Site icon InMarathi

अंध-कर्णबधिर स्त्रीने गाजवलेलं कर्तृत्व; धडधाकट माणसांनीसुद्धा प्रेरणा घ्यावी…

helel keller featured inmarathi

whas11.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

डोळ्याभोवती पट्टी बांधून खेळण्यात येणारा आंधळी- कोशिंबीर खेळ आपल्यापैकी बहुतेकांनी खेळला असेल. जेव्हा डोळ्या समोर अंधार असतो तेव्हा न अडखळता चालण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.

निसर्गाने आपल्याला दिलेले निरोगी शरीर ही खरोखरच एक देणगी आहे. ज्यांना जन्मतःच पाहण्यात, ऐकण्यात किंवा बोलण्यात अडचण असते त्यांचं आयुष्य किती खडतर होत असेल, याची कल्पना करणं सुद्धा कठीण होतं.

कुठल्याही गोष्टी,व्यक्ती किंवा शारीरिक क्षमतेचं मूल्य जेव्हा त्याची उणीव भासू लागते तेव्हाच जाणवते!

दिव्यांग व्यक्तींना जगण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींचा सामना करावा लागतो. परंतु उत्तुंग आशावाद आणि सकारात्मक विचारांच्या जोरावर कुठल्याही अडचणींवर मात करता येऊ शकते.

प्रसिद्ध अमेरिकन लेखिका हेलन केलर यांचा जीवनप्रवास याचं एक उत्तम उदाहरण आहेत.

 

wisewomen.co.au

 

हेलन या जन्मतः एखाद्या सामान्य बाळासारख्या होत्या. परंतु त्या दीड वर्षाच्या असताना, एका गंभीर आजाराने त्यांना पछाडले.

तापामुळे त्यांच्या मेंदू आणि पोटात काही गंभीर प्रकारचे अडथळे निर्माण झाले. आताच्या काळात हा आजार ‘स्केरलेट फिवर’ या नावाने ओळखला जातो.

सध्या त्यावर संपूर्ण उपचार उपलब्ध आहेत. परंतु त्या काळी हा एक गंभीर आजार समजला जायचा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

हेलन ना, ताप येण्यापूर्वी त्यांच्या आईला हेलन मधे काही लक्षणं दिसली होती जस की घरात काही आवाज झाला तरी त्यांना ऐकू येत नव्हता किंवा तिच्या डोळ्या समोर हाताने इशारे केलेलं सुद्धा तिला दिसत नव्हते.

या व्याधीचा परिणाम असा झाला की त्यांची पाहण्याची आणि ऐकण्याची शक्ती पूर्णतः नाहीशी झाली.

हेलन केलर – एक बेलगाम मूल :

लहानपणी या रोगाला बळी पडल्यावर हेलन च्या स्वभावात बराच बदल घडत गेला. तिच्या भावनांचा अतिरेकी उद्रेक होऊ लागला.

जेव्हा तिला राग यायचा तेव्हा ती जोरजोरात आदळ-आपट करायची आणि जेव्हा तिला आनंद व्हायचा तेव्हा ती हसतच राहायची! तिचं हे वागणं दिवसेंदिवस कुटुंबासाठी त्रासिक होत चालल होतं.

त्यांच्या नातेवाईकांनी तर वाटायचं की या मुलीला विशेष मुलांच्या संस्थेत का दाखल करत नाहीत? पण तिच्या या चिडचिडेपणाचं मुख्य कारण काही वेगळंच होतं.

 

aruma.com.au

 

या लहान वयात सुद्धा तिला, आपल्याला इतरांशी संवाद साधता येत नाहीये याची बोच लागून असायची. त्याच वेळी आपल्या बरोबरची मुलं मात्र अगदी सहज ऐकू शकतात, गोष्टी पाहून त्याचं वर्णन करू शकतात.

हे पाहून तिची निराशा आणखीन वाढायची अन त्यातूनच मग तिच्या चिडचिडेपणाला सुरुवात झाली.

त्या वयात सुद्धा तिची इतरांशी संवाद साधण्याची आत्मशक्ती इतकी दांडगी होती की तिने स्वतःची अशी भाषा चिन्हे तयार केली!

