Site icon InMarathi

…आणि शोभा डेंची मुंबई पोलिसांनी ‘शोभा’ काढली!

shobha-day-tweet-marathipizza

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

 

कालच मुंबईत रेकॉर्ड ब्रेक 55% मतदान झालं. सिनेतारकांपासून आंतरराष्ट्रीय खेळाडूपर्यंत सगळ्यांनीच मतदान केंद्रावर हजेरी लावली. मतदानाचा टक्का वाढवल्याबाबत मुंबईचं कौतुक होत होतं. तिथेच शांतता आणि सुव्यवस्था कायम ठेवल्याबद्दल मुंबई पोलिस विभागाचंही अभिनंदन केलं जात होतं.


पण ते म्हणतात ना, सगळंच जर चांगलं होत असेल तर कुणाची तरी नजर लागतेच व काही लोक ही नजर लागावी म्हणून प्रयत्नशील असतात आणि काही ना काही खोड काढतात. शोभा डे असंच एक “चांगलं” काम करायला गेल्या आणि फसल्या.

लोकप्रियता कमी झाली म्हणून शोभा डेंनी ट्विटरचा वापर करून मुंबई पोलिसांवर टीका केली.

(असाच त्यांचा एक पब्लिसिटी स्टंट : शोभा डे ने केला भारतीय ऑलिम्पिक टीमचा अपमान, लोकांनी twitter वर दिलं चोख उत्तर)

मतदान केंद्राबाहेर असलेल्या बंदोबस्तावर (गरज नसताना फक्त हौस म्हणून) ट्विटर वरून टीका करणाऱ्या शोभा डेंचा मुंबई पोलिसांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

त्यांनी केलेली टीका

फोटोत दिसत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला उद्देशून त्या म्हणाल्या,

आज मुंबईत मतदानासाठी “भारी” बंदोबस्त आहे.

ह्या फुलटॉस आलेल्या बॉल वर मुंबई पोलिसांनी षटकार मारायचा सोडला असता का?

मुंबई पोलिसांनी दिलेलं उत्तर-

मुंबई पोलिसांच्या ऑफिशियल ट्विटर हॅन्डल वरून पुढील रिप्लाय दिला गेला –

तो युनिफॉर्म/कर्मचारी मुंबई पोलिसांचा नाही. खोड्या काढायला आम्हाला ही मजा येते. पण त्यात काही तरी तथ्य असावं. तुमच्यासारख्या जबाबदार नागरिकांकडून आम्हाला ह्यापेक्षा चांगल्याची अपेक्षा आहे.

ह्यानंतर शोभा डेंना मूर्खात काढणाऱ्यांची आणि मुंबई पोलिसांच्या उत्तराचं कौतुक करणाऱ्यांची गर्दी वाढली,

कुणीतरी शोभाजींना झालेल्या रोगाचं नाव सांगितलं 

कुणीतरी जशास तसे ह्या मुंबई पोलिसांच्या पवित्र्याचं अभिनंदन केलं

एक जण तर कुठून तरी आणखी एका बंदोबस्ताचा फोटो घेऊन आला आणि कोणता चांगला हे सांगून टाकलं.

इकडे तांबडे बाबा ज्ञान देत आले

पण शेवटी चोरी पकडली गेली

मुंबई पोलिसांना त्यांच्या ह्या हजरजबाबीपणासाठी  सलाम आणि नेहेमीप्रमाणे, ट्विटरकरांचं प्रॉम्प्ट प्रतिक्रियांसाठी कौतुक!

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Exit mobile version