Site icon InMarathi

सुशांतसिंगच्या हसऱ्या चेहऱ्यामगे लपलेलं ‘हे’ दुःख त्याने कोणालाच दिसू दिलं नाही..

Sushant Singh Rajput im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

छिछोरे या सिनेमात सुशांत सिंह राजपूत मुलांना आत्महत्या का करायची नाही हे सांगतो. ‘कोणत्याही समस्येवर आत्महत्या हा पर्याय नसून आपण लढलं पाहिजे आणि जगलं पाहिजे’, असं तो सांगतो.

आत्महत्या विषयक जनजागृती करणारा सिनेमा म्हणून छिचोरेकडे पाहता येईल. पण याचाच विपर्यास करणारी बातमी मागच्या वर्षी १४ जून च्या दुपारी आली.

सुशांतसिंह राजपूत ने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. ही बातमी टीव्हीवर झळकली आणि मनात विचारांचे काहूर सुरू झाले होते.

अत्यंत धक्कादायक ही बातमी आहे.

 

 

स्वतःच्या हिमतीवर स्ट्रगल करून बॉलिवूडमध्ये स्वतःचे नाव, ब्रँड निर्माण करणारा हा कलाकार. अचानक असे काय घडले असेल की त्याला आत्महत्येचे पाऊल उचलावं लागलं!

इतका टोकाचा निर्णय त्याने का घेतला असेल?

टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेपासून त्याचं रुपेरी दुनियेशी नातं जडल होत. त्यानंतर त्याने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होत.

खरंतर तो मूळचा इंजिनियर. परंतु नाटक सिनेमाच्या वेडातून तो इकडे आला होता.

इथे आल्यानंतर होणारा संघर्ष, काम मिळवण्यासाठी केलेली मेहनत, त्याच बरोबर भूमिकेत एकरूप होण्यासाठी केलेला अभ्यास, या सगळ्यांनीच त्याने आपला एक ठसा चित्रपटसृष्टीवर उमटवला होता.

मुंबईत आल्यावर त्याने नादिरा बब्बर यांच्या एकजूट थिएटर कंपनी जॉईन केली. तिथूनच त्याने टीव्ही इंडस्ट्रीत प्रवेश केला.

प्रख्यात बालाजी टेलिफिल्मच्या पवित्र रिश्तासारख्या लोकप्रिय सिरीयल मध्ये काम केलं होत. पहिली सिरीयल असूनही त्याचा सहज सुंदर वावर यामुळे तो लगेचच लोकप्रिय झाला होता.

 

 

त्या सिरीयल साठी लोक वाट पाहायचे. सिनेमात काम करण्यासाठी त्याने ती सीरियल मध्येच सोडली परंतु नंतर आलेल्या मानवला लोकांनी स्वीकारला नाही इतका तो लोकांच्या आवडीचा झाला होता.

त्यानंतर त्याने फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला तिथेही त्याने यशाचे शिखर गाठले.

आज-काल फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश सहज होत नाही प्रचंड स्पर्धा तिकडेही आहे तरीही त्यात स्वतःचे स्थान निर्माण करणे कठीण गोष्ट परंतु सुशांत सिंह ने स्वतःच्या मेहनतीच्या बळावर तेही साध्य केलं.

अनेक विविध प्रकारच्या भूमिका खरतर त्याने आपल्या करियरमध्ये केलेल्या आहेत.

अभिषेक कपूरच्या ‘काय पो छे’ असेल किंवा राजकुमार हिरानी यांचा ‘पि के’ असेल सुशांत सिंह सगळीकडेच मनापासून काम करायचा.

 

===

हे ही वाचा – प्रचंड गरिबीशी झगडून अनाथांचा मसीहा बनलेल्या बॉलिवूडच्या ‘बिंदास भिडू’चा प्रवास!

===

त्याने केलेला ‘ब्योमकेश बक्षी’ हा देखील सिनेमा सगळ्यांना आठवत असेल. त्यासाठी देखील त्याने अनेक रिहर्सल्स केल्या, वर्कशॉप्स केली, नोट्स काढल्या. आणि त्या काळातला फिल येण्यासाठीच्या सगळ्या गोष्टी केल्या. कुठलंही कॅरेक्टर जीव ओतून उभ करायचं काम सुशांत सिंह छान करायचा.

