अंघोळ करताना केलेली फक्त “ही” एक गोष्ट कित्येक आजारांना कायम दूर ठेवेल…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आयुर्वेदात अनेक झाडांचे आरोग्यदायी फायदे सांगितले आहेत. आता सध्या कोरोनाच्या काळात स्वच्छतेचं महत्त्व खूपचं वाढलं आहे. आपण बाहेरून आलो की लगेच आंघोळ करतो किंवा डेटॉल टाकून हात-पाय स्वच्छ धुतो.
पण कधी डेटॉल नसेल तर? जर तुम्ही या झाडाची दोन पानं पाण्यात टाकलीत तर अनेक रोगांपासून तुमचं रक्षण होऊ शकतं. कोणतं झाड आहे असं? ते झाड आहे कडूनिंबाचं.
आपल्या भारतीयांना कडूनिंबाच्या झाडाचे, त्याच्या पानांचे फायदे वेगळ्याने सांगायला नकोत खरं तर! कडूनिंबाचे झाड अंगणात असले, तर हवा शुद्ध राहाते आणि त्याची पानं जंतुनाशक, गुणकारी असतात हे आपल्यापैकी बहुतेकांना ठाऊक असतंच.
तर जाणून घेऊया कडूनिंबाचे फायदे.
बहुगुणी कडुनिंबाचे झाड –
भारतात अनेक ठिकाणी ही झाडं विपुल प्रमाणात आढळतात. कमी पर्जन्यमानाच्या ठिकाणी ही झाडे अधिक होतात. या झाडांची सावली शीतल आणि वाटसरूला थंडावा प्रदान करणारी असते. कडुनिंबाचं एकच झाड परीसरातील हवा शुद्ध ठेवण्यास मदत करते.
कडुनिंबाच्या कोवळ्या डहाळ्या अनेक प्रांतात ‘दातून’ म्हणून वापरून, त्याने रोज दात घासले जातात. त्यामुळे दातांचं आरोग्य चांगलं राहतं. दातात बॅक्टेरिया होत नाहीत.
दाढांमध्ये कीड लागली असेल तर कडुनिंबाच्या डहाळ्यांनी दातून करून दात आणि तोंड स्वच्छ केल्यास ती कीड मरते.
कडुनिंबाची पाने धान्य साठवण्यासाठी वापरली जातात. तांदूळ, गहू, डाळी इत्यादी वर्षभर साठवायचे झाल्यास ते डब्यात भरताना त्यात खाली वर कडुनिंबाच्या डहाळ्या पानांसह भरून ठेवल्यास धान्याला सहजासहजी कीड लागत नाही.
कडुनिंबाच्या झाडा-पानांपासून केसांना लावण्याचे तेलही तयार केले जाते. आयुर्वेदीक दुकानांतून हे तेल मिळते. या तेलाच्या वापराने केसात कोंडा, उवा, लिखा होण्याचे प्रमाण कमी होते. असे हे बहुगुणी, आयुर्वेदाने गौरवलेले झाड खरंच फार उपयोगाचे आहे.
ऋतुमानानुसार होणारे वेगवेगळे आजार –
जेव्हा ऋतुबदल होतो, तेव्हा वेगवेगळे आजार होण्याची शक्यता बळावते. अशावेळी आयुर्वेदाने कडुनिंबाची पाने गरम पाण्यात टाकून त्याने आंघोळ करण्यास परंपरेने सांगितलेले आहे.
कडुनिंबाच्या उपयोगाने त्वचा रोग देखील बरे होतात. परंतु कडुनिंबाचा थेट खाण्यासाठी वापर करणे जरा कठीण जाते, कारण ही पाने चवीला जहाल कडू असतात. त्यामुळे त्याचा वापर वेगवेगळ्या प्रकारे करावा लागतो.
–
हे ही वाचा – या सुंदर महिलांना अंघोळ करण्यास “सक्त मनाई” आहे…
–
तरी देखील रोज दोन पाने चावून खाता आली तर ती शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवतील यात शंका नाही.
ऋतुबदल होताना आजार बळावतात. सर्दी, पडसे, फ्ल्यूचा ताप यासारखे आजार तर सर्रास होतात. अशावेळी शरीरातील प्रतिकारशक्ती उत्तम असेल, तर हे आजार लवकर बरे होतात. त्यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम हा कडूनिंब करतो.
म्हणूनच आपल्या महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाच्या पानांची चटणी खाण्याचा प्रघात आहे. सकाळी आधी ही चटणी खाऊन मगच श्रीखंड किंवा इतर मिष्टान्न खायचे अशी पद्धत आहे. त्यामागे हेच कारण आहे, की ऋतुबदलानुसार होणारे आजार होऊ नयेत.
या दिवशी कडुनिंबाच्या डहाळ्या घराच्या मुख्य दारावर तोरणासारख्याही लावल्या जातात. त्यामुळे हवा शुद्ध होऊन घरात येते.
