Site icon InMarathi

‘खऱ्या’ भारताची झलक बघण्यासाठी हे चित्रपट बघायलाच हवेत

hight way inmarathi

pinterest.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोरोना महामारी मुळे सर्वाधिक फटका बसलेल्या क्षेत्रात पर्यटनाचा क्रमांक बराच वरचा आहे. लोकं अजून त्यांचा दैनंदिन नित्यक्रम सुद्धा सुरू करू शकले नाहीत. त्यामुळे बाहेर कुठे फिरायला जाणं वगैरे लांबच्या गोष्टी आहेत.

घरात बसून कंटाळा येणं सहाजिक आहे पण घरात बसल्या बसल्या देश पाहण्याची तुमची हौस नक्कीच भागवली जाऊ शकते!

भारत एक अतुलनीय देश आहे. जगभरातून अध्यात्मिक प्रेरणेसाठी, शांततेसाठी, ऐतिहासिक वास्तू,तसेच इथलं नैसर्गिक सौंदर्य सृष्टीचा आस्वाद घेण्यासाठी अनेक लोकं भारतात पर्यटनासाठी येतात.

असेतु हिमाचल आणि आसाम पासून ते गुजरात पर्यंत पसरलेल्या आपल्या देशात अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत.

कितीतरी चित्रपटांच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या देशाची भ्रमंती घरबसल्या होऊ शकते. हे चित्रपट केवळ प्रेक्षणीय स्थळं दाखवत नाहीत तर भारतीयांच्या वास्तविक जीवनातील अनोखे पणाचं दर्शन सुद्धा घडवून जातात.

खाली दिलेले चित्रपट जर तुम्ही या काळात पाहिलेत तर तुम्हाला भारताची सैर घरबसल्या नक्की घडू शकेल!

१)बॉम्बे टू गोवा

 

==

हे ही वाचा : उत्कंठेच्या टोकावर नेऊन श्वास रोखायला लावणारे “स्मार्ट” चोरीवरील सर्वोत्तम चित्रपट

==

१९७२ साली प्रदर्शित झालेला ‘बॉम्बे टू गोवा’ क्लासिक चित्रपटांच्या यादीत येतो. अमिताभ बच्चन,शत्रुघ्न सिन्हा, अरुणा इराणी आणि मेहमूद सारख्या तगड्या कलाकारांची फौज ‘बॉम्बे टू गोवा’ ची सफर रंजक बनवते.

हा विनोदी चित्रपट ,रस्त्यावरील साहसी सहलीचं आणि दोन्ही राज्यातल्या सुंदरतेचं उत्तम दर्शन घडवतो.

 

२)अ पेसेज टू इंडिया

 

भारताचं, जगाला मोठ्या पडद्यावर दर्शन घडवणारा ‘अ पेसेज टू इंडिया’ हा चित्रपट एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव आहे. १९८४ ला प्रदर्शित झालेला इ. एम. फोर्स्टर यांच्या सुप्रसिद्ध पुस्तकावर आधारलेला हा सिनेमा डेव्हिड लिन यांनी दिग्दर्शित केलाआहे.

चित्रपटात १९२० सालाचं कथानक आहे, बिहारच्या पाटण्यातील ‘बांकीपूर’ उपनगरात घडणारी ही कथा आहे.या चित्रपटात सुप्रसिद्ध ‘बराबर’ लेण्यांची सफर घडते.

या लेण्या बिहारमधील जेहनाबाद जिल्ह्यात आहेत. दोन इंग्रज महिला – अडील्या ,मिसेस मुरी आणि अजीझ या भारतीय पुरुषाची ही कथा आहे. अजीझच पात्र व्हिक्टर बॅनर्जींनी साकार केलंय.

