आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
किडनी स्टोन. हा अचानक उद्भवणारा रोग. सर्वसाधारणपणे कोणताही रोग कोणालाही होऊ शकतो. स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत, लहान थोर हा कसलाही भेद आजारपण करत नाही.
ज्यांनी किडनी स्टोनच्या आजाराला तोंड दिलं आहे ते त्याचा काय आणि किती त्रास होतो ते सांगू शकतात.
एकाएकी कमरेकडून ओटीपोटात सरकणाऱ्या कळा, त्यानंतर येणारी कणकण, लघवीला न होणं किंवा लघवीला प्रचंड वेदना होणं हे केवळ ज्याने किडनी स्टोनचा आजार अनुभवला आहे तोच समजू शकेल.
त्या कळांची तुलना अगदी लेबर पेन्स बरोबरच केली जाते. हा पुन्हा पुन्हा होऊ शकतो. तो होऊ नये म्हणून होमिओपॅथी, आयुर्वेद या सर्वांनी वेगवेगळ्या उपचार पद्धती सांगितल्या आहेत.
पण तुम्हाला अजूनही काही पदार्थ, किंवा आहारात समावेश असणारी फळं, फळभाज्या आहेत ज्यांच्या सेवनाने किडनी स्टोनचा त्रास होतो असं सांगितलं जातं?
कितीतरी फळभाज्या- पालेभाज्या आहेत, ज्यात किडनी स्टोनचा त्रास वाढायला कारणीभूत असणारे घटक असतात असं सांगितलं जातं. आठवून बघा बरं.. कोणती नावं सांगितली जातात??
हो…टोमॅटो… लालचुटुक रंगाचे टोमॅटो आंबट -गोड चवीमुळे स्वयंपाकघरात सर्रास वापरले जातात. त्यात असलेल्या अँटी आॅक्सिडंट, जीवनसत्त्व आणि उत्तम पोषणमूल्य यामुळे भारतीय पदार्थ हे सर्रास टोमॅटो वापरून केले जातात.
भेळेत, मसालापुरीत किंवा इतरही कितीतरी पदार्थांमध्ये टोमॅटो शिवाय चव येणं अशक्य असतं. कोशिंबीर, सूप, साॅस यांनी तर आपली रसना तृप्त केली आहे.
ब्रेडला लावायला, पास्ता, मॅगी, पिझ्झा यांचे टाॅपिंग्ज म्हणून टोमॅटो सॉस सर्रास वापरलं जातं. त्यांची आंबटगोड चव मन खुश करते. ढोकळा, कचोरी यांच्यासोबत तर मुद्दाम पिकलेल्या टोमॅटोची चटणी देतात.
थोडक्यात सांगायचं तर, टोमॅटो आजकाल आपल्या जेवणखाणातील एक अविभाज्य घटक झाला आहे.
तसा टोमॅटो अल्पमोली आहे. अगदी गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांना परवडणारी फळभाजी आहे ही. त्यात असलेल्या ’क’ जीवनसत्त्वाने आपल्या आहारातील कितीतरी पोषक घटक पुरवले आहेत.
त्यातील फायबर्स, पोटॅशियम यांची मात्रा आपल्याला आरोग्यदायी आहेच. दृष्टी चांगली रहावी यासाठी टोमॅटो फार उपयोगी आहे. मधुमेहावर गुणकारी, प्रोटेस्ट कॅन्सरवर गुणकारी असे विविध फायदे असलेली ही फळभाजी!!!
पण कितीतरी वेळा असं ऐकायला मिळतं की ज्यांना किडनी स्टोनचा आजार आहे त्यांनी टोमॅटो खाऊ नयेत. कारण टोमॅटो मधील बियांमुळे किडनी स्टोनचा त्रास बळावतो किंवा किडनी स्टोन होण्यास सुरुवात होते. तथ्य आहे का यामध्ये?
आधी आपण किडनी स्टोन काय असतो हे पाहूया-
किडनीमध्ये होणारे क्षारांचे एकत्रिकरण व त्याने होणारा खडा म्हणजे किडनी स्टोन. तो का आणि कसा तयार होतो?
===
हे ही वाचा – हिमोग्लोबीन वाढविण्यासाठी हे घरगुती खाद्यपदार्थ १०० % टक्के उपयोगी पडतील
===
किडनी स्टोनचे विविध प्रकार आहेत. त्यातील एक सर्वसाधारणपणे एक प्रकार सार्वत्रिक आहे तो म्हणजे कॅल्शियम आॅक्सलेट स्टोन. कॅल्शिअम आॅक्सलेट हे बऱ्याचशा पालेभाज्या आणि फळभाज्या मध्ये असतेच. त्यांच्या सेवनाने ते शरीरात जाते.
