Site icon InMarathi

दातांच्या भयंकर व्याधींपासून दूर राहण्यासाठी ह्या ५ गोष्टी  तुम्हाला माहीत असायलाच हव्यात!

teeth care featured inmarathi

visualsstock.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

स्मितहास्य ही माणसाला मिळालेली एक दैवी देणगी आहे. ज्याच्या चेहेर्यावर हास्य असते तो चेहेरा नेहेमीच आकर्षक दिसतो. त्यातही दात जर मोत्यांसारखे असतील तर..?

कुंदकळ्यांसारखे दात असल्यावर ते स्मितहास्य अजूनच आकर्षक वाटते. दातांचे आरोग्य आणि स्मितहास्य ह्यांचा परस्पर संबंध आहे.

तसेच ‘हेल्दी’ राहण्यासाठी आपण ‘डाएट फूड’ घेतो, काही जणं खाण्याचे शौकिन असतात. निरनिराळे पदार्थ खायला आवडतं त्यांना! पण समजा, जर दात निरोगी नसतील तर?

आपले आवडते पदार्थ आपण खाऊ शकू का? आपण मस्तपैकी ‘स्माईल’ करू शकू का?

 

bestmediainfo.com

 

काही जणांना हिरड्यातून रक्त येणे, दातदुखी अशा समस्यांना तोंड द्यावं लागतं.

काही जणांना कडक वस्तू खाता येत नाहित. काहींना एकदम गरम किंवा खूप थंड वस्तू खाल्ल्यानंतर दातांतून सणक येते, दातातून झिणझिण्या येतात.

काहींच्या हिरड्यांना सूज येते. अशा दातांशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा समस्यांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. मग त्यासाठी काय करायचं?

आपण आपल्या दातांची योग्य काळजी घ्यायला हवी हे आपल्याला माहितेय, पण कशी? आज काल जाहिरातींमध्ये निरनिराळ्या ‘टूथपेस्टस्’ च्या जाहिराती येतात.

त्यामुळे मनातला गोंधळ अजून वाढतो. आपल्यातल्या काही जणांना ह्या गोंधळातून योग्य तो मार्ग मिळतो. काही जण त्यासाठी दंतवैद्य् किंवा ‘डेंटिस्ट’ कडे जातात.

 

livemint.com

 

त्यासाठी महागड्या ट्रीटमेंटस् घेतात. पण, सगळ्यांना ते परवडतं का? आणि ज्यांना ते परवडत नाही ते जाहिराती ‘फॉलो’ करतात. तेव्हढं पुरेसं आहे का? काय करायचं आपल्या दातांची निगा राखण्यासाठी?

आज आपण ह्या लेखातून दातांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची ते पाहूया!

१. काही काही जणांना खूप जोरजोरात दात घासायची सवय असते. एका संशोधनात असे आढळून आले आहे की, ब्रश करताना दिवसभरातल्या कामांची उजळणी करण्याची बऱ्याच जणांना सवय असते.

महत्त्वाची मीटिंग, ऑफिस मधली महत्त्वाची कामे इत्यादी गोष्टींचे विचार सुरू असतात. त्यामुळे नकळत त्यांची दात घासण्याची क्रिया जलद होते.

पण, त्यामुळे हिरड्यांतून रक्त येणे, हिरड्या कमजोर होणे ह्यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

म्हणूनच, दात घासताना कोणतेही अतिरिक्त विचार मनात आणू नये आणि अगदी हळूवारपणे दात, योग्य तितक्या वेगाने, टूथब्रश वर योग्य तितका भार देऊनच दात घासावेत.

 

timesofindia.indiatimes.com

 

२.आपल्या आहारावर देखील आपल्या दातांचे आरोग्य अवलंबून असते. धूम्रपान, मद्यपान, अती थंड, अती गरम, तिखटजाळ, मसालेदार, अती आंबट इत्यादी पदार्थांच्या अती सेवनाने दात, हिरड्यांवर विपरित परिणाम होतात.

कच्ची फळे खावीत पण विकतचा फळांचा रस सेवन करणे टाळावे, त्यामध्ये जे ग्लुकोज असते ते दातांसाठी, हिरड्यांसाठी हानीकारक असते, त्यामुळे शक्यतो घरी केलेला, ताजा फळांचा रस पिणे केव्हाही चांगलेच!

