Site icon InMarathi

चेंडू ते छोटासा पुतळा: यासाठी अंतराळवीर चंद्रावर सोडून आलेत या विचित्र गोष्टी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एकेकाळी चंद्र इतका दूर होता..तो फक्त कविता आणि गाण्यांमधूनच दिसायचा. कित्येक प्रेमिकांचा साक्षीदार म्हणून त्यालाच पाहीलं जायचं. ज्योतिषशास्त्रात त्याची स्वतःची वेगळी जागा मानली जाते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

माणसाच्या अंतराळातील प्रगतीचं सर्वात मोठं पाऊल होतं…चंद्रावर स्वारी! नील आर्मस्ट्राँग आणि एडविन एल्ड्रीन यांना अमेरिकेनं प्रथम चंद्रावर पाठवलं.

 

 

रशियाने पण लायका नावाची कुत्री पाठवली होती. भारतानंही राकेश शर्मा या अंतराळवीराला अवकाशात पाठवलं होतं. म्हणजे जो चंद्र पृथ्वीपासून कित्येक हजार योजने दूर होता तो किमान माणूस पाहून येऊ शकला हेच केवढं मोठं यश होतं.

कवि कल्पनेतील चंद्र हा वास्तविक दगड मातीनं भरलेला एक गोळा आहे जो प्रकाश देतो तो ही सूर्यापासून मिळालेला, हे विविध संशोधनांनी सिद्ध झाले आहे.

सर्वात मोठा प्रयोग म्हणून नासा ने अंतराळात झेप घेतली आणि चंद्रावरच माणसाला पाठवलं. या चंद्रावरील स्वारीने माणसाला ज्ञानाच्या नव्या क्षितीजावर नेऊन ठेवलं. विविध संशोधनांची मानवाच्या समोर ज्ञानाची, माहितीची वेगवेगळी कवाडं उघडली.

विविध नमुने गोळा करून चंद्राबद्दलची अजूनही नवी माहिती लोकांपर्यंत आणली. ती माहिती मिळवण्यासाठी चांद्रवीरांनी विविध प्रयोग केले. प्रयोगांचे पृथःकरण केले.

 

 

त्यासाठी त्यांनी जे जे केले ते अंतराळातील प्रगतीचं एक नवं परिमाण ठरलं. काय केलं त्यांनी???

अंतराळात माणसानं १९६९ ते १९७३ पर्यंत जितक्या स्वाऱ्या केल्या तितक्या वेळा तिथं काहीतरी टाकून आलेला आहे.

आता पृथ्वीवरच बघा… किल्ल्यांवर, जंगलात आणि  कुठं कुठं लोकं जातात आणि काही ना काही टाकून येतातच! मग तिथं कसा अपवाद असेल.‌

तिथंही अंतराळवीर काही ना काही टाकून आलेले आहेत. कुटुंबियांसोबतचा फोटो, गोल्फ खेळायचा चेंडू, शास्त्रीय उपकरणे, अमेरिकेचा राष्ट्रध्वज, नको असलेल्या काही वस्तू, एक छोटासा पुतळा…

हे सारं काही जे डझनभर अंतराळवीर चंद्रावर गेले होते त्यांनी टाकलं आहे. अशी ही मजेदार यादी प्रसिद्ध केली आहे, ती प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ बेन ओ’ लेरी यांनी.

 

 

आता या वस्तू टाकण्यामागं काहीतरी हेतू असणारच. असंच काही गंमत म्हणून त्या वस्तू टाकल्या नाहीत. त्यापैकी एक मुख्य कारण म्हणजे ओझं कमी करणे.

पृथ्वीवर परत येताना चंद्रावरील माती आणि खडकाचे नमुने त्यांनी सोबत घेतले होते. मग ते घेताना आपल्याकडील काही वस्तू टाकणं गरजेचं होतं कारण एका ठराविक वजनाचे वस्तूमानच अंतराळ यानात चालू शकतं.

दुसरं कारण होतं पुढील अभ्यासासाठी त्या वस्तूंचा वापर करता यावा.

अपोलो ११ या अंतराळयानाने सर्वप्रथम चंद्रावर स्वारी केली. नील आर्मस्ट्राँग आणि एडविन एल्ड्रीन यांनी चंद्रावर पाऊल टाकणारा पहिला मानव ही उपाधी मिळवली. ते बिरुद आजन्म त्यांच्या नांवासह राहीलं.