 

३)इट, प्रे,लव्ह

 

२०१० मधे आलेली ‘इट, प्रे,लव्ह’ मुव्ही सुद्धा एका कादंबरीवर आधारित आहे. जुलिया रॉबर्ट्स प्रमुख भूमिकेत असणारा हा स्त्री प्रधान कथानक असलेला सिनेमा आहे.

चित्रपटात एका घटस्फोटित पात्राची कहानी दाखवली आहे. ही महिला अध्यात्मिकतेच्या आणि आत्मिक शांततेच्या शोधत भारतात येते. तिच्या या प्रवासात सबंध भारताचं दर्शन घडतं.

विशेषत्वाने राजधानी दिल्ली चा झगमगाट, गोंगाट ते हरयानातील पतोडी सारख्या गावातील शांतता, ग्रामीण भागाचे उत्कृष्ट चित्रण यात आहे.

 

४)ये जवानी है दिवानी

 

‘ये जवानी है दिवानी’ हा बॉलिवूड चा भ्रमंती वर आधारलेला अयान मुखर्जी दिग्दर्शित सर्वोत्तम चित्रपट आहे. बनी(रणबीर कपूर) आणि नैना(दीपिका पदुकोन) या पात्रांची कहाणी यात गुंफली आहे.

या चित्रपटाचं बहुतांशी चित्रकरण मनाली सारख्या हिल स्टेशन वर झालं आहे. पुढे यात राजस्थानातील उदयपूर ची संपन्नता आणि काश्मीर च्या गुलमर्ग, पेहलगाम आणि श्रीनगर चं नयनरम्य दर्शन घडतं.

 

५)जब वुई मेट

 

दोन अनोळखी व्यक्तींची भारतीय रेल्वेत होणारी भेट आणि नंतर टॅक्सी मधला प्रवास यात दाखवला आहे.प्रवासात फुलत जाणारं नातं यात दाखवण्यात आलं आहे.

शाहिद कपूर आणि करीना कपूर यांचा उत्कृष्ट अभिनय आपल्याला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. या सिनेमात रतलामचे सुनसान रस्ते ते मनाली आणि नग्गर या हिमाचल मधल्या गावांचे सुंदर नजारे दिसतात.

तसेच पंजाब च्या भटिंडा मधली हिरवीगार शेते पाहून गावाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही!

 

६)द दार्जिलिंग लिमिटेड

 

‘द दार्जिलिंग लिमिटेड’ ही एक तीन भावांची गोष्ट आहे. आपल्या वडिलांच्या मृत्यू नंतर हे तिघे भाऊ भारतात येतात. इथे येण्याचा प्रमुख उद्देश असतो तो म्हणजे कौटुंबिक मतभेद मिटवणे आणि जीवनात शांतता प्राप्त करणे.

ओवीएन विल्सन,अद्रियन ब्रॉडी,जेसन सॉर्टझमॅन आणि इरफान खानच्या यात प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट भारतीय हिमालय आणि उदयपूर च्या टेकड्यांची सफर घडवतो.

 

७)शुद्ध देसी रोमान्स

 

सुशांत सिंग राजपूत आणि परिणीती चोप्राचा हा सिनेमा तुम्हाला प्रेमकथेसोबतच जयपूरच्या रंगीबेरंगी रस्ते,बाजारपेठांच आणि शहराची शान असलेला ‘राज मंदिर सिनेमा’ चं दर्शन घडवतो.

त्या शिवाय निळं शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जोधपूरचा मेहरेनगढ किल्ला आणि त्यावरून शहराचं दिसणार विहंगम दृश्य यात चित्रित केलं आहे.

जयपूर शहराचे इतके निरनिराळे दृश्य यात दिसतात की त्या जयपूर शहराला मुख्य कलाकारांच्या यादीत समाविष्ट सुद्धा करता येईल!

==

हे ही वाचा : खुद्द भारतात बॅन झालेले पण जगभरात नावाजलेले १० भारतीय चित्रपट

==

८)हाय-वे

 

हाय-वे हा केवळ एक सिनेमा नाही तर यात दोन जीवांचा प्रवास दाखवला आहे. प्रवासा दरम्यान उलगडणारा जीवनपट आणि फुलणारं नातं याचं सुंदर चित्रण यात आहे.

