' फळं खायचीयेत, पण कॅलरीजची चिंता भेडसावतेय? तुमच्या “डाएटिंग”साठी ही फळं आहेत लाभदायी – InMarathi

फळं खायचीयेत, पण कॅलरीजची चिंता भेडसावतेय? तुमच्या “डाएटिंग”साठी ही फळं आहेत लाभदायी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सध्या कोरोनामुळे सगळे घरी बसून काम करत आहेत. साधारण मागच्या तीन महीन्यापासून राज्यात लॉकडाउन आहे. ज्यामुळे बाहेर फिरायला जायची सगळी ठिकाणं, ऑफिसेस, व्यायाम करण्यासाठी असलेले जीम, गार्डन्स यासारख्या जागा बंद केल्या होत्या.

आता घरी बसून मनसोक्त खाल्ल्यामुळे चिंता आहे, वाढलेले वजन कमी करायची. मग ते करायच कसं? कारण ऑफिसच काम घरी एकाच जागी बसून आपण करतोय.

 

work from home inmarathi
MalayalaManorama.com

 

परत एकीकडे जिभेचे चोचले सुद्धा पुरवतोय. उन्हाळ्यात आंबे खाऊन आधीच वजन वाढलंय. आणि आता तर पावसाळा सुरू झाल्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच गरमागरम भजी, बटाटे वडे असे तेलकट आणि रुचकर पदार्थ आवडीने खावेसे वाटणारच!

ही सगळी खायची चंगळ सुरू असली, तरी डोक्यात सारखं एकच येतं, वजन वाढायला नको आणि वाढलं असेल तर ते कमी करायला हवं.

मग फक्त व्यायाम करून तुमचे वजन कमी होईल का? किंवा निरोगी आरोग्यासाठी शरीराची हालचाल पुरेशी आहे का? तर याला ‘नाही’ असं उत्तर आहे. व्यायाम याबरोबरच आहार तितकाच महत्वाचा आहे.

तुम्ही जर रोजचा आहार वजन कमी करण्यासाठी टाळत असाल तर ते अजिबात योग्य नाही. रोजच्या आहारामध्ये जेवणाबरोबरच ‘फलाहार’ करा.

 

fruits inmarathi 1
thehealthy.com

 

जर तुम्हाला खरंच वजन कमी करायचं असेल आणि शरीराला आवश्यक ते न्यूट्रीयंट्स द्यायचे असतील, तर फळं ही तुमच्या दिवसातील एका भुकेच्या वेळेस नक्की खा.

फळं केवळ तुमचं बेली फेट कमी करायला मदत करत नाहीत, तर मोठ्या प्रमाणात अनेक कॅन्सर होण्यापासून तुम्हाला वाचवतात. तसेच काही गरजेचे विटॅमिन्स , मिनरल्स तुमच्या शरीराला पुरवतात.

इतकंच नाही तर, centers for disease control and prevention यांच्यामते, तुमच्या रोजच्या जेवणाचे स्वरूप अत्यंत योग्य पाहिजे. आणि फळातही अनेक प्रकार आहेत जे तुमच्या शरीरासाठी योग्य आणि पोषक आहेत. त्याचे प्रमाण आत्तापसूनच वाढवा.

तुम्ही बाजारात जर फळं घायला गेलात, तर पहिले फ्रोजन फळ विकत घेऊ नका. आपली साधी फ्रेश दिसणारी फळ घ्या ज्यात त्यातील पोषक घटक कायम असतील.

इतकंच नाही तर तुम्ही फळं ज्यूस, स्मूदी, फ़्रूट सॅलड, सँडविच या प्रकारांमध्ये खाऊ शकता. पण मग साधारण आपण म्हणतो, की सीजनल फळं प्रत्येकाने खावीत.

पण अशी काही फळ आहेत जी बघायला गेल तर बाराही महीने मिळतात आणि तुमच्या हेल्थसाठी, डायटसाठी फायद्याची आहेत. त्याची यादी पुढीलप्रमाणे –

 

१. पीच

 

peach inmarathi
ndtvfoods.com

 

पीच या फळामध्ये जास्तीत जास्त डाएटरि फायबर असतात. तुम्ही १०० ग्रॅम पिच जरी दिवसाला खाल्लं तरी ते तुम्हाला १.६ ग्रॉम फायबर मिळवून देते. तुम्हाला जास्त काळ भूक लागत नाही.

फायबर मुळे पचन छान होतं. तुमचं अन्नपचन उत्तम असणं हे मेटाबॉलीजम करता अत्यंत महत्वाचं आहे. तसेच कुठल्याही प्रकारचा पोटाचा आजार होत नाही. पोट अगदी साफ होत.

तर असे हे लो कॅलरीज असलेले फळ तुम्हाला रोज एक तरी खायला काहीच हरकत नाही. आणि बाराही महीने तुम्हाला हे फळ बाजारात मिळू शकत.

२. सफरचंद 

 

apple inmarathi
thefoodmagzine.com

 

सफरचंद तुम्ही कधीही कुठेही घेऊन जाऊ शकता.  अनेक डायटीशन मोठ्या प्रमाणात सफरचंद खायचा सल्ला देतात. हे फळ खाल्ल्याने कॅन्सरचा धोका कमी होते.