चंद्रावर उतरताना त्यांनी जे‌ लाँचपॅड वापरले ते तिथंच आहेत. त्याचबरोबर चंद्रावर होणारे भूकंप मोजण्यासाठी सेस्मोमीटर हे उपकरण त्यांनी तिथं जोडून ठेवलं होतं. त्याचबरोबर पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचं अंतर मोजण्यासाठी लावलेले रेट्रोरिफ्लेक्टर तिथंच आहेत.

काही काही वस्तू तर अगदी वेडगळपणानं टाकल्या असंही वाटतं. त्यातील एक म्हणजे गोल्फ खेळायचे ३ चेंडू. अपोलो १४ या यानातून गेलेला अॅलन शेपर्ड याने ते बाॅल टाकले आहेत. पण हा वेडगळपणा नाही.

अपोलो ११ ने एक सोनेरी ऑलिव्हची फांदी पण चंद्रावर ठेवली आहे.

 

 

चंद्रावर गुरुत्वाकर्षण नसतं, वातावरण नाही मग अशा ठिकाणी जर गोल्फ खेळायचे ठरवलं तर काय होईल? हे बघण्यासाठी टाकलेले ते चेंडू आहेत.

अपोलो १६ या चांद्रयानातून गेलेला अंतराळवीर चार्ली ड्युक याने आपल्या कुटुंबासह काढलेला फोटो प्लास्टीक पेपर मध्ये गुंडाळून चंद्रावर टाकला आहे.

 

 

पण नंतर ड्युक कुटुंबाचा फोटो कधीच चंद्रावर दिसला नाही कारण तिथं असणाऱ्या अतिनील किरणांमुळे तो फोटो धूसर झाला. या सर्व वस्तू काही अपोलो मोहीम राबविण्यात आली त्याचा भाग नव्हत्या.

अपोलो ११ ही मोहीम फत्ते करुन‌ आल्यानंतर नील आर्मस्ट्राँग आणि एडविन एल्ड्रीन यांना विचारले, की तुम्हाला चंद्रावर कसं वाटलं? त्यांनी सांगितलं,

त्यांना आठ मिनिटात, तिथं काहीतरी हवेत उडवून पहायचं होतं. त्यामुळे त्यांना गरजेच्या नसणाऱ्या गोष्टी त्यांनी तिथे उडवल्या.  जिथं ते उभे होते त्या भागाला शास्त्रज्ञांनी टाॅस झोन असं नांव दिलं.

तिथं पोचल्यावर त्यांनी अमेरिकेचा राष्ट्रध्वज तिथंच ठेवला. एक ट्यूबलाईट, कॅमेरा ज्यावर तो ऐतिहासिक क्षण बंदीस्त करण्यात आला होता, त्याचबरोबर चंद्रावरील माती, दगडाचे नमुने घेण्यासाठी जे स्कूप्स वापरले ते त्यांनी सोबत घेतले नाहीत.

कारण यानामध्ये त्यासाठीची जागा शिल्लकच नव्हती. सुरक्षित प्रवासासाठी जेवढं वजन आवश्यक होतं तेवढं त्या दगड मातीच्या नमुन्यांनी भरुन गेलं. मग तो राष्ट्रध्वज, स्कूप्स घेणं‌ केवळ अशक्य होतं.

 

हे ही वाचा – मृत अंतराळवीराच्या मृतदेहाचं जे केलं जाऊ शकतं, ते सामान्य व्यक्तींना सुचणारही नाही!

यानंतर जे काही सापडलेलं होतं ते निव्वळ मानवी शरीरातील टाकाऊ पदार्थ होते. चंद्रावर चार मानवी मूत्राचे नमुने आणि उलटीच्या पिशव्या सापडल्या. त्याचसोबत सापडलेल्या त्या मानवी विष्ठेच्या पिशव्या..

याचा उपयोग करून मानवी जीवन चंद्रावर कसे होऊ शकेल याचा अभ्यास शास्त्रज्ञांना करणे शक्य व्हावे हा पण एक उद्देश होताच त्यात, पण तरीही शास्त्रज्ञांना त्या सर्वांचा अभ्यास करणं शक्य झालं नाही.

मध्यंतरी रशिया आणि अमेरिका यांच्यात शीतयुद्ध सुरू होते त्यामुळे थोडाफार परिणाम या मोहीमा आणि संशोधनावर ही झाला. पण शेवटी ज्ञानाला कसल्याही चौकटीत बंदिस्त करता येत नाही.

त्यावेळी या अंतराळवीरांनी ज्या ज्या वस्तू, गोष्टी तिथं टाकल्या त्याचा उपयोग या पिढीतील संशोधकांना नक्की झाला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version