हिमाचल प्रदेश च्या दुर्गम सांगला व्हॅली चा प्रवास यात दाखवला आहे.याशिवाय आहु व्हॅली, चंदनवाडी,पेहेलगाम,काश्मीर च्या सुंदरतेचा नजारा यात दिसून येतो. हिरव्यागार पर्वतांपासून ,कच्छ च्या रणात चं उत्तम दर्शन यात प्रेक्षकांना घडतं.

 

९)दिल चाहता है

 

 

नव्वदी मध्ये जन्मलेल्या आणि २००२ च्या आसपास किशोर किंवा युवा वर्गात असणाऱ्या पिढीत या सिनेमाची प्रचंड क्रेझ आज ही आहे.

तीन वेगवेगळ्या स्वभावाच्या मित्रांची मस्ती, त्यांचे जीवनाकडे पाहण्याचे असलेले भिन्न भिन्न दृष्टीकोन तरीही मैत्रीच्या नात्यात एकत्र बांधली गेलेली त्यांची मनं याच उत्तम चित्रण यात पाहायला मिळतं.

फरहान अख्तर ने दिग्दर्शित केलेला हा सिनेमा गोव्याच्या वेगवेळ्या किनाऱ्याची मस्त सफर घडवतो.

 

१०)चेन्नई एक्सप्रेस

 

चेन्नई एक्सप्रेस ची कथा सांगण्यासारखी नाही, परंतु हा सिनेमा तुम्हाला गोव्याचा दूधसागर धबधबा, मुन्नार चे चहाचे मळे ते रामेश्वरमइथल्या नयनरम्य ठिकाणांचं दर्शन घडवतो.

दक्षिणेकडच्या सृष्टी सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी एकदा पाहण्यासारखा आहे हा सिनेमा.

 

११)बर्फी

 

रणबीर कपूर आणि प्रियांका चोप्रा यांचा प्रमुख अभिनय असलेल्या या सिनेमात दार्जिलिंग परिसराचं सुंदर चित्रण सिनेमात दिसतं. बर्फी ने ‘दार्जिलिंग’ ला लाँच केलं अस म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही!

दार्जिलिंग ची धुक्यात बुडालेली सकाळ ते चिखलातले रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली हिरवाई या सर्वांच उत्कृष्ट सिनेमॅटिक चित्रण रवि बर्मनने केलं आहे.

चित्रपटाची प्रत्येक फ्रेम ही अगदी नजाकततेने घडवल्याचा भास होतो. गावकडील निवांत जीवन, शांतता तिथला जगण्यातला संघर्ष ते दार्जिलिंगच प्रसिद्ध क्लॉक टॉवर, ग्लेनरी केफे आणि हिमालयन ट्रेन या सर्वांच उत्कृष्ट चित्रण आपल्याला पाहायला मिळत.

दार्जिलिंग हिल स्टेशन च्या सौंदर्याचा सिनेमात पुरेपूर वापर करून घेण्यात आला आहे.

==

हे ही वाचा :  हे ५ चित्रपट आजच्या काळात रिलीज झाले तर, त्यांना ‘बॉयकॉटचा’ सामना करावाच लागेल

==

१२)थ्री इडियट्स

 

२००९ ला प्रदर्शित झालेला राजकुमार हिरानी दिग्दर्शित आणि चेतन भगत च्या कथेवर आधारलेला सिनेमा उत्तम मनोरंजन करून जातो.

शिमला मधील चैल पॅलेस (जावेद जाफरी चे घर दाखवण्यात आले आहे ते) ते बंगलोर आयआयएम. यात लदाख चा प्यांगोंग तलाव सुद्धा चित्रित केला गेलाय!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version