' “दुर्धर” आजारातून उठून उभं राहिलेल्या ह्या “उद्योजकाची” कहाणी तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल! – InMarathi

“दुर्धर” आजारातून उठून उभं राहिलेल्या ह्या “उद्योजकाची” कहाणी तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

 

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

आपल्या भोवतीच वातावरण कधी कधी इतकं नकारात्मक असतं, की ते पाहून अनेक जण मानसिकदृष्ट्या खचून जातात. जीवनात येणारी दुःख, वाईट प्रसंग, संकट यामुळे माणसाची विचारक्षमता देखील खुंटते.

मग आपल्या हातून नवीन काही चांगलं होईल की नाही याविषयी देखील साशंकता निर्माण होते. माणूस उमेद घालवून बसतो.

असे प्रसंग सगळ्यांच्याच आयुष्यात थोड्याफार फरकाने येतातच काहीजण पूर्ण खचून जातात तर कोणी त्यातूनही फिनिक्स भरारी घेतं. अशीच एक कथा आहे एका दिव्यांगाची. शारीरिक अक्षमता असून देखील आपली स्वतंत्र ओळख त्यांनी निर्माण केली.

कर्नाटकातील मंड्याचे रामकृष्ण यांनी अत्यंत वेगळ्या अशा मशरूम उत्पादन क्षेत्रामध्ये कामगिरी करून आपला ठसा उमटवला आहे.

 

mushroom farmer inmarathi
thebetterindia.com

 

वयाच्या दुसऱ्या वर्षी त्यांना पोलिओची बाधा झाली. तरीही शिक्षण पूर्ण करून त्यांनी एका शैक्षणिक संस्थेमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून नोकरी स्वीकारली. पण हे करतानाच काहीतरी वेगळं करण्याची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.

त्याच वेळेस त्यांच्या वाचनात मशरूम बद्दल माहिती आली. मग त्यांनी त्याबाबत वाचन वाढवलं, आणि आता त्याच मध्ये काही करता येते का बघायचं म्हणून मशरूम उत्पादन घरात सुरू केलं.

तसं मंडया गावात अनेक शेतकरी आहेत. परंतु कुणीही मशरूम उत्पादनाबाबत जागृत नाही. म्हणून रामकृष्ण यांनी पहिल्यांदाच मशरूम लावले आणि त्या पिकातून फायदा होतो हे त्यांच्या लक्षात आलं.

 फक्त फायदाच नाही तर मशरूम हे प्रोटिन्सनी युक्त असल्यामुळे सगळ्यांनाच आरोग्यासाठी उपयोगी आहेत. हे खाल्ल्यामुळे आयर्न डेफिशियन्सी कमी होते तसेच हृदयरोगाचा त्रास ही कमी होतो.

परंतु ह्या मशरूम चे हे गुणधर्म बऱ्याच जणांना माहीत नाहीत. त्यासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे हे ही त्यांच्या लक्षात आले.

म्हणून मग त्यांनी स्वतः पहिल्यांदा मशरूम लावले त्याची देखभाल केली आणि पुढे एकही मशरूम वाया जाऊ नये यासाठी देखील प्रयत्न केले.

 

mushroom inmarathi

 

मशरूम लावल्यानंतर पहिल्या दहा दिवसातच त्यांच्यावर काही कीड निर्माण झाल्यास पुढे त्याचे उत्पादन कमी होते हे त्यांच्या लक्षात आलं, म्हणून मग त्यांनी सुरुवातीचे मशरूम हे कॅरी बॅग मध्येच ठेवायला चालू केले, ज्यामुळे बाहेरुन येणारी कीड मशरूमला वाचवेल.

मशरूम मध्ये तसे अनेक प्रकार आहेत, परंतु त्यांनी भरपूर प्रोटिन्स असलेले ऑईस्टर मशरूम उत्पादन घ्यायला सुरुवात केली. मशरूमला पहिल्या दहा दिवसात मायसेलियम नावाची बुरशी लागल्यास ते मशरूम वाढत नाहीत.

म्हणजेच सुरुवातीच्या दहा दिवसातच मशरूमची विशेष काळजी घ्यावी लागेल हे त्यांच्या लक्षात आले. विशेष काळजी घेतल्यास मशरूम उत्पादनात फरक पडत नाही हेही त्यांच्या लक्षात आले.

दुसरी एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली, ती म्हणजे मशरूम काढल्यानंतर पहिल्या दहा तासातच त्यांची विक्री व्हायला हवी. नाहीतर मग मशरूम खराब होतात हेदेखील त्यांना समजले. आता इतक्या कमी वेळात मशरूम लगेच विक्रीला जाणे अवघड होते.

म्हणून मग त्यांनी मशरूम काढण्यासाठी वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले. मशरूम काढल्यानंतर ते विशिष्ट तापमानात मध्ये ठेवल्यास ते जास्त टिकतात. हे सगळे प्रयोग करण्यासाठी रामकृष्ण यांनी आपली स्वतः जवळची पुंजी देखील वापरले आणि त्यांचे प्रयोग यशस्वी झाले.

