Site icon InMarathi

IAS ऑफिसर्सचा रुबाब – जबाबदारी ज्या लेव्हलची त्या लेव्हलचा पगार, सुविधा!

IAS officer IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

लहान असताना कधी ना कधी ‘कलेक्टर’ व्हायचं स्वप्न हे जवळपास सर्वांनी बघितलेलंचं असत.पण नंतर बदलत जाणाऱ्या आवडी आणि ध्येय यामुळे ते कलेक्टर होणं कुठे तरी मागे पडून राहत.

तर, कलेक्टर अर्थात जिल्हाधिकारी व्हायला युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच यूपीएससी ची परीक्षा द्यावी लागते.

जगातली सर्वात अवघड परीक्षा म्हणून या परीक्षेला ओळखलं जातं. एकूण तीन स्तरावर ही परीक्षा घेतली जाते.

 

 

प्रि अर्थात पूर्व परीक्षा, मेन्स अर्थात मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू अर्थात मुलाखत

प्रि मध्ये २००-२०० मार्काचे दोन पेपर असतात. सामान्य अध्ययन आणि कंपेटीटिव्ह. ठराविक कट ऑफ क्रॉस केल्यानंतर आपण मेन्स साठी क्वालिफाय होतो.

मेन्स मध्ये दोन भाषा सहित तब्बल सात विषयांवर डिटेल मध्ये पेपर द्यावा लागतो.यात सुद्धा योग्य परफॉर्म करणारा मुलाखती साठी शॉर्टलिस्ट होतो.

आणि शेवटी मुलाखत. मेन्स आणि इंटरव्ह्यू चे एकूण मार्क्स मिळून ऑल इंडिया रँक ठरत असतात.

ही परीक्षा नसून उमेदवाराला आंतर्बाह्य सखोल चाचणी करायचा एक मापदंड आहे.

भारतीय प्रशासकीय सेवा अर्थात आयएएस, भारतीय पोलीस सेवा अर्थात आयपीएस, भारतीय विदेशी सेवा अर्थात आयएफएस हे ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणून ओळखल्या जातात, आणि बाकी इतर सेवा.

 

 

दर वर्षी ठराविक जागा या विविध सेवेसाठी असतात. त्यात सर्वाधिक जागा या ऑल इंडिया सर्व्हिसेस ला असतात.

म्हणून या तीन सेवांना वेगळंच वलय मिळालेलं आहे. त्यातला त्यात आयएएस ला तर सर्वात जास्त.

या परीक्षा क्रॅक करण म्हणजे वाटत तेवढं सोप्प नाही. दोन-तीन-चार प्रयत्नात यश आल्याचे भरपूर उदाहरण आहेत.

हो, सर्वस्व झोकून अभ्यास करणाऱ्यानी पहिल्याच प्रयत्नात यश खेचून आणल्याचे उदाहरण पण बरेच आहेत.

विवादित आयएएस अधिकारी टीना दाबी या पहिल्याचं प्रयत्नात यशस्वी होऊन ऑल इंडिया रँक १ आणला होता.

पिंपरी चिंचवड चे माजी आयुक्त आणि आता पीएमओ मध्ये सचिव असलेले डॉक्टर श्रीकर परदेशी हे सुद्धा पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले होते शिवाय महाराष्ट्रात पहिले आलेले, असे अनेक आहेत.

हातोडा फेम आयुक्त तुकाराम मुंढे हे आपल्या चौथ्या प्रयत्नात यशस्वी झाले होते.

 

हे ही वाचा – परदेशी पसार झालेल्या बलात्काऱ्याला पकडून आणलंय या धाडसी महिला IPS ऑफिसरने!

जस वर सांगितलं की अनेक इच्छुक या परीक्षेसाठी सर्वस्व झोकून देतात.तसं त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ सुद्धा मिळत.

राज्य प्रशासकीय सेवे अंतर्गत जे पद कारकिर्दीच्या शेवटला मिळत जातात ते केंद्र प्रशासकीय सेवे अंतर्गत सुरवातीलाच मिळतात.

यावरून या परीक्षेच महत्व का जास्त आहे ते कळेल.

भारतीय प्रशासकीय सेवे अंतर्गत जिल्हा पातळीवरून सुरवात होते. उपविभागीय दंडाधिकारी म्हणून अधिकाऱ्याला सुरवात करावी लागते.

इथून जो प्रवास सुरु होतो तो जिल्ह्याचा जिल्हाधिकारी,महानगरपालिकेचा आयुक्त, राज्याचा मुख्य सचिव, केंद्र शासनाच्या विविध योजनांमध्ये प्रमुख पद ते केंद्र सरकार मध्ये कॅबिनेट सेक्रेटरी इथं पर्यंत येऊ थांबतो.

जिल्हा स्तरापासून ते केंद्र स्तरापर्यंत प्रत्येक महत्वाच्या प्रशासकीय पदावर हा आयएएस अधिकारीच असतो.