तिची जिवलग मैत्रीण मार्शा वॉशिंग्टन सोबत ती त्या खाणा- खुणा वापरून संवाद साधायची.

सातव्या वर्षापर्यंत तिने स्वतःची अशी तब्बल ६० संवाद चिन्हे तयार केली होती!

सातव्या वर्षी झाली जीवन पहाट :

हेलन च्या मते जेव्हा तिची मार्गदर्शकआणि मैत्रीण ऍना सुलीव्हॅन तिच्या आयुष्यात आली तेव्हा खऱ्या अर्थाने तिचे जीवन सुरू झाले. हेलन सात वर्षांची असताना साधारण मार्च १८८७ दरम्यान ऍना तिला भेटली.

त्या वेळी २१ वर्षीय ऍना नुकतीच ग्रॅच्युएट झाली होती. विशेष बाब म्हणजे ऍना दृष्टिहीन होती.

ऍना ने हेलन ला बोटांचा, स्पर्शाचा वापर करून सांकेतिक भाषांद्वारा संवाद साधण्याच्या छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्या. हेलन च्या हातात बाहुली देऊन ऍना तिच्या हाताच्या पंजावर डॉल चे स्पेलिंग रेखाटायची.

 

biography.com

 

सुरवातीला पंजावर रेखाटले जाणारे स्पेलिंग आणि दुसऱ्या हातातील वस्तू यांची सांगड घालणं तिच्या साठी प्रचंड कठीण होतं.

पण ऍना चिकाटीने तिला सोप्या पद्धतीने समजावत राहिली.

पाण्याचं स्पेलिंग सांगण्यासाठी तिने हेलन च्या एक हातावर पाईप मधून पाणी ओतलं आणि दुसऱ्या पंजावर W-A-T-E-R रेखाटले. ही कल्पना बऱ्यापैकी यशस्वी ठरली.

त्याचवेळी हेलन ने जमिनीला स्पर्श करून त्याचे नाव विचारले. या प्रकारे स्पर्श ज्ञानाने हेलन ने लिपी चटकनआत्मसात करून घेतली.

 

जिवलग मित्र- मार्क ट्वेन :

हेलन मार्क ट्वेन यांना आपला जिवलग मित्र मानायची. १४ व्या वर्षी मुलींच्या केम्ब्रिज स्कुल ला ती जाऊ लागली. तिथे तिला थोर लेखक,उद्योजक आणि व्याख्याते असलेले मार्क ट्वेन यांचे मार्गदर्शन लाभले.

दोघांच्या वयामध्ये प्रचंड अंतर असून सुद्धा ते एकमेकांचे मित्र बनले. हेलन च्या इच्छाशक्तीचं ट्वेन यांना प्रचंड कौतुक वाटायचं.

हेलन त्यांच्या आत्मचित्रात म्हणतात

मार्क ट्वेन यांनी मला कधी वेगळं असल्याचं जाणवू दिलं नाही. त्यांनी मला नेहमीच एक अपंग मुलगी, दुर्दम्य इच्छाशक्तीने येणाऱ्या समस्यांवर मात करतीये या दृष्टीने पाहिलं!

 

aruma.com.au

 

वर्गात हेलन ला मार्क ओळखू यावे म्हणून ते १०-१२ सिगार ओढायचे! जेणे करून त्या विशिष्ट वासाने ती त्यांना चटकन ओळखू शकेल!

दृष्टिहीन आणि बहिरेपणा असलेली पहिली महिला पदवीधारक!

सन १९०० मधे तिला केम्ब्रिज च्या रेडक्लिफ कॉलेज मधे प्रवेश मिळाला. अर्थात तिथे सुद्धा वर्गात शिकवलेलं तिच्या भाषेत समजावून सांगायला तिची अगोदरची शिक्षिका, मैत्रीण ऍना सुद्धा वर्गात बसायची.

ज्युनिअर कॉलेज मधे असतांनाच तिने आत्मकहाणी ‘ स्टोरी ऑफ माय लाईफ’ लिहिली!

१९०४ पर्यंत तिने केवळ पुस्तकच लिहिलं नाही तर कला शाखेतून पदवी सुद्धा प्राप्त केली. आणि दृष्टिहीन,बहिरेपणा असणारी पदवी प्राप्त करणारी पहिली महिला बनली!

