Site icon InMarathi

आधुनिक शस्त्रास्त्रांचा साठा असूनदेखील टिपूला आपले प्राण गमवावे लागले

tipu sultan rocket featured inmarathi

thebetterindia.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारतीय पुरातत्व खात्याचे खोदकाम आणि शोध –

स्टेट आर्किओलॉजी डिपार्टमेंटचे असिस्टन्ट डायरेक्टर आर.एस. नायका यांच्या म्हणण्यानुसार टिपू सुलतानजवळ शेकडो रॉकेट्स होते आणि ते ठेवण्यासाठी त्याच्या सैन्याजवळ श्रीरंगपट्टणम येथे विशेष जागा होती.

हे श्रीरंगपट्टणम बंगळूरहून १२० किमीवर दक्षिणेकडे आहे.

त्यांनी सांगितले की, शिवमोगा जिल्ह्यातील नागराजवळ बिदानुरू किल्ल्यात टिपुच्या एक हजारहून अधिक रॉकेट्स विखुरलेल्या सापडल्यात.

२००२ च्या आर्किओलॉजी विभागातर्फे चाललेल्या खोदकामात जवळपास १६० न वापरलेल्या परंतु गंजलेल्या अवस्थेत असलेल्या रॉकेट्स सापडल्या होत्या.

त्यानंतर पाच वर्षांनी म्हणजे २००७ मध्ये त्या टिपू सुलतानच्या काळातील असल्याचे सिद्ध झाले होते.

 

हे ही वाचा – हेच ते ३ विश्वासघात – ज्यांमुळे भारतावर ब्रिटिशांचं जुलमी राज्य आलं

म्हणून मग तिथे अजून खोदकाम करून त्या किल्ल्यात दारूगोळा वगैरे अजून सापडतोय का याचा शोध घेतला गेला होता.

नायका पुढे म्हणाले, की तिथे अजून शोधकाम केल्यानंतर तिथे एका कोरड्या विहिरीत पोटॅशियम नायट्रेट, चारकोल, मॅग्नेशियम पावडर यांनी भरलेले रॉकेट्स मातीच्या ढिगात फसलेले सापडले होते.

२०१८च्या मध्यावर जुलैमध्ये तीन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर तिथल्या जमिनीत अडकलेले दारूगोळ्यांनी भरलेले रॉकेट्स उकरून काढण्यात यश आले.

हे रॉकेट्स गंजलेल्या स्थितीत होते. शिवाय ते विहिरीच्या तळाशी भूमिगत जागेत सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवले होते हे देखील लक्षात आले.

शिवमोगा येथील म्युझियममध्ये आजही बघायला मिळतात हे रॉकेट्स –

हे रॉकेट्स आजही तुम्ही शिवमोगा येथील पुरातत्व विभागाच्या म्युझियममध्ये ठेवलेले पाहू शकता. यात लोखंडी आवरणवाले रॉकेट्सही आहेत.

 

 

त्यापैकी काही टिपूच्या कारकिर्दीनंतर केलाडी राजवंश आणि मैसूर येथील वडियार राज्यकर्त्यांच्याही असू शकतात.

हे रॉकेट्स वेगवेगळ्या आकारातले होते. अगदी २३-२६ सेंमीपासून ते १२-१४ इंचापर्यंतचे होते.

म्हेसूरचा सुलतान टिपू सुलतान हा राजा इतर राजांपेक्षा वेगळा होता, तो प्रयोगवादी राजा होता.

तो आपल्या सेनेसाठी आणि जनतेसाठी वेगवेगळे प्रयोग नेहमी करत असे, आणि म्हणूनच तो एक वेगळा राजा म्हणून ओळखला जातो.

टिपू सुलतान आणि त्याची कारकिर्द –

टिपु सुलतानचं पूर्ण नाव होतं – फतेह अली साहब टिपू आणि त्याच्या वडिलांचं नाव होतं हैदर अली, तर आईचं नाव होतं फातिमा फखरुनिशा.

टिपू सुलतान हा ‘मैसूर टायगर’ या नावानेही ओळखला जात होता. त्याचा जन्म २० नोव्हेंबर १७५० साली झाला होता. मृत्यु ५ मे १७९९ साली झाला.

 

 

टिपू हा इंग्रजांशी दोन हात करणारा बहाद्दूर योद्धा म्हणूनही ओळखला जातो. इंग्रजांविरुद्धच्या चौथ्या लढाईत मैसूरजवळच्या श्रीरंगपट्ट्णम येथे त्याचा मृत्यु झाला.

टिपू सुलतानने आपल्या राजकीय कालावधीत अनेक प्रयोग केले. त्याच्या या स्वभावामुळेच त्याला अनेक पदव्या मिळाल्या. प्रशासकीय बदल करून त्याने आपले राजकीय धोरण प्रगतीशील ठेवले.

