आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
जर्मन लोक प्रत्येक गोष्ट परफेक्ट करतात हे सर्वश्रुत आहे. प्रत्येक क्षेत्रात जर्मन लोकांनी आपल्या दर्जेदार कामाचा ठसा उमटवला आहे. मग OTT platform त्याला अपवाद कसा असेल?
‘DARK’ या नावाची एक वेबसिरीज नेटफलिक्स वर उपलब्ध आहे. वेळेचा प्रवास दाखवणारी ही सिरीज प्रेक्षकांना खिळवून ठेवायची ताकत आहे.
‘DARK’ या सिरीज बद्दल एक छान वाक्य लिहिलं गेलं आहे, “ही सिरीज बघायला अवघड आहे आणि एकदा बघायला लागलो की बघणं सोडणं सुद्धा अवघड आहे. “
==
हे ही वाचा : १९६२ च्या भारत-चीन युद्धावर बेतलेली ही भन्नाट वेबसिरीज प्रत्येक भारतीयाने का बघावी?
==
१० एपिसोड्स असलेली ही वेबसिरीज नावाप्रमाणेच अंधारी गुहा, जंगल, चालणाऱ्या सावल्या, गूढ रहस्य असलेली गुफा अश्या ठिकाण चा प्रवास घडवते. ज्यांना हॉरर शो बघायची आवड आहे त्यांच्यासाठी ही सिरीज म्हणजे एक पर्वणी आहे.
घरातील सगळे लाईट बंद करून मध्यरात्री ही सिरीज भीतीदायक गोष्टी आवडणाऱ्या लोकांनी बघावी.
सिरीज बघताना असा अनुभव येईल जणू की, तुम्ही जंगलात बसलेले आहात, समोर कॅम्पफायर सुरू आहे आणि कोणी तुम्हाला एक भीतीदायक गोष्ट सांगत आहे.
ती गोष्ट पण अशी की ज्यामध्ये फक्त धोका आहे, विचित्र पद्धतीने होणारे खून आहेत, झाडांवरून खाली मरून पडणारे पक्षी आहेत.
डेव्हिड फिंचर या अमेरिकन दिगदर्शकाच्या सुरुवातीच्या काळातील हॉरर सिनेमासारखी ही वेबसिरीज आहे.
नेटफलिक्स वरील या पहिल्या जर्मन वेबसिरीज चे लेखक Baran bo Odar आणि Jantje Friese हे आहेत.
या जोडीनेच २०१४ मध्ये रिलीज झालेला थ्रिलर सिनेमा ‘Who Am I : No System Is Safe’ लिहिला आणि दिग्दर्शित केला होता.
‘DARK’ या वेबसिरीज मध्ये त्याच दर्जाचं बॅकग्राऊंड म्युजीक आणि पटकथा लिहिण्यात आली आहे. फरक इतकाच आहे की, सिनेमा हा दोन तासांचा असल्याने फास्ट आहे.
वेबसिरीज दहा एपिसोड्स म्हणजेच दहा तास इतका वेळ असल्याने कथानकाचा वेग कमी करण्यात आला आहे.
वन लाईन स्टोरी सांगायची तर ‘DARK’ ही एक मिस्ट्री आहे. पण, ती एका कम्युनिटी ची स्टोरी आहे ज्यांना की त्यांचे स्वतःचे प्रॉब्लेम्स आहेत. हे सगळे प्रॉब्लेम्स एकमेकांशी, वर्तमान आणि भूतकाळाशी जोडलेले आहेत.
Ulrich Nielsen हे एक पोलीस ऑफिसर आहेत. त्यांना तीन मुलं आहेत. Ulrich हे आपल्या पत्नी ला सध्या फसवत आहेत. त्यांना एक मैत्रीण आहे जिच्या नवऱ्याने आत्महत्या केली आहे.
मैत्रिणीचा मुलगा जोनास हा सध्या त्याच्या एका क्लासमेटचा शोध घेत आहे जो की काही दिवसांपूर्वी जंगलातून गायब झाला आहे.
हा शोध सुरू असताना Ulrich चा सर्वात लहान मुलगा Mikkel सुद्धा गायब होतो. पोलिसांना असा संशय येतो की कोणीतरी मुद्दामहून या भागातील तरुणांना गायब करत तर नसेल ना ?
==
हे ही वाचा : हर्षद मेहता स्कॅमनंतर आलेला ‘द बिग बुल’ हा खरंच एक सुखद धक्का आहे का? वाचा!
==
हा शोध सुरू असताना अचानक मृत अवस्थेत प्राणी सापडू लागतात. विजा चमकू लागतात. त्या शहरातील वयस्कर नागरिक, Mikkel ची आजी एक जुनी आठवण सांगतात की,
त्यांच्या तरुणपणी अश्या घटना घडल्या होत्या.
हे सगळं सांगत असतानाच आपल्या स्क्रीन वर पेपर ची हेडलाईन दिसू लागते ज्यामध्ये लिहिलं आहे की, “Where is Mikkel ?” आणि काही क्षणातच या हेडलाईन चा पहिला शब्द बदलतो आणि ती बदलून “When is Mikkel ?” अशी होते.
या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सिरीज च्या तिसऱ्या भागात पहायला मिळतं. पण, त्यासोबत काही नवीन प्रश्न समोर येतात. ज्यांची उत्तरं ही भूतकाळात दडलेली असतात.
