हा’ महत्वाचा अवयव होईल खराब!
–
टोफू हे आरोग्यदायी फूड म्हणून हल्ली सर्रास समजले जाते. परंतु त्यात असलेल्या ओमेगा-६ चे अतिरिक्त प्रमाण शरीराला घातक असते. त्याने शरीरातील उष्णता वाढते. ऍसिडीटीसारखे प्रकार वाढतात.
अर्थात टोफूचा वापर करूच नये असे नाही. मात्र त्याचा अतिरेक टाळावा. टोफू हे सोयाबीनपासून बनवले जाते. आणि अनेकांना सोयाबीनची देखील ऍलर्जी असते.विशेषतः ज्यांना आतड्यांचा त्रास आहे अशा लोकांना.
लर्जी असलेले पदार्थ खाल्ल्याने शरीर त्या ऍलर्जीला प्रतिकार करण्यासाठी शरीर ऍन्टीबॉडीज तयार करतं. मात्र या ऍन्टीबॉडीज शरीरातील आपल्याच अवयवांना देखील नुकसान करू शकतात.
वनस्पती तेल –
सोयाबीन, सनफ्लॉवरसारख्या तेलांमध्ये देखील शरीरात दाहकता निर्माण करणारे ओमेगा-६ हे फॅटी ऍसिड असते. शिवाय त्यात टोफूत असते तसे प्रोटीन किंवा इतर पोषक द्रव्ये देखील नसतात. त्यामुळे ते शरीराला अधिक हानीकारक असतात.
या फॅटी ऍसिडमुळे शरीरात रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या निर्माण होण्याची शक्यता वाढते.
बटाटा वेफर्स –
बटाटा वेफर्स हे वनस्पती तेलात तळलेले असतात आणि त्यात मीठ जास्त असतं. अती मीठ हे शरीराला घातक आहे. बटाटा वेफर्समध्ये पोषणमूल्य अजिबात नाहीत. उलट कॅलरीज वाढवणारे हे पदार्थ आहेत. याने तुमच्या इम्युनिटीवर परिणाम होतो.
फास्ट फूड, किंवा जंक फूड –
बर्गर, वडे, भजी, वेफर्स, फिंगर चिप्स इत्यादी सर्वांच्या बाबतीतही हाच प्रकार आहे. यांत पोषणमूल्य कमी. तेलात तळलेले आणि मीठ जास्त.
तुम्हाला जर हे पदार्थ खूप खायची सवय असेल, तर हे पदार्थ महिनाभर सोडून पाहा. तुमचा तुम्हालाच फरक जाणवेल.
बिअर –
बिअर, वाईन किंवा अल्कोहोलयुक्त कोणतेही ड्रींक हे शरीराला घातकच असतात. अल्कोहोल शरीरात वाढलं, की तुम्ही संसर्गाला लवकर बळी पडू शकता. अल्कोहोलमुळे शरीरातील साखर, हॉर्मोन कार्टीसोल आणि इन्शुलीन वाढते.
हे तीन्ही घटक शरीरात वाढणे हानीकारक असते. हे आपण आधीच पाहिले.
पाश्चराईज्ड चीज –
–
हे ही वाचा – डाएटिंगचे विचित्र पाश्चात्य परिमाण : वाचा पचनशक्तीनुसार आयुर्वेदाचा मौलिक सल्ला
–
डेअरी प्रॉडक्ट्समुळे ऍसिडीटी वाढू शकते. जी पुन्हा प्रतिकार शक्तीला कमी करते.
बिस्कीटे, कूकीज इत्यादी-
यात पुन्हा साखर खूप असते. अनेकदा मैद्यापासून बनलेले असतात. यांत पोषणमूल्य फारच कमी असतात. आणि फायबरही कमी असते.
हवाबंद डब्यातील तयार अन्न –
असे पदार्थ टिकण्यासाठी त्यावर प्रोसेस केलेली असतात. या प्रोसेसिंगमध्ये पदार्थाची मूळ पोषणमुल्ये नाश पावलेली असतात. त्यामुळे शक्यतो हवाबंद डब्यातील पदार्थ खाऊ नयेत.
त्यामुळे या कोरोनाच्या निमित्ताने का होईना, आपण आपल्या आहारात बदल करून वरील पदार्थ नेहमीसाठी टाळण्याचा प्रयत्न करू या. ह्या अन्नाने पोट तर भरते मात्र त्यातून पोषणमूल्ये फार मिळत नाहीत, उलट हे पदार्थ आरोग्याला हानीकारक ठरतात.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.