Site icon InMarathi

जेवणानंतर आपल्याकडून नकळत होणार्‍या या गोष्टी ठरू शकतात अत्यंत घातक!

meal inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तुमचे असे कधी झाले आहे, की तुम्ही जेवणानंतर लगेच स्विमिंगला गेलात? जिमला गेलात? किंवा पोटभर गोडधोड जेवण झाल्यामुळे तुम्हाला झोप आलीये आणि तुम्ही लगेचच झोपलात?

या सगळ्या प्रश्नांची उत्तर नक्कीच ‘हो’ अशी येतील हे आम्हाला माहित आहे. पण वरील पैकी कुठलीही गोष्ट जेवण झाल्यावर लगेच करणे हे आपल्या शरीरासाठी योग्य ठरू शकत नाही.

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे हे आवश्यक आहे नाही का? पण आपण हे करणार कसे? योग्य आहार घेऊन, व्यायाम करून, किमान आठ तास झोपून आपण आपले स्वास्थ्य टिकवू शकतो.

 

ndtv.com

 जेवण झाले की लगेच आपण काम करायला बसतो, किंवा इतर वेळी सुद्धा जेवण झाल्यावर आपण काही गोष्टी नकळतपणे करतो ज्या आपल्या शरीरासाठी घातक आहेत.

कामासोबतच निरोगी आयुष्य जगणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. 

असं म्हणतात, आपले जीवन आणि आहार यांचा खूप जवळचा संबंध आहे. सध्याच्या वातावरणात आपले राहणीमान, जेवणाच्या पद्धती यांत मोठ्या प्रमाणात बदल होतांना दिसतो. पण, विचार केला तर लक्षात येईल की आपले तन, मन आणि आहार हे मोठ्या प्रमाणात एकमेकांवर अवलंबून आहेत.

अनियमित वेळी आहार घेणे यामुळे आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो तर किंबहुना करावा लागतो.

आरोग्यविषयक ग्रंथांमध्ये उच्च असलेल्या ‘आयुर्वेद’ या ग्रंथात देखील उत्तम जीवनाचे रहस्य नियमित आहार आणि दिनचर्या हे सांगितले आहे. यामुळे पचनक्रिया सुकर होते.

पण काही गोष्टी अशाही आहेत ज्या जेवणानंतर लगेच केल्याने तुम्हाला अपचन होऊ शकते आणि नकळत काही आजारांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो.

तर या गोष्टी टाळण्यासाठी आणि आरोग्यदायी आयुष्य जगण्यासाठी पुढील गोष्टी जेवणानंतर करायचे तुम्ही प्रकर्षाने टाळा.

 

१. थंडगार पाणी पिणे टाळा

 

 

पाणी पिणे हे आपल्या शरीरासाठी कितीही अत्यावश्यक असले तरी, जेवण झाल्यावर लगेच गार पाणी पिणे हे योग्य नाही. यामुळे तुमची पचनक्रिया ही अनियमित होते आणि याचा परिणाम म्हणजे अन्नपचन योग्य प्रकारे होत नाही.

यामुळे जेवण हे जर तुमच्या पोटात ऊर्जा निर्माण करत असेल, तर ती तुम्ही असे थंडगार पाणी पिऊन विजवता हे लक्षात घ्यायला हवे.

२. जेवणानंतर ‘चहा’ आणि ‘कॉफी’ ला नाही म्हणा

 

shutterstock.com

 

तसे जेवणानंतर लगेच चहा किंवा कॉफी प्यावी का? या गोष्टीवरून बरीच मतमतांतर आहेत. काही अभ्यासकांच्या अनुसार, लगेच चहा आणि कॉफी प्यायल्याने फिनोलिक कंपाऊंड तयार होते, जे तुमच्या शरीरातील लोह घटकाचे प्रमाण कमी करते.

ज्याने तुम्हाला अनेमिया, हातपाय गार पडणे, भूक कमी लागणे असे शरीराला हानिकारक आजार होतात.

तुम्हाला चहा प्यायची इच्छा झालीच तर तुम्ही ग्रीन टी, हर्बल टी, जिंजर टी असे योग्य पर्याय निवडू शकता. आणि अजून एक पर्याय म्हणजे साधारण तासाभराच्या अंतराने चहा कॉफी पिऊ शकता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

 

३. फळं खाणे बंद करा

 

stylecraze.com

 

साधारण एखादे फळ हे पोटभर जेवण झाल्यावर खाण्यापेक्षा रिकाम्या पोटी खाल्लेले कधीही चांगले असते. कारण त्यात असलेल्या पोषक घटकांचा तुम्हाला फायदा होतो.

जेवणानंतर फळं खाल्ल्याने पोटातील जागा व्यापली जाते. ज्यामुळे अपचन होणे, करपट ढेकर येणे असे तुम्हाला अस्वस्थ करणारे आजार होतात.

तुम्हाला जर फळं खायची असतील तर तुम्ही ती जेवणाआधी किंवा जेवणानंतर १ ते २ तासांच्या अंतराने खावीत.