दिवसभर पुरेल इतकी ताकद देणार हे फळ आहे. ब्लड शुगर नीट ठेवण्यासाठी डॉक्टर हे फळ खायला लावतात. आणि असही सगळेजण म्हणतात, An apple a day keeps the doctor away. तर बघा जमेल तितक सफरचंद खात राहा.

 

३. अननस 

 

pineapple inmarathi
theindependent.com

 

अननस सुद्धा डाएट फ्री फळं आहे. त्यात bromelain नावाचा घटक असतो ज्यामुळे तुमच्या शरीरातील दाहकतेच प्रमाण करतात. आणि मेटाबॉलीजम उत्तम प्रकारे सुरू राहते. त्यामुळे बेली फॅट कमी होते.

अननस तुम्ही कापून खाऊ शकता, त्याचा छान ज्युस बनवून पिऊ शकता.

 

४. केळी 

 

banana inmarathi
theindianexpress.com

 

अर्धे पिकलेले अशी केळी शरीराला फारच फायदेशीर असतात. केळी ही तुमची ताकद वाढवण्याचे काम उत्तम करतात. आणि इतकंच नाही तर तुम्ही केलेल्या हेवि वर्कआउट नंतर केळ snack म्हणून खाणं कधीही चांगलं आहे.

तसंच तुमच्या शरीरातील येणारे वाताचे प्रकार याने कमी होतात. ब्लड प्रेशर उत्तम प्रकारे नियंत्रणात राहत. केळं खाल्याने तुम्हाला पोट भरल्या सारखे वाटेल आणि तोंडाला चव येईल.

 

५. कलिंगड 

 

waterrmelon inmarathi
economictimes.com

 

अतिशय रसाळ आणि गोड असे हे कमी कॅलरी असलेले फळं आहे. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. जेव्हा तुम्हाला डी हायड्रेट झाल्या सारखे वाटेल तेव्हा तुम्ही हे फळ खाऊ शकता.

कलिंगड नुसतं खाण्यापेक्षा त्यात वर काही चाट मसाला, मीठ असे तोंडाला चव येणारे पदार्थ टाकलेत तर फारच उत्तम आहे. खास करून उन्हाळ्यातील दिवसात येणारे फळं तुमच्या शरीराला अगदी फायद्याचे आहे.

 

६. द्राक्ष 

 

cancer-grapes-inmarathi
goodhousekeeping.com

 

जेवणाच्या आधी किंवा व्यायाम केल्या नंतर अर्धा बाउल भरून द्राक्ष खाल्ल्याने insulin चे प्रमाण कमी होते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

कारण द्राक्ष ही रसाळ असतात जे तुम्हाला हायड्रेट ठेवतात. तसचं या फळात फॅट बर्न होतील असे घटक आहेत. यात विटामीन सी, फॉलिक अॅसिड असे घटक अधिक दिसून येतात. ज्यामुळे एकंदरीतच वजन प्रमाणात राहते.

 

७. स्ट्रॉबेरी

 

strawberry inmarathi
realfoodforlife.com

 

बाउलभर स्ट्रॉबेरी खाणे तुमच्या वाढलेल्या बेली फॅटला कमी करण्यासाठी फायद्याचे ठरू शकते. यात फायबर कंटेंट मोठ्या प्रमाणात असतो, जे पचनक्रिया सुरळीत करते.

त्याचबरोबर टाइप २ चा diabetes याने आवाक्यात येतो. तुम्ही ही स्ट्रॉबेरी सेरियल मध्ये घालून खाऊ शकता किंवा त्याची छान स्मूदी बनवू शकता.

८. संत्र 

 

orange inmarathi

 

संत्र्यात शून्य फॅट असते. anti-oxidents संत्र खाल्ल्याने खूप मिळतात. ज्याने वजन कमी लगेच होते. डॉक्टर सुद्धा आवर्जून सांगतात संत्र्याचा ज्यूस करून पिण्यापेक्षा ते संपूर्ण खा. त्याचा फायदा जास्त होतो.

९. किवी 

kiwi inmarathi

 

किवी खाल्ल्यामुळे पचन अगदी बेस्ट होते. या फळात actinidain नावाचा घटक असतो जो शरीराला अत्यंत उपयुक्त असतो. याने शरीरातील प्रोटिन्स सगळीकडे जातात. वेट लॉस लगेच होतो.

पांढर्‍या पेशी कमी झाल्या असतील तर ते वाढायला या फळामुळे मदत होते. आणि मेटाबॉलीजम उत्तम प्रकारे काम करते.

१०. अवाकाडोज (avocados)

 

avacado inmarathi

 

या फळातील घटक तुमची भूक भागवतात आणि तुम्हाला चिवडे, चकली असे पदार्थ खायच्या मोहात पडण्यापासून वाचवतात. यामुळे वजनावर नियंत्रण ठेवता येते. कार्ब्स यातून अधिक प्रमाणात मिळतात. ज्याचे रूपांतर ग्लुकोज मध्ये होते आणि शरीरभर त्याचा पुरवठा रक्तावाटे होतो.

म्हणून अनेकदा डॉक्टर आणि डायटेशीयन तुम्हाला हे फळ खाण्याचा सल्ला देतात. कारण हे तुम्हाला एनर्जि देते आणि त्याचबरोबर अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते.

तर अशाप्रकारे ही वरील फळं जरूर खा, तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. आणि फळं खाऊन वजन वाढते या विचारला बाय बाय करा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?