Site icon InMarathi

प्रत्येकाचं बालपण वेगवान करणाऱ्या “अॅटलास” सायकल कंपनीला लागणार ‘ब्रेक’!

atlas cycles shut down inmarathi

theprint.in

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

टू व्हीलर किंवा फोर व्हीलर मिळायच्या आधी जवळपास सगळ्यांनाच लहानपणी सायकल ही दिलीच जाते. दिली जाते म्हणण्यापेक्षा हट्टाने ती मागून घेतली जाते.

लहानपणी च्या बकेटलिस्ट मधली टॉप प्रायोरिटी ची गोष्ट म्हणजे सायकल!

आज जस मोबाइल घ्यायचं म्हणजे ५६ प्रकारचे ब्रँड आणि त्यांचे मॉडेल. तसं सायकलच्या बाबतीत कमी होत.

एक तर हिरो किंवा एटलास!

हिरो म्हणजे देशातली सगळ्यात जास्त सायकल उत्पादन करणारी कंपनी तर त्याच्या खालोखाल ऍटलास.

 

sightsinplus.com

 

जगाच्या एकूण सायकल उत्पादन पैकी १०% उत्पादन हे भारतात होत. ज्याचा आकडा जवळपास वर्षाकाठी १२.५ करोड सायकल एवढे आहे.

त्यात ४०% उत्पादन हे एकटी हिरो सायकल घेते तर त्याच्या खालोखाल १७% उत्पादन हे ऍटलास सायकल कंपनी घेते.

एक स्पेसिफिक कस्टमर डोळ्यासमोर ठेऊन ऍटलास प्रोडक्शन घेते तर हिरो ब्रॉड कस्टमर डोळ्यासमोर ठेऊन प्रोडक्शन घेते. त्यामुळे आकडेवारी मध्ये एवढी तफावत!

३ जून, यूएन अर्थात संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केलेला विश्व सायकल दिवस. हाच दिवस भारताच्या सायकल निर्मिती इंडस्ट्रीचा काळा दिवस म्हणायला हरकत नाही.

देशातली दुसरी सगळ्यात मोठी सायकल निर्माण करणारी कंपनी ऍटलास सायकल हिने देशातलं शेवटचा साहिबबाद इथला प्लांट बंद केला.

एका छोट्याशा वर्कशॉप मध्ये १९५१ मध्ये सुरवात झालेली ही कंपनी ग्रीक देवता ऍटलास हिच्या नावाने अल्पवधितच लोकांच्या पसंतीस उतरली.

एवढी प्रसिद्ध झाली की १९८२ साली भारतात आयोजित केल्या गेलेल्या आशियायी खेळामध्ये ऍटलास सायकल ही अधिकृत सायकल सप्लाय करणारी सप्लायर कंपनी होती.

यशाची सर्व शिखरे सर करून आज ही कंपनी बंद पडायच्या मार्गावर आली हे पाहून शेअर मार्केट पासून सामान्य सायकल प्रेमीं पर्यंत हडकंप उडाला आहे.

 

thenewsminute.com

 

जस प्रवास करताना गंतव्य स्थान येईपर्यंत रस्त्याचा शेवट हा नसतो तसाच हा शेवट नसल्याचा कंपनीने आवर्जून सांगितले.

ऑपरेशनल फंड जमा करण्यासाठी कंपनीच्या मालकीच्या जमिनीचा काही भाग विक्रीसाठी खुला करण्याची परवानगी कंपनी प्रशासनने मागितली असल्याचे कळते.

कंपनीच्या प्रवक्त्यानी सांगितल्या प्रमाणे १८ जून रोजी एनसीएलटी या मागणी वर विचार करून जमीन विकायला परवानगी देईल.

जर का मागणी मंजूर झाली तर ऍटलास कंपनी जवळपास ५० कोटी रुपयांपर्यंत भांडवल पुन्हा उभं करू शकेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

भांडवल उभं करण्यासाठी यापूर्वी अशी परवानगी का घेतली गेली नाही आणि शेवटचा कार्यरत असलेला साहिबाबाद येथील प्लांट चालू ठेवण्यासाठी कंपनीने बंद पडलेल्या आधीच्या युनिटची जमीन विक्री का केली नाही याबाबत अजून कंपनीने मौन सोडलेले नाही.

परंतु कंपनीच्या रेकॉर्डनुसार एटलास सायकल ही २०१४ पासून तोट्यात होती.आणि नफा एवढा घटला होता की सायकल निर्मितीसाठी लागणारे रॉ मटेरियल घेण्याइतपत सुद्धा पैसा कंपनीकडे नव्हता.

साहिबाबाद प्लांट जो वर्षाला ४० लाख सायकल निर्माण करायचा तो त्याच्या पूर्ण क्षमतेच्या ५०% सुद्धा उत्पादन घेण्यास असमर्थ होता.