मशरूम येतानाच त्यांची विशेष काळजी घेतली. नंतर त्याला व्यवस्थित पाणी वगैरे दिले, तर मशरूम चांगले येतात. रामकृष्ण यांचा एक म्हणणं होतं, की एकही मशरूम वाया जाऊ नये. म्हणून मग त्यांनी दुकानदाराकडे दिलेले मशरूम जे विकले गेले नाहीत ते परत आणायला सुरुवात केली.

त्यासाठी काही पैसे देखील मोजले आणि त्यानंतर ते मशरूम वाळवून त्यापासून पावडर तयार करायला सुरुवात केली.

 

mushroom farmer inmarathi1
deccanherald.com

 

आता त्या पावडरपासून वीस प्रकारचे पदार्थ त्यांनी तयार केलेले आहेत ज्यामध्ये रस्सम पावडर, पापड, बिस्किट याशिवाय अनेक उत्पादने घ्यायला सुरुवात केली.

त्यांचे हे पावडरचे उत्पादन संपूर्ण कर्नाटकात विकली जातात. भारतीय अन्नसुरक्षा मंडळाकडून( FSSAI) आता त्यांच्या मशरूम प्रॉडक्शनला मान्यता मिळाली आहे.

ऑईस्‍टर मशरूमचे उत्‍पादन करणे त्यापासून चे प्रॉडक्ट तयार करणे याबरोबरच रामकृष्ण यांनी ‘इन्स्टिट्यूशन ऑफ मशरूम सायन्स’ नावाची एक संस्था काढली आहे. २०१३ मध्येच त्यांनी ही संस्था काढली आहे.

ज्यामध्ये कोणाला मशरूमचे उत्पादन चालू करायचे असल्यास त्याविषयीचे मार्गदर्शन मिळते. त्याच बरोबर नवीन उपक्रम चालू करणाऱ्या व्यक्तीला मशरूम किट त्या संस्थेमार्फत दिले जाते.

त्याच बरोबर शेतकऱ्यांनी मशरूम उत्पादनात रस घ्यावा म्हणून त्यांना दर महिन्याला तीन हजार रुपयांच्या उत्पादनांची हमी दिली जाते.

रामकृष्ण यांना मनापासून वाटतं, की शेतकऱ्यांना या मशरूम उत्पादनात जागरूकता निर्माण व्हायला हवी. जेणेकरून शेतकरी हे उत्पादन घेऊ शकतील. महिन्याला एका ठराविक रकमेची हमी मिळाल्यास शेतकरी याचे उत्पादन घेतील असेही त्यांना वाटते.

शेतकऱ्यांना मशरूम उत्पादनात प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांनी एक स्कीम सरकारजवळ सादर केली. आता कर्नाटक सरकारने त्यांच्या स्कीमला संजीवनी मिशन अंतर्गत मान्यता दिली आहे.

ज्यामध्ये शेतकऱ्याला कमी किमतीत दहा दिवस वाढ झालेल्या मशरूमच्या कॅरी बॅग देण्यात येतात. वाढ झालेल्या मशरूमची विक्री कशी करायची यासाठी देखील मदत केली जाते.

 

mushroom farmer inmarathi2
thebetterindia.com

 

मंड्या, तुमकुरू,मैसूर या जिल्ह्यांमधील जवळपास तीनशे शेतकरी त्यांच्या ऑर्गनायझेशनचे सदस्य आहेत आणि जे या स्कीमचा लाभ घेतात. या सगळ्यांचे वाढ झालेले मशरूम आणि मशरूम उत्पादने तिथली स्थानिक दुकान, हॉटेल्स, मॉल्स मध्ये विकली जातात.

त्यांच्या या कामाबद्दल कर्नाटक सरकारने २०१७ मध्ये त्यांचा गौरव केला. तिथल्या विजय वर्तमानपत्राने देखील ‘सुपरस्टार फार्मर’ म्हणून त्यांना गौरवले आहे. २०१९ मध्ये त्यांच्या ऑर्गनायझेशन ला अनेक शेतकरी जोडले गेले.

परंतु आता २०२० मध्ये मात्र कोरोनामुळे, लॉकडाऊन मुळे त्यांच्या या कामात खंड पडला होता. मात्र आता अनलॉकला सुरुवात झाली असून त्यांनी परत एकदा कामाला सुरुवात केली आहे. आता शेतकऱ्यांना मशरूम कीट देण्यात येत आहेत.

येत्या काही दिवसातच आता मशरूम पापड आणि बिस्किटे बाजारात येतील असा त्यांना विश्वास आहे.

त्यांनी त्यांची मशरूम आणि मशरूम उत्पादने ऑनलाईन बिग बास्केट सारख्या मार्केटमध्ये विक्रीसाठी देखील ठेवली आहेत. आता त्यांना ५००० शेतकऱ्यांना या कामात जोडून घ्यायचे असून त्यांना मशरूम उत्पादनाच्या तांत्रिक बाबी शिकवायच्या आहेत.

त्यांची ही स्वप्न पाहिल्यानंतर लोक छोट्या छोट्या गोष्टींनी देखील का खचत असतील असा प्रश्न पडतो. म्हणूनच रामकृष्ण यांच्यासारख्या व्यक्ती समाजात प्रेरणादायी असतात.

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?