आता जबाबदारी ज्या लेव्हल ची आहे त्या लेव्हलचा मोबदला सुद्धा हा त्यांना दिला जातो.

सातव्या वेतन आयोगाच्या नुसार एन्ट्री लेव्हल आयएएस अधिकाऱ्याचा मूलभूत वेतन ५६,१०० इतका आहे. विशेष म्हणजे हा त्यांचा निव्वळ पगार आहे.

 

 

यामध्ये त्यांचे इतर भत्ते समाविष्ट नाहीत. महागाई भत्ता (डीए), ट्रॅव्हल अलोन्स (टीए),घरभाडे भत्ता (एचआरए) यासारखे भत्ते वेगळे दिले जातात.

आयएएस अधिकारी यांना मिळणारी पगार रचना ही १८ लेव्हल पर्यंत आहे.

यांच्या पगारात वार्षिक १००० ते ५००० ची वाढ होत असते. शिवाय ४ ते ५ वर्षांनी प्रमोशन देखील फिक्स असते.

एन्ट्री लेव्हल अधिकारी हा लेव्हल १ वर असतो तर देशाच्या कॅबिनेट सेक्रेटरी पदावर असलेला आयएएस अधिकारी लेव्हल १८ सॅलरी रेंज मध्ये येतात.

लेव्हल १८ साठी पे हा जवळपास २,५०,००० इतका आहे.

पगाराच्या व्यतिरिक्त या सनदी अधिकाऱ्यांना विविध सोयी सुविधा सुद्धा दिल्या जातात. राहण्यासाठी घर अथवा बंगला यांना अल्प दरात मिळतो.

शिवाय स्वयंपाकासाठी स्वयंपाकी, गाडी साठी चालक, सुरक्षा रक्षक, गार्डनर इत्यादी सुद्धा कमीत कमी शुल्का मध्ये मिळतात.

 

 

कर्तव्य बजावत असताना एखादा सरकारी बंगला किंवा सरकारी विश्रामगृह विनाशुल्क यांना मिळतो.

त्याचप्रमाणे वीज वापर,टेलिफोन सेवा यासुद्धा निशुल्क. सेवा निवृत्ती नंतर मात्र आजीवन मासिक पेन्शन आणि सोयी सुविधा या आहेच!

बरेच असे अधिकारी आहेत ज्यांनी आपलं उच्च शिक्षण हे पदावर नेमणूक झाल्यावर पूर्ण केल आहे. होय तशी तरतूद सुद्धा आहे!

सात वर्षे सेवा दिल्यानंतर सरकार तर्फे काही विशेष अभ्यासक्रम डिझाईन केलेला असतो. आणि त्याच्या अभ्यासासाठी आयएएस अधिकारी परदेशात शिकायला जाऊ शकतो.

काही रुल्स आणि रेग्युलेशन आहेत. त्याची पूर्तता केल्यानंतर संबंधित सनदी अधिकारी परदेशात शिक्षण घेऊ शकतो, ते सुद्धा निशुल्क.

अर्थात सगळा खर्च हा सरकारचा असणार असतो.

कधी काळी काही असे निर्णय घेतले जातात ज्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना जीवाचा धोका निर्माण होतो.

तर त्यांच्यासाठी सुद्धा सरकार कडून एसटीएफ कमांडोज ची सुरक्षा प्राप्त होते.

या व्यतिरिक्त, आयएएस अधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा किंवा क्षेत्रामध्ये होणार्‍या सर्व मोठ्या कार्यक्रमांना आमंत्रित देखील असतात.

 

 

यात क्रिकेट सामने, कॉन्सर्ट यासाठी विनामूल्य तिकिटे आणि पास समाविष्ट असतात.

तथापि, कार्य वचनबद्धतेमुळे हजेरी लावणे कदाचित बंधन कारक असू शकत.

या फक्त काही प्रमुख भत्ता आणि सुविधा आहेत जे भारतातील आयएएस अधिकाऱ्यांना मिळतात. त्यांना मिळणाऱ्या सर्व छोट्या छोट्या फायद्यांची यादी करणे जवळजवळ अशक्य आहे.

तथापि, वर सूचीबद्ध केले असलेले भत्ते आणि सुविधा हे स्पष्ट करतात की आयएएस अधिकारी म्हणून भारतात करिअरसाठी पहिली पसंती का मानली जाते!

तर, यूपीएससी ची परीक्षा क्लीअर करण्यासाठी आपला उत्साह हा वाढविलाच पाहिजे.

कारण एकदा आपण ती क्लीअर झाली म्हणजे येणाऱ्या जबाबदाऱ्यांसोबत वरील सर्व सुविधा आपल्याच असतील. तर, अभ्यास करत रहा आणि सर्वोत्तम कार्य करा!

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version