 

afb.org

 

कॉलेज मधे असताना संवादांची बरीच साधने हेलन ने आत्मसात करून घेतली बोलणाऱ्यांच्या ओठांना स्पर्श करून ती त्यांचं म्हणणं समजावून घेऊ लागली.

ब्रेल ,स्पेलिंग टाईप किंवा हाताच्या बोटाने त्याचा आकार करून एवढंच नाही तर ती बोलायला पण शिकली! पण तिचा आवाज मोठा आणि अस्पष्ट यायचा या गोष्टीचं तिला वाईट वाटायचं.

 

एफबीआय च्या रडार वर हेलन :

विसाव्या शतकात महिलांच्या प्रश्नांसंदर्भात कार्य करणारी ती एक थोर व्यक्ती होती. पण आपल्या वैचारिक लढाईत तिने अनेक राजकारण्यांना सुद्धा शिंगावर घेतले होते.

हेलन जगप्रसिद्ध लेखक, व्याख्याते यांची भेट घेऊन त्यांना अपंग लोकांविषयी बोलण्याची विनंती करायची.

पण तिचं कार्य तेवढ्या पुरतं सीमित नव्हतं महिलांचे सामाजिक अन राजकीय प्रश्न, त्यांच्या समस्या, जन्म नियंत्रण, मतं देण्याचा अधिकार आणि मुख्यत्वे युद्ध बंदी या मुद्द्यावर मार्क ट्वेन आणि हेलन ची मतं सारखीच होती!

हेलन ने ‘अमेरिकन सिव्हिल लिबर्टी युनियन’ नावाची संघटना सुद्धा स्थापन केली. तिच्या या आत्यंतिक डाव्या विचारांमुळे ती बरेचदा FBI च्या रडार वर देखील राहिली होती!

 

aruma.com.au

अधुऱ्या प्रेमाची कहाणी :

सहसा अपंग किंवा दृष्टीहीन महिला कधी प्रेमात वैगेरे पडूच शकत नाहीत किंवा त्यांना रोमान्स वैगेरे भावनाच नसतात किंवा अश्या व्यक्तींनी लग्न करूच नये इथपर्यंत बहुतांश लोकांचा आग्रह असतो.

परंतु हेलन वयाच्या ३६ व्या वर्षी आपल्या सहायकाच्या प्रेमात पडली! वृत्तपत्राचा पत्रकार असलेला पीटर फ्यागन आणि हेलन दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडून गेले.

त्यांनी गुपचूप एंगेजमेंट सुद्धा केली. त्यांनी विवाह प्रमाणपत्र सुद्धा मिळवलं मात्र त्या दरम्यान दोघांच्या कुटुंबांना या गोष्टीची खबर लागली आणि त्यांनी त्यांच्या विवाहाला कडवा विरोध केला.

त्या मागचं मुख्य कारण म्हणजे हेलन ची दृष्टीहीनता आणि बहिरेपणा.

 

aruma.com.au

 

हेलन ला याचा तीव्र धक्का बसला ती म्हणायची ‘जर मी पाहू शकत असले असते तर माझं लग्न नक्की झालं असतं!”

ऍना – गुरू, मार्गदर्शक ते मैत्रीण :

आपल्या बालपणीची शिक्षिका – ऍना सोबत तिचा सहवास ४९ वर्षे होता! ऍना ने तिला केवळ शालेय शिक्षणातच मदत नाही केली तर कॉलेज मध्ये सुद्धा ती गुरूच्या भूमिकेत कायम राहिली!

१९३६ मध्ये एका रोगाच्या प्रभावाने ऍना कोमात गेली. दुर्दैवाने त्यातच तिचा मृत्यू झाला.. मृत्यूसमयी सुद्धा तिने हेलन चा हात हातात घट्ट पकडून ठेवला होता.

अगदी आज सुद्धा या सख्या एकमेकांच्या शेजारीच आहेत. १९६८ मधे जेव्हा हेलन चं झोपेतच निधन झालं तेव्हा तिची समाधी ऍना च्या समाधी शेजारीच बांधण्यात आली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: ht

tps://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version