' स्वप्नं सर्वांनाच पडतात, पण अनेकांना स्वप्नांबद्दल “ह्या” गोष्टी माहीत नसल्याने त्यांचा “उलगडा” होत नाही – InMarathi

स्वप्नं सर्वांनाच पडतात, पण अनेकांना स्वप्नांबद्दल “ह्या” गोष्टी माहीत नसल्याने त्यांचा “उलगडा” होत नाही

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

तुम्हाला कधीतरी एखादं वाईट स्वप्न पासून दचकून जाग आलीये? आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा अनुभव आला असेल.

आपल्या मेंदूची रचना खूप गुंतागुंतीची आहे. यामुळेच आपल्याला स्वप्न पडतात. यापैकी काही स्वप्ने आपल्याला सकली उठल्यावर आठवतात तर काही आपण विसरून जातो.

स्वप्न ही आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवरच आधारित असतात. आपल्या कळत- नकळत आपण ज्या गोष्टी बघतो त्याच आपल्याला रात्री स्वप्नात दिसतात.

 

sleeping InMarathi

 

अनेक शास्त्रज्ञांनी स्वप्ने का पडतात याची कारण सांगितली आहेत.

आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये सर्वात रहस्यमय घटना जी नेहमीच आपल्या सोबत घडते ती म्हणजे आपली स्वप्नं. होय रहस्यमय यासाठी की त्यामागील विज्ञान माहिती असून देखील आपण त्या स्वप्नांवरती ताबा ठेवू शकत नाही.

असं म्हटलं जातं की ” स्वप्न ही सर्वसामान्यांची सर्वात मोठी ताकद आहे” आजच्या एकविसाव्या शतकात आपल्याला स्वप्न का पडतात, ती पडण्यामागील कारण माहिती असलं तरी त्यामागील काही मनोरंजक अशा बाबी मात्र आपल्याला माहिती नाहीत.

मित्रांनो या लेखाच्या माध्यमातून आपण स्वप्नांबाबत अशाच काही गमतीशीर बाबी जाणून घेणार आहोत….

 

dreams inmarathi
medicalnewstoday.com

 

मानवी स्वभाव हा जगातील सर्वात विचित्र गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपल्याला पडलेल्या स्वप्नांचा वेगवेगळा अर्थ काढायचा प्रयत्न करत असतो.

आजच्या २१व्या युगात तंत्रज्ञान एवढं प्रगत झालं आहे; तरीही अशा काळात जर आपल्याला स्वप्नांबाबत एवढी उत्सुकता असेल तर विचार करा जेव्हा मानव एवढा प्रगत नसेल तेव्हा स्वप्नांबाबत कुठल्या प्रकारे विचार केला जात असेल?

रोमन साम्राज्यात स्वप्नांना फार महत्व असायचं कारण स्वप्नांबद्दलची ही वैज्ञानिक माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नव्हती. त्यामुळे स्वप्नांच्या आधारावर अनेक निर्णय घेतले जायचे.

तिथे अशी मान्यता होती की “हेच स्वप्न म्हणजे देवाने तुम्हाला दिलेला निरोप आहे.”  मग काही अति भयानक किंवा महत्त्वाच्या स्वप्नांना ते त्यांच्या सीनेट जवळ म्हणजेच आमसभेसमोर मांडत.

 

roman sinet inmarathi
lt.fehrplay.com

 

पुढे तेथील बुद्धिमान, हुशार आणि प्रतिष्ठित मंडळी त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतं आणि त्या अर्थावरून भविष्याची वाटचाल ठरवली जात असे.

आज आपण स्वप्नांना एवढ्या गांभीर्याने घेत नसलो तरीही स्वप्नांबाबत असलेलं गुढ आणि उत्सुकता आजही तशीच कायम आहे. त्यामुळेच आज आहे तुमच्यासाठी स्वप्न बाबत काही रंजक बाबी घेऊन आलेलो आहोत.

१. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही तुमची ९०% स्वप्न ही उठल्यानंतर पाच मिनिटाच्या आत विसरून जाता. फार कमी जणांना त्यांची स्वप्ने अगदी व्यवस्थित आठवतात.

२. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, की अंध लोकांनादेखील स्वप्न पडतात. ज्या व्यक्ती दुर्दैवाने जन्म झाल्यानंतर काही कारणास्तव अंध होतात त्यांना त्यांच्या स्वप्नात सर्व प्रकारच्या गोष्टी बघायला मिळतात, परंतु ज्या व्यक्ती जन्मतः अंध असतात त्यांना स्वप्नात काहीही दिसत नाही.

३. लक्षात घ्या मित्रांनो ह्या जगातील प्रत्येक व्यक्ती स्वप्न पाहते आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला स्वप्न पडत नाहीत तर असं नाहीये. तुम्ही तुमची स्वप्न विसरता.

 

dreams-facts-inmarathi

 

( जी व्यक्ती मानसिक दृष्ट्या आजारी असते शक्यतो अशाच व्यक्तींना स्वप्न पडत नाहीत.)

४. आपण आपल्या स्वप्नात त्याच व्यक्ती बघतो ज्यांना आपण संपूर्ण आयुष्यात केव्हातरी नक्कीच बघितलं असेल. आपला मेंदू नवीन चेहरे तयार करून आपल्याला स्वप्नांमध्ये दाखवत नाही.

आपण अगदी लहानपणापासून आपण अनेक प्रकारचे चेहरे आजूबाजूला वावरताना पाहिलेले असतात त्यामुळे ते चेहरे कदाचित आपल्याला आठवत नसतील, परंतु आपण त्यांना कुठेतरी पाहिलेलं नक्कीच असतं.

त्यामुळे आपल्याला आठवत नसलं तरी आपल्या मेंदूकडे व्यक्तींची कमतरता नाही.

५. सगळ्यांनाच रंगीत स्वप्न पडतात असं नाही, काही जण ब्लॅक ॲण्ड व्हाइट स्वप्नदेखील पाहतात. वाटलं ना आश्चर्य?

 

dreams inmarathi1
cephuscorner.jadedragononline.com

 

ज्या व्यक्ती आपल्या आधीच्या पिढीच्या आहेत, ज्यांनी मनोरंजनासाठी टीव्ही ब्लॅक ॲण्ड वाइट बघितलेला आहे त्यापैकी ५० % व्यक्ती ब्लॅक अँड व्हाईट मध्येच स्वप्न पाहतात.

कारण त्यांनी मनोरंजनात देखील प्रतिमा या ब्लॅक अँड व्हाईट याच रंगांमध्ये बघितलेल्या आहेत.

६. आपण स्वप्न पाहत असताना बऱ्याच वेळेस नकारात्मक स्वप्न बघतो यामागील कारण आजपर्यंत समोर आलेली नाहीत, पण आपण 90% स्वप्न ही नकारात्मक बघतो एवढं मात्र खरं.

 

dreams-facts-inmarathi

 

७. अनेक जणांना प्रश्न पडत असेल आपण झोपल्यावर एका रात्रीत किती स्वप्न पाहू शकतो.

एका अभ्यासानुसार असं लक्षात आलं आहे की एक सामान्य व्यक्ती एका रात्रीत सहा ते सात स्वप्न पाहू शकते, म्हणजेच तुम्ही एका रात्रीत तब्बल एक ते दोन तास स्वप्न पाहू शकता.

 

dreams-facts-inmarathi

 

८. प्राणीदेखील स्वप्न पाहतात. एका अभ्यासाअंती असे लक्षात आले आहे की बहुतेक सर्व प्राणी स्वप्न पाहतात. आपण अनेक वेळा कुत्र्यांना झोपल्यानंतर  हात-पाय हलवताना बघतो कारण ते स्वप्नात धावत असतात.

९. तुमच्यापैकी अनेक जणांना प्रश्न पडत असेल, की स्त्री आणि पुरुषांना सारखीच स्वप्न पडतात का? याचे उत्तर नाही अस आहे.

साधारणपणे स्त्री आणि पुरुषांना सारखे स्वप्न पडत नाहीत, कारण पुरुषांच्या स्वप्नात ७० टक्के पुरुषचं असतात तर स्त्रियांच्या स्वप्नात ५० टक्के पुरुष आणि ५० टक्के स्त्रिया असतात.

मित्रांनो, स्वप्न ही गोष्ट इतकी मजेशीर आहे की त्याबद्दल तुम्ही जितकं वाचाल तेवढं तुम्हाला नवीन ज्ञान मिळेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?