त्याचा फायदा असा झाला की त्याच्या सेनेची युद्ध करण्याची क्षमता देखील अधिक चांगली होती.

रॉकेटचा शोध लावण्याचे श्रेय देखील टिपूलाच जाते. हे रॉकेट्स विकसित करण्यासाठी टिपूने फ्रेंच सैन्याची मदत घेतली. या फ्रेंच सैन्याला युरोपमध्ये नेपोलियन बोनापार्टच्या नेतृत्वाखाली युद्ध करण्याचा अनुभव होता.

त्या युद्धांमध्ये असे रॉकेट वापरले जात होते. टिपू सुलतानच्या अधिकतर लढाया या इंग्रजांच्या विरुद्धच झाल्या. आणि त्यातील शेवटच्या लढाईत तो मृत्यू पावला.

 

 

हैदर अली –

खरंतर टिपू सुलतानच्या वडिलांपाशीच म्हणजे हैदर अली यांच्यापाशीच ५०हून अधिक रॉकेटमन होते असं म्हटलं जातं. या रॉकेटमेनचा वापर टिपू युद्धात मोठ्या कौशल्याने करून घेत असे.

हे रॉकेटमन अचूक निशाणा साधण्यात एक्स्पर्ट होते. त्यामुळे प्रतिपक्षाचं खूप नुकसान होऊन टिपूला जिंकण्यात मदत होत असे.

टिपू सुलतानच्या कार्यकाळातच मैसूर येथे पहिलं लोखंडाचं मिसाईल रॉकेट विकसित करण्यात आलं होतं. खरंतर हे रॉकेट टिपूच्या वडिलांच्या म्हणजेच हैदर अली यांच्या आदेशावरून बनवण्यात आलं होतं.

त्यानंतरही टिपूने या रॉकेटमध्ये वेळोवेळी बदल करून त्याची क्षमता वाढवत नेली.

टिपूच्या कार्यकाळात या रॉकेट्सचा वापर सर्वात अधिक इंग्रजांच्या विरोधात केला गेला. त्यामुळे इंग्रज सेना टिपू सुलतानला घाबरून असायची.

१८ व्या शतकातच टिपूने या मिसाईल रॉकेटचा यशस्वी वापर करून इंग्रज सेनेला सळो की पळो करून सोडले होते.

 

हे ही वाचा – क्रांतिकारी की कट्टर धर्मांध, अहंकारी शासक? म्हैसूरचा राजा – टिपू सुलतान!

टिपूने या मिसाईल रॉकेट्सच्या देखभालीसाठी एक वेगळं युनिटही तयार केलेलं होतं. तिथे हे रॉकेट्स बनत आणि त्यांची दुरुस्ती होऊन नीट ठेवले जात.

बाम्बूपासून बनलेले रॉकेट्स –

टिपूचे हे रॉकेट्स सुरुवातीच्या काळात बांबूपासून बनवलेले असत. हे रॉकेट २०० मीटर पर्यंत हवेतून उडून जाऊन पडत. त्यांना उडवण्यासाठी २५० ग्रॅम दारूगोळा लागत असे.

मात्र बांबूपासून बनलेले हे रॉकेट जळून जाण्याची शक्यता अधिक असे. म्हणून त्याने नंतरच्या काळात लोखंड धातूपासून हे रॉकेट बनवायला सुरुवात केली.

हे रॉकेट पूर्वीपेक्षा अधिक अंतर पार करून जाऊ शकत होते आणि यांच्यात अधिक दारूगोळा भरला जाऊ शकत होता. त्यामुळे आता पूर्वीपेक्षा शत्रूसैन्याची अधिक हानी करता येऊ लागली होती.

 

 

आधुनिक रॉकेट्सचे जनक रॉबर्ट गोडार्ड याने देखील टिपू सुलतान यालाच रॉकेटचा पहिला जनक म्हणून मान्यता दिलेली आहे.

टिपू सुलतानने विकसित केलेल्या या रॉकेट्सना ‘तकरनुखसाक’ हे नाव दिलेले होते. हा एक फारसी शब्द आहे.

असं म्हटलं जातं की टिपू सुलतानच्या मृत्युनंतर इंग्रजांनी त्याचे हे रॉकेट्स इंग्लंडला पाठवून दिले.

इंग्लंडमधील रॉयल वूलविच आर्सेनल मध्ये या रॉकेट्सवर प्रयोग करून त्यांना अधिक विकसित करण्यात आलं आणि त्यातून आधुनिक रॉकेट्सची निर्मिती केली गेली.

त्यानंतर इंग्रज देखील आपल्या युद्धांमध्ये या विकसित रॉकेट्सचा यशस्वी वापर करू लागले आणि जिंकू लागले होते.

इंग्रजांनी टिपू सुलतानच्या या शोधावर पुढे बराच रिसर्च केला आणि त्यातून आताचे विकसित रॉकेट बनत गेले.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version