Site icon InMarathi

…..आणि ह्या कारणासाठी ट्विटर ने ‘अमूल’ कंपनीचं अकाऊंट केलं होतं ‘ब्लॉक’!

amul account ban inmarathi featured

lallantop.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

दूध,दही, पनीर, चीज, पासून कोणतंही डेअरी प्रॉडक्ट असो किंवा आइसक्रीम किंवा श्रीखंड सारखे गोड पदार्थ असोत, निदान आपल्या देशात तरी ह्या सगळ्यासाठी एकच ब्रॅंड प्रसिद्ध आहे तो म्हणजे अमूल!

आज तुम्ही घराच्या बाहेर पडलात आणि जवळच्या परिसरात एखादी चक्कर टाकली तर तिथं तुम्हाला अमूलची एक ब्रांच किंवा आइसक्रीम पार्लर हमखास दिसेल!

देशात बहुतेक सगळ्या कानकोपऱ्यात पोहोचलेला आणि फेमस झालेला ब्रॅंड कोणता असेल तर तो अमूलच!

ह्या सगळ्या पदार्थांची क्वालिटी आणि त्यांची सामान्य माणसाला परवडणारी किंमत याबाबतीत तर अमूल ला टक्कर देणारा एकही ब्रॅंड मार्केट मध्ये नाही!

अमूल.. टेस्ट ऑफ इंडिया, तीन शब्दांचा हा स्लोगनच अमूलची ख्याती सांगतो. गुजरातमध्ये आणंद येथील हा प्रकल्प.. धवलक्रांतीच घेऊन आला.

 

financialexpress.com

 

डॉ. वर्गीस कुरियन यांनी कायापालट केलेलं गाव म्हणजे आणंद. अमूलचं दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची चव, दर्जा यांनी आख्खा भारत पादाक्रांत केला आहे.

गुजरातमधील शेतकऱ्यांना दुधाची विक्री करायला हा सहकारी तत्त्वावर सुरू केलेला प्रकल्प देशव्यापी आहेच! संपूर्ण देशात अमूल उत्तम उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प सुरु झाला. अमूल्य म्हणजे ज्याचं काही मोल नाही असं त्याचा अपभ्रंश म्हणजे अमूल!

हा अमूल्य असा प्रकल्प गुजरात सहकारी दूध उत्पादक संघ सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली त्रिभुवनदास पटेल यांनी चालू केला.

डॉ.वर्गिस कुरीयन यांच्यासारख्या व्यापक दृष्टिकोन असलेल्या अतिशय तळमळीने काम करणाऱ्या माणसाला त्यांनी सोबत घेतलं. आणि त्यांनी ज्या योजना राबवल्या त्यांनी आणंदचं नांव ठळकपणे भारताच्या नकाशात कोरलं.

आणि अमूलनं विविध दूध आणि दुग्धजन्य पदार्थ बनवायला चालू केले. आज इतक्या वर्षांनंतरही अमूल आपला दर्जा टिकवून आहे.अमूलचं दूध, दही, पनीर, आईस्क्रीम हे सर्व पदार्थ अतिशय उत्तम दर्जाचे आहेत.

 

dailyreporter.com

 

पण आजकाल नुसतं उत्पादन चांगलं असून चालत नाही. त्याची जाहिरात पण तशीच करावी लागते. त्याकरिता वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती बनवल्या जातात.

वेगवेगळ्या ठिकाणी त्या प्रसिद्ध केल्या जातात. लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोपा मार्ग म्हणजे सोशल मिडिया. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यांनी हे काम अजूनच सोपं केलं आहे.

समाज माध्यमातून सगळेचजण हळूहळू लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील असतात.

वेगवेगळ्या जाहिराती लिहून जिंगल्स बनवून आकर्षक रितीने लोकांसमोर आपल्या उत्पादनांची प्रभावी मांडणी करायचा प्रत्येक उत्पादक प्रयत्न करत असतो.

फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्वीटर हे तर मानवी जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. तिथून आपण आपल्या जाहिराती पाठवू शकतो. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू शकतो.

अमूलनं याबाबत कायम आघाडी घेतली आहे. उत्पादनांचाच नव्हे तर जाहिरातींचा ही दर्जा उत्तम असतो.

थोडक्यात अमूल हा केवळ भारतातच नव्हे तर जगभरात एक ब्रँड म्हणून ओळखतात. पण तुम्हाला माहिती आहे का? सध्या अमूल वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे!

