Site icon InMarathi

सुशांतसिंग राजपूत सारख्या अनेकांच्या दुःखाच्या मुळाशी आहे चंदेरी दुनियेचं “हे” भयाण वास्तव

sushant singh rajput inmarathi.jpg1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

Nepotism म्हणजेच आपल्या नात्यातील लोकांनाच काम मिळतील ही वृत्ती बॉलीवूड मध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे, हे आपण काही दिवसांपासून ऐकत आहोत.

कलाकार किती चांगला आहे यापेक्षा तो कोणाचा मुलगा किंवा मुलगी आहे हे जास्त महत्वाचं आहे.

पण एखाद्या मोठ्या स्टारचा मुलगा म्हणजे हमखास यश असं नाहीये. पण, जो संघर्ष एका कलाकाराला मुंबईत आल्यावर करावा लागतो तो जर का तुम्ही एखाद्या स्टार चे नातेवाईक असाल तर तुम्हाला हा संघर्ष अजिबात करावा लागत नाही.

अनेक कलाकारांना त्यांच्या पहिल्या रोल साठीच इतका संघर्ष करावा लागतो, की ती तोपर्यंत त्यांचे उमेदीचे वर्ष निघून गेलेले असतात.

याउलट, स्टार लोकांचे नातेवाईक जे असतात त्यांना अगदी कमी वयात लाँच करण्यात येतं, म्हणजे त्यांना त्यांचं करिअर व्यवस्थित प्लॅन करता येतं.

आपण त्या कलाकारांची उदाहरण बघूया, ज्यांना बॉलीवूड मध्ये त्यांच्या नातेवाईकांमुळे लवकर संधी मिळाली:

१. जान्हवी कपूर:

 

wikibio.in

 

‘श्रीदेवी ची मुलगी’ ही ओळख जर का बाजूला केली; तर तिला क्वचितच बॉलीवूड मध्ये संधी मिळाली असती.

तिचे फॅन्स असतील. पण, तिच्यासारख्या किंवा त्यापेक्षा जास्त सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री या मुंबईच्या लोकलच्या वाऱ्या करून हैराण आहेत हे वास्तव नाकारता येणार नाही.

 

२. सूरज पांचोली:

 

dnaindia.com

 

आदित्य पांचोली चा मुलगा सूरज पांचोली हा जिया खान या अभिनेत्रीच्या आत्महत्येतील एक संशयित गुन्हेगार असूनही, त्याला सलमान खान ने ‘हिरो’ या २०१५ मध्ये रिलीज झालेला सिनेमात काम करण्याची संधी दिली.

इतर कोणी व्यक्ती जर अशी संशयित गुन्हेगार असती; तर त्या व्यक्तीला कोणी जवळ उभं सुद्धा केलं नसतं.

 

३. अथिया शेट्टी:

 

indiaweekly.com

सुनील शेट्टी ची ही कन्या कोणत्याच सीन मध्ये तुम्हाला कलाकार म्हणून इम्प्रेस करणार नाही.

संवादाची फेक, चेहऱ्यावरील expressions या गोष्टी ज्या कोणत्याही ऑडिशन मध्ये बारकाईने बघितल्या जातात, त्या अथिया शेट्टी च्या बाबतीत बघितल्या गेल्या की नाहीत? हा प्रश्न प्रत्येक तिकीट काढून सिनेमा बघायला गेलेल्या प्रेक्षकाला पडल्याशिवाय राहणार नाही.

 

४. फरदिन खान:

 

superstarsbio.com

 

फिरोज खानचा मुलगा, फरदिन खान ऑडिशन च्या रांगेत उभा राहून दिग्दर्शका समोर आला असता आणि जर त्याने एखादा डायलॉग म्हणून दाखवला असता, तर आपण त्याने केलेला सिनेमा बघण्यापासून स्वतःला वाचवू शकलो असतो.

 

५. सारा अली खान:

 

theprint.com

 

सैफ अली खान आणि अमृता सिंगची ही मुलगी किती कमी वयात बॉलीवूड मध्ये आली. पटापट तिला तीन सिनेमे मिळाले पण. करण जोहर, इम्तियाज अली यांनी तिला लीड रोलची संधी सुद्धा दिली.

यात काही अंशी प्रेक्षकांचं या स्टार किड्स बद्दल असलेलं कुतूहल सुद्धा कारणीभूत असेल. आपण सैफ अली खान आणि करीना कपूर चा मुलगा तैमुरच्या प्रत्येक फोटो, विडिओला किती लाईक्स आणि forwards मिळतात हे आपण बघतच आहोत.

 

६. आयुश शर्मा:

 

theindianexpress.com

 

२०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘लवरात्री’ मधून या हिरो ने बॉलीवूड मध्ये पदार्पण केलं होतं. आयुश शर्मा ने या आधी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं आहे.

सलमान खान निर्माता असलेल्या ‘लवरात्री’ या सिनेमात त्याला हिरो चा लीड रोल मिळण्याचं कारण म्हणजे तो सलमान खान ची मानलेल्या बहीण अर्पिता खान चा नवरा आहे. ही ओळख त्याला हा रोल मिळवण्यासाठी पुरेशी होती.