एखादी कंपनी अथवा उत्पादन करणारा प्लांट बंद होतो तेव्हा त्याचा सगळ्यात जास्त फटका हा तिथे काम करणाऱ्या कामगार वर्गावर जास्त होतो.

 

newindianexpress.com

 

साहिबाबाद इथला प्लांट बंद झाल्यामुळे कामगार वर्गात एकच उदासीनता निर्माण झाली आहे.

एटलास कंपनीच्या या शटडाऊन मुळे जवळपास ७०० कामगारांवर थेट फरक पडणार आहे.

एटलास कंपनीने यापूर्वी २०१४ आणि २०१८ मध्ये आपले दोन युनिट बंद केले होते. डिसेंबर २०१४ साली मध्य प्रदेश मधला मालनपूर येथील तर २०१८ मध्ये हरियाणा मधील सोनिपत येथील युनिट.

सोनिपत, हरियाणा येथे ऍटलासच्या सुसज्ज प्लांटचा पाया घालून जानकी दास कपूर यांनी सायकल निर्मितीची सुरवात केली होती.

वर्षाला १२००० सायकलचं विक्रमी उत्पादन या प्लांट मधून घेऊन त्यांनी सायकल ब्रँड म्हणून देश विदेशात एटलास ला ओळख मिळवून दिली.

 

nationalheraldindia.com

 

प्लांट बंद करण्याच्या मुद्द्यावर विस्तृत माहिती घेतल्यावर काही गोष्टी या उघड झाल्या.

आतील लोकांचा असा दावा आहे की शेजारच्या देशांमध्ये देखील भारतीय सायकलींची निर्यात कमी झाली. तसेच भारतात आता बाहेरून स्पेअर पार्टस मागून देशात सायकल असेंम्बली करायचा उद्योग सुरू झाला आहे.

असे असताना बांगलादेश आणि श्रीलंका कडून कमी किमतीत स्पेअर आयात झाल्याने भारतीय बाजारपेठ त्याने भरून गेली.आणि एटलास सारख्या जुन्या खेळाडूला या खेळात मार खावा लागत आहे.

आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्राने २०१९ साली जारी केलेल्या अहवालात म्हटले गेले आहे,

२०११ साली बांगलादेश मधून जवळवस २.५ करोड डॉलरचे स्पेअर पार्ट भारतात आयात केले गेले. तीच २०१८ साली साडे सहा करोड डॉलर एवढी झाली.

तेच श्रीलंके मधून २०११ साली १.९५ करोड डॉलर वरून २०१८ साली ३.२३ करोड डॉलर एवढे आहे. यावरून भारतात मोठ्या प्रमाणात आयात होणाऱ्या सायकल च्या स्पेअर पार्टस बद्दल आयडिया येईल.

 

yourstory.com

 

या स्वस्त स्पेअर पार्ट बद्दल अधिक जाणून घेतल्यावर कळून आलं की बांगलादेश आणि श्रीलंका हे दक्षिण आशियायी मुक्त व्यापार कराराचा (SAFTA) फायदा घेत असल्याचे दिसून आले.

या करारानुसार बांगलादेश आणि श्रीलंका या देशातून येणाऱ्या मालावर ड्युटी चार्जेस हा शून्य आहे.

इनडायरेक्टली भारतीय बाजरात त्यांना ड्युटी फ्री प्रवेश मिळाला आहे त्याचा ते पुरेपूर फायदा घेत आहेत.

त्याच्या विरुद्ध चित्र हे बांगलादेश आणि श्रीलंका येथील ड्युटी बद्दल आहे. बांगलादेश ही २५% तर श्रीलंका ही ३०% इम्पोर्ट ड्युटी आकारते.

यामुळे त्यांचे लोकल सायकल निर्माते सेफ राहून परदेशी कंपन्यांना त्यांच्या बाजारात टिकून राहणे अवघड झाले आहे.

एकंदरीत भारतात सायकल निर्मितीचा व्यवसाय डबघाईला का आलं हे कळलं असेल. वेंडर सोबत चर्चा केली असता त्यांचं म्हणणं आहे,

जी अवस्था आज ऍटलास ची आहे तीच उद्या अँवोन ची असेल आणि परवा हिरोची.

 

gaadi.com

 

चायनीज सायकली पण हळूहळू भारतीय बाजारात आपले हातपाय पसरवायला सुरवात केली आहे. विशेष म्हणजे इलेक्ट्रिक सायकल.

एकूणच सगळी परिस्थिती पाहता ऍटलास कंपनी ला भांडवल उभं करायला एनसीएलटीने परवानगी देऊन भारताचं आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव काढणाऱ्या कंपनीला डबघाईला जाण्यापासून वाचवाव!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version