' केसगळती – झोप उडवणाऱ्या या गैरसमजांवर बिलकुल विश्वास ठेवू नका… – InMarathi

केसगळती – झोप उडवणाऱ्या या गैरसमजांवर बिलकुल विश्वास ठेवू नका…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

केस म्हणजे लोकांची आन बान शान असतात, केसांमुळे व्यक्तीच सौंदर्य आणखीन खुलून दिसतं! जशी स्त्री ची आब्रू तिची लज्जा किंवा शालीनता असते तसेच पुरुषाची आब्रू म्हणजे त्याचे केस असतात!

आणि आपल्याइथे पुरुषांना केस गळतीचा खूप त्रास होतो, एखाद्याला टक्कल पडायला लागलं किंवा केस गळायला सुरुवात झाली कि लगेच त्या व्यक्तीला टोमणे मारणं किंवा त्याची खिल्ली उडवणं चालू होतं!

तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल जास्त माहिती नसेल आणि एखाद्या व्यक्तीकडून त्या गोष्टीबद्दल तुम्हाला चुकीची माहिती जरी समजली तरी ती खरी वाटून आपण अगदी हवालदिल होतो.

हीच गोष्ट जर केसगळती बाबत असेल तर मात्र आपली रात्रीची झोप देखील उडते.

केसगळतीबाबत लोकांच्या मनात आजही अनेक गैरसमज आहेत आणि हे गैरसमज लोकांच्या मनात अधिक भीती उत्पन्न करतात. केसगळतीच्या अफवांबद्दलची हीच भीती दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला या अफवांमागचं सत्य सांगणार आहोत.

 

bollywood actor inmarathi
desiblitz

 

१. एसी रूम मध्ये बसल्याने केसगळती होते

 

indian guy hair fall inmarathi 2
the economic times

 

लोकांच्या मनातील हा सर्वात मोठा गैरसमज आहे. पण हे अजिबात सत्य नाही.

एसी मुळे  तुमचे केस रुक्ष होतात अथवा कोरडे होतात हे खरे, पण त्यामुळे केसगळती होते असे अजून तरी शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले नाही.

 

२. दरोरोज केस गळत असतील तर तुम्हाला टक्कल पडणार

 

hair-loss-men02

 

हा जावईशोध कोणी लावला देवच जाणे! दिवसाला १०० केस गळणे ही सामान्य गोष्ट आहे हे लक्षात घ्या. हो पण जर त्यापेक्षा जास्त केस गळत असतील तर मात्र तज्ञांना एकदा दाखवेलेले बरे!

 

३. केस मऊ किंवा सरळ केल्यास (केसांची रचना बदलल्यास) केस गळतात

 

indian girl hair fall inmarathi
iswarya siddha hospital

 

केस मऊ किंवा सरळ करण्यासाठी आपण वापरतो हेअर प्रोडक्ट!

या हेअर प्रोडक्टच्या वापरामुळे केस गळायला सुरुवात होते हा गैरसमज मनातून काढून टाकला पाहिजे. अर्थात, चांगल्या प्रतीचं हेअर प्रोडक्टच वापरा. अन्यथा ही गोष्ट सत्यता घडायला जास्त वेळ लागणार नाही.

 

४.  टक्कल केल्यावर चांगले आणि जास्त केस येतात

 

hair-loss-men04

 

ही एक प्रसिद्ध अफवा आहे जी आपल्याला सगळीकडे ऐकायला मिळते. पण असं काहीच घडत नाही. टक्कल केल्याने तुम्हाला जास्त केस येत नाहीत. तुम्ही केस जेवढे वाढवाल तेवढे ते वाढतील जसे आहेत तसे!

 

५. रोज डोक्यावरून अंघोळ केल्याने केस जास्त गळतात

 

indian girl shampoo inmarathi
YouTube

 

असंही काही लोकांचं मत आहे कि रोज डोक्यावरून अंघोळ केल्याने केस जास्त गळतात, पण  ते अत्यंत चूक आहे, तो एक स्वच्छतेचा भाग आहे, आणि रोज अंघोळ केल्याने केसांच्या आतला भाग स्वच्छ होतो!

त्यामुळे अंघोळीचा आणि केस गळण्याचा तसा काहीच थेट संबंध नाही!

 

६. थेट सूर्यप्रकाशात फिरल्याने सुद्धा केसगळती होते

 

Asian woman in hot summer - heat stroke concept
sowetanlive

 

खरंतर हि तर खूप हास्यास्पद गोष्ट आहे, उन्हामध्ये व्हिटॅमिन डी असते, आणि उन्हात फिरल्याने तर कधीच केस गळती होत नाही, आणि जर होत असेल तर त्याची काही वेगळीच कारण आहेत!

 

केसगळती थांबवण्यासाठी काहीही उपाय नाही

 

ayushman in bala inmarathi
scroll.in

 

तंत्रज्ञान इतकं प्रगत झालय की आता केसगळतीवर कायमचे उपाय करता येतात. त्यामुळे कोणी सांगितलं की केसगळती वर काहीही उपाय नाही, तर त्याच्या बोलण्याने चिंतीत होऊ नका आणि त्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका.

आता विचाराल, केस गळतीवर उपाय कोणते?!

ते पुढील लेखात!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?