चॉकलेट सारखे दातांना चिकटणारे पदार्थ सेवन केल्यानंतर व्यवस्थित चूळ भरावी किंवा दात घासावेत. जंक फूड, फास्ट फूड, चहा, कॉफी ह्यांचे अती सेवन टाळावे.

ह्या पदार्थांच्या अती सेवनाने दात पिवळे होणे, दातांमध्ये फटी पडणे, डाग पडणे किंवा हिरड्या कमजोर होणे ह्यांसारखे गंभीर विकार होतात.

 

graceadams.com

 

३.आपल्याला माहित आहे का? आपल्यातील बहुतेक जणांना टूथपेस्टची ऍलर्जी असू शकते. हे ऐकायला थोडे विचित्र वाटेल कारण, बऱ्याच जणांना टूथपेस्टची ऍलर्जी असते हेच माहित नसते.

दात घासून झाल्यावर ओठ, गालांचा तोंडातील भाग ह्यांची जळजळ होणे, आतील भागात छोटे छोटे व्रण येणे ह्या गोष्टींना बऱ्याच जणांना सामोरे जावे लागते. पण, हे कशामुळे होते हेच त्यांना ठाऊक नसते.

त्यांना टूथपेस्टची ऍलर्जी असू शकते. कारण काही काही टूथपेस्टमध्ये हानीकारक रसायने, रासायनिक पदार्थांचा समावेश असतो जे आपल्या हिरड्यांना आणि तोंडाच्या आतील त्वचेसाठी हानीकारक असतात.

त्यामुळे आता ब्रश केल्यानंतर लक्ष द्या, जर ओठांची, गालांची जळजळ झाली तर रासायनिक टूथपेस्ट बदलून नैसर्गिक टूथपेस्ट वापरण्याची वेळ आहे.

 

health.com

 

४. हार्मोनल चेंजेस् हा देखील दातांच्या आरोग्यावर विपरित परिणाम करणारा महत्त्वाचा घटक असतो. विशेषतः स्त्रियांना ह्या समस्येला जास्त करून सामोरे जावे लागते.

कारण मासिक पाळी, रजोनिवृत्ती, प्रसूती आणि गर्भधारणा ह्या सगळ्या अवस्थांमध्ये स्त्रियांना हार्मोनल चढ उतारांना तोंड द्यावे लागते.

अशा वेळी हिरड्यांची निगा राखणे गरजेचे असाते कारण, ह्या दिवसांमध्ये इतर अवयवांप्रमाणेच दात आणि हिरड्य़ा देखील ह्यावेळी नाजूक झालेले असतात.

स्त्रियांना ह्या दिवसांमध्ये हिरड्यांना सूज येणे, हिरड्यांतून रक्त येणे, दात दुखणे, दातातून झिणझिण्या येणे ह्यासारख्या समस्यांना मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावे लागते, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण त्याचा तब्येतीवर देखील विपरित परिणाम होतो.

त्यामुळे अशा वेळी ‘डेंटिस्ट’ चा सल्ला जरूर घ्यावा.

५. आपल्या दातांची आपण घरीच निगा राखू शकतो.

लवंग तेल, नैसर्गिक टूथपेस्ट, हलक्या हाताने, योग्य तेव्हढाच दाब देऊन ब्रश करणे ह्या गोष्टी शिवाय घरचे अन्न सेवन करणे, अपायकारक पदार्थांचे सेवन टाळणे किंवा त्यांचे कमीत कमी प्रमाणात सेवन करणे ह्या गोष्टी आपल्या हातात असतात.

पण तरीही काही समस्या उद्भवल्यास काही जणं डेंटिस्ट कडे जाणे टाळतात. काही काही जणांना ते कमीपणाचे वाटते, काही जणांना ते लाजिरवाणे वाटते, संकोच वाटतो.

 

burienfamilydentalcare.com

 

पण, आपल्या आरोग्यासाठी आपल्याला हे करणे भागच असते, त्यामुळे मनामध्ये काहीही किंतु न बाळगता, कमीपणा वाटू न देता आपल्या दातांसंबंधी घरी निवारण न करता येणारी समस्या उद्भवल्यास निःसंकोच पणे डेंटिस्ट कडे जावे.

आपले दात, आपल्या हिरड्या ह्यांच्या निरोगी पणाचा आपल्या शारीरिक निरोगी पणाशी संबंध असतो. त्यामुळे आपल्या दातांच्या आरोग्याची आपण सर्वतोपरी निगा राखणे गरजेचे असते.

===

सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. InMarathi.com च्या वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून ,डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version