Site icon InMarathi

आरोग्याला अत्यावश्यक ‘व्हिटॅमिन डी’ कोवळ्या उन्हाशिवायही मिळू शकतं, हे वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मार्च २०२० पासून आपण एक वाक्य वारंवार ऐकत, वाचत आहोत. ते वाक्य म्हणजे, “घरीच रहा, सुरक्षित रहा.” २०२१ चा मध्य आला, तरीही परिस्थितीत फार काही बदल नाहीये.

लॉकडाऊन हा प्रकार संपला असला तरी कोरोनाचा विळखा कायम असल्याने घराबाहेर फिरणं तसं धोक्याचं आहे.

आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका ही सतर्कता पाळणं अजूनही अपेक्षित आहे. घरीच व्यायाम करणे, टेरेस वरच मॉर्निंग वॉक करणे हे सगळं आपण आमलात आणलं आहे. कारण, घरातच राहून तब्येत चांगली ठेवणं ही सुद्धा एक आव्हान आहे.

सध्या अजून एक गोष्ट सारखी बोलली जात आहे ती म्हणजे ही की, ‘तुमची immunity म्हणजेच रोग प्रतिकार शक्ती वाढवा.’ आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहीत असेल, की Vitamin D हे रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक आहे.

 

==

हे ही वाचा : रोज “व्हिटॅमिन सी” घेताय? पण दिवसाच्या ‘या’ वेळी व्हिटॅमिन सी घेतलंत, तरच ते ठरेल फायदेशीर

==

Vitamin D आपल्याला सुर्यप्रकाशातून मिळत असतं. याला ‘सनशाईन व्हिटॅमिन’ असं सुद्धा म्हणतात. Vitamin D चे फायदे सांगायचे तर, त्यामुळे शरीराच्या वाढीसाठी मदत, हाडांची बळकटी, दात मजबूत होतात हे सांगता येतील.

आपण पाहिलं असेल, की प्रत्येक बाळाला काही मिनिटांसाठी सकाळचं कोवळं ऊन देणं आवश्यक असतं. तसं केल्याने त्या बाळाला कावीळ होण्याची शक्यता कमी होत असते.

रिसर्चने असं सुद्धा सांगितलं आहे की, Vitamin D मुळे मानसिक स्वास्थ्य सुद्धा चांगलं रहातं आणि तुम्हाला जास्त फ्रेश वाटतं, ज्याची सध्याच्या काळात फार आवश्यकता आहे.

आजकाल सर्वात जास्त चर्चिलेली गोष्ट म्हणजे ‘वजन कमी करणे’. Vitamin D ने तुम्ही हे सुद्धा साध्य करु शकता. त्यासोबतच हृदय विकाराची शक्यता सुद्धा Vitamin D मुळे कमी होते.

फायदे तर खूप आहेत, पण ते घरातच बसून मिळवायचं कसं ? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सूर्यप्रकाशा व्यतिरिक्त काही उपाय आहेत, ज्याने तुम्हाला Vitamin D मिळू शकतो. ते सोर्स कोणते ते आपण जाणून घेऊया :

काही अन्न पदार्थात Vitamin D भरपूर प्रमाणात असते. ते पदार्थ म्हणजे :

 

१. Salmon म्हणजेच विदेशात मोठ्या प्रमाणावर खाणारा जाणारा मासा

 

 

२. Egg Yolk म्हणजेच अंड्याचा बलक

 

 

३. Shrimp म्हणजेच कोळंबी मासा

 

 

४. गायीचं दूध

 

 

५. कडधान्ये

 

 

६. दही

 

 

७. ऑरेंज ज्यूस

 

 

या पदार्थांच्या सेवनाने शरीराला Vitamin D चा अतिरिक्त पुरवठा होऊ शकतो. रोज सूर्यप्रकाशात जाणं शक्य नसेल तर या मार्गाने आपण शरीराची ही गरज भागवू शकतो.

==

हे ही वाचा : निरोगी राहण्यासाठी जर रोज व्हिटॅमिनच्या गोळ्या खात असाल तर थांबा, आधी ‘हे’ वाचा

==

त्यासाठी, ‘काय होत असेल तर तुमच्या शरीरात Vitamin D ची कमतरता आहे’ हे समजावे ती लक्षणं बघूया:

 

 

१. तुम्हाला जर का नेहमीच थकवा वाटत असेल, तर तुमच्या शरीरात गरजे इतकं Vitamin D पोहोचत नाहीये हे त्याचं कारण असू शकतं.

२. शरीरातील मांसपेशी जर का दुखत असेल तर. म्हणजे, पाय दुखणे, ओटीपोटा चा भाग दुखणे हे सगळे Vitamin D च्या कमतरतेची लक्षणं आहेत.

तुमच्या शरीरात जर Vitamin D ची कमतरता असेल तर डॉक्टर च्या सल्ल्याने तुम्ही Vitamin D चे सप्लिमेंट्स घेऊ शकतात. पण, प्रयत्न असावा की Vitamin D हे तुमच्या शरीरात अन्न किंवा सुर्यप्रकाशाच्या माध्यमातूनच जावे.

तुमच्या रक्ताची तपासणी केल्यावर तुमच्या शरीरातील Vitamin D चं प्रमाण डॉक्टरांना लक्षात येत असतं.

 

तुमच्या शरीराला Vitamin D ची गरज किती आहे हे सुद्धा समजून घेऊया – 

 

 

नुकत्याच झालेल्या एका रिसर्च ने असं सांगितलं आहे की, बदललेल्या वातावरणामुळे आणि लाईफ स्टाईल मुळे तुम्हाला आता Vitamin D ची गरज जास्त आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ फूड अँड अग्रीकल्चर च्या रिपोर्ट नुसार, International Units (IUs) हे एक गणक प्रमाणित करण्यात आलं आहे. हे गणक तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स यांची तुमच्या वयानुसार गरज सांगते.

IU चं प्रमाण हे प्रत्येक व्हिटॅमिन साठी वेगळं असतं. तुमच्या शरीराची गरज ही तुमच्या रक्त तपासणीतून कळते आणि तुमचं शरीर किती प्रमाणात Vitamin D चं सेवन विविध मार्गाने, अन्न पदार्थाने होत आहे त्यानुसार उपचार ठरवून दिले जातात.

वयानुसार शरीराला असणारी Vitamin D ची गरज खालीलप्रमाणे सांगता येईल:

लहान मुलं आणि पौगंड अवस्थेत : 600 IU
मोठी माणसं ७० वर्ष वयापर्यंत : 600 IU
७० वर्ष वयाच्या वरील व्यक्ती : 800 IU
गर्भवती महिला : 600 IU.

Vitamin D ची कमतरता असण्याचं प्रमाण सध्या वाढत चाललं आहे. लक्षणं लवकर न दिसल्याने किंवा लक्षणाचं कारण Vitamin D ची कमतरता हे आहे हे काही वेळेस उशिरा कळतं.

वरील दिलेल्या पैकी कोणतंही लक्षण जाणवत असल्यास त्वरित डॉक्टरांना भेटा आणि तुमची रक्त तपासणी करून घ्या.

चांगली गोष्ट ही आहे की, सूर्यप्रकाश हा सर्वात चांगला आणि सोपा उपाय असल्याने Vitamin D ची कमतरता दूर करणं त्या मानाने सोपं आहे.

==

हे ही वाचा :  हिमोग्लोबीन वाढविण्यासाठी हे घरगुती खाद्यपदार्थ १०० % टक्के उपयोगी पडतील

==

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version