Site icon InMarathi

२०२० मध्ये शतकातील सर्वात मोठं ‘सूर्यग्रहण’ अनुभवताना काय काळजी घ्याल?

solar eclipse featured inmarathi

mymodernmet.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

ग्रहण हा अगदी लहान असल्यापासूनच आपल्या उस्तुकतेचा विषय असतो. सगळेजण त्या आकाशाकडे असे दुर्बीण घेऊन का बघतात आणि मग आपल्यासमोर ती भूगोलात आणि विज्ञान विषयात शिकवलेली आकृती डोळ्यासमोर येते.

मग ते सूर्यग्रहण असो किंवा चंद्रग्रहण. साधारण आई आजी आपल्याला अनेक सूचना देतात. ज्यात या ग्रहणाच्या काळात काय करायच आणि काय करायचं नाही याची मोठी यादी असते.

पण अस का सांगितलं जातं? हे कोड अजूनपर्यंत काही सुटलेलं नाही. तर साधारण ग्रहण म्हणजे काय आणि आता येणार्‍या २१ जूनच्या ग्रहणाच्या वेळेस काही काळजी घ्यायला हवी का ते बघूया.

या रविवारी म्हणजेच २१ जून २०२० रोजी शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण (Solar Eclipse) होणार आहे.

 

express.co.uk

 

असं म्हटलं जात आहे की हे सूर्यग्रहण देशातील बऱ्याच भागात कंकणाकृती स्थितीत दिसेल. कंकणाकृती स्थितीत चंद्र हा सूर्याच्या समोर येतो आणि त्यामुळे सूर्याचा काही भाग झाकला जातो.

यामुळे होते असे की सूर्याची फक्त कडं आपल्याला चंद्राच्या भोवती दिसते. या परिस्थितीला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात तर काहीजण ‘रिंग ऑफ फायर’ असंही संबोधतात.

तसेच या वेळेचे ग्रहण थोडे वेगळे असेल याचे कारण म्हणजे हा २०२० मधला सगळ्यात मोठा दिवस असणार आहे.

२१ जून रोजीचं होणारे सूर्यग्रहण हे आफ्रिकेतील कांगो येथून सुरू होणार आहे आणि त्यानंतर इथिओपिया, येमेन, ओमान, सौदी अरेबिया, हिंद महासागर, पाकिस्तान नंतर भारतातील राजस्थानमध्ये प्रवेश करेल.

भारतानंतर तिबेट, चीन, तैवानच्या दिशेने प्रशांत महासागराच्या मध्यभागी सूर्यग्रहण समाप्त होईल. २१ जून रोजी रविवारी सकाळी १०.१७ मिनिटांनी ग्रहणाला सुरूवात होईल.

 

khaleejtimes.com

 

आणि दुपारी २ वाजून २ मिनिटांनी सूर्यग्रहण समाप्त होईल. २१ जून २०२० रोजीचं सूर्यग्रहण झाल्यानंतर २०२० या वर्षाच्या शेवटी आणखी एक सूर्यग्रहण होणार आहे.

यावेळी सूर्यग्रहण हे भारतातूनही पहायला मिळणार आहे मात्र, ग्रहण पाहताना डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.

भारताचा विचार केला तर अगदी पूर्वीपासूनच हिंदू ग्रंथामध्ये संगितले आहे की ग्रहण बघताना काळजी घ्या. इतकेच नाही तर mythology या विषयात असे म्हणतात की सूर्यग्रहणाचे तुमच्या शरीरावर खूप वाईट परिणाम होतात.

तसेच हे ग्रहण इतर ग्रहणांच्या मानाने अशुभ मानले जाते. त्यामुळे या काळात अगदी आधीपासूनच शुभ काम केली जात नाहीत.

