Site icon InMarathi

अनाकलनीय! एक भुताटकी चित्रपट ज्याने प्रेक्षकच नव्हे, कलाकारांनाही गुंगवून टाकलं…!

blair witch featured 2 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अनेक सिनेमे असे असतात, जे काळाच्या पटलावर आपली अनोखी ओळख सोडून जातात. लोकांच्या कायम स्मरणात राहतात.

‘द ब्लेअर विच प्रॉजेक्ट’ हा असाच एक भयपट, जो दोन दशकानंतरही लोक अजून त्याला विसरले नाहीत. त्याच्याभोवतीच्या अफवा, दंतकथा अजूनही विरलेल्या नाहीत.

तेव्हा या सिनेमाची कहाणी खरी वाटायची? दिग्दर्शकाला हे कसं काय शक्य झालं होतं? पण तसं घडलं होतं हे खरं आहे.आता अनेक प्रकारचे भयपट येतात. त्यांची चर्चा होते आणि लोक विसरूनही जातात.

मात्र दोन दशकांपूर्वी आलेल्या ‘द ब्लेअर विच प्रॉजेक्ट’ या सिनेमाने लोकांना धडकी भरवली होती. हा सिनेमा पाहताना लोक अर्ध्यावरच थिएटर सोडून निघून जात होते.

 

 

कारण पडद्यावर जे दाखवतायत ते खरंच असलं तर? याची त्यांना भीती दाटून येत असे.

हा सिनेमा १९९९ मध्ये रीलीज झाला होता. या सिनेमात ‘फाऊन्ड फुटेज’ या नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने शुटींग केलं होतं. हा सिनेमा हेदर, माईक आणि जोश या तीन मित्रांनी फार कमी बजेटमध्ये बनवला होता.

त्यासाठी हॅन्डी कॅमेरा घेऊन ते तिघे जंगलात गेले होते तेव्हा त्यांनी शोध घेतलेल्या अमानवी गोष्टींवर या सिनेमाची कहाणी आधारित आहे.

सोशल मिडीया तेव्हा उपलब्ध नव्हता आणि या सिनेमात वापरल्या गेलेल्या तंत्राविषयी तोपर्यंत प्रेक्षकांना काही माहिती नव्हती. त्यामुळे प्रेक्षकांना सिनेमात घडत असलेल्या घटना खऱ्या वाटून त्याने ते घाबरून जात होते.

या सिनेमाचा प्रचार करण्यासाठी अभिनव तंत्र वापरले गेले होते. यात काम करणाऱ्या अभिनेत्याचे पोस्टर्स आपोआप गहाळ झाल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या.

या सिनेमात घडलेल्या घटना खऱ्या असल्याच्या अफवा पद्धतशीरपणे चित्रपटाचे प्रमोटींग म्हणून पसरवल्या गेल्या होत्या.

 

 

ब्लेअर विचचा स्टार मायकेल सी विल्यम्स याने एका वृत्तपत्राला मुलाखत देताना म्हटले, की अशा प्रकारच्या प्रचारामुळे लोकांना त्या सिनेमात घडणाऱ्या घटना खऱ्याच असणार असं वाटू लागलं होतं.

अगदी मला नी माझ्या कुटुंबियांना आधीपासून ओळखत असलेले लोक देखील या गोष्टीवर विश्वास ठेवू लागले होते. सिनेमाचा प्रचार इतका परीणामकारक झाला होता.

तो म्हणतो, की लोक त्याच्या घरी फोन करून शोक व्यक्त करत होते आणि त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन करत होते. त्यांना वाटत होतं की खरंच मेरीलॅन्डच्या जंगलात त्याच्याबरोबर बरंवाईट झालेलं आहे.

तो म्हणतो की आम्ही बऱ्याच लोकांना गोंधळात टाकून दिलं होतं. परंतु जेव्हा मी जिवंत आहे हे पाहून त्यांना आनंद होण्याऐवजी ते आमच्यावर रागवू लागले. हे बरं नाही ना?

त्यानंतर चित्रपटनिर्माते आणि दिग्दर्शक या सगळ्यांनी ह्या घटना खोट्या, काल्पनिक असल्याचे वारंवार सांगूनही लोक अभिनेत्यांच्या गूढ मृत्यूवर विश्वास ठेवतच राहिले होते.

 

 

या सिनेमाचा एक निर्माता मायकल मोनेलो म्हणतो, की या चित्रपटावरून हे सिद्ध झालं की लोक अजूनही अमानवी शक्तींवर विश्वास ठेवतात.

अशा गूढ शक्ती विश्वात वावरत असतात आणि त्या कधी कधी मानवी जीवनावर नियंत्रण मिळवून त्यांना अंकीत करतात असं लोकांना वाटतं. लोकांच्या अशा गोष्टींवर आजही विश्वास आहे हेच या सिनेमाने सिद्ध केले.

