' भारत-चीनमध्ये एवढा तणाव निर्माण होण्यामागे गलवानचं “हे” अनन्यसाधारण महत्व कारणीभूत आहे! – InMarathi

भारत-चीनमध्ये एवढा तणाव निर्माण होण्यामागे गलवानचं “हे” अनन्यसाधारण महत्व कारणीभूत आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

भारत – चीन या दोन्ही देशांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. हा तणाव निवळावा म्हणून बोलणी देखील सुरू आहेत.

असे असतानाही भारत चीन संघर्षात २० भारतीय सैनिक हुतात्मा झाले. आणि संपूर्ण भारतात चीनच्या विरोधात वातावरण तयार झालं आहे.

इतिहास काय सांगतो!!

भारत चीन यांचे परस्परांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. १९६२ च्या चीन आक्रमणानंतर भारताचा भूभाग असलेला मोठा प्रदेश चीनच्या ताब्यात गेला, त्याला अक्साई चीन म्हटलं जातं.

 

aksai chin 2 inmarathi
m.economictimes.com

 

त्यानंतर १९७५ मध्ये अरुणाचल प्रदेशात चकमक झाली त्यात भारताचे चार जवान हुतात्मा झाले. त्यानंतर आत्ताच हे भारत चीन प्रकरण चिघळलं आहे.

अक्साई चीनमध्ये चीनने १७९ किलोमीटरचा रस्ता भारताची परवानगी न घेता बनवलेला आहे. भारताच्या कोणत्याही लष्करी हालचालींवर तिथून चीनच बारीक लक्ष असतं.

चीन स्वतःची LAC उंचावर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. कारण उंचावरून खाली भारताच्या हालचाली टिपता येतील असा त्याचा प्रयत्न आहे.

आणि भारत त्याविरुद्ध काहीही करू शकणार नाही या बाबतीतही चीन दक्षता बाळगत आहे.

गलवान चे महत्व

भारत – चीन मध्ये तणाव निर्माण होण्याचे कारण म्हणजे गलवानचं खोरं. जर नकाशा पाहिला तर लक्षात येईल की काश्मीर खोऱ्यातील जो भाग चीनने घेतला आहे त्याला लागूनच गलवान नदी आहे.

आणि तो भाग हा भारताच्या सीमेत येतो परंतु चीनला त्या भागात आपलं वर्चस्व ठेवायचं आहे. अलीकडे चीनने त्या भागात काही टेंट टाकले आहेत.

भारताची पूर्वोत्तर सीमा ही चीनला लागूनच आहे. कारण तिबेट देखील चीनच्या अंतर्गत येणाराच देश आहे.

आणि आता चीनला भारतातील सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, लदाख सारखे भूभाग स्वतःच्या भूभागाखाली आणायचे आहेत.

आता भारतात सध्या कोरोनाचा हाहाकार असताना, लॉककडाऊनची परिस्थिती असताना मे महिन्यामध्ये चीनने पंगोंग त्सो सरोवर, दौलत बेग ओल्डी, गलवान खोरे, डॅम चौक याठिकाणी घुसखोरी केली.

 

galwan valley inmarathi
thehindu.com

 

ही केवळ गस्ती दरम्यान केलेली घुसखोरी नसून भारतावर दबाव आणण्यासाठी चीनने उचललेलं पाऊल आहे. लडाख जवळच्‍या सीमारेषेजवळ चीनने चिलखती वाहने आणि रणगाडे आणून ठेवले आहेत.

चीन हा धूर्त आणि कावेबाज शत्रू आहे म्हणूनच त्याच्या शेजारच्या सीमा मजबूत करणे महत्त्वाचे आहे. हे पहिल्यांदा जॉर्ज फर्नांडिस यांनी सांगितले.

चीनला लागून असलेली सीमा ही सुरक्षित नाही. तिथले रस्ते देखील मजबूत नाहीत, तिथले रस्ते मजबूत करणे गरजेचे आहे हे पहिल्यांदा १९९० मध्ये जॉर्ज फर्नांडिस हे भारताचे संरक्षण मंत्री असताना त्यांनी सांगितलं होतं.

भारताने लडाखला लागून असलेल्या काराकोरम क्षेत्रात आता एक रस्ता करायचे काम हाती घेतले आहे. मुळात हा वाद त्या रस्त्यावरूनच सुरू आहे.

चीनला त्याठिकाणी भारताने रस्ता करू नये असे वाटते. याचं मुख्य कारण म्हणजे भारताने रस्ता केल्यास त्यावरून भारताची लष्करी वाहने प्रवास करतील.

मुख्य म्हणजे भारताच्या लष्करी वाहनांना पूर्वी सात ते आठ तासांचा जो वेळ लागत होता तो आता फक्त ३५ ते ४० मिनिटांवर आला आहे. आणि त्यांचा वचक आसपासच्या प्रदेशावर राहील ही भीती चीनला आहे.

 

karakoram highway inmarathi
indiandefencereview.com

 

भारत सरकार हा जो रस्ता तयार करत आहे तो अरुणाचल प्रदेश ते सियाचीन पर्यंत. आणि त्याच्यामध्ये येतं गलवान खोरे.