 

४. सिगरेट ओढणे अत्यंत घातक

 

 

ही सवय तुम्ही नियमित सिगरेट ओढणार्‍या लोकांमध्ये बघू शकता. की बहुतांश वेळा अशी लोकं जेवणानंतर घराबाहेर जाऊन सिगरेट ओढून येतात. जे वैद्यकीय अभ्यासानुसार शरीराला अत्यंत घातक आहे.

असे केल्याने पचन क्रियेच्या वेळेस तुमच्या आतडयांवर मोठ्या प्रमाणात फरक पडतो. तसेच सिगरेट मध्ये निकोटीन या घटकाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ते रक्तात मिसळून शरीरातील कॅन्सरचे प्रमाण वाढते.

 

५. शॉवरने आंघोळ करणे सोडा

 

donusnaturalonlinestoreskincareproducts.com

 

तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण हो जेवणानंतर लगेच शॉवरने आंघोळ करणे आरोग्यासाठी चांगले नाही. जेव्हा आपण शॉवरने आंघोळ करतो तेव्हा आपला रक्तप्रवाह हात आणि पाय यांच्याकडे जास्त प्रमाणात जातो.

पचनक्रियेत जिथे खरी गरज आहे तिथे रक्तप्रवाह न गेल्यामुळे जेवाणातील पोषक घटक संपूर्ण शरीरात पोहोचत नाहीत. आणि मग अन्नपचन नीट न झाल्याने आपल्याला वेगळ्याच प्रकारचा अस्वस्थपणा जाणवतो.

 

६. जेवणानंतर लगेच झोपणे

 

indiatimes.com

 

जेवण झाल्यावर लगेच झोपायला जाण्याने गॅसेस तयार होणे, अर्धवट आणि वाईट झोप होणे किंवा उठल्यावर अस्वस्थ वाटणे अशी लक्षणे दिसू लागतात.

वैद्यकीय अभ्यासाप्रमाणे, अपचन होण्याचे मुख्य कारण हेच आहे की, तुम्ही झोपलेले असतांना अन्न पचनासाठी आवश्यक असलेले रस हे उलट दिशेने जातात. ज्याचा परिणाम तुमच्या पुढील दिवसावर आणि आरोग्यावर होतो. चरबी वाढते.

म्हणून जेवणानंतर लगेच झोपणे टाळा. २-३ तासांचे अंतर ठेवा.

 

७. बेल्ट सैल करू नका

 

medictips.com

 

काही लोकांची सवय असते, की ते प्रमाणाच्या पेक्षा जास्तच जेवतात. आणि मग जेवल्यानंतर पोट जड झाले आहे असे सांगून बेल्ट सैल करतात. जे अत्यंत चूकीचे आहे.

असे केल्याने पचन क्रियेवर त्याचा परिणाम होतो. त्याचप्रमाणे पचनाचे मुख्य काम करणारी आतडी एकमेकांत गुंततात, जे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

असे करण्यापेक्षा जेवण्याआधीच बेल्ट काढून ठेवा.

 

८. चालायला जाणे टाळा

 

welthuis.nl

 

जेव्हा तुम्ही पोटभर जेवण करता त्यानंतर लगेचच चालायला जाणे, उंच ठिकाणी चढउतार करणे हे टाळले पाहिजे. याने शरीरातील अॅसिडचे प्रमाण कमी जास्त होते आणि मोठ्या प्रमाणात अपचन होते.

त्यामुळे जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा व्यायाम जसे की जलद चालणे, धावणे यापैकी काही करायची इच्छा असेल तर जेवणानंतर तीस मिनिटांचे अंतर नक्की ठेवा.

 

९. दात घासणे अयोग्य आहे

 

irishmirror.ie

 

रात्री झोपतांना दात घासून झोपणे ही चांगली सवय आहे याबद्दल दुमत नाही. तरी देखील रात्रीच्या जेवणानंतर लगेच दात घासणे आरोग्यासाठी चांगले नाही. असे केल्याने, तुमच्या दातांवर परिणाम होतो.

तुमच्या दातांवर असलेला  थर असे केल्याने लगेच निघतो. आणि जर तुम्ही अॅसिडिक गोष्टी प्यायल्यावर किंवा गोड खाल्ल्यावर दात घासले तर ते जास्त धोकादायक आहे.

 

१०. कुठल्याही प्रकारचे वाहन चालवू नका

 

 

जेवल्यानंतर शरीराला जास्तीत जास्त रक्ताची गरज ही पचनक्रियेच्या ठिकाणी असते. आणि वाहन चालवतांना तुमचे लक्ष रस्त्यावर असल्यामुळे रक्तप्रवाह त्या भागात जास्त होतो. म्हणून तुम्हाला झोप येते.

झोपेत गाडी चालविणे अत्यंत धोकादायक आहे. म्हणून जेवल्यावर थोडा आराम करून गाडी चालवावी.

थोडक्यात काय, जेवण आणि अन्नपचन हे एकमेकांचे मित्र आहेत. यांच्यात भांडण झाले, कुठल्याही प्रकारचा बिघाड झाला की त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर लगेच होतो.

म्हणून अनेक आजारांना नकळतपणे तोंड द्यावे लागते. त्यामुळे वरील दहा गोष्टी जेवणानंतर करणे प्रकर्षाने टाळा. आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version