शुद्ध देसी रोमान्स, केदारनाथ, ड्राईव्ह, सोनचिरिया हे त्याचे वेगळेपण असलेले सिनेमे. इतक्‍या कमी वयात इतके वेगवेगळे विषय हाताळून सिनेमातून त्याने ते कॅरेक्टर उभं केलं.

त्याला त्याच्या जीवनातील सगळ्यात महत्वाची फिल्म करायला मिळाली होती ती म्हणजे एम.एस धोनी: द अनओल्ड स्टोरी’.

भारताच्या यशस्वी क्रिकेटपटूचा प्रवास आणि संघर्ष त्याला त्या सिनेमात दाखवायचा होता. सुशांतने त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. एम एस धोनी हा त्याच्या चित्रपट सृष्टीतील जीवनातील एक मैलाचा दगड ठरला.

म्हणजे सुशांत सिंह शिवाय एम एस धोनी हा सिनेमा आठवूचं शकत नाही. इतका तो धोनी इतकाच लोकांच्या लक्षात राहिला. धोनीचा हेलिकॉप्टर शॉटही सुशांतने सिनेमात मारला आणि तो तसा वाटलाही.

 

 

धोनी सिनेमाचे यश त्यातच आहे. धोनीचं कॅरेक्टर त्याने सिनेमात करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. क्रिकेटमधले बारकावे शिकला. त्यासाठी त्याला जे ट्रेनिंग मिळालं त्यानंतर सुशांत सिंह म्हणाला होता की,

” स्पोर्ट्समनच्या ट्रेनिंग मुळे आता कामावरचा माझा फोकस क्लिअर झाला आहे. आता एक शिस्त माझ्या स्वतःच्या ही आयुष्यात आली आहे. माणूस म्हणून एक समृद्ध व्यक्तिमत्त्व कसं असावं हे मी शिकलो आहे!”

….सुशांत इतकं सगळं शिकूनही शेवटी तू जीवनापासून का लांब गेलास?

वेगवेगळे सिनेमे सुशांतने दिले. त्याला त्यासाठी अवॉर्ड देखील मिळालेलं आहे. परंतु अलीकडचे काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर यश मिळू शकले नाहीत परंतु त्याचा अर्थ असा नव्हता की त्याचं काम वाईट होतं.

परंतु सिनेमासृष्टीत हे घडत असतं.मागच्या वर्षी या बातम्या येत होत्या की सुशांत सिंह सध्या डिप्रेशन मध्ये आहे, निराश आहे.

अगदी त्याच्यावर आता उपचार सुरू आहेत. त्याला एकटं सोडलं जात नाही. नेहमी त्याच्याबरोबर कोणी ना कोणी असतं.

वाटलं होतं की आयुष्यात अनेक फेजेस येत असतात, त्यापैकीच सुशांतची ही एक असेल यातून तो नक्कीच बाहेर येईल.

 

 

त्याची आधीची मॅनेजर दिशा सलियनने आत्महत्या केली तेव्हादेखील त्याने एक पोस्ट शेअर केली होती. धक्कादायक आणि दुःखी असं त्याने त्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

तिच्या कुटुंबीयांच सांत्वनही केलं होतं. त्याने जाण्याच्या आधी इंस्टाग्राम वर आपल्या आईसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. ज्यात आईच्या फोटो शेजारी त्याचा फोटो होता.

“डोळ्यातल्या पाण्यामुळे धूसर दिसत असलेला भूतकाळ, अंतहीन स्वप्ने आणि क्षणभन्गुर आयुष्य आम्ही दोघेच वाटाघाटी करीत आहोत…..माँ”

आशा अर्थाची त्यांने एक कविता त्याने केली होती.

 

 

 

सुशांत तुझं हे वय नव्हतं जायचं. आता तर सुरुवात होती. अजून खूप काही तुला करायचं होतं आणि आम्हाला तुला ते करताना पाहायचं होतं. चुकलास मित्रा! जीवन संपवण इतकं सोपं असतं का रे!!

===

हे ही वाचा – बॉलिवूडचे ‘शो मॅन’ ठरलेले सुभाष घई रातोरात कुठे गायब झाले… ते आता करतात काय?

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version