गुलाम रसूल गलवान या एका शूर साहस वीराच्या नावाने ते खोरं आणि ती नदी ओळखली जाते.

१८९५ मध्ये तो लेहमध्ये आला आणि त्याने त्या भागातील युरोपियन अधिकारी आणि प्रवाशांच्या मोहिमेत धाडसाची कामगिरी केली म्हणून त्याचं नाव त्या खोऱ्याला देण्यात आलं.

आता भारत जो रस्ता बनवत आहे तो दौलत बेग ओल्डी जवळ. जो भाग चीनच्या भूभागाला लागून आहे. त्याचं महत्त्व हेच आहे की दौलत बेग ओल्डी हा सगळ्यात उंचावरील एअरपोर्ट असणार आहे.

जो सियाचिन च्या जवळ आहे. भारताने दारबुक श्योक नदीजवळ हा रस्ता तयार केला आहे. त्यावर एक भरभक्कम ब्रिज बांधला आहे. त्यातून एक दुसरा रस्ता तयार केला आहे जो गलवान खोऱ्यात जातो.

चीनचं मूळ दुखणं तो रस्ता आहे जो १४००० फूट उंचीवर बनवण्यात येतो आहे. तो रस्ता चीनला गलवान खोऱ्यात नको आहे. 

 

daulat beg oldi road inmarathi
dnaindia.com

 

कारण तो रस्ता तयार झाल्यास भारताचं त्या ठिकाणी सामर्थ्य वाढणार आहे. भारताचे लष्करी वाहन त्यावरून अत्यंत कमी वेळात LAC वर पोहोचतील. आता भारताने संपूर्ण पुर्वोत्तर राज्यांच्या सीमांवर सैन्य तैनात केले आहे.

भारताने गलवान खोऱ्यात आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी आता तिथे आपले तिरंगी झेंडे लावून दोन लष्करी पोस्ट निर्माण केले आहेत.

सुरुवातीला त्या अत्यंत खडकाळ भागात, उंच पर्वतांमध्ये, प्रचंड थंडी असलेल्या प्रदेशात रस्ता तयार होईल याची कल्पना चीनला नव्हती.

परंतु तो रस्ता जसा तयार होतो आहे तशी चीनच्या मनात धडकी भरली आहे. दौलत बेग ओल्डी जवळ जो एअरपोर्ट बनवण्यात आला आहे, त्यावर भारताच्या एअरफॉर्सची विमान उतरणार आहेत.

तिथे भारतीय एअरपोर्ट बेस बनवण्यात आला आहे.

भारत आता लडाख या परिसराचा विकास करीत आहे. तिथे मोठमोठे रस्ते आणि विकास कामे होत आहेत. त्याठिकाणी देश-विदेशातील पर्यटक देखील आणले जात आहेत.

आणि त्या सगळ्यांना प्रवासाची परवानगी ही भारत सरकारकडून घ्यावी लागते म्हणजेच हा भाग भारताचाच आहे असा दाखवण्याचा भारताचा प्रयत्न आहे.

 

ladakh tourist inmarathi
indianpanorama.in

 

या प्रश्नाचं काश्मिरी कनेक्शन

भारताने काश्मीर खोऱ्यातील ३७० कलम रद्द करून जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा दिला आहे. तर लडाखला केंद्रशासित प्रदेश केलं आहे. हीदेखील चीनसाठी डोकेदुखी झाली आहे.

कारण त्यामुळे भारतीय सैन्याचा वावर आता तिकडे सहज होईल.

काश्मीर खोऱ्यात चीन स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी CPEC रस्ता बनवत आहे. जो सियाचिन ग्लेशियर जवळ आहे. चीन पाकिस्तान बॉर्डर जोडण्यासाठी चीन हा रस्ता बनवत आहे.

परंतु त्याचा मूळ उद्देश चोहोबाजूंनी भारताला घेरणे हाच आहे. पाकिस्तान सारखा देश भारताच्या विरोधासाठी चीनला वाट्टेल ती मदत करेल.

 

cpec inmarathi
zeenews.india.com

 

त्या रस्त्याद्वारे भारताच्या पश्चिम भागावरही आपली सीमा आणून ठेवण्याचा चीनचा प्रयत्न सुरू आहे.

परंतु आता भारत, काराकोरम ते अरुणाचल प्रदेश हा जोडणारा जो रस्ता तयार करत आहे, त्यामुळे चीन बनवत असलेल्या CPEC रस्त्याला महत्त्व उरणार नाही.

कारण आता भारताचा स्वतःच्याच रस्त्यांवरून चीनच्या सगळ्या लष्करी चौक्यांवर नजर ठेवण्यात येईल.

त्या रस्त्यावरून भारताच्या लडाख आणि जम्मू काश्मीर मध्ये चीनचा शिरकाव करण्याचा मनसुबा हाणून पडला आहे. म्हणूनच चीन गलवान खोरं स्वतःच्या ताब्यात ठेवू पाहत आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?