आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
जेव्हा जेव्हा आपण आजारी पडतो, तेव्हा आणि तेव्हाच फक्त निरोगी असण्याची किंमत आपल्याला कळते. एखादा अवयव दुखू लागला, की मगच आपण त्याकडे लक्ष देतो. तोवर जराही काळजी घेत नाही.
डोकेदुखी, अर्धशिशी, किंवा दाढदुखी चालू झाली तर काहीही सुचू देत नाही. डोकेदुखीची विविध कारणे आहेतच. जसं झोप पुरेशी न होणं, मानसिक ताण, चिंता.
उन्हात बराच वेळ काम करणं, सतत काँप्युटरवर काम करुन डोळ्यांवर ताण येणं, पित्त होणं, अतिवाचनानं डोळ्यांवर ताण येणं इ. हे जेव्हा मर्यादित असतं तेव्हा फारसा त्रास होत नाही, पण जेव्हा या दुखण्यानं दिवसचे दिवस व्यापतात तेव्हा ते भलतेच त्रासदायक ठरते.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
==
हे ही वाचा : हे घरगुती उपाय ऍसिडिटीपासून कायमची मुक्ती देतात! तुम्हाला कल्पना आहे का?
==
पण दुर्लक्ष करणं किंवा तात्पुरती औषधं घेणं यांमध्ये लोक अग्रेसर असतात. त्यातही विशेषतः स्त्रीया तर याबाबत दहा पावलं पुढंच असतात. या गोष्टीचा फार अभिमानही असतो त्यांना, की आम्ही कसं स्वतःकडं दुर्लक्ष करून कामं करतो.
केमिस्टकडं जाऊन दुखलं खुपलं तर गोळ्या घेऊन यायचं, गोळ्या घेऊन कामाला लागायचं. पण हे पेन किलर्स दुखणं थांबवतात खरं त्याचे दुष्परिणामही तसेच असतात.
जर दीर्घकाळ अशा पेन किलर घेत राहीलं तर त्याचा परिणाम फार भयंकर होतो. काही पेन किलर मध्ये असलेले स्टराॅइड्स शरीरात मोठा बिघाड करु शकतात.
म्हणून पेन किलर घेण्यापेक्षा काही घरगुती आणि नैसर्गिक उपाय केल्यास ते त्याहून जास्त सुरक्षित आहेत. त्यांचे दुष्परिणाम नाहीत.
१. भरपूर पाणी प्या-
==
हे ही वाचा : पेनकीलर्स शिवाय सुद्धा वेदना बऱ्या होतात, त्यासाठी हे ७ उपाय करून बघाच!
==
शरीरातील पाणी कमी झाल्यास डोकेदुखी उद्भवू शकते.अगदी संशोधनाने सिद्ध केले आहे, की जुनाट डोकेदुखी ही शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे होते. मानसिक ताण तणाव यांमुळे डोकेदुखी, अर्धशिशीचा त्रास होऊ शकतो.
या ताण तणावामुळेच शरीरातील पाणी कमी होते आणि डोकेदुखीची सुरुवात होते. तेच तुम्ही पाणी किंवा पाण्याचा जास्त अंश असलेली फळे कलिंगड, संत्री मोसंबी खाल्ली तर ही पाण्याच्या कमतरतेची समस्या कमी होऊन डोकेदुखीला अटकाव करता येतो.
२. मॅग्नेशियम युक्त आहार घ्या-
हा अजून एक घरगुती उपाय. मॅग्नेशियम हे शरीरातील विविध क्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे खनिज आहे. शरीरांतर्गत होणाऱ्या अगणित क्रिया केवळ मॅग्नेशियम मुळेच होत असतात.
मज्जातंतू च्या संदेशांची देवाणघेवाण करणं, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे ही कामे मॅग्नेशियम करते.
मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते. ती टाळण्यासाठी मॅग्नेशियम असलेला आहार घ्यावा. मॅग्नेशियम असलेले अन्नपदार्थ आहारात ठेवले तर हा त्रास कमी होतो.
३. मर्यादित मद्यपान-
मद्यात असलेली अल्कोहोलची मात्रा ही डोकेदुखीचं कारण आहे. शक्यतो मद्यपान करुच नये. पण जर केलं तर ते मर्यादित प्रमाणातच करावं.
एकंदरीत अभ्यासानंतर असं सिद्ध झालं आहे की, मद्यपान करणाऱ्या लोकांपैकी १/३ लोकांना हा वारंवार डोकेदुखीचा त्रास होतोच होतो. म्हणून शक्यतो कमी प्रमाणात मद्यपान करावे.
कारण मद्यपानानंतर वारंवार लघवी होऊन शरीरातील पाणी कमी होऊ शकते व डोकेदुखी वाढू शकते.
४. शांत झोप घ्या-
सलग आणि शांत झोप लागणं हे उत्तम आरोग्याचं लक्षण आहे. कधी कधी झोप नीट झाली नाही तर दिवसभर अस्वस्थ होणं, डोकं दुखणं या गोष्टी तुम्हीही अनुभवल्या असतीलच.