कोव्हीड काळात कडुनिंबाचे फायदे –
सध्या तर कोव्हीड-१९ च्या संसर्गाच्या काळात शरीराची प्रतिकार शक्ती हाच महत्त्वाचा मुद्दा ठरतोय. कोव्हीडशी सामना करायचा तर शरीरातील प्रतिकार शक्ती उत्तम असायला हवी. शिवाय सध्याचा काळ हा ऋतुबदलाचाही आहे.
नुकताच कडक उन्हाळा संपून पावसाळा सुरू होतोय. अशावेळी आजारांचे प्रमाणही वाढते. हे लक्षात घ्यायला हवे.
त्यामुळे या काळात सध्या ज्यांना शक्य आहे, त्यांनी कडुनिंबाचा वापर जास्तीत जास्त करावा आणि रोजची आंघोळ याची पाने पाण्यात टाकून त्या पाण्यानेच करावी. कारण कडुनिंब हे तीव्र जंतुनाशक आहे.
कडुनिंबाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे –
उन्हाळ्यात जेव्हा हवेतील आर्द्रता वाढते, तेव्हा विशेषकरून त्वचारोग बळावतात. घामोळं होतं. सोरायसिस, इसब यासारखे संसर्गजन्य रोग बळावतात. अशा आजारांवर कडुनिंबाचे पाणी चमत्कारासारखे काम करते. वेगवेगळ्या प्रकारची त्वचेची ऍलर्जी दूर करण्यास मदत करते.
कडुनिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचेवरील विविध प्रकारचे डाग, मुरुमं आणि ब्लॅकहेड्स दूर होतात. शरीराची दुर्गंधी दूर होते.
हिवाळ्यात केसात कोंडा वाढतो. अशावेळी कडुनिंबाच्या पाण्याने केस धुतल्यास कोंडा कमी होण्यास मदत होते.
डोळ्यांना झालेली कोणत्याही प्रकारची ऍलर्जी, डोळे लाल होणे, खाजणे इत्यादींवर कडुनिंबाची पाने घालून गरम पाण्याने धुतल्याने ते कमी होत जाते.
कडुनिंबाचे पाणी योग्यपद्धतीने कसे तयार करायचे?
बादलीत कडुनिंबाच्या दोन डहाळ्या टाका. त्यावर गिझर चालू करून गरम पाणी सोडा, किंवा चांगलं गरम केलेलं पाणी ओता.
ते थोडा वेळ तसेच झाकून ठेवा.
पाणी हलकं थंड, आंघोळीएवढं कोमट झालं, की त्या डहाळ्या काढून टाका. हे पाणी तुम्ही आता वापरायला घ्या.
पूर्वी कांजिण्या, गोवर इत्यादीसारखे ताप मुलांना यायचे तेव्हा, तो ताप उतरल्यावर जेव्हा पहिली आंघोळ घातली जायची, तेव्हा ती कडुनिंबाच्या पानांच्या पाण्याचीच घातली जायची.
शिवाय ही आंघोळ घालताना बाथरुममध्ये फार वेळ पाण्याशी खेळत बसायचं नाही असा शिरस्ता होता.
नुकत्याच तापातून उठलेल्या शरीराला पाण्याशी जास्त संपर्क नको, म्हणून कडूनिंबाचे तापवलेले पाणी एकदाच डोक्यावरून ओतून आंघोळ घातली, की लगेच टॉवेल गुंडाळून बाहेर यायचे असते.
खबरदारी –
लक्षात ठेवा, अंगात ताप असताना कोणत्याही परिस्थितीत आंघोळ करायची नसते. अगदी कडूनिंबाच्या पानाच्या पाण्यानेही नाही.
ताप उतरल्यावर जेव्हा आजार बरा होतो, आणि आजारपणातून उठल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा आंघोळ केली जाते, तेव्हाच कडुनिंबाची पाने टाकून आंघोळ करायची असते. आजार, ताप चालू असताना नाही.
एरव्ही ताप इत्यादी आजार नसताना मात्र तुम्ही केसांतील कोंड्यासाठी, त्वचेच्या समस्यांसाठी, डोळ्यांच्या ऍलर्जीसाठी नियमितपणे कडुनिंबाच्या पाण्याने आंघोळ केली तर ती उत्तम राहील.
तर अशा या बहुगुणी झाडाचे जितके फायदे घेता येतील तितके घ्यावेत आणि आपल्याला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे कडुनिंबाच्या झाडांचे रोपण करून अशी झाडे जगवणे वाढवणे हे फायद्याचे ठरते.
===
हे ही वाचा – कोरोनाच्या संकटात ब्युटी पार्लरला जाणं टाळा, सौंदर्य खुलवणा-या घरगुती टिप्स ट्राय करा
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.