कथा अजून जास्त गुंतागुंतीची त्यावेळेस होते जेव्हा एक सुंदर सजवलेला दागिन्याचा बॉक्स सापडतो ज्याच्यात आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीने लिहिलेलं एक पत्र असतं.
पण, ते एक विशिष्ठ तारीख आणि वेळेच्या आधी उघडू नये अशी सूचना त्यावर लिहिलेली असते. “हे काय चाललंय ?” हा प्रश्न आपल्याला खूपदा पडतो.
‘DARK’ ही सिरीज बघताना आपण एखादं भयानक स्वप्न बघत आहोत असं सतत वाटत राहतं.
Winden या जर्मनीच्या एका शहरात घडणाऱ्या या कथेत Ulrich हा एकटाच नाहिये ज्याचं की अफेअर सुरू आहे. निखळ प्रेम सोडून या कथेत सर्व काही आहे.
तगडी स्टारकास्ट असलेल्या या वेबसिरीज मध्ये प्रत्येक जण अगदी चपखल बसला आहे. प्रत्येक पात्र हे वातावरण अशांत आणि अविश्वासार्ह कसं होईल याची पूर्ण काळजी घेतो.
‘DARK’ या वेबसिरीज चे आपण जर सलग एपिसोड्स बघितले तर आपल्याला वेळेचा प्रवास करणारी मुलं, होणारे खून या गोष्टी अगदीच नॉर्मल वाटू लागतात.
David Fincher यांच्या कथा सादरीकरणाची प्रकर्षाने आठवण होते जेव्हा काही बॅकग्राऊंड म्युजिक, उदास वाटणारी पटकथा आपल्या समोर ठेवली जाते पण असं असतानाही कथा कुठेच पकड सोडत नाही.
तिसऱ्या एपिसोड च्या शेवटी एक सीन येतो जेव्हा विंडेन या शहरात घडलेल्या बदलांबद्दल काही संवाद आहेत आणि तिथलं निसर्ग सौन्दर्य आपल्याला स्क्रीन वर दिसतं.
त्यावेळी आपल्या लक्षात येतं की, ही फक्त मर्डर मिस्ट्री नाहीये. ही गूढकथा आहे ती मुलांच्या गायब होण्याच्या घटनेचा भूतकाळात जाऊन उत्तर शोधण्याची.
ही कथा आहे ती लोक त्यांनी दिलेले वचन कसे विसरून जातात हे दाखवणारी. एक गंभीर आणि एक उदास करणारी कथा कलात्मक रित्या कशी सादर केली जाऊ शकते याचं ‘DARK’ ही सिरीज हे उत्तम उदाहरण आहे.
कथा आपल्याला एखाद्या समुद्राच्या लाटेप्रमाणे आत ओढते की, नकळत आपण त्यात ओढले जातो आणि काही काळाने आपल्याला त्या समुद्रातून बाहेर यायची इच्छा होत नाही.
Time Travel म्हणजेच दोन वेळांमधील प्रवास ही गोष्ट आपण इंग्लिश सिनेमामध्ये बऱ्याच वेळेस बघितली आहे. पण, ही गोष्ट वेबसिरीज मध्ये बघण्याची ही पहिलीच वेळ असावी.
लेखक त्याची कथा कोणत्याही काळात नेऊन ती आपल्याला सादर करू शकतो फक्त त्याला त्या काळच्या बांधना नुसार आपल्या कथेला लवचिक ठेवावं लागतं.
‘DARK’ हे काळाचे नियम अगदी व्यवस्थित पाळते. Ulrich हे पात्र चुका करत असतं; पण तरीही ते आपल्याला आवडत असतं.
त्यासोबतच इतर सगळेच पात्र या वेबसिरीज ला त्यांच्या कामाने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात.
२०१७ मध्ये पहिल्यांदा प्रसारित झालेली ही सिरीज अशी आहे जी की, लॉजिक ला धरून आहे. ही कथा एखाद्या चढत्या, उतरत्या आलेखा प्रमाणे आपल्या समोर येत असते.
‘DARK’ या सिरीज चा सेकंड सिझन तीन भागांमध्ये आपल्या समोर येणार आहे. २०१९ आणि १९८६ या दोन कालखंडात फिरणारी ही कथा प्रेक्षकांना एकदा बघितल्या नंतर त्या बद्दल बोलायला भाग पाडते.
आपल्यापैकी किती तरी जणांना भूतकाळात जाऊन किती तरी गोष्टी बदलण्याची इच्छा असते किंवा भविष्यात घडणाऱ्या घटना जाणून घेऊन त्या बदलाव्या असं वाटत असतं.
कधी कधी यातील फक्त अर्धीच गोष्ट घडते. घडणाऱ्या घटना तर कळतात पण त्या बदलायच्या कशा? हे कळत नाही. मग, या घटना का कळल्या असं आपल्याला वाटत राहतं.
==
हे ही वाचा : नेटफ्लिक्सवरील हे ७ शो तुम्ही बघायलाच हवेत! २ दिवस मोफत बघता येतील!!
==
मनाची ही घालमेल दाखवण्याचा एक यशस्वी प्रयत्न दिगदर्शकाने केला आहे.
२७ जून २०२० ला ‘DARK’ या वेबसिरीजचा तिसरा आणि शेवटचा भाग नेटफिलक्स वर रिलीज केला जाईल. तेव्हा आधीचे भाग बघून तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील.
ज्यांना या सिरीज बद्दल आत्ताच कळालं ते आधीचे दोन सीझन नेटफिलक्स वर बघू शकतात. तुमचा वेळ वाया जाणार नाही हे निश्चित.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.