अभ्यासाअंती काढलेला हा निष्कर्ष हेच सांगतो, माणसाला दिवसभराच्या श्रमानंतर किमान सहा तास झोप आवश्यक असते. ज्यांना सहा तासांहून कमी झोप लागते त्यांना डोकेदुखीची समस्या निर्माण होते. पण तुलनेत जे सहा तास झोपतात त्यांना हा त्रास होत नाही.
अर्थात अतिझोप घेणाऱ्या लोकांनाही डोकेदुखीची समस्या होतेच. म्हणून किमान सहा तासांची झोप ही योग्य आहे. त्यापेक्षा कमी झोपेमुळे तीव्र डोकेदुखी होऊ शकते.
५. हिस्टामाईन टाळा-
मानवी शरीरात हिस्टामाईन हा रक्तपेशींशी संबंधित द्रव्य आहे. ते नैसर्गिकरीत्या शरीरात असतेच. प्रतिकारशक्ती, पचन आणि मज्जासंस्थेवर हे काम करते.
काही अन्नपदार्थ हे हिस्टामाईन युक्त असतात. जसे चीज, आंबवलेले पदार्थ, बीअर, वाईन, भाजलेले मासे, आणि खारवलेले मांस. यामुळे अतिरिक्त हिस्टामाईन शरीरात प्रवेश करते आणि एंझाईम या द्रव्याची निर्मिती होण्यावर परिणाम होतो.
म्हणून ज्यांना हे पदार्थ खाल्ल्यावर डोकेदुखी होते त्यांनी वर सांगितलेले पदार्थ टाळावेत.
६. विशिष्ट तेलाचा वापर करावा-
==
हे ही वाचा : हिमोग्लोबीन वाढविण्यासाठी हे घरगुती खाद्यपदार्थ १०० % टक्के उपयोगी पडतील
==
अरोमा थेरपी म्हणजे सुगंधी द्रव्ये वापरुन केले जाणारे उपचार. अरोमा थेरपीमध्ये जी तेलं वापरली जातात, ती विविध वनस्पतींचा अर्क काढून बनवलेली असतात. ही तेलं उपयुक्त आरोग्यासाठी असल्याचा दावा केला जातो. उ
दा. मिंट, लव्हेंडर ही तेलं डोकेदुखीच्या विकारात उपयुक्त आहेत. मिंटयुक्त तेल ताणतणावाच्या लक्षणांना काबूत ठेवू शकते, तर लव्हेंडर डोकेदुखी थांबवू शकते. म्हणून ज्यांना डोकेदुखीची समस्या आहे त्यांनी याचा वापर करावा.
७. बी काँप्लेक्स व्हिटॅमिन घ्या-
मानवी शरीरात बी काँप्लेक्स व्हिटॅमिन फार महत्त्वाचे आहे. अन्नपचन करुन त्यांचे ऊर्जेत रूपांतर करण्याचे महत्त्वाचे कार्य बी काँप्लेक्स व्हिटॅमिन करते. याच्या वापराने डोकेदुखी कमी होते.
टोमॅटो, कोंडा युक्त पीठ, अंड्याचा बलक यात हे जास्त असते. त्यांच्या सेवनाने तुम्हाला ते योग्य मात्रेत मिळते आणि डोकेदुखीची समस्या कमी होते.
८. थंड जेलचा वापर-
डोकेदुखी मध्ये विविध प्रकारचे शमन करणारे उपाय उपलब्ध आहेत. कोल्ड जेल हा त्यापैकीच एक. दुखणाऱ्या भागावर ही जेल हलक्या हाताने लावल्यास बराच आराम मिळतो. त्यासाठी दरवेळी बाजारात जायला हवे असे नाही.
एखादा टाॅवेल गार पाण्यात भिजवून तुम्ही मानेभोवती, कपाळावर गुंडाळला तरी शक्य होते किंवा शेकायच्या रबरी पिशवीत गार पाणी किंवा बर्फ टाकूनही तुम्ही हे करु शकता.
९. विशिष्ट अन्नपदार्थ टाळा-
जे अन्नपदार्थ खाल्ले असता तुम्हाला डोकेदुखी होते ते पदार्थ टाळा. जसे चीज, आंबट फळं, दारु, काॅफी इ. हे निद्रानाश करणारे पदार्थ आहेत.
या पध्दतीला एलिमिनेशन फूड असं म्हणतात. यामुळे तुमची डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.
१०. अॅक्युपंक्चर थेरपी-
==
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
–
हे ही वाचा : खोकला, सर्दी आणि व्हायरल फिव्हर टाळण्यासाठी कडु गोळ्यांपेक्षा हा चविष्ट उपाय नक्की ट्राय करा
==
ही प्राचीन चीनी उपचार पद्धती आहे. अतिशय बारीक सुया ठराविक पाॅईंट्सवर लावून केली जाणारी ही उपचार पद्धती आहे. जुनाट अर्धशिशी आणि डोकेदुखीची समस्या अॅक्युपंक्चर थेरपीने बऱ्याच प्रमाणात कमी झालेली आहे असं अभ्यासकांनी अनुभवलं आहे.
थोडक्यात पेन किलर घेण्यापेक्षा या उपायांनी डोकेदुखी कमी होण्यास निश्चितच मदत होईल.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.