Site icon InMarathi

कुत्र्यावरून युद्ध? कल्पनाविलास वाटेल, पण हा आहे अक्षरशः खरा इतिहास…! वाचाच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

युद्ध म्हंटल की आपल्यासमोर उभं राहतं ते भलं मोठं रणांगण, आणि तिथे झुंज देत असणारे सशस्त्र सैनिक!

असं म्हणतात की युद्धामुळे प्रश्न सुटत नाहीत तर ते आणखीन चिघळतात! पण काही काही प्रश्न सोडवण्यासाठी युद्धाशिवाय दूसरा पर्याय सुद्धा नसतो हे देखील तितकंच खरं आहे!

युद्ध हे सोल्यूशन नक्कीच नाहीये, पण ते कधीच होऊच नये किंवा युद्ध चुकीचंच आहे हे म्हणणं सुद्धा योग्य नाही!

१६ जून २०२० या दिवशी आपण सगळ्यांनीच गालवन व्हॅलीमध्ये हुतात्मा झालेल्या आपल्या २० जवानांची बातमी वाचली. या युद्धाचे काळे ढग आता ह्या पावसाच्या काळ्या ढगांपेक्षाही जास्तच गडद वाटू लागलेत.

 

kashmirreporter.com

 

पण युद्ध हा नक्कीच शेवटचा उपाय नसतो. भारत आणि चीन सारख्या मोठ्या देशांनी तर अत्यंत संयमाने अशा परिस्थितीत वागायला हव.

आजवर इतिहासात जमीन, पैसा, धर्मांतरण अशा अनेक मुद्द्यांवर युद्ध झाली, पण जेव्हा अगदीच फुटकळ कारणाने युद्ध होत तेव्हा काय होतं ते आपण बघूया.

१९२५ साली ग्रीस आणि बल्गेरिया या दोन देशांमध्ये युद्ध झाल. खरतर दोन्ही देश ऑटोमन साम्राज्यातून स्वतंत्र झालेले आणि दोन्ही देश बाल्कन लीग मधले.

पण काही भूभाग असा होता ज्याच्यावर दोन्ही देश हक्क सांगू लागले. अनेक चकमकी बॉर्डरवर होऊ लागल्या.

शेवटी १९१३ मध्ये त्यांच्यात एक युद्धं झाला. ते युद्धं संपलं तर लगेच १९१४ मध्ये पहिल्या महायुद्धाची सुरुवात झाली. ज्यात बल्गेरियाने ऑटोमन साम्राज्याच्या बाजूने भूमिका घेतली तर ग्रीसने ब्रिटन आणि फ्रान्सच्या.

 

metropostcardnews.com

 

त्यामुळे युद्धानंतर जेव्हा ब्रिटन आणि फ्रान्स जेते ठरले तेव्हा ग्रीसला त्यांच्या बाजूने उभे राहिल्याबद्दल बक्षीस मिळालं. जो भूभाग बल्गेरीया आणि ग्रीस यांच्यातील वादात होता तो सगळा ग्रीसला मिळाला.

त्याकाळात सीमेवर तणाव कायमच राहिला.

आणि एक दिवस १८ ऑक्टोबर १९२५ मध्ये एक कुत्रा बल्गेरियाच्या दिशेने धावत सुटला. त्या कुत्र्यावर एका ग्रीक सैनीकाचा फार जीव होता, त्यामुळे तो जवानसुद्धा हरपून त्या कुत्र्याला वाचवायला त्याच्यामागे धावला.

आणि धावता धावता दोघेही बल्गेरियाच्या सीमेजवळ जाऊन पोहोचले.

 

warhistoryonline.com

 

जेव्हा तो ग्रीक सैनिक बल्गेरियन बंदुकीच्या टप्प्यात आल्याचं जाणवलं तेव्हा एका बल्गेरियन सैनिकाने गोळी झाडली आणि ग्रीक सैनिक जागीच ठार झाला.

ही धक्कादायक गोष्ट ग्रीक सैन्याला रुचली नाही. त्यांनी प्रत्युतर म्हणून बल्गेरियन चौकीबाहेर गोळीबार केला. मग याला उत्तर म्हणून बल्गेरियन सैनिकांनी हल्ला केलं.

आणि त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली. ही परिस्थिती नियंत्रणात आणायला हवी असा विचार करून ग्रीक कॅप्टन आणि त्याचा सहकारी एक पांढरी चादर घेऊन नो मॅन्स लँड वर गेले.