या भयपटाचा लोकांचा अनुभव आजही तितकाच विलक्षण आहे. या सिनेमाचे निर्माते आणि अभिनेते यांनी या सिनेमाच्या शुटींगच्या वेळी आलेले अनुभव देखील लोकांसमोर शेअर केलेले आहेत.

प्रेक्षकच कशाला, या सिनेमाबद्दल गूढता निर्माण व्हावी आणि लोकांना यातील घटना खऱ्या वाटाव्या याकरता,

या सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माते डॅनियल मायरिक आणि एड्युर्डो सॅन्चेझ यांनी या सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्यांशीही शुटींगच्या वेळी जंगलात असताना त्यांच्याशी कमीत कमी संवाद ठेवून त्यांनाही गूढतेच्या वलयातच ठेवले होते.

 

 

ते म्हणतात, की अभिनेत्यांनीही का कोण जाणे आमच्यावर विश्वास ठेवून आपल्यासोबत हे सगळं खरंच घडतंय अशी कल्पना करून आम्हाला चित्रिकरणात मदत केली होती.

खरंतर या सिनेमाचा शेवट काय असेल याची निश्चित कल्पना खुद्द दिग्दर्शकालाही चित्रिकरणाच्या शेवटच्या दिवसापर्यंत नव्हती. यावरूनच कल्पना येईल की हा सिनेमा किती काल्पनिक होता ते!

मायरीक म्हणतो की सिनेमाचा शेवट कसा करणार आहोत, त्याची आम्हालाच शेवटपर्यंत कल्पना नव्हती. आणि आम्हाला जे नको होतं तेच आम्ही केलं.

फक्त एखाद्या एलियनसारखे किंवा आपल्या कल्पनेतल्या टिपिकल चेटकीणीसारखी वेशभुषा इत्यादी आम्हाला दाखवायची नव्हती.

शेवटी मायरीक आणि सॅन्क्झ यांनी ब्लेअर विचच्या घरात पात्रांवर एक न पाहिलेली गूढ शक्ती अटॅक करते आणि त्यात त्यांचा अंत होतो असे दाखवले.

 

 

परंतु त्या पात्रांच्या भूमिका करणाऱ्या अभिनेत्यांना देखील ते शूटींगवाले घर सोडेपर्यंत याची कल्पना दिली गेली नाही.

मायकेल विल्यम म्हणतो की शेवटच्या सीनमध्ये त्याच्या सहकलाकाराला हेदरला त्या घरात एकटी किंचाळत सोडून पळून जाताना मी खूप घाबरलो होतो. माझ्यासाठी तो भयानक अनुभव होता.

जेव्हा तो पळत त्या घराच्या तळघरात येतो तेव्हा तिथे पोचल्यावर सिनेमाच्या एका निर्मात्याने त्याला उचलून आपटल्याचे फक्त त्याला आठवते.

चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनबद्दल बोलताना तो म्हणतो, की मला फक्त एवढंच आठवतंय, की मला मी सुटल्याची, मुक्त झाल्याची जाणीव होत होती.

कोणीतरी माझ्या कानाशी उठ आणि त्या कोपऱ्यात जाऊन उभा राहा असा आदेश देत होतं.

अशाप्रकारे या सिनेमात काम करणाऱ्या खुद्द अभिनेत्यांना देखील काय खरं नि काय खोटं याची शेवटपर्यंत कल्पना न दिल्याने त्यांचा अभिनय हा वास्तव पातळीवरचा, खराखुरा झाला होता.

 

 

आणि त्यामुळेच प्रेक्षकांनाही ते सगळं खरंखुरं वाटायला मदत झाली होती.

अवघ्या ६०,००० डॉलरच्या (४५ लाख) बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने नंतर २४ करोड डॉलर्सचा (अब्जावधी मध्ये) बिझनेस केला. आणि या सिनेमाचा प्रभाव आज वीस वर्षांनंतरही जनमानसावर तेवढाच परिणाम करून आहे.

या सिनेमातील मुख्य अभिनेता विल्यम्स अजूनही अभिनय क्षेत्रात काम करतो. मात्र त्याचे मुख्य काम हे माध्यमिक शाळेतील मार्गदर्शक समुपदेशक म्हणून आहे.

जोश लिओनार्ड हा अजूनही अभिनय करतो आणि ‘ट्रू डिटेक्टीव्ह ऍन्ड बेट्स मोटेल’ सारख्या शोजमधून दिसत असतो.

हेदरने मात्र त्यानंतर अभिनय केला नाही आणि ती एका वेगळ्याच क्षेत्रात काम करू लागली. २०१२ मध्ये तिचं एक ग्रोगर्ल नावाचं मेमोयर देखील प्रसिद्ध झालं होतं.

मानवी मनात किती गुंता असतो, मार्केटिंगमुळे लोक खूप प्रभावित होतात – हे कळल्यानंतर चित्रपट दिग्दर्शक आणि  कलाकार दंग झाले होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version