Site icon InMarathi

या पुस्तकांतून दिसणारं महाभारताचं “हे” रूप तुम्ही कधीही बघितलं नसेल

palace of illusion inmarathi 1

poojajagtiaani.blogspot.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सध्या लॉकडाउनमध्ये महाभारत आणि रामायण या मालिकांनी प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली. आता महाभारत जाणून घेण्यास लोक अधिक उत्सुक झाली आहेत.

महाभारताला भारतीय संस्कृतीत एक अनन्य साधारण महत्व आहे. ह्या जगात चांगलं, वाईट जे काही हे ते महाभारतात आहे. महाभारत हा आपल्या संस्कृतीचा गाभा आहे. ह्यातील घटना आणि व्यक्तींना प्रमाण मानून आज ही अनेक जण वागत असलेले आपण बघतो.

“प्रेम, सुड, काम, पुत्रकर्तव्य, निष्ठा, मैत्री ह्या सर्व गोष्टी आपल्याला महाभारतात दिसतात”

 

amarujala.com

 

महाभारत व्यासांनी जसे घडले तसे लिहून ठेवले आहे. ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीरेखेची स्वतःची अशी खासियत आहे. पुढे वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळ्या व्यक्तिरेखेवर आपापल्या आकलन क्षमतेनुसार पुस्तके लिहिली.

काहींनी महाभारतात असलेल्या वास्तुस्थितीनुसार तर काहींनी महाभारतातील संदर्भांचा स्वतः आकलन करीत काल्पनिक पुस्तके लिहिली.

यातील काही पुस्तकांवर आक्षेपही घेतला गेला, तर काही पुस्तकांचे खूप कौतुकही केले गेले. महाभारताला समोर ठेऊन आपल्या कल्पनेने लेखकांनी ही पुस्तकं लिहिली, आणि शेवटी ” जे न देखे रवी, ते देखे कवि” असं म्हटलंच आहे.

या पुस्तकांनी महाभारतकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला. जाणून घेऊया आजच्या लेखात अशा काही पुस्तकांबद्दल…

 

1) द पॅलेस ऑफ इल्यूजन – चित्रा बॅनर्जी 

 

timesofindia.com

 

हे पुस्तक आपल्याला द्रौपदीच्या दृष्टिकोनातून महाभारताचे दर्शन घडविते. ह्यात द्रौपदी चा जन्म, तिचे एकाकी बालपण, तिचं कृष्णा बद्दल निर्मळ आणि गूढ नातं, पाच पती लादल्यावर तिच्या मनाची होणारी घालमेल असं ह्या पुस्तकात विस्ताराने दिले आहे.

द्रौपदी आणि शिखंडी बद्दल झालेल्या संवादात इथे लेखिका लिहितात, शिखंडी द्रौपदी ला उद्देशून म्हणतो,

“सूड हाच माझा धर्म होता, माझा सूड घेण्यास मी कुणा पुरुषाची वाट पाहिली नाही, वाट पाहिली असती तर सूड घेताच आला नसता”

 

2) जया – देवदत्त पटनायक

 

tangledtourista.com

 

ह्या पुस्तकामध्ये लेखकाने बऱ्याच महाभारतातील घटनांना वैज्ञानिक संदर्भ दिला आहे. लेखकाच्या मते, “पांडवांचा जन्म हा नियोग क्रियेने झाला आहे. कुंतीची व माद्री ची चीवेगवेगळ्या पुरुषांबरोबर नियोग क्रिया झाली व पांडवांचा जन्म झाला.”

ह्यात पुस्तकात लेखकाने अतिशय खळबळजनक दावा केला आहे की, युधिष्ठिराने द्रौपदीला किचकाबरोबर संबंध ठेवण्यास सांगितले होते.

ह्यात लेखक असा दावा करतात की, अज्ञातवासात असताना जेव्हा सैरेंध्री जेव्हा कंकाला किचकबद्दल सांगते तेव्हा कंक म्हणजे युधिष्ठिर तिला गप्प राहण्यास सांगतो. कारण अज्ञातवास पूर्ण झालेला नसून आताच काही केल्यास पांडवांची ओळख उघडी पडण्याची भीती होती.

 

3) अजेय सिरीज – आनंद नीलकंठ

 

Anand Neelakantanfacebook.com

 

ह्या सिरीज मध्ये २ पुस्तके आहेत, राईज ऑफ कली आणि रोल्स ऑन द डाईस. ही पुस्तके दुर्योधनाच्या दृष्टिकोनातून आपल्यासमोर महाभारत मांडतात. ह्या पूर्ण सिरीज मध्ये दुर्योधनाला सुयोधन ह्या नावाने संबोधिले आहे.

ह्या पुस्तकात सांगितले आहे की एकलव्य हा शंकराचा अवतार होता आणि पुढे चालून एकलव्य शंकरवतारात अर्जुनाला पशुपतास्त्र देतात.

 

४) कर्णपत्नी उरुवी – कविता काणे

 

sanjeevkotnala.com

 

हे पुस्तकात कर्णाची तिसरी पत्नी उरुवी वर असून ह्यात कर्ण किती थोर होता हे दाखविले आहे. कर्णाला उरुवी ने प्रथम द्रौपदी स्वयंवरवेळी पाहिले आणि ती त्याच्या प्रेमात पडली. क्षत्रिय असून ही तिने तेव्हा सुतपुत्र असलेल्या कारणही विवाह केला.

ह्या पुस्तकात दावा केला आहे की द्रौपदी चे कर्णावर प्रेम होते, व तिने स्वयंवरात कर्णाला नाकारून चूक केली असा तिला पश्चाताप झाला.

 

५) युधिष्ठिर आणि द्रौपदी – पवन के वर्मा

 

madrasshoppe.com

 

हे पुस्तक युधिष्ठिरावर असून ह्यात युधिष्ठिराच्या व्यक्तिरेखेवर प्रकाश टाकला आहे. ह्या पुस्तकाचे ३ भाग आहेत.

पहिल्या भागात युधिष्ठिराचा द्रौपदी आहि विवाह होतो, युधिष्ठिराचे द्रौपदी वर अतोनात प्रेम आहे. लग्नानंतर दोघे एकांतात असताना दोघे एकत्र येतात, समागम करीत असताना द्रौपदीला सुख प्राप्त होत नाही.

दुसऱ्या भागात यक्ष प्रश्न प्रसंग अतिशय खोलात दिला असून शेवटी युधिष्ठिर चार ही भावांचे प्राण वाचवतो तर तिसऱ्या भागात दोघे पुन्हा एकत्र येतात व द्रौपदीला सुख प्राप्त होते.

 

६) अर्जुन – अजेय योध्याची गाथा – अनुजा चंद्रमौळी

 

kobo.com

 

ह्या पुस्तकात अर्जुनाच्या आयुष्यावर प्रकाश टाकला आहे. अर्जुनाचे बालपण, धनुर्विद्या , गीताज्ञान प्राप्ती असे सगळे प्रसंग अतिशय छान रंगविले आहेत.

ह्या पुस्तका प्रमाणे अर्जुनाचा मृत्यू त्याच्या मुलाच्या “बब्रुवाहन च्या हातून होतो”

मित्रानो वरील माहिती ही त्या त्या पुस्तकात दिलेली आहे जी आम्ही तुमच्या समोर मांडलीये. महाभारत हे आपणा सर्वांसाठी पूजनीय आहेच आणि राहील. आपण ही पुस्तके वाचून एक वेगळे पैलू वाचून आणि समजून घेऊ शकता.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version