ट्विटरने अमूल चं भरतातले ऑफिशियल अकाऊंट काही काळासाठी बंद केले होते! अमूल गर्ल च्या नेहमीच्या खोचक शैलीतल्या एका फोटोमुळे अमूलचं अकाऊंट झालं होतं बंद!

 

tfipost.com

 

असं काय घडलं की ट्वीटरनं एवढ्या मोठ्या कंपनीच अकाऊंट ब्लाॅक केलं??

अमूल गर्लची जाहिरात बघा.. प्रसंगानुरूप असते. इतकी वर्षे उलटली पण अटर्ली बटर्ली डेलिशियस म्हणणारी अमूल गर्ल तशीच आहे.

कोणताही सण असो की उत्सव किंवा कोणतीही मॅच जिंकणं असो वा एखादा खास प्रसंग, ठिपक्या ठिपक्यांचा स्कर्ट घातलेली अमूल गर्ल त्यानुसार बोलत असते. लोकांनाही ते आवडतं.

पण यावेळी असं काय झालं की ट्विटरनं अमूलचं अकाऊंट तात्पुरतं ब्लाॅक केलं?

नुकतीच अमूलची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती पहा!

अमूल गर्लसमोर ड्रॅगन आला आहे. ती त्याला हाकलते आहे असं चित्र आहेच आणि त्याच्या मागं टिकटाॅकमधील अक्षरं दिसत आहेत. आणि नरेंद्र मोदी यांनी केलेली घोषणा आणि ठेवलेलं ब्रीद मेड इन इंडिया ठळकपणे दिसत आहेत.

 

scroll.in

 

एकंदरीत कोरोनाच्या मुळाशी कुठंतरी चीन आहे ही जागतिक भावना आहेच त्याशिवाय चीननं भारत चीन सीमारेषेवर घुसखोरीचा डाव आखून सैन्य तैनात केलं आहे.

सैनिक शहीद पण झाले आहेत ‌ भारत चीन दरम्यान असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे उमटलेले हे तणावजन्य प्रतिबिंब आहे. थोडक्यात चीनवर बहिष्कार टाका असंच हे चित्र सुचवत आहे.

या चित्राच्या प्रसारणानंतरच अमूलचं ट्विटर अकाऊंट ब्लाॅक केलं आहे. गुजरात सहकारी दूध विक्री संघाचे अध्यक्ष श्री सोनी यांनी याबाबत ट्विटरकडे विचारणा केली!

नेटीझन्सनी पण याबाबत ट्विटरकडे विचारणा केली आहे.म्हणजे आपल्या देशातील ध्येय धोरणांना जाहिराती मध्ये लिहीलं तर हे का ट्विटरच्या धोरणांना हरताळ फासतं का?

 

m.dailyhunt.in

 

अशी सरळ विचारणा नेटीझन्स करत आहेत. कुणी कुणी कोर्टात जायला लावू नका असंही सुनावलं आहे.

अखेर ह्या सगळ्या वादंगावरून ट्विटर ने नेहमीच त्यांचं सोशल मीडियाचं सच्यातले उत्तर दिलेच! त्यांच्या म्हणण्यानुसार,

ही अत्यंत सामान्य आणि रुटीन प्रोसेस आहे, ट्विटर अकाऊंटची सेफ्टीसाठी ही प्रोसेस कधी कधी फॉलो करायला लागते! आता तरी अमूलचे अकाऊंट पूर्ववत झालेले दिसते आहे!

ही प्रोसेस जरी सामान्य असली आणि ह्या गोष्टीवर विश्वास जरी ठेवला तरी नेमकं ह्याच पोस्ट नंतर अकाऊंट का ब्लॉक झालं असा देखील प्रश्न आपल्या मनात येतोच ना!

अगदी ह्या गोष्टीकडे योगायोग म्हणून काना-डोळा करणं सुद्धा योग्य नाही! जर आपल्या अभिव्यक्ति वर हे सोशल मीडियाचे मुख्य असा घाला घालत असतील तर ते अत्यंत चुकीचे आहे आणि आपण या विरोधात आवाज उठवायलाच पाहिजे!

 

twitter.com

 

आज ही गोष्ट अमूल सारख्या कंपनीच्या बाबतीत झाली आहे, उद्या आणखीन मोठ्या कंपनीच्या बाबतीत होईल!

सध्या तरी भारत चीन संबंध फारसे चांगली नाहीत. त्यामुळे कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनी अशी विचित्र पावलं उचलून लोकांच्या भावना आणखीन भडकवायचे काम करू नये!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version