बल्गेरियन सैनिकांना ही सुवर्णसंधी गमवायची नव्हती म्हणून त्यांनी शांततेच अपील करणार्‍या त्या कॅप्टन आणि सहकार्‍याला गोळी झाडली. आणि ते त्याच क्षणी धारातीर्थी पडले.

त्यामुळे आता मृत सैनिकांचा आकडा हा तीन झाला होता. हा झालेला प्रकार जेव्हा वरिष्ठांपर्यंत पोहोचला तेव्हा बल्गेरियन सरकारने माफी मागितली आणि गैरसमजातून हा प्रकार झालेला असल्याचा सांगितला.

एवढच नाही तर एकूण प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी आणि चौकशीसाठी एक ग्रीको बल्गेरियन कमिशन सुद्धा स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला.

पण आता आक्रमकता दाखवण्याची पाळी ग्रीकवर आली होती आणि ग्रीसने तेच केलं.

 

electrodealpro.com

 

ग्रीसच्या लष्करी हुकूमशहा आणि नंतर पंतप्रधान झालेल्या थिओडोरोस पांगलोस याने बल्गेरियाला अल्टीमेटम दिल आणि सांगितलं की ज्या बल्गेरियन सैनिकांनी गीक सैनिकांना मारलय त्यांना शिक्षा करा.

नंतर बल्गेरियाने रीतसर माफी मागावी आणि मेलेल्या ग्रीक सैनिकांच्या परिवाराला नुकसान भरपाई म्हणून २० लाख फ्रेंच फ्राक्स द्यावेत.

हे सगळं करायला पांगलोस याने बल्गेरियाला फक्त ४८ तास दिले होते. बल्गेरियाने हा अल्टीमेटम धुडकावून लावला.

परिणामतः २२ ऑक्टोबर च्या दिवशी पांगलोस याने ग्रीक सैन्याला बल्गेरिया मध्ये प्रवेश करण्याचे आदेश दिले. ग्रीसने पेट्रीश नावाच शहर आणि आजूबाजूची काही गावं ताब्यात घेतली.

बल्गेरियाने या क्रियेला चांगलाच प्रतिसाद दिला पण ग्रीसने त्या प्रतिसादावर आपली पकड कायम ठेवली.

बल्गेरियाला हे कळून चुकलं होत की स्वबळावर बल्गेरियाला ग्रीस सैन्याला स्वतःच्या देशातून हाकलून लावता येणार नाही. त्यामुळे त्यांनी ‘लीग ऑफ नेशन’ कडे धाव घेतली.

(यूनायटेड नेशन्स याच दुसर्‍या महायुद्धाधीच स्वरूप). मग लीग ऑफ नेशन यांनी सिसफायर याचा आदेश दिला. आणि ग्रीसने बल्गेरिया इनवेड केल्याबद्दल कमपेन्शेशन ची मागणी केली.

 

thoughtco.com

 

ग्रीसने लीगवर हिपोक्राट असल्याचा आरोप केला आणि हे दाखवून दिल की १९२३ मध्ये जेव्हा इटलीने ग्रीसवर हल्ला केला होता, तेव्हा लीगने इटलीची म्हणजेच अटॅकर्सची बाजू घेतली होती.

पांगलोसने आरोप केला की लीगचे दोन वेगळे नियम होते. इटली सारख्या पावरफुल देशांसाठी एक आणि ग्रीस सारख्या वीक देशांसाठी एक.

पण तरीही ग्रीसकडे भूभाग सोडून परत येण्याशिवाय दूसरा पर्यायच नव्हता. लीगने ब्रिटन, फ्रांस आणि इटली मधून मिलिटरी पाठवली विथड्रॉवलची पाहणी करण्यासाठी.

ह्या हल्ल्यामध्ये ५० बल्गेरियन जवान मेले होते आणि भरपाई म्हणून ग्रीसने युरो ४५,००० बल्गेरियाला द्यावे लागले.

अशाप्रकारे साधारण ५० च्यावर बल्गेरियन सैनिक आणि काही ग्रीक सैनिक ज्या युद्धात मृत्युमुखी पडले ते हे युद्धं एका कुत्र्याच्या अनावधानाने बॉर्डर क्रॉस करण्याच्या प्रयत्नांत झाले होते.

आजवर त्या कुत्र्याचे पुढे काय झाले हे मात्र कळू शकलेल नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version