' मोदी सरकारचा नवा कॅशलेस पेमेंट पर्याय- “भारत QR कोड” – समजून घ्या – InMarathi

मोदी सरकारचा नवा कॅशलेस पेमेंट पर्याय- “भारत QR कोड” – समजून घ्या

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

 

कॅशलेस युगाकडे आणखी एक पाउल म्हणून नुकतंच भारत सरकारने भारत QR कोड नावाने अजून एक कॅशलेस पेमेंट सिस्टम नागरीकांपुढे सादर केली आहे. हे जगातील पहिलं inter-operable payment solutionआहे हे विशेष!

National Payments Corporation of India (NPCI), Mastercard, आणि Visa यांच्या संयुक्त विद्यमानाने विकसित करण्यात आलेल्या भारत QR कोड पेमेंट सिस्टमचा वापर करताना दुकानदारांना अनेक QR कोडचा वापर करण्याची गरज नाही. याउलट एकच QR कोड डिस्प्ले करून ते त्या मार्फत ग्राहकांकडून पेमेंट घेऊ शकतात. म्हणजे आता ग्राहकांना स्वाईप वगैरे करण्याची गरज भासणार नाही उलट “scan to pay” केल्याने व्यवहार अजून सुलभ होणार आहे.

अश्या या आणखी एका क्रांतिकारी बदलाबद्दल इत्यंभूत माहिती आज जाणून घेऊया.

Bharat-QR-code-marathipizza00

स्रोत

भारत QR कोड नक्की काय आहे?

QR कोड म्हणजेच Quick Response code बद्दल तुम्हाला वेगळ्याने समजावून सांगायची गरज नाही. काळ्या आणि पांढऱ्या रेषांनी भरलेले हे QR कोड आपण अनेकदा पाहतो. स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याने ते रीड केले जातात. PayTM, MobiKwik, Freecharge आणि Oxigen यांसारख्या खाजगी ई-वॉलेट कंपन्यांनी यापूर्वीच मोबाईल वॉलेटमधून QR कोड च्या माध्यमातून पेमेंट करण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. याच संकल्पनेच्या आधारावर भारत QR कोडची निर्मिती करण्यात आली आहे.

Bharat-QR-code-marathipizza01

स्रोत

भारत QR कोड कसे काम करते?

याचा वापर करण्यापूर्वी दुकानदारांना गुगल प्ले स्टोरमधून त्यांच्या मोबाईलवर BHIM app डाऊनलोड करावे लागेल. हे app त्यांना त्यांच्या बँक खात्याशी लिंक करावे लागेल त्यानंतर QR कोड जनरेट होईल. हा QR कोड दुकानदार त्यांच्या दुकानामध्ये डिस्प्ले करू शकतात. म्हणजे जेव्हा कधी एखादा ग्राहक तेथून काही खरेदी करेल तर त्याला केवळ आपल्या स्मार्टफोनमधून तो QR कोड स्कॅन करावा लागेल आणि पेमेंट अमाउंट थेट दुकानदाराच्या बँक खात्यात जमा होईल.

Bharat-QR-code-marathipizza02

स्रोत

भारत QR कोडचे फायदे काय?

आता दुकानदारांना कार्ड मधून पेमेंट स्वीकारण्यासाठी PoS  मशीन्स बसवण्याची गरज नाही.

मुख्य म्हणजे डेबिट आणि क्रेडीट कार्ड पेमेंट सिस्टम पेक्षा भारत QR कोड पेमेंट सिस्टम अधिक सुरक्षित आहे. तसेच  यातून कोणत्याही प्रकारे ग्राहकाचा डेटा चोरला जाऊ शकत नाही असा दावा देखील केला जातोय.

इतर QR code-based  पेमेंट पेक्षा भारत QR कोड वेगळं आहे का?

हो. भारत QR कोड हे काहीसं वेगळं आहे. जर तुम्ही PayTM, MobiKwik, Freecharge आणि Oxigen यांसारख्या खाजगी ई-वॉलेट कंपन्यांच्या मोबाईल वॉलेटमधून QR कोड सिस्टमचा वापर केला तर त्यात तुम्हाला inter-operable payment solutions मिळत नाही. उदाहरणार्थ, PayTM युजर केवळ दुसऱ्या PayTM युजरलाच पैसे पाठवू शकतो. पण भारत QR कोड मध्ये अशी कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. तसेच तुम्ही  MasterCard, Visa किंवा RuPay यावैकी कोणत्याही माध्यमाचा पेमेंट साठी वापर करू शकतो. अजून एक फरक म्हणजे खाजगी ई-वॉलेट कंपन्यां बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करताना फी चार्ज करतात. पण भारत QR कोड फ्री ऑफ कॉस्ट कोणत्याही बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्याची मुभा देते.

Bharat-QR-code-marathipizza03

स्रोत

कोणकोणत्या बँक्स भारत QR कोड सुविधा देतात?

SBI, Axis Bank, Bank of Baroda, Bank of India, Citi Union Bank, Development Credit Bank, Karur Vysya Bank, HDFC Bank, ICICI Bank, IDBI Bank, RBL Bank, Union Bank of India, Vijaya Bank आणि Yes Bank यांसारख्या बहुतांश अग्रगण्य बँकांनी भारत QR कोड सिस्टमचा स्वीकार केलेला आहे.

इतर बँका देखील लवकरात लवकर या पेमेंट सिस्टमला सपोर्ट करण्यास सुरुवात करतील.

भारत QR कोडचे तोटे काय?

सर्वात मोठा तोटा दुकानदारांसाठी आहे तो म्हणजे त्यांना प्रत्येक ट्रान्सॅक्शनसाठी बँकेला merchant discount rate किंवा MDR चार्ज द्यावा लागणार आहे.

BHIM app ची देखील काही मर्यादा आहे. BHIM app मधून दिवसाला केवळ २० हजार रुपयेच ट्रान्स्फर करता येतात. आणि एका वेळेस एका ट्रान्सॅक्शनला केवक्ल १० हजार रुपये ट्रान्स्फर करता येतात.

भारत QR कोड साठी स्मार्टफोन आणि इंटरनेट असायलाच हवे.

Bharat-QR-code-marathipizza04

स्रोत

भारत सरकारच्या या नव्या पाऊलावर नागरिक किती पाऊले ठेवून चालतात हे येणाऱ्या कळत स्पष्ट होईलच!

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?