 

७. हर्षवर्धन कपूर:

 

indiatoday.com

अनिल कपू चा मुलगा हर्षवर्धनला पहिला चान्स मिळाला तो असिस्टंट डायरेक्टर म्हणून ‘बॉम्बे वेल्वेट’ या सिनेमा मध्ये. त्यानंतर त्याला पहिलाच सिनेमा मिळाला तो राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी दिगदर्शीत केलेला ‘Mirzya’.

हा चित्रपट सणकून आपटला. तरीही हर्षवर्धन च्या करिअर ला काहीच फरक पडला नाही.

दोन वर्षांनी म्हणजे २०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘भावेश जोशी – सुपरहिरो’ मध्ये त्याला एक रोल मिळाला आणि अभिनव बिंद्रा या नेमबाज च्या बायोपिक मध्ये तो शीर्षक भूमिका सध्या करत आहे.

हा मधला काळ जो बॉलीवूड मध्ये जो sustain करू शकतो तोच इथे राहू शकतो आणि हे स्टार सन्स ला अजिबात अवघड नसतं.

 

८. आलिया भट्ट:

 

bizasialive.com

 

इतरांपेक्षा जास्त यशस्वी आणि चांगलं काम करणारी अभिनेत्री आहे हे मान्य आहे, पण आलिया भट्ट ही वयाच्या १७ व्या वर्षी धर्मा प्रॉडक्शनच्या ऑफिस ला जाते, ऑडिशन देते आणि रोल मिळवते.

तिची ऑडिशन ची क्लिप सुद्धा इंटरनेट वर व्हायरल झाली होती. त्यामध्ये फार काही सादर करायला सांगितलेलं अजिबात नाहीये.

आलिया भट्टचा करिअर ग्राफ बघितला, तर करण जोहरने तिला किती तरी सिनेमांमध्ये संधी दिली आहे. यामध्ये तिची मेहनत आणि अभिनयकौशल्य आहेच.

 

९. वरुण धवन:

 

bollywoodhungama.com

 

दिग्दर्शक दविड धवन यांचा हा मुलगा एक चांगला अभिनेता आहे हे त्याने सिद्ध केलं आहे. पण, त्याच्या करिअरची सुरुवात आपण बघितली तर ती केवळ करण जोहर आणि त्याच्या वडिलांच्या सिनेमा मिळत राहिल्यानेच झाली आहे.

त्याचा स्क्रीन वरील वावर अगदी सहज आहे. मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचणं हे त्याला ‘धवन’ हे आडनाव नसलं असतं तर कदाचित अजून काही वर्षांनी शक्य झालं असतं.

 

१०. अभिषेक बच्चन:

 

mensxp.com

 

‘रेफ्युजी’ या पदार्पणाला मिळालेलं संमिश्र यश आणि त्यानंतर बॉक्स ऑफिस वर झोपलेले कितीही सिनेमे असले तरीही अभिषेक बच्चनला चित्रपट  मिळत गेले.

त्याचा आजपर्यंत चा सर्वात चांगला रोल म्हणजे मणीरत्नम यांनी दिगदर्शीत केलेला ‘गुरू’. पण, हे लक्षात घेतलं पाहिजे की हा सिनेमा ‘रेफ्युजी’ च्या सात वर्षांनंतर अभिषेक बच्चन ला मिळाला होता.

७ वर्ष कोणत्याही सोलो हिट शिवाय इंडस्ट्री मध्ये तग धरून राहणं यासाठी तुम्ही अमिताभ बच्चन यांचा पुत्र असावं लागतं.

असं अजिबात नाहीये की, स्टारची मुलं ही कमी प्रतिभावान आहेत. यांच्यापैकीच हृतिक रोशन हा या श्रेणीतील सर्वात यशस्वी आणि चांगला कलाकार म्हणता येईल.

रणबीर कपूर सुद्धा एक स्टारसन आहे. पण त्याने त्याचं अभिनयाचं नाणं खणखणीत आहे हे त्याने सिद्ध करून दाखवलं आहे.

बॉलीवूडमध्ये Nepotism आहे हे मान्य करायला इतक्या उदाहरणा नतर कोणालाही हरकत नसावी. इतरांच्या मानाने संधीची दारं यांच्यासाठी लवकर उघडी होतात.

काही वर्षांनी बॉलीवूड ही फक्त चोप्रा, जोहर, भट आणि खान यांचं म्हणणं ऐकणारी इंडस्ट्री आहे असं चित्र समोर आल्यास आश्चर्य वाटायला नको.

चंदेरी दुनियेचं स्वप्न घेऊन मुंबईत रोज दाखल होणाऱ्या मुला मुलींना हे सर्व अडथळे पार करण्याची देव शक्ती देवो आणि पुन्हा कोणी सुशांत सिंग राजपूत ची पुनरावृत्ती न करो हीच इच्छा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version