जेणे करून त्याचे वाईट परिणाम आपल्या कुटुंबांवर किंवा आरोग्यावर व्हायला नकोत. एवढचं नाही तर मागचे अनेक वर्ष भारतात मोठी मोठी मंदिर ही ग्रहणाच्या काळात बंद ठेवली जातात.

कारण ते एक पवित्र ठिकाण आहे जिथे अशुभ घटनांचा वावर व्हायला नको.

आजकालच्या सायन्स बेस्ड जगात ग्रहण असतांना काही काळजी घ्यावी असे मानत नाहीत.

पण तरीसुद्धा NASA सारख्या जगातील सगळ्यात मोठ्या रिसर्च सेंटर याच हेच म्हणणं आहे की तुम्ही उघड्या डोळ्यांनी ग्रहण बघण टाळा.

 

republicworld.com

 

कारण सूर्याची प्रखरता फार वेगळ्या स्वरूपाची असते जी डोळ्याकरता योग्य नाही.

पण या ग्रहणाच्या काळात तुम्ही अजून काय काळजी घ्यायला हवी ते देखील एकदा बघूया.

साधारण ज्यांना अवकाश आणि त्या संबंधी विषयाचे वेड आहे किंवा ज्यांना ग्रहण दिसते कसे हे बघायची उस्तूकता आहे त्यांनी काळजी घेऊन ते बघावे.

उघड्या डोळ्यांनी बघितलेले सूर्यग्रहण हे तुमच्या डोळ्यांच्या रेटिना असतात त्याला हानिकारक असते.

ज्यामुळे त्या जाळल्या जाण्याची शक्यता असून अंधत्व येऊ शकते म्हणून हे ग्रहण बघायचं असेल तर काळजी घ्या आणि बघा.

तसे काही नवीन विज्ञान जगाला सांगणारे शास्त्रज्ञ यावर काही मत देत नाहीत.

पण तरी काही आयुर्वेदाचा अभ्यास करणारे अभ्यासक सांगतात, की आपण जर गॅस जवळ जाऊन अन्न शिजवले तर त्यात बॅक्टीरिया निर्माण होतात जे शरीराच्या आरोग्यासाठी घातक असतात.

त्यामुळे त्यांचा सल्ला असतो तुम्ही जमलच तर ग्रहणाच्या काळात अन्न शिजवायचे टाळा. आणि त्याचबरोबर उपवास करणे सुद्धा टाळा. जे पचायला हलके असेल असा आहार घ्या.

ज्या महिला गरोदर आहेत त्यांनी खास करून काळजी या काळात घ्यावी. त्यांनी बाहेर जाणे जाणीवपूर्वक टाळावे.

 

inkhabar.com

 

पण काही सायन्स सेंटर च्या मते हे सगळ खोट आहे. या अफवांवर लक्ष देण्यापेक्षा जर घरात बसून शक्य असेल ग्रहण बघण तर नक्की बघा. त्या करता बाहेर जायची गरज नाही.

त्याचबरोबर ग्रहण काळात झोपण्यावर आणि खाण्यावर बंदी आहे. या ग्रहणातून येणारे किरण हे शिजवलेल्या अन्नासाठी योग्य नसतात. तसचं काही खाल्ले या काळात तर अन्नपचन नीट होत नाही.

या वरील सांगितलेल्या गोष्टींवर किती विश्वास ठेवायचा आणि नाही हे तुमच्यावर आहे. पण तरी साधारण हे लक्षात घ्या. कुठल्याही प्रकारे उस्तूकता आहे म्हणून अयोग्य पद्धतीने ती गोष्ट बघू नका.

सूर्यग्रहण पाहताना आवश्यक काळजी घेणं गरजेचं आहे. नुसत्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहिल्यास त्यामुळे डोळ्यांना अपायकारक ठरु शकतं.

सूर्यग्रहण पाहण्यासाठी दुर्बिण, टेलिस्कोप, ऑप्टिकल कॅमेराच्या सहाय्याने पाहता येऊ शकतं.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version