मानवी यकृत दिवसभरात ठराविक प्रमाणात कॅल्शियम तयार करते. आपली हाडे आणि स्नायूंना कॅल्शियमची गरज भासतेच.
अन्नपचन झाल्यानंतर त्यातील पोषक द्रव्यांचे विघटन करुन शरीर त्याला हवे असलेले घटक काढून घेते व नको असलेले घटक घाम, मल, मूत्र यांच्या रुपाने बाहेर फेकून देते. ही घटक द्रव्ये किडनीकडे पाठवली जातात. त्यांना लघवीच्या रुपात आपले शरीर बाहेर फेकून देते.
अनावश्यक कॅल्शियम पण मूत्राच्या रुपात बाहेर फेकले जाते. पण कधीकधी माणसाची किडनी हे जास्तीचे कॅल्शियम बाहेर टाकण्यास सक्षम नसते. मग ते कॅल्शियम हळूहळू एके ठिकाणी साठू लागते व त्याला खड्यासारखा आकार येतो. हाच तो किडनी स्टोन!!!
ज्या फळभाज्यांमध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात असते तर यातील एक नाव आहे टोमॅटो!!!
टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात आॅक्सलेट असते आणि यांच्या सेवनाने किडनी स्टोन होण्याचा संभव जास्त असतो असं सांगितलं जातं, पण यात किती तथ्य आहे?
१०० ग्रॅम टोमॅटो फक्त ५ ग्रॅम आॅक्सलेटची निर्मिती करतात. किडनी स्टोन या गोष्टीमुळे होतो असे नाही. तुम्ही निरोगी असाल आणि किडनीचा कोणताही त्रास तुम्हाला नसेल तर तुम्ही योग्य प्रमाणात टोमॅटो खाऊ शकता.
डाॅ. राजीव सूद हे प्रसिद्ध मूत्ररोगतज्ज्ञ आहेत. त्यांच्या मते, टोमॅटो मध्ये असलेलं विशिष्ट जीवनसत्त्व आणि आॅक्सिडंट हे लायपोन म्हणून ओळखलं जातं.
त्याचा फायदा आॅक्सिडेटीव्ह स्ट्रेस म्हणजे शरीरांतर्गत आॅक्सिडंट आणि रॅडीकल्स यांच्या बिघाडामुळे जो शरीरसंस्थेवर ताण येतो तो कमी करण्यासाठी होतो.
हा ताण विविध कारणांमुळे येतो जसं मधुमेह, स्थूलता, हायपर टेन्शन, वातावरणातील प्रदूषण आणि किडनीमधील दाह. किडनीचे कार्य बिघडले असेल तर यापैकी काहीही कारण पुरेसे असते. आणि आॅक्सिडेटीव्ह स्ट्रेस वाढतो.
या स्ट्रेसमुळे बाकीच्या अवयवांवर परिणाम होतोच पण किडनीवर जास्त होतो. कारण लायकोपेन मूत्रसंस्थेवर आणि जननेंद्रियांच्या पेशींमध्ये जास्त प्रमाणात असते.
डाॅ. सूद म्हणतात, टोमॅटो हे काही शरीराला हानिकारक नाहीत. उलट त्यातील जीवनसत्त्वे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. किडनीसाठी ते घातक आहेत असंही नाही. पण काही रुग्णांना त्याचा अनुभव चांगला नाही.
लघवीतील क्षार एकत्र येऊन किडनी स्टोन बनतो. त्याची अनेक कारणे आहेत. टोमॅटो हे त्यापैकीच एक.
जर टोमॅटो शिजवून खाल्ले तर ते खाण्यास निर्धोक होतात, पण ते न शिजवता तसेच कच्चे किंवा नुसते चिरुन खाल्ले तर त्याचा वाईट परिणाम होतो आणि किडनी स्टोनचा त्रास वाढू शकतो.
एखाद्या माणसाला किडनी स्टोनचा आजार आहे आणि त्याने जर भरपूर प्रमाणात टोमॅटो खाल्ले तर त्याला त्रास होण्याची शक्यता बळावते.
ज्या रोग्याला आपल्याला आॅक्सलेट स्टोन आहे हे माहीत आहे, त्याने विपुल प्रमाणात टोमॅटो सेवन टाळावे.
स्त्रीयांमध्येही टोमॅटोचं अतिसेवन कॅन्सरचा धोका ४०% पर्यंत वाढवतं. तर पुरुषांना तो फक्त २०% असतो. पण एखाद्या रुग्णांची प्रवृत्ती वारंवार आॅक्सलेट स्टोन होण्याची असेल तर मात्र टोमॅटो खाणे हे घातक ठरु शकते.
शेवटी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. त्यामुळे किडनी स्टोनचा आजार असणाऱ्यांनी टोमॅटो डